महागुरू सचिन पिळगावकर

Submitted by कटप्पा on 10 June, 2020 - 11:54

एखादी क्षणिक भावना त्या क्षणाचे प्रतिनिधित्व करते पूर्ण आयुष्याचे नाही. हीरा यांनी मी अस्मिता यांच्या स्फुटा बद्धल लिहिलेलं हे वाक्य मला फार आवडले. खरेच किती योग्य विचार मांडला आहे.
काल मी सचिन पिळगावकर यांचा आमची मुंबई हे गाणे पहिल्यांदा पाहिले. नंतर कमेंट्स वाचल्या.

तिरुमला तेल खाऊन इथं हागत जाऊ नको - अशी पहिली कमेंट होती आणि त्याला शेकडो लोकांनी लाईक केला होता. हे बघून मला खरंच आश्चर्य वाटले. महागुरू सचिन यांच्यासारखा चतुरस्त्र कलावंत खरे तर आजच्या जगात सापडणे महाकठीण आहे.
त्यांची दूरदृष्टी, निर्देशन , नृत्य, अभिनय, विनोद सर्वच फार उच्च प्रतीचे आहे.
तो व्हिडीओ सचिनजी नि मैत्रीखातर केला होता आणि त्यांची अट होती व्हिडीओ मध्ये मुली नको मुले हवीत पण निर्देशक च्या कामात ढवळाढवळ करणे त्यांना योग्य वाटले नाही.
त्याच्या एका व्हिडीओ बघून त्याच्या संपूर्ण कारकिर्दी ला - त्या व्यक्तीला असे घालून पाडून बोलणे किती योग्य आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

महागुरूंनी त्यांच्या एकापेक्षा एक या कार्यक्रमात निवेदक पुष्कर कडून जे स्वतःचे कौतुक करवून घेतले त्याला तोड नाही

Submitted by Sadha manus on 14 June, 2020 -

अगदी. .

>>तिरुमला तेल खाऊन इथं हागत जाऊ नको<< आधि मला हे कळालेच नाहि पण जेव्हा ते महागरु तिरुमला तेलाचि जाहिरात करतात त्याच्याशी हे निगडीत होते हे कळाल्यावर जी खस्खस पिकली ते काही विचारुच नका. उलट एका व्हटस्अप मीम्स ची आठवण झाली. तीमधे तिरुमला तेलाची जाहिरात सुरु होते. सुप्रिया बाई गरम तेलात बटाटेवडे तळत असतात आणि ती रिपोर्टर हातात माईक घेऊन महागुरुंना प्रश्न विचारते, " सर, हे काय..? आम्हि तुम्हाला तळलेले बटाटेवडे खाताना बघतोय..!" तर महागुरु म्हणतात - "सकाळी या.. टाकलेले पण बघायला मिळतील...!!" कित्ती घृणास्पद मीम्स होतं ते..! Uhoh

तिरुलमला तेल काहिच नाही, मागे एक लेख आला होता व्हॉटस अप वर दक्षिणी चित्रपट कसे बटबटीत असतात त्यावर पण त्या दक्षिणी चित्रपटांची तुलना महागुरुच्या चित्रपटाशी करुन जो काही फार्स केला होता त्याला तोड नाही. कुणी वाचला असल्यास कल्पना येइइल. पण असं काहिहि का लिहावं बरं कुणी हा प्रश्न नक्की पडतो.

{{{ प्याराग्राफची सुरुवातच चुकीची आहे
राहता राहिला..
अहो शाहरूखपासून ईंडस्ट्रीची सुरुवात होते ! }}}

हे म्हणजे चायनीज मालापासून जागतिक बाजारपेठेची सुरुवात होते असं म्हणण्यासारखं आहे. ३० वर्षांपूर्वी चायनीज मालाचा बाजारपेठेत उदय झाला (साधारण शाहरुखची कारकीर्दही याच दरम्यान सुरु झाली). त्यापूर्वी जागतिक बाजारपेठच नव्हती की काय?

पुराणातली वांगी बटाटे पुराणात..
आधीही फिल्म ईंड्स्ट्री होती. आणि कदाचित आधीपासूनच त्यात घाणेरडी घराणेशाहीही होती. त्यात शाहरूख सारख्या आऊटसायडरने येत आपले नाणे खणखणीत वाजवून जागा बनवणे नव्हे सर्वोच्च स्थान पटकावणे हे कोणी मान्य करा वा नको पण अचाट कृत्य आहे.

ऋन्मेष,
अशोककुमार, दिलीपकुमार ही नावे कधी कानावर पडली आहेत का?
गेला बाजार धर्मेंद्र, नसीरुद्दीन शाह, मिथुन चक्रवर्ती वगैरे?
अगदीच नाही तर इरफान खान, अक्षयकुमार, नवाजुद्दीन सिद्दीकी?
इतर अनेकांचा तर उल्लेखही केलेला नाही.
नाही, फिल्म इंडस्ट्रीत आऊटसायडरने येत नाणे खणखणीत वगैरे लिहीलेले आहे म्हणून आपले विचारले.
अर्थात या सगळ्यांचा संबंध अभिनयाशी आहे आणि ते मलाच पाहा आणि फुले उधळा हा प्रकार करत नाहीत हा भाग वेगळा.
सर्वोच्च स्थान पटकावणे म्हणजे आपल्या चमचांकडून आणि खिशातल्या पत्रकारांकडून सतत तसे वदवून घेणे नाही.

रिव्हर्स स्वीप. सगळे उत्तम अभिनेते आणि माझ्या आवडीचे कलाकार आहेत.
सुपर्रस्टार एकच आहे शाहरूख खान Happy

महागुरूंचा वर्कआऊट व्हिडिओ. महागुरू फायटिंग बघा कसली करताहेत.

या वर्कआउटच्या व्हिडीओमधे किक साठी उचलेल्या पायावर एकाने कॉमेंट केली होती, की माझे ९० वर्षाचे आजोबा पायजमा घालताना यापेक्षा जास्त वर पाय उचलतात. मी लोळायचाच बाकी होतो.

मला अत्यंत यक्क वाटलं त्या वर्क आउट व्हिडीओ वरच्या कमेंट वाचून.सोशल मीडिया इज अ बिx. प्रत्येकाच्या क्षमतेनुसार वर्कआउट होतो.सगळे काय ह्रितीक टायगर च्या लेव्हल चा hiit करतील का?सचिन च्या वयानुसार, क्षमतेनुसार तो असणार वर्क आउट.
एखादा आल्बम सुमार आहे.ठीक.पिक्चर्स सुमार आहेत.ठीक.सध्या रिऍलिटी शो मध्ये इरिटेट करतात.ठीक.पण काय लेव्हल च्या बिलो द बेल्ट कमेंट करतात लोक?
इथे फेसबुकवर मारे 'मी फोन कॉल अवे आहे, दारं उघडी आहेत' लिहायचं.दुसरीकडे सोशल मीडियावर अत्यंत खालच्या दर्जाच्या पर्सनल कमेंट करून माणसाला मेल्याहून मेल्या सारखं करायचं.एखाद्या उमद्या सुशांत सिंग ने आत्महत्या केली की काही दिवस डोळे उघडणार, संवेदनशीलतेचा पूर येणार.मग परत येरे मागल्या.
(माझी ही चीड मायबोलीवर कोणासाठी किंवा वर ही लिंक देणाऱयांसाठी नाहीये.जनरलच आहे.)

दुसरीकडे सोशल मीडियावर अत्यंत खालच्या दर्जाच्या पर्सनल कमेंट करून माणसाला मेल्याहून मेल्या सारखं करायचं.एखाद्या उमद्या सुशांत सिंग ने आत्महत्या केली की काही दिवस डोळे उघडणार,

>>>>

सहमत आहे अनु आणि फार चांगला मुद्दा आहे हा.
सेलिब्रेटी आहेत तर आम्हाला त्यांच्या पर्सनल लाईफवर कॉमेंट करायचा हक्कच आहे. जर त्यांनी चाहत्यांशी आपले पर्सनल फोटो शेअर केले तर त्यात कारण नसताना खालच्या पातळीवर जाऊन आम्ही टिका करू शकतो. जर नको असेल तर त्यांनीच शेअर करू नये. शेअर केले तर जणू आम्हाला हक्कच देतात ते हिन बोलायचा. आणि ते सेलिब्रेटी आहेत. त्यांना काय फरक पडतो आपल्या बोलण्याने. उलट त्यांना तर प्रसिद्धीचाच हव्यास असतो. आपल्या टिकेने त्यांना प्रसिद्धीच हवी असते. सगळं आपणच ठरवायचे. मला वाटते हा मानवी स्वभावातच लपलेला एक दुर्गुण होता. जो झुण्डीने एकत्र आल्यावर बाहेर येतो. सोशलसाईटने या वृत्तीला एक प्लॅटफॉर्म दिलाय असे वाटते.

नवीन Submitted by mi_anu on 17 June, 2020 - 11:44
>>>>>
सहमत.
नाही आवडत तर ठीक आहे. पण पातळी सोडून टीका करणे पूर्णपणे चुकीचे आहे.

हा धागा दिसलाच नव्हता.
अनुशी सहमत. हा विडिओ सुमार आहेच तरीही,
हे कलाकार पण माणसं आहेत. तेही चुकतात. काही गोष्टी त्यांना नाते जपण्यासाठी कराव्या लागतात. काही वेळा एन्ड product वर नियंत्रण नसते. आणि सतत काम करण्याचा, चांगले दिसण्याचा, चर्चेत रहाण्याचा दबाव असतो. पण इतक्या हीन कमेंट्स तेही पर्सनल आणि अश्लिल शिव्या देण्याची चढाओढ पाहून थक्क झाले Sad ! तुम्हाला गाठून ते जाब विचारु शकत नाहीत म्हणून तुम्ही स्क्रीन मागे लपून पातळी सोडता नं. संवेदनशील कलाकार असेल एखादा तर तो आत्मविश्वास गमावेल किंवा जीवही !
हा वरचा प्रतिसाद दोन्ही विडिओ खालील कमेंट्स आणि रोस्ट क्लिप साठी आहे
बाकी सचिनने खूप वर्षे उत्तम काम केले आहे की ते लक्षात ठेवायचे. मला तो दिग्दर्शक म्हणून चांगला वाटतो. सुप्रिया अधिक आवडते. सहजसुंदर आणि नैसर्गिक वाटतो तिचा अभिनय .

lol

एक बरेच जुने मिम् आहे म्हागृंवर. मानवाच्या उत्क्रांतीचे एकेक टप्पे आणि शेवटी म्हागृंना पाहून होमो सेपियन का कुणी त्याच्या मागच्यांना म्हणतो 'ए परत मागे फिरा रे ' असे काहीसे. कुणाला सापडले तर इथे शेअर करा प्लीज.

अशोक कुमार, सोहराब मोदी, बलराज सहानी, प्राण, राज कपूर, दिलीप कुमार, अनेक जुन्या अभिनेत्री

संजीव कुमार, ओम पुरी, नसीर, स्मिता पाटील, शबाना आझमी, नाना, रेखा इत्यादी

अमिताभ (पूर्णतः वेगळी कॅटेगरी)

नवाजुद्दीन, तापसी, के के मेनन, कंगना, इरफान, विद्या बालन

अशी शेकडो नावे फक्त हिंदीतच!

स्टार म्हणूनच वावरणारे - देव आनंद, राज कुमार, राजेश खन्ना, अनेक कपूर, कुमार्स, देवगण इत्यादी! त्यातलाच एक शाहरुख

सचिन यात बसत नाही, पण यांच्यापैकी काहींबरोबर होता याचे भांडवल तुफान केले त्याने

नवाजुद्दीन, तापसी, के के मेनन, कंगना, इरफान, विद्या बालन
>>> तापसी आणि कंगना ची लेव्हल नाहीय या यादीत येण्याची... तापसी तर बिलकुल नाही...

शोलेमध्ये गब्बरसिंगला आवाज द्यायला मी शिकवलं Rofl Rofl Rofl

बसलेल्या प्रेक्षकांची बॉडी लॅग्वेज बघा. जास्तीत जास्त लोकं हाताची घडी घालुन बसलेत.

Pages