राहून गेले...

Submitted by Pragalbha Prade... on 29 June, 2020 - 03:29

सरला वसंत कधीचा
बघ उमलणे राहून गेले
स्पर्शिले तुला हजारदा
जवळ घेणे राहून गेले

वाचीले जे डोळ्यांमधे
ते टीपणे राहून गेले
आठवणी खुडल्या एकाच रात्री
पानांचे दुमडणे राहून गेले

निरखले अनेकदा मला
ओळखणे पुरते राहून गेले
जसे अत्तर फासले मनगटी
त्याला हुंगणे राहून गेले

जतन केल्या शेकडो खुणा
जपणे तुला राहून गेले
जुन्या त्या खुणांचे
कोलाज करणे राहून गेले

कोण गुंतले कोणामधे
'गाठ' बांधणे राहून गेले
बघितले उशीराच वळूनी
मिळविणे तुला राहून गेले

शेवटी उमललो तुझ्यात मी
तसे तुझे येणे राहून गेले
नाते सांभाळता संवाद हरवले
तुझे-नि-माझे बहारणे राहून गेले

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

निरखले अनेकदा मला
ओळखणे पुरते राहून गेले

तुझे-नि-माझे बहरणे राहून गेले
ह्या लाईनी भावून गेल्या.
अजून येउद्या

जे भोगलय तेच लिहिलय. यात कौतूक ते कोणाच... तिने नाकारून जे केलं त्याचं, का माझच जे कौतूक चाललयं ते स्विकारू मी. कधी कधी जेव्हा माझं लिहिलेलंं मी वाचतो... डोळे भरून येतात. म्हणून मी स्वत: च सहासा वाचायला जात नाही जो त्रास झाला त्यामुळे तर लिहू शकलो. या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी एक अभंग / भजन लिहिण्याचा प्रयत्न केलाय कविता ग्रुप मध्ये पण कितीही टाळलं तिला तरी तिच्याबद्दल च्या विचारांना टाळणंं भलतं अवघड!! खरं तर सगळंं आलबेल असताना कोणी लिहीत नाही. ज्यांचे संसार सुखाने सुरु आहेत त्यांतील किती लोकंं आपल्या सौं वरती कविता करत असतील!! ... तसही मी आत्ता आत्ता शिकायला लागलोय. एक जण टेलिग्राम वर भेटला होता. आम्ही काही दिवस बोललो हिंदी मधून , कारण तो उत्तरेकडील होता. तो खूप वेळा बोललाय "भाई, बहोत दर्द है यार तुझमे","*********** ये मेरा व्हॉट्स अ‍ॅप का नंंबर है. अगर कुछ बोलना चाहो तो सिर्फ मेसेज कर दे." मग मी विचार केला अरे! साध्या बोलण्यातून जर कोणी आपल्याला सांगत असेल की बहुत दर्द है तुझमे, तर आप्ल्याला हे सगळ उतरवलं पाहीजे कुठे तरी. मग मी लिहायला लागलो. 25 एक कविता/ गझल लिहिल्या आहेत आत्तापर्यंंत डायरी मध्ये. पण अज्ञानामुळे नाही सांगू शकणार की किती कविता आहेत आणि किती गझला आहेत. म्हणून इथे नाही टाकत. मयेकर दादांनी काही मायबोली वरील संग्रहीत लेख दिलेत. गझल कशी असते, कशी जन्माला येते त्या बद्दल. फक्त निदान अजून 2-3 दिवस तरी लागतील मला पुढील गझल (नियमांना तंतोतत जुळणारी) लिहीण्यासाठी.
मला निदान या गद्य्या बद्दल सांगाल का? की आपण याला गझल म्हणू शकतो का? का ही कविता आहे?
धन्यवाद प्रभुदेसाई दादा... धन्यवाद अस्मिता ताई. मी लवकरच लिहीन गझल. तोवर जी माझी चार गद्द्ये आहेत त्यांचा अस्वाद घ्या. दोन गझल ग्रुप मध्ये आणि दोन कविता ग्रुप मध्ये आहेत. हे सगळंं सहानुभुती करता नाही लिहित मी. ज्या दिवसापासून आलोय त्या दिवसापासून इथल्या सगळ्यांना आपलं मानलय कारण वैभव जोशी कडून मायबोली बद्दल बरच ऐकल आहे. आणि कधी कधी ओळखीच्या, भेटलेल्या माणसांकडे मोकळं होण्यापेक्षा अनोळखी , कधीही भेट न झालेल्यांकडे मोकळं होण फायद्याच ठरतंं. तिथे भय नाही की याचा 'बोभाटा' होईल.

Tu nahi aur sahi
Aur nahi aur sahi
Badi lambi hai zami
Milenge laakh hasi
Sari duniya me sanam
Tu अकेली hi nahi
Mujhse tu aankh mila
Kya kami hai ye bata
हे जरा जमवा
हे असेच चालू राहिले तर आपण पुढे आपली एकही कविता वाचणार नाही.
घटका गेली पळे गेली तास वाजे ठणाणा /
आयुष्याचा नाश होतो दुसरे काहीतरी लिहा ना .
ह्या जगांत इतक्या इतक्या इतक्या करण्यासारख्या गोष्टी आहेत तिकडे बघाना.
बघा समजतंय का ,पटतंय का. नाहीतर आहेच रोते हुये जी लीया

कसल भारी बोललात . अजून स्मित आहे चेहर्‍या वरती. दादा खूप मस्त केली आहे. काश तुम्ही ग्रेस ना भेटले असता .

मी महाकवी दु:खाचा अस त्यानी लावल च नसत.
मी काही ओळी लिहिल्या होत्या युअरकोट डॉट कॉम.
वर त्यांना शब्दांजली म्हणून.

वाहता वारा थांबत नाही
धरला हात सोडवत नाही
काळाचं आभाळ पोकळं नाही
"भय इथले संपत नाही"

फिटली आस पुन्हा लागते
मिळाली वेळ आपुली नसते
गिळली तहान जळ देते
"मज तुझी आठवण येते"

'ग्रेस' निदान आपुली आपली भेट पुढील जन्मी व्हावी, इतुकी ओंजळ या जन्मी पुण्यभर असावी.