महागुरू सचिन पिळगावकर

Submitted by कटप्पा on 10 June, 2020 - 11:54

एखादी क्षणिक भावना त्या क्षणाचे प्रतिनिधित्व करते पूर्ण आयुष्याचे नाही. हीरा यांनी मी अस्मिता यांच्या स्फुटा बद्धल लिहिलेलं हे वाक्य मला फार आवडले. खरेच किती योग्य विचार मांडला आहे.
काल मी सचिन पिळगावकर यांचा आमची मुंबई हे गाणे पहिल्यांदा पाहिले. नंतर कमेंट्स वाचल्या.

तिरुमला तेल खाऊन इथं हागत जाऊ नको - अशी पहिली कमेंट होती आणि त्याला शेकडो लोकांनी लाईक केला होता. हे बघून मला खरंच आश्चर्य वाटले. महागुरू सचिन यांच्यासारखा चतुरस्त्र कलावंत खरे तर आजच्या जगात सापडणे महाकठीण आहे.
त्यांची दूरदृष्टी, निर्देशन , नृत्य, अभिनय, विनोद सर्वच फार उच्च प्रतीचे आहे.
तो व्हिडीओ सचिनजी नि मैत्रीखातर केला होता आणि त्यांची अट होती व्हिडीओ मध्ये मुली नको मुले हवीत पण निर्देशक च्या कामात ढवळाढवळ करणे त्यांना योग्य वाटले नाही.
त्याच्या एका व्हिडीओ बघून त्याच्या संपूर्ण कारकिर्दी ला - त्या व्यक्तीला असे घालून पाडून बोलणे किती योग्य आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

म्युन्सिपालिटी शाळा म्हणजे फक्त शिव्या या विधानाचा मी निषेध करतो.
दादा कोंडके चित्रपट बघून माय चा अर्थ कळतोच .

दुसरया धाग्यावरील पोस्ट ईथेही पोस्टतो - विषयाला अनुसरून आहे.
...

आपणच आपलं कौतुक करून घेतलेलं लोकांना पसंत पडत नाही .. ही नापसंती व्यक्त करण्यासाठी मग ट्रोलिंग ..
>>>>

धाग्यात राजकारण आणायचे नाही. अन्यथा स्वत:च स्वत:चे कौतुक करून घेणारया आणि तरीही लोकांनी डोक्यावर ऊचलून घेतलेल्या राजकीय नेत्यांची उदाहरणे दिली असती.

दुसरयावर टिका करणारयांपेक्षा स्वत:चे कौतुक करणारे केव्हाही चांगलेच नाही का?

लोकांना अशी लोकं आवडत नाही कारण लोकांच्या स्वताच्या मनात अहंकार असतो. त्यांना समोरच्याने आपलेच केलेले कौतुक पटत नाही. तू कसा आहेस ते तुझे तूच काय ठरवणार, ते आम्ही ठरवणार.. हा एक मीपणाच झाला.

खरं सांगायचे तर मला पर्सनली विनम्रतेचा आव आणणारयांचा रग येतो. जे आत ते बाहेर अशी लोकं केव्हाही परवडली.

पण त्याहून महत्वाचा मुद्दा म्हणजे मला एखाद्या व्यक्तीचे वागणे रुचत नाही म्हणून मला त्याचे ट्रोलिंग करायचा काहीएक अधिकार मिळत नाही. तुम्ही इग्नोर करू शकता. ते जरुर तुमच्या अखत्यारीत येते.

सचिन महागुरू आणि एकापेक्षा एक म्हणाल तर एक जज म्हणून ते नाचातल्या एकेक बारकावे टिपत जे कॉमेंट करायचे ते ऐकून मी थक्क व्हायचो. त्यामुळे त्यांना महागुरू म्हणवायचा हक्कही आहे.

नच बलियेचा पहिलाच सीजन त्यांनी ईतर तरुणांना मात देत जिंकला. तिथे त्यांचे सळसळते तारुण्य आणि उत्साहही सिद्ध झाला.

एक चतुरस्त्र कलाकार म्हणून ते अफाट आहेत. त्यांचे चित्रपटसृष्टीला दिलेले योगदान अतुलनीय आहे. एखाद्याला त्यांचे वागणे वा स्वभाव पटो न पटो त्यांचा आदर व्हायलाच हवा असे मला वाटते.

{{{ पण त्याहून महत्वाचा मुद्दा म्हणजे मला एखाद्या व्यक्तीचे वागणे रुचत नाही म्हणून मला त्याचे ट्रोलिंग करायचा काहीएक अधिकार मिळत नाही. तुम्ही इग्नोर करू शकता. ते जरुर तुमच्या अखत्यारीत येते.}}}

अर्रर्र! स्वतःच स्वतःच्या फेव्हरिट्सना दिलेली टॅगलाईन विसरलात काय?

यू कॅन लव्ह हिम, यू कॅन हेट हिम; बट यू कान्ट इग्नोर हिम!

यू कॅन लव्ह हिम, यू कॅन हेट हिम; बट यू कान्ट इग्नोर हिम!

बिपीन, तुम्ही चायनीज "वोक"ला उलटा करुन म्हाक्याचे महाभृंगराज तेल लावताय. तरीही तुम्हाला शुभेच्छा देतो या भगीरथ प्रयत्नांसाठी.

जर मैत्री खातर केला होता तर लगेच दुसरा व्हिडिओ का केला? नाही सांगायचं ना!!
मैने कहां हट्.. असे काहितरी लिरीक्स होते. या गाण्यावरून झालेल्या ट्रोलिंगला उत्तर म्हणून केलाय हे स्पष्ट दिसत होत.
पण कोणीतरी जबरदस्त कान उघडणी केली म्हणून तो काढून टाकला

अरे लोक्स 'माय' बद्दल ऋन्मेष यांची ती हजरजबाबी कमेंट होती. काय राव इथे 'माय' शब्दाची चिरफाड करत बसलाय. थोडा सेन्स ऑफ ह्युमर .... थोssssssडा!!!

जेम्स बॉन्ड ते फक्त इतरांना यांची डब्बल ढोलकी दाखवण्यासाठी.. तरीही शुभेच्छांबद्दल धन्यवाद.

स्वतःच स्वतःच्या फेव्हरिट्सना दिलेली टॅगलाईन विसरलात काय?
यू कॅन लव्ह हिम, यू कॅन हेट हिम; बट यू कान्ट इग्नोर हिम!

>>>>

शाहरूख न आवडणारे त्याला इग्नोर करू शकत नाहीत यात शाहरूखची शान आहे. त्याला इग्नोर करू न शकणारयांचे मी कौतुक करत नाहीये वा त्यांना प्रोत्साहन देत नाहीये. त्यांच्याबद्दलही माझे मत तेच राहिल जे सचिनवर विनाकारण टिका करणारयांबद्दल आहे

बाकी शाहरूख जगातला सर्वात मोठा सुपर्रस्टार आहे. त्याच्यावर टिका करंणारे काही असले तरी चाहत्यांची संख्या अफाट असल्याने ते पुरून ऊरतात. त्यामुळे शाहरूखवर टिका करणारयांना मी त्याला इग्नोर करा असा त्यांच्याच भल्याचा सल्ला द्यायलाही जात नाही. करताहेत मजा तर करू देतो. मी सुद्धा करतो. पण ईतर सेलिब्रेटींवर नाहक टिका करणारयांना मी समजवणारच

म्हागृ कितीही हागत असले तरी ते बोकड्या शारुख पेक्षा चांगलंच काम करतात. कॉप्या करून चांगल्या मार्काने पास होणाऱ्या मुलागत आहेत ते.

म्हागृ कितीही हागत असले तरी ते बोकड्या शारुख पेक्षा चांगलंच काम करतात.

>>>>

मराठी कलाकारांचे कौतुक ईंग्रजी विशेषणे लावत केले आणि सईचे आडनाव लिहिताना एखादा कानामात्रा चुकला .. म्हणून आक्षेप घेणारे अश्या पोस्टबाबत मौन का बाळगतात हे कळेल का?

कारण मी मुद्दाम तसं लिहिलंय
>>>>

मुद्दाम?
असे काय कारण होते जे तुम्हाला मुद्दाम या लोकांबद्दल असे अपशब्द वापरावे लागले?

कारण तुम्हीच... जिथं तिथं संदर्भ नसताना शारुख शारुख करत प्रतिसाद देत, आपले मायबोलीवरील उपद्रवमूल्य कायम ठेवण्याचा जो तुमचा केविलवाणा अट्टहास आहे त्यामुळे जमून आलेल्या जेवणात खडा लागावा तसं होतं. तुमच्या ह्या घाणेरड्या सवयीने उचकुन जाऊन माझ्यासारखे साधे भोळे वाचक प्रतिसाद देतात आणि तुम्ही त्याचा टाळ्या वाजवत विकृत आनंद लुटता..

तुमचे अनेक विषयांवर खूप छान विचार मी इथेच वाचले आहेत, कधीकाळी तुमचे लिखाण आवडायचे मला.. पण नंतर नंतर तुमचे विचार संपले की काय आणि फक्त ही विकृती तेवढी उरली.. असो, ह्या प्रतिसदाचासुद्धा आनंद लुटा आता..

राहिला प्रश्न शारुख आणि म्हागृचा, तर ते कसे काय चांगले वाईट मला माहित नाही, फक्त तुम्हाला उकसवण्यासाठी, खिजवण्यासाठी मी प्रतिसाद दिला. (हे लिहिण्याएव्हढा प्रामाणिकपणा आहे माझ्यात)

मला उकसवण्यासाठी आणि खिजवण्यासाठी त्यांना मुद्दाम अपशब्द वापरले??
पण का? जर काही राग माझ्यावर असेल तर थेट मलाच बोला. मलाच ट्रोल करा. माझ्या आवडत्या कलाकारांना हिणवून मला त्रास देणे हे त्या कलाकारांवर अन्यायकारक नाही का? यात त्यांची काय चूक?

महागुरुंचा अनादर करणाऱ्यांस अतीव दारिद्र्यावस्था प्राप्त होते. जर उपरती होऊन महागुरुंचे पाय धरले तर पुन्हा उत्कर्षावस्था येते. तेंव्हा इथे बोलणाऱ्यांची जपून बॉलावे!

{{{ त्यांना समोरच्याने आपलेच केलेले कौतुक पटत नाही. तू कसा आहेस ते तुझे तूच काय ठरवणार, ते आम्ही ठरवणार.. हा एक मीपणाच झाला. }}}

आपलेच कौतुक करण्यावर आक्षेप नाही.

आक्षेप खालच्या शब्दरचनेला आहे.

{{{ बाकी शाहरूख जगातला सर्वात मोठा सुपर्रस्टार आहे. }}}

सुपरलेटीव डिग्री शाळेत शिकला असाल अशी आशा आहे. जेव्हा शाहरुख स्वतःला आय अ‍ॅम द बेस्ट म्हणतो तेव्हा इतर त्याच्यापेक्षा कमी योग्यतेचे आहेत हे अध्याहृत असते. त्यामुळे तो इतरांना कमी लेखतो हा त्याचा माज लपत नाही. तुम्ही कितीही नाकारलंत तरी ही वस्तुस्थिती बदलत नाही. त्याने इतरांचं कौतुक करावं असंही आम्ही म्हणत नाही पण त्याने आय अ‍ॅम द बेस्ट म्हणणे किंवा त्याच्या चाहत्यांनी तो जगातला सर्वात मोठा सुपरस्टार आहे म्हणणे हे इतरांच्या भावना दुखावणारे ठरतेच.

आक्षेप खालच्या शब्दरचनेला आहे.
>>>>

जेव्हा एखादी आई आपल्या बाळाला जगातले सर्वात गोड बाळ बोलते तेव्हा तिच्या मातृत्वावरही असाच आक्षेप घ्याल का?

सचिन जिं नि आपल्या
वया प्रमाणे वागायला हवे . त्या मुळे
त्यांना
टिकेला तोंड द्यावे लागत आहे,

एखादी आई आपल्या बाळाला जगातले सर्वात गोड बाळ बोलते तेव्हा तिच्या मातृत्वावरही असाच आक्षेप घ्याल का?<<<

हे काहीही उदाहरण झाले बरं का

सचिन, अक्षय कुमार, अमिताभ यांचा उबग येण्याचे कारण म्हणजे मिळेल त्या संधिमार्फत पब्लिक समोर येत राहतात

पण निदान अमिताभ आणि अक्षय कुमार हे महान तरी आहेत, सचिन प्रचंड पीळ आहे

(सर्व मते वैयक्तिक)

जेव्हा एखादी आई आपल्या बाळाला जगातले सर्वात गोड बाळ बोलते तेव्हा तिच्या मातृत्वावरही असाच आक्षेप घ्याल का?>>
तुम्ही सचिन /शाहरुखवर आईसारखी माया करता की काय?

सचिन, अक्षय कुमार, अमिताभ यांचा उबग येण्याचे कारण म्हणजे मिळेल त्या संधिमार्फत पब्लिक समोर येत राहतात

>>>>

कुठे ऊबग आलाय?
अक्षय कुमारचे पिक्चर आजही करोडो कमावताहेत.
अमिताभचे केबीसीही टीआरपी खेचत चालतो. जाहीरातीही मिळत आहेत. याचा अर्थ बहुसंख्यांकाना ऊबग आला नाहीये.

आईच्या मायेत काय वाईट आहे?>>
आईच्या मायेत काहीच वाईट नाही. आईची माया ही सर्वोच्च आहे. त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही.
चाहत्यांच्या कलाकारांवरील प्रेमाला आईच्या मायेची सर येऊ शकत नाही.
तुमच्या लाडक्या अभिनेत्यांना सुपरस्टार ठरवतांना तुम्ही चुकीचे उदाहरण दिले.

Pages