शाश्वत विकास म्हणजे काय? -भाग ३.१

Submitted by जिज्ञासा on 26 June, 2020 - 06:14

पहिल्या भागाचा दुवा: https://www.maayboli.com/node/75247
दुसऱ्या भागाचा दुवा: https://www.maayboli.com/node/75248

भाग ३: आपण काय करू शकतो? - नैसर्गिक संसाधनांचा वापर

डिस्क्लेमर - सध्याची परिस्थिती अत्यंत वेगळी आहे. या लेखात सुचवलेले सगळे उपाय आत्ता लागू पडतीलच असे नाही. सर्वांनी प्रथम आरोग्याची काळजी घ्या.

अमुक करा किंवा करू नका हे सांगणं सोपं असतं पण शेवटी प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार वागतो. तेव्हा असे घाऊक सल्ले दिले तरी प्रत्येकाने तो आपल्याला लागू होतो का ते पाहावे. अजून एक डिस्क्लेमर असा की जर एखादी गोष्ट चुकीची आहे असे म्हटले आणि जर तुम्ही ती गोष्ट करत असाल तर I am not judging you. शाश्वत विकास हा एक प्रवास आहे. यातील यश हे आपण कालच्यापेक्षा आज काही बदललो का या निकषावर मोजावे. मी देखील एक प्रवासी आहे आणि आपला प्रवास बरोबरच सुरु आहे.
या लेखमालेचा उद्देश हाच आहे की जर अज्ञानातून किंवा चुकीच्या माहितीच्या आधारे आपण काही पर्यावरणाला घातक गोष्टी निवडत असू तर त्याची जाणीव व्हावी आणि अधिक चांगल्या प्रकारे ही निवड करता यावी. यासाठी holistic approach हवा. जर आपण तात्पुरता विचार केला तर चुकीच्या गोष्टींची निवड केली जाते. ही अशी काही उदाहरणं पण आपण पाहूया.
मी इथे व्यक्ती अथवा कुटुंब या पातळीवर करता येणारे बदल यावर भर देणार आहे. सरकार, समाज, खाजगी आस्थापने यांच्या धोरणांमध्ये बदल हवे आहेत पण ते आपण शेवटी पाहू कारण यातील बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नाहीत. तेव्हा जे आपल्या हातात आहे ते प्रथम पाहूया.
या भागात आपण वस्तू आणि खाण्याच्या सवयी यावर भर देऊया. उर्जा आणि तिचा वापर याविषयी एका स्वतंत्र भागात लिहिण्याचा विचार आहे.

माणसाचा पृथीवरचा भार कमी करायचा असेल तर सर्वात उत्तम उपाय लोकसंख्या कमी करणे हा आहे. सुदैवाने जनजागृतीमुळे कुटुंब नियोजनाबद्दल लोकांना माहिती असली तरी या दृष्टिकोनातून लोकसंख्येचा विचार केला जात नाही. तो व्हायला हवा.
याविषयीचा एक चांगला लेख: https://www.sciencemag.org/news/2017/07/best-way-reduce-your-carbon-foot...

सुरुवातीला एक सोपा खेळ खेळू - कोणतीही एक समोर दिसणारी वस्तू घ्या आणि तिचे विश्लेषण करा - ती वस्तू कशाची बनली आहे, कुठे बनली आहे, तिला बनवण्यासाठी काय काय लागलं असेल, किती ऊर्जा लागली असेल, तिचं आयुष्य किती आणि जेव्हा ती वस्तू निरुपयोगी होईल तेव्हा तिचं काय होईल? याला टेक्निकल भाषेत life cycle assessment म्हणतात. उदाहरणार्थ माझ्या समोर केळं आहे - केळ्याचा भाग खाऊन त्याचे माझ्या शरीरात पचन होईल, साल हळूहळू मातीत मिसळून जाईल. एक शाम्पू चे पाकीट आहे - शाम्पू सांडपाण्याबरोबर नदीत जाईल. प्लास्टिकचे आवरण कचऱ्यात जाईल त्याच्या पुढे त्याचे काय होईल माहिती नाही. केळं आणि शाम्पूचं पाकीट दोन्ही मी बाजारातून आणलं आहे. या दोन्ही गोष्टींसाठी ऊर्जा खर्च झाली आहे. दोन्ही गोष्टी जर कचऱ्यात जाणार असतील तर केळ्याची साल जैविक कचरा असली तरी तो वाहून नेण्यासाठी अजून ऊर्जा खर्च होणार आहे. जर प्रत्येकाने किमान दहा वस्तूंचे असे life cycle analysis केले तर ह्या खेळातून आपल्याला अनेक वस्तूंच्या कार्बन फूटप्रिंटची कल्पना येईल.

जर आपल्याला चांगल्या निवडी करायला शिकायचे असेल तर प्रत्येक गोष्टीची अशी चिकित्सा करून बघा.
आपल्याला लागणाऱ्या सर्व गोष्टी या तीन प्रकारांत मोडतात - १. जीवनावश्यक (needs) २. आवडीच्या (wants) ३. चैनीच्या (luxury). या साऱ्या गोष्टींसाठी काही सोपे नियम आहेत जे आपल्यापैकी बहुतेकांना माहिती आहेतच. मी ते इथे जरा विस्ताराने उदाहरणासहित लिहायचा प्रयत्न करणार आहे.
१. Refuse - घेऊ नका. लॅपटॉप, कपडे, स्वयंपाकघरातील उपकरणे, इतर सामान. गरज नसेल तर घेऊ नका. जर आपल्याकडे तेच काम करणारी दुसरी वस्तू असेल तर मग मुळीच नाही. दुसरी पर्स, तिसरी चप्पल, पंधरावा ड्रेस, विसावे कानातले, छान दिसणारा कप. यात तुम्हाला परवडते का हा प्रश्न नाही. आपल्या आवडी आणि चैनीपायी आपण पर्यावरणाचे नुकसान करतो आहोत. आपल्या खरेदीच्या यादीत जर फक्त आवश्यक गोष्टी असतील तर आपला बराचसा फूटप्रिंट कमी होईल.

२. Reduce - जर एखादी वस्तू हवीच असेल तर तिचा वापर किती यावरून आपल्याला आवश्यक तेवढीच घेता येईल का हे बघता येईल. म्हणजे तीनवर एक फुकट असेल तर एकाच्या ऐवजी तीन वस्तू घेतल्या जातात. शिवाय घेताना स्वस्त use and throw गोष्ट घेण्यापेक्षा थोडी महाग मात्र अधिक टिकणारी वस्तू घ्या. Fast fashion म्हणजे Forever21 किंवा आपल्याकडचे फॅशन स्ट्रीट वरचे कपडे, चपला इत्यादी गोष्टींमुळे खूप प्रदूषण होते. यात अनेक नष्ट न होणारे अविघटनशील microfibers वापरलेले असतात. आपण दरवेळेस कपडे धुतो तेव्हा ते पाण्यात मिसळतात. असे पाणी कर्करोगासारख्या आजारांना निमंत्रण असते. आईचे दूध हे पौष्टिक मानतो पण काही ठिकाणी आईच्या दुधात देखील microplastics आढळून आली आहेत.
Fast fashion ची किंमत काय यावरचा एक लेख: https://edition.cnn.com/2020/05/03/business/cheap-clothing-fast-fashion-...
खरेदी करताना अजून काय निकषांचा विचार केला पाहिजे हे आपण नंतर सविस्तर बघूया.

३. Reuse - जर मला एखादी गोष्ट हवीच आहे. मग मला ती वापरलेली घेता येईल का? Garage sales, thrift stores, भारतात असाल तर नातेवाईक, मित्र मैत्रिणी, OLX आणि तत्सम apps इथे बघता येईल. तुम्ही काही काळ मागू शकता का, भाड्याने घेऊ शकता का? अमेरिकेत बहुतेक public libraries मध्ये अनेक गोष्टी भाड्याने मिळू शकतात.

४. Repurpose - हे आपण बहुतेक वेळा नकळत करतोच. पास्ता सॉसची बाटली मसाला भरायला, नको असलेल्या टी शर्टचे पुसायचे फडके इत्यादी. फर्निचर देखील बहूउपयोगी होऊ शकते.

५. Rot - जेव्हा एखादी गोष्ट नैसर्गिकरित्या नष्ट होणारी असते त्या गोष्टीला चांगल्या प्रकारे आणि योग्य जागी नष्ट करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ भाजीपाल्याचा कचरा जर ढीग करून anaerobic पद्धतीने कुजवला तर त्यातून घातक मिथेन वायू तयार होतो - यातून dumping site ला आग लागणे अशा घटना घडतात. मात्र हाच कचरा जर एखाद्या bioreactor मध्ये किंवा composting bin कुजवला तर त्यातून उपयोगी बायोगॅस किंवा खत तयार होते.

६. Recycle - जेव्हा वरील चारही पर्याय शक्य नसतात तेव्हा वापरायचा पर्याय म्हणजे रिसायकलिंग. मात्र दुर्दैवने हा पर्याय अधिक प्रसिद्ध आहे. Recycling should always be our last resort. कारण या प्रक्रियेला भरपूर ऊर्जा लागते आणि फार कमी वस्तू यशस्वीपणे रिसायकल करता येतात.

जीवनावश्यक खरेदी करताना

या भागात आपण प्रामुख्याने एक ग्राहक म्हणून आपण काय करू शकतो या विषयी चर्चा करू. जरी पहिला नियम refuse म्हणजे नकार द्या असा असला तरी आपल्याला दैनंदिन जीवनात अनेक गोष्टी विकत घ्याव्या लागतात. त्या खरेदी करताना आपण काही साधे सोपे प्रश्न विचारू शकतो का? तर हो. आपण जर खालील प्रश्न विचारले तर कोणतीही वस्तू घेताना आपण त्यातल्या त्यात कमी हानिकारक पर्याय निवडू शकू.

१. वस्तू पुनः पुन्हा वापरता येते का? - उदाहरणार्थ single use plastic bags च्या ऐवजी कापडी पिशव्या, प्लास्टिक straws ऐवजी स्टीलचे straws, earbuds ऐवजी कान कोरणं, बाटलीबंद पाण्या ऐवजी स्वतःची बाटली सोबत बाळगणं, प्लास्टिकचे cutlery वि. स्टील cutlery, पेपर नॅपकिन्स वि. रुमाल. आपण विचार करायला लागलो की आपल्याला या यादीत भरपूर भर घालता येईल. कधी कधी टिकावू वस्तू अधिक महाग असल्याने ती न घेता स्वस्त पर्याय घ्यावा असे वाटू शकते. मात्र दीर्घकालीन विचार केला तर चांगल्या गुणवत्तेची वस्तू अधिक चांगला परतावा देते. विशेषतः कपड्यांच्या बाबतीत फास्ट फॅशन नेहमी स्वस्त असते पण टिकावू नसते. त्या ऐवजी एखादा सुती कॉटनचा किंवा लिननचा (नैसर्गिक धाग्यापासून बनवलेला) शर्ट महाग असेल पण जास्ती टिकेल. There are many reasons why you should buy local sustainable clothes.

Related video: https://www.youtube.com/watch?v=sD0ADO1QnW0

२. वस्तू कुठून आली आहे? - विशेषतः शेतमालाच्या बाबतीत हा प्रश्न महत्वाचा आहे. जितक्या लांबून वस्तू येते तितका जास्ती कार्बन फूटप्रिंट. चहा, कॉफी, मसाले इत्यादी गोष्टी वगळता आपला आहार जास्तीत जास्त प्रादेशिक आणि ऋतू अनुसार असला पाहिजे. यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात. परदेशात सध्या Olio, too good to go, plant jammer अशी बरीच apps आपल्याला अन्न वाया न जाण्याचे पर्याय उपलब्ध करून देतात. मी यातलं कोणतंही app अजून वापरलं नाहीये त्यामुळे मला या विषयी फार अनुभव नाही.

आहाराच्या सवयी बदलणं सगळ्यात कठीण गोष्ट आहे. पण आपल्याला ऑल ऑर नन असा विचार करायचा नाहीये. छोट्या छोट्या कृतीतून सुरुवात करता येईल. उदा. मी रोज दही खाते त्या ऐवजी एका दिवसाआड खाईन, आठवड्यातून तीनदा मांसाहार करत असेन तर दोनदा करेन.बीफच्या ऐवजी चिकन खाईन. Meat substitutes खाऊन बघेन. एखादवेळी चीज घेणार नाही. पदार्थ तळायला तुपाऐवजी तेल वापरेन. हळूहळू का होईना या सवयी आपल्याला लागल्या तर आपण यशस्वी झालो! यात एक गोष्ट ही माझे स्वतःचे मत म्हणून मांडावीशी वाटते - व्हीगन होणे सोपे नाही पण व्हीगन होताना आपण जे पर्याय वापरू इच्छितो ते एकदा तपासून बघायला हवे. आपल्या घराशेजारच्या cage-free कोंबडीची अंडी की हजारो मैल प्रवास करून आलेला ऑलिव्ह ऑइल किंवा कोकोनट मिल्कचा कॅन या पैकी निवड करायची असेल तर कदाचित कोंबडीची अंडी अधिक चांगली ठरतील. अर्थात हे नेहमी लक्षात ठेवा की वनस्पतीजन्य पदार्थ हे सर्वात चांगले.
बरेचदा वस्तूंच्या sell by/best by dates ह्या overrated असतात. आपले अंदाज वापरून वस्तू खाण्यायोग्य आहे की नाही ते ठरवा.
इतर वस्तूंच्या बाबतीत देखील हेच धोरण ठेवता येईल. दर दोन वर्षांनी मोबाईल बदलण्याची गरज आहे का? काही गोष्टी विशेषतः electronic gadgets seocnd hand/refurbished घेता येतील का? कारण या वस्तूंच्या निर्मितीसाठी प्रचंड ऊर्जा आणि संसाधने खर्च होतात.

Related video: https://www.youtube.com/watch?v=xkG4jSbfReQ

३. वारंवार लागणारी कोणती वस्तू घ्यावी? - जसे कपड्यांच्या बाबतीत म्हणले तसेच अनेक बाबतीत पर्यावरणस्नेही पर्याय घेता येऊ शकतात. विशेषतः ज्या गोष्टी सतत लागतात. टूथब्रश, टूथपेस्ट, साबण, शांपू, मेकअपचे सामान, कपडे आणि भांडी धुण्याची पावडर किंवा लिक्विड सोप, फरशी पुसण्यासाठी वापरले जाणारे जंतूनाशकं - या साऱ्यांमध्ये असणारी रसायने पाण्याचे प्रदूषण करतात. आत्ताच्या परिस्थितीत कदाचित यातील काही गोष्टी unavoidable आहेत उदा. साबण. पण याचा भविष्यात विचार करता येईल.

४. वस्तूबरोबर काय येतेय? - आजकाल दुधी भोपळासुद्धा प्लास्टिक च्या आवरणात मिळतो. Zero waste packaging or zero waste shopping हे आपलं अंतिम ध्येय करा. भारतात असाल तर चांगल्या दर्जाचा सुटा माल प्लास्टिकच्या पिशवी शिवाय घ्यायचा प्रयत्न करा. घाणीचे तेल घरच्या डब्यात मिळते का याचा शोध घ्या. परदेशात असाल तर एखादे zero waste store किंवा co-op store किंवा whole foods सारख्या सुटा माल विकणाऱ्या दुकानांमधून खरेदी करता येईल का? जर पिझ्झा किंवा इतर पदार्थ बाहेरून मागवत असाल तर त्या बरोबर येणाऱ्या अनावश्यक packaging ला टाळण्याचा प्रयत्न करा. मी घरच्या डब्यातून भेळ, पाणीपुरी, डोसा या साऱ्या गोष्टी शक्य तेव्हा आणल्या आहेत. जर online shopping करणं अत्यावश्यक असेल तर त्यातल्या त्यात वस्तू एकत्र येतील असे बघा. शक्यतो आलेले packaging material sort करून व्यवस्थित recycle होतोय ना हे बघा. गरज नसेल तेव्हा अनावश्यक आवरणे टाळा. जर तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तर वस्तू कमीत कमी आणि प्लास्टिक विरहित packaging सकट कशी देता येईल याचा विचार करा.

आपल्याला सगळं जमायलाच पाहिजे असा अट्टहास नको पण शक्य तेवढे नक्की करायचा प्रयत्न करा. आपल्या प्रत्येक चांगल्या बदलाने फरक पडतो हे लक्षात ठेवा.

सर्व प्रकारच्या eco-friendly hacks साठी ही दोन छान युट्युब चॅनेल्स नक्की पहा.

Sustainably vegan (UK-based): https://www.youtube.com/channel/UCkq2gEWE-i647M71bh7zDxA

Plastic roti (India-based): https://www.youtube.com/channel/UCeJRs2NG2J1EoZn9jDJZJNw

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१ आणि २ यात आदर्शाच्या दिशेने माझी बर्‍यापैकी वाटचाल सुरू आहे.
४ सगळ्यात मोठा प्रश्न पॅकेजिंग मटेरियल व त्यातही धान्य व खाद्य पदार्थांची आवरणे हा आहे.

तुम्ही पहिल्या लेखापासून मांडलेले मुद्दे लक्षात घेतले तर पिशवीबंद तयार अन्न ज्यात बिस्किटांपासून सगळे स्नॅक्स पूर्णपणे वर्ज्य करायला लागतील. हा सगळा कचरा आम्ही वेगळा करूनच देतो. पण त्याच्या रिसाय कलिंगची योग्य व्यवस्था नाही. मनपाच्या मते हे स्थानिक पातळीवर रि साय कल व्हायला हवंय त्यामुळे ते वेगळा असा सुका कचरा घेत नाहीत. आणि त्यामुळे पुढच्या स्टेजला तोही ओल्या कचर्‍यासोबतच पुढे जातोय.

कचरा वाहून नेण्यावर खर्च होणार्‍या इंधनाचे आकडेही डोळे पांढरे करणारे आहेत, त्यामुळे याबाबत ठोस कृती आराखडे आणि न टाळता येण्याजोगं कर्तव्य मानला जाणारा नियम यांची गरज आहे.

मस्त लेख.
यातील बर्‍याच गोष्टी अंमलात आणायचा प्रयत्न करतो. रिपर्पज आणि नवी वस्तू घेण्यापुर्वी ती वापरलेली कोणी विकत आहे का हे बघणे आवर्जुन करतो. मुलांनाही हे शिकवतो.

लोकांचे विचार बदलण्यास कोणती पद्धत जास्त उपयोगी पडेल ह्याच्या वर पण विचार करणे अत्यावशक्या आहे.
सक्ती करून लोकांना बदलावे की समजावून त्यांनी बदल्याण्याची वाट बघावी .
मुंबई सारख्या शहरात विनंती करून सुद्धा ओला कचरा आणि सुका कचरा लोक वेगवेगळा जमा करत नव्हती शेवटी सरकारला सक्ती करावी लागली पण ती सक्ती पण गृहसंकुल पर्यंतच मर्यादित राहिली झोपड्या आणि चाळी इथे त्या सक्ती ची अमलबजावणसाठी योग्य यंत्रणा अस्तित्वात नाही.
वास्तू जास्त दिवस वापराव्या हे तुमचे मत योग्य च आहे पण प्रत्यक्षात तसे चित्र नाही.
मोबाईल पण तीन तीन असतात लोकांकडे एक कॉल करण्यासाठी,एक व्हॉटसअप साठी ,एक खासगी सवांद साधण्यासाठी.
सर्व खिसे भरलेले.
गाड्या ची पण तीच अवस्था .
एक गाडी भाजी पाला आण्यान साठी एक फिरण्या साठी आणि एक पाहुण्यांना ,आणि बाकी लोकांना दिपावण्यासाठी लक्सरी कार.
इथे सक्ती च कामाला येईल.

चांगला आहे हाही लेख!
यातल्या अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असते. घरी कंपोस्टिंग करते. 'मोअर मेगास्टोअर'मध्ये तांदूळ वगैरे सुटे मिळतात ते आणते. वगैरे. पण तरी अनेक वस्तूंंचं packaging येतंच घरी.
एक होता कार्व्हर पुस्तकात कार्व्हर लहानपणी ज्यांच्याकडे रहायचा त्यांंचं वर्णन असं होतं, की कॉफी आणि साखर वगळता त्या काहीही विकत घेत नसत Happy

सुंदर लेखमालिका. ह्या सर्व उपायात माझी ही एक भरः इंटरनेटचा वापर कमी करणे.
https://www.cwjobs.co.uk/insights/environmental-impact-of-emails/
इमेल बद्दल जास्त ओरड होत असली तरी सोशल मिडीया बद्दलही आक्षेप आहेत.
https://www.computerworld.com/article/3431148/why-data-centres-are-the-n...

सी, धन्यवाद! हो इमेल ने होणारे प्रदूषण हे एका नव्या वाढत्या प्रकारच्या प्रदूषणाची सुरूवात आहे असं वाटतं. जसे सुरूवातीला फारशा धोकादायक न वाटणाऱ्या साध्या साध्या सवयी (उदाहरणार्थ, स्ट्रॉ चा वापर) या आता किती मोठ्या समस्या निर्माण करत आहेत तसंच काहीसं या डिजिटल माहितीचं होणार आहे असं वाटतं. Sustainability demands a lot of lifestyle changes.

लेखातील विचार आणि त्या मागची तगमग योग्यच आहे.
आपले आयुष्य 30/ वर्ष राहिले आहे 100 वर्ष नंतर काय घडेल त्याचा विचार आता कशाला करायचा अशा विचाराची लोक ही जास्त आहेत.
माणूस हा हुशार प्राणी आहे पण तो तेवढंच बिनडोक प्राणी सुधा आहे.
गरजा कमी केल्या की उत्पादन कमी होईल आणि त्याचा परिणाम म्हणून ऊर्जेचा वापर कमी होईल हे विचार योग्य च आहेत.
आधुनिकता म्हणजे काय हेच लोकांना समजत नाही .
जगात पर्यावरण विषयी आता जागृती होत आहे पण स्वार्थी स्वभाव माणसाला ते विचार स्वतः आचरणात आण्यात रोखत आहेत..
विचार पडतात पण ते दुसऱ्या नी अमलात आणावेत ही भावना असते .
लोकसंख्या वाढ हा प्रश्न निसर्ग सोडवेल.प्रजनन क्षमता माणसाची कमी झाली आहे.लग्न करण्याचे वय वाढल्या मुळे मुलांची संख्या कमी होईल च.
आणि स्वतंत्र च्या नावाखाली मुल होवून न देणे हा विचार बळावेल .
लोकसंख्या कमी होणार काही वर्षात.
माणसाची वयो मर्यादा वाढली आहे ती 60 च्या दशकात ह्यांचा जन्म झाला आहे त्यांची .
राहणीमानात आलेल्या प्रचंड बदला मुळे माणसाचे सरासरी आयुष्य 40 वर नक्कीच येईल.

Hello. Our government is trying to remove India’s Environmental Impact Assessment (EIA). This will be made a law on June 30th. This means, industry can take up any land, pull down any forest, dam any river, start any project, dump anything, anywhere, anytime, without any oversight of Environmental law. Which means, we’re kaput!

Speak up now, or forever hold your breath (cause you wouldn’t want to breathe the air out there). Submit this letter at:

https://letindiabreathe.in/WithdrawDraftEIA2020#form1

Fill to send email, please. It’ll take you 1 minute. To tomorrow!

मस्त लेख

शाश्वत विकास आणि economical विकास ह्या दोन एकमेकाचा विरोधी गोष्टी आहेत. उदा एक कार भारतात तिचा आयुष्यात ५ मॅनयियर जॉब निर्माण करते. ज्यात कार डिज़ाइन , निर्माण , विक्री , वापर आणि विल्हेवाट लावणे हे सगळे आले. येत्या वर्षात निम्म्या लोकानी कार घेतली नाही तर खुप जण बेकार होतील भारताचा GDP 3% खाली येईल . त्यामुळे १००% implementation is challenging .

शाश्वत आणि economical विकास हे दोन्ही एकाच वेळी कसे होईल यावर जोर दिला पाहिजे. काही गोष्टीत ते शक्य आहे जसे कोळस्यावर विज निर्माण करण्याऐवजी विंड किंवा सोलर प्लॅट उभारणे. ईको- फ्रेंडली बिल्डीगी बाधंणे, ईत्यादी.

वर्क फ्रोम होम पण शाश्वत विकास देतो. प्रवास आणि. ऑफिस मधील विज वापर यात पण बरेच कार्बन फुटप्रिंट तयार होते ज्याची बचत होईल.

ड्रायव्हर ला पर्याय म्हणून सेल्फ ड्राईव्ह गाडी चे गुणगान चालू आहे .
त्या साठी असंख्य सेंसर,कॅमेरा,wifi, kiti तरी प्रकारे विजेचा वापर केला जाईल ही ऊर्जेचे नासाडी ह्याच सदरात च येईल.
आणि बेरोजगारी वाढेल हे वेगळे.
विकास आणि पर्यावरण.
की विकास आणि रोजगार असा दोन प्रकारे विकास ची तुलना ऊर्जा वापर शी करता येईल.
रोजगार विरहित विकास आणि त्या साठी होणारा बेसुमार विजेचा वापर माणसाच्या हिताचा नक्कीच नाही.l
उलट असा विकास बेरोजगारी निर्माण करून उपासमारी नी लोकांचे नुकसान तर करेल च आणि त्याच बरोबर ऊर्जेचा बेसुमार वापर करून पर्यावरण ला सुद्धा प्रचंड नुकसान पोचेल.
आणि हे फक्त काही व्यक्तींच्या च्या स्वार्थासाठी .ज्यांना पैसा म्हणजे संपत्ती असा भ्रम आहे.
पैसा म्हणजे एक कागदाचा तुकडा ह्या पलीकडे त्याला काही अर्थ नाही.
हवा,पाणी,आणि वनस्पती हीच खरी संपत्ती आहे
त्याचा दर्जा वाढवा.

नानबा, धन्यवाद! त्याच दिवशी लिंकवर जाऊन इमेल पाठवली होती. एक चांगली बातमी म्हणजे आता आपल्या सुचना आणि हरकती दाखल करण्याची मुदत वाढवून ११ अॉगस्ट केली आहे. तेव्हा आपण अजूनही इमेल पाठवू शकतो.
बातमीचा दुवा - https://www.livelaw.in/top-stories/delhi-hc-extends-time-for-filing-obje...

जीवीतनदी हा एक पुण्यातील काही जणांनी मिळून चालवलेला उत्तम उपक्रम आहे. याच्या एका ब्लॉग पोस्टमधे घरच्या घरी फळे आणि भाज्यांच्या सालींपासून fruit enzyme solution कसे बनवता येईल हे सांगितलं आहे. त्या पोस्टची लिंक - https://www.jeevitnadi.org/how-kirti-turned-fruits-and-vegetables-into-c...

साहील शहा, आजचा विकास हा विषमता वाढवणारा आहे. शाश्वत विकासात देखील उद्योगाच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. गाड्यांच्या ऐवजी जर प्रभावी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभी राहिली तर त्यातूनही उत्तम रोजगार निर्मिती होऊ शकते. It is not all or none approach. But if we strive for private sufficiency and public luxury when we plan for the development, then we will get much greater RoI in a more sustainable way.
The idea of public luxury was introduced by George Monbiot in his articles. https://www.theguardian.com/commentisfree/2017/may/31/private-wealth-lab...