मुलांच्या वर्तणूकीच्या समस्या आणि आपण-५-अंतिम

Submitted by मोहिनी१२३ on 9 July, 2020 - 09:40

भाग १: https://www.maayboli.com/node/75446
भाग २: https://www.maayboli.com/node/75447
भाग ३- https://www.maayboli.com/node/75462
भाग ४-https://www.maayboli.com/node/75469

आता मात्र आम्ही ठरवलं होतं की मुलाची treatment चालू करायची,मध्ये थांबवायची नाही आणि डॅाक्टर शक्यतो बदलायचे नाहीत.

आम्ही मुलाला treatment करिता तयार करू लागलो. त्याला २-३ गोष्टी सांगितल्या.
१. आपण आजारी पडल्यावर काही घरगुती उपचार करून फारसा उपयोग होत नसेल तेव्हा डॅाक्टरांकडे जातो तसेच आपण आत्ता जाणार आहोत.
२. आजारी पडल्यावर त्यातून बरे होण्याकरिता आपण पथ्य,विश्रांती, औषधे , काही नियम पाळतो, तसेच या साठी पण काही तात्कालिक तर काही कायमचे नियम पाळणार आहोत.
३. तू जसा तुझ्या डॅाक्टर मावशींशी गप्पा मारतोस तसेच या नवीन डॅाक्टरांशी पण मोकळेपणाने बोललास तरी चालेल.

आमच्या वाचण्यात डॅा. भूषण शुक्ला यांचे पेपर/website वरील लेख, FB Posts, Tweets आले होते. ते पुण्यातील एक नावाजलेले Child & Adolescent Psychiatrist आहेत. त्यांच्या लेखांवरून ते यातून आम्हाला योग्य प्रकारे बाहेर काढतील असा विश्वास वाटला. तसेच त्यांचे clinic comprehensive services असलेले आहे व आमच्या जवळच्याच भागात आहे . या सर्व कारणांमुळे आम्ही त्यांच्याकडे जायचा निर्णय घेतला.

या treatment चे आर्थिक नियोजन आम्ही सुरू केले. जर आपल्या नियोजनापेक्षा जास्त खर्च झाला तर आपल्या सर्वांना काटकसर करावी लागेल हे मुलालाही सांगितले.

Appointment आम्हाला आमच्या सोयीची वेळ हवी असल्याने(रात्री ७ नंतर) सुमारे १.५ महिन्यानंतरची मिळाली. आम्ही त्यांना कधीही मध्ये ७ नंतरचा slot अचानक मोकळा झाला तर कृपया आम्हाला सांगा ही विनंती त्या वेळी केली.त्यानंतर १ महिन्याने पावसामुळे मुलाच्या शाळेला अचानक २ दिवस सुट्टी मिळाली. त्या दिवशी मी clinic ला फोन केला आणि आम्हाला पुढच्याच दिवसाची appointment मिळाली.

दुसर्या दिवशी आम्ही तिघेही तिथे वेळेवर पोचलो. त्यांनी आम्हाला तिघांनाही आत बोलावले. मुलाला बघितलं, त्याला थोडं relax करण्याचा प्रयत्न केला. नंतर त्याला बाहेर पाठवून आम्हाला बोलायला सांगितलं. आमचं थोडं बोलणं त्यांनी ऐकल्यावर बोलणं मध्येच थांबवून २ दिवसांनी आम्हाला दोघांनाच यायला सांगितलं. या सेशन चे त्यांनी charges घेतले नाहीत.
२ दिवसांनी आम्ही परत गेलो.त्यावेळी त्यांनी आम्हाला आमची parenting style विचारली. त्यांनी आम्हाला प्रामुख्याने खालील गोष्टी सांगितल्या.
१. मुलाने काही बाबतीत पालकांचे विनाशर्त ऐकलेच पाहिजे.
२.आम्ही मुलाला शांतपणे पण ठामपणे शिस्त लावली पाहिजे.
३.mobile usage हा कमीत कमी पाहिजे.
४.आहारातील गोड पदार्थांचे( including गूळ) प्रमाण अगदी कमी करायला सांगितले.
५.या वयात मुलाला इतकं सांगायची/विचारायची गरज नाही.

त्यांनी आम्हाला संगीता करमरकर (occupational therapist) यांची सेशन्स चालू करायला सांगितली व ही सेशन्स संपल्यावर परत भेटायला बोलावले.
यावेळी आमचे २५००/- झाले.

त्यानंतर करमरकर मॅडम यांची आम्हाला एका आठवड्यानंतरची appointment मिळाली. त्यावेळी त्यांनी मुलाच्या बाबांशी आणि त्याच्याशी वेगवेगळे बोलावून गप्पा मारल्या. मुलाला skipping, jumps, reading, climbing अशा काही गोष्टी करायला सांगितल्या.त्यावेळी त्यांनी ८-१२ sessions(आठवड्याला १) लागतील असं सांगितलं. प्रत्येक session ४५ मिनिटांचे असेल. ६ व्या सेशन नंतरच त्या आमच्याशी बोलतील असे सांगितले. एकाही आठवड्यात सेशन बुडवू नका , २ सेशन्स मध्ये जास्त अंतर पडले तर परिणाम कमी होतो असे त्यांनी सांगितले. त्यांच्या एका सेशन चे charges पूर्वी ४००/- व नंतर ४५०/- झाले होते.त्याची एकूण १० सेशन्स झाली.त्यात त्यांनी काही लिखाण-वाचनाची ही सत्रे घेतली.त्यात त्यांनी निरीक्षण करून त्याला लिहीताना पेन्सिल जरा मागे धरायची व वाचताना त्याला शक्यतो मध्ये चूक दुरूस्त करून disturb करायचं नाही,एका लयीत त्याला वाचून द्यायचे असे आम्हाला सांगितले.

आम्ही डॅाक्टरांच्या सुचना पाळायला सुरवात केल्यावर त्याचा आक्रस्ताळेपणा/mobile time खूप कमी झाला. तो शांतपणे आमचे ऐकू लागला.(listen+obey). सेशन्स मुळे त्याचा focus, attention span, concentration वाढले.

या शाळेत पहिल्यापासूनच त्याची शैक्षणिक,खेळातील प्रगती अतिउत्तम (९५%-१००% गूण, धावण्यात सुवर्णपदक इ.) आहे. लिहीणे व्यवस्थित पूर्ण होत आहे.वाचन छान करतो असे शेरे त्याला मिळत आहे.इतर गोष्टींमध्ये ही रस घेत आहे.

Class Teacher यांनी पहिल्या मिटींग मध्ये त्याचे disturbing nature आहे असे सांगितले. त्यावेळी आम्ही त्याची treatment चालू केली आहे असं सांगितलं. त्यानंतरच्या meetings मध्ये त्या आमच्या मुलामधे काय सकारात्मक बदल झाला हे सांगून आमचे मनोबल वाढवायच्या.

मुलाची सत्रे संपल्यावर करमरकर मॅडम यांनी डॅाक्टरांना report पाठवला आणि आम्ही डॅाक्टरांना जाऊन भेटलो.अर्थात appointment खूप आधी घेऊन ठेवली होती.त्या मिटींग मध्ये त्यांनी मुलाला लिखाण/वाचन यात त्याला खरोखर काही अडचण येत आहे असं सांगितलं.पण सध्या व्यवस्थित चालू असल्याने काळजीचे कारण नाही.आम्हाला लक्ष ठेवलं पाहिजे हे नक्की हे ही सांगितले.

आम्हाला त्याचे लक्ष देणे/ऐकणे हे महिन्याभरातच खूप कमी झाल्याने करमरकर मॅडम यांच्या सत्रांची परत आवश्यकता वाटू लागली. पहिली सत्रे संपल्यावर १.५ महिन्यातच ही सत्रे सुरू झाली.यावेळी मात्र फक्त ६ सत्रे लागली. यावेळी मॅडम यांनी त्याच्याशी वागण्याच्या खालील tips दिल्या.
१. थोडक्यात आणि स्पष्ट सुचना
२.कारणमींमासा सांगणे
३.मुलभूत गोष्टींबद्दल ठाम रहाणे
४. त्याचा स्वभाव,उर्जा योग्य दिशेने वळवणे
५.शांत पण ठाम
६. Don’t try to mould against his basic nature (which will also keep changing)
७. आक्रस्ताळेपणावर लक्ष
८. He will keep surprising you and put you on toes.
९. Out of box thinking while dealing with him

त्यांनतर ६ महिने झाले पण अजून आम्हाला सत्रांची आवश्यक्ता भासली नाही. त्याची जिद्द ही खूप वाढली आहे. आम्हाला मॅडम यांनी सत्रे गरज लागली तर आणि तेव्हाच करा असे सांगितले आहे.

Treatment मध्ये खालील कारणांमुळे खीळ पडू शकतो. योग्य माणसाशी योग्य वेळी संवाद साधला/लवचिकता दाखवली/काही वेळा दुर्लक्ष केलं तर या अडचणी दूर होवू शकतात.
१.रिसेप्शनिस्ट/डॅाक्टर/थेरपिस्ट यांच्या बोलण्याचा टोन,सांगण्याची पध्दत न रूचणे.
२.आपल्याला पाहिजे असलेला दिवस/वेळ न मिळणे.आपण जर अगोदरच replacement slot मध्ये असू तर proactively बराच follow-up करावा लागतो.
३.आपल्याला डॅाक्टर/थेरपिस्ट यांचे काही मुद्दे/पध्दत न पटणे.
४.मुलामध्ये फार फरक न दिसणे/आता सगळं नीटच झालय असं वाटणं.
कोणत्याही परिस्थितीत treatment एकतर्फी बंद करू नये.

तसेच आम्ही नेहमी आमच्या बालरोगतज्ञांना updates देत राहिलो.त्यांनीही आम्हाला खूप आधार दिला,मार्गदर्शन केले.
त्याच्या ग्राउंडच्या सरांनाही आम्ही अशी treatment सुरू केली आहे असं सांगितलं.त्यांनीही त्याप्रमाणे त्याच्याकडून काही वेगळे व्यायाम/activities करून घेतल्या, आम्हालाही करून घ्यायला सांगितल्या.

सध्या तरी त्याला आवश्यक इतकं लिखाण-वाचन सहजरीत्या जमतयं, त्याच्या नवीन नवीन गोष्टी जाणून/करून बघण्याच्या वृत्तीशी लिखाण-वाचनाची सांगड जमली तर तो त्यात ही रस घेवून चांगली प्रगती करेल अशी आशा वाटते.

Lockdown phase मध्ये तर चिडचिड न करता आहे त्या साधनांसह नवनवीन गोष्टी करून आपला आणि दुसर्यांचा जीव कसा रमवायचा हे गणित त्याला चांगले जमले आहे.

समाप्त.

Group content visibility: 
Use group defaults

विषय महत्वाचा आहे.. लिहिताही अगदी मनापासून.
संगोपनाबद्दल डॉक्टरांची तुम्हाला पटलेली आणि उपयोगी पडलेली काही मते/टेक्निक्स जमल्यास सविस्तर सान्गा.

तुमच्या दर दहा मिनिटानी लेखात एक ओळ वाढवायच्या लेखापद्धतीशी वाचकांनी कसा ताळमेळ राखावा बरं?
दरवेळी 'बदलून' असे दिसले की आता काय ओळ वाढवली ते पाहायला लेख उघडण्याचे जीवावर येते आहे. विचार घटना पूर्ण लिहून लेख एकदाच पोस्ट करण्याबाद्दल विचार करा.

हो. मी_अनू.
धन्यवाद मी_अनू,धनवन्ती,मी अश्विनी

छान लिहिले आहे.
काही टिप्स मिळाल्या. काही आमच्या मुलीशीही रिलेट झाले. उदाहरणार्थ ती वाचताना मध्येच कर्रेक्ट करू नये हे आम्हीही तिच्याबाबत अनुभवाने शिकलोय.

कोणाला याची गरज पडल्यास त्याला येणारया अडचणींसोबत बजेटचाही अंदाज आला असेल

तुम्हाला आणि तुमच्या मुलाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

घन्यवाद jollyjui, ऋन्मेऽऽष.
सर्वांच्या प्रतिसादाने हुरूप वाढला आणि शिकायला ही मिळाले.
कोणी या टप्प्यातून सध्या जात असेल तर खूप खूप शुभेच्छा.

तुमची लेखमाला वाचली. यातल्या बर्‍याच गोष्टी रिलेट होताहेत. माझी लेक सात वर्षांची आहे. प्रचंड एनर्जी, एका ठिकाणी बसायचा कंटाळा, लिहायचा आळस हे फारच कॉमन दिसतंय या वयाच्या मुलांमध्ये. तिच्या शाळेनेही बरंच प्रेशर आणायचा प्रयत्न केला पण आम्ही फार मनावर घेतलं नाही. शाळा बदलायला लागेल का असं वाटत होतं, पण आता ठीक चाललंय. पुन्हा त्रास झाला तर या सगळ्या लेखमालेचा खूपच उपयोग होईल.
तुमच्या चिकाटीला सलाम आणि मुलाला शुभेच्छा!

मोहीनी, शेवट वाचतांना डोळे पाणावलेच. तुम्ही खूप धीराने घेतलेत. वेलडन!

नॉर्मल मुलांशी सुध्दा वागतांना समस्या येतात,
छान लेखमाला!

प्रांजळ अनुभव कथन, अवलोकन व विश्लेषण, छान लिहिताय. तुमचे चिकाटी व प्रयत्न जाणवतायत. इतरांनाही यातून मार्गदर्शन होईल. तुम्हाला व तुमच्या बाळा ला शुभेच्छा

मी तुमचे सगळे लेख वाचले. चांगले लिहिले आहेत.
काही शंका
डॉ शुक्लांनी पालक म्हणून तुमच्या वागण्यातही बदल सुचवले असे दिसते. ते काय होते? काही चुकत होतं का?

occupational therapist आठ वड्याच्या सेशन्समध्ये मुलाकडून ज्या अ‍ॅक्टिव्हि टीज करून घेत त्या घरीही करायला सांगत का?
की ४५ मिनिटांच्या सेशनचा प्रभाव आठवडाभर टिकत होता?

धन्यवाद सामो, भरत.
डॉ शुक्लांनी पालक म्हणून तुमच्या वागण्यातही बदल सुचवले असे दिसते. ते काय होते? काही चुकत होतं का?—-आम्ही खूप जास्त मुलाच्या कलाने घेत होतो.
occupational therapist आठ वड्याच्या सेशन्समध्ये मुलाकडून ज्या अ‍ॅक्टिव्हि टीज करून घेत त्या घरीही करायला सांगत का?—-नाही
की ४५ मिनिटांच्या सेशनचा प्रभाव आठवडाभर टिकत होता?—-असं नक्की सांगणं अवघड आहे. मुलाच्या वागण्यातील सकारात्मक बदल हा आमचं बदललेले वागणे + सेशन्स+बदललेली शाळा+ repeat केलेले वर्ष + त्याची इच्छाशक्ती या सगळ्याचा एकत्रित परिणाम होता.

ओके.
रीडर्स डायजेस्टमध्ये वाचलेल्या एका लेखातली सूचना आठवली. ती इथे नोंदवतो. मुलांना सूचना देतानाआय काँटॅक्ट महत्त्वाचा आहे. दोघांचंही पूर्ण लक्ष त्या संवादात हवं.

ही उत्तम आणि उपयोगी माहिती इथे सविस्तर लिहिल्याबद्दल तुमचे अनेक आभार. अनेक पालकांना हे उपयोगी पडेल.

अनुभव कथन आवडले. तुम्ही दिलेली माहिती खूप उपयोगी आहे. तुमच्या मुलाला आणि तुम्हाला खूप शुभेच्छा!

अनुभव कथन आवडले. तुम्ही दिलेली माहिती खूप उपयोगी आहे. तुमच्या मुलाला आणि तुम्हाला खूप शुभेच्छा!
+१

Pages