महागुरू सचिन पिळगावकर

Submitted by कटप्पा on 10 June, 2020 - 11:54

एखादी क्षणिक भावना त्या क्षणाचे प्रतिनिधित्व करते पूर्ण आयुष्याचे नाही. हीरा यांनी मी अस्मिता यांच्या स्फुटा बद्धल लिहिलेलं हे वाक्य मला फार आवडले. खरेच किती योग्य विचार मांडला आहे.
काल मी सचिन पिळगावकर यांचा आमची मुंबई हे गाणे पहिल्यांदा पाहिले. नंतर कमेंट्स वाचल्या.

तिरुमला तेल खाऊन इथं हागत जाऊ नको - अशी पहिली कमेंट होती आणि त्याला शेकडो लोकांनी लाईक केला होता. हे बघून मला खरंच आश्चर्य वाटले. महागुरू सचिन यांच्यासारखा चतुरस्त्र कलावंत खरे तर आजच्या जगात सापडणे महाकठीण आहे.
त्यांची दूरदृष्टी, निर्देशन , नृत्य, अभिनय, विनोद सर्वच फार उच्च प्रतीचे आहे.
तो व्हिडीओ सचिनजी नि मैत्रीखातर केला होता आणि त्यांची अट होती व्हिडीओ मध्ये मुली नको मुले हवीत पण निर्देशक च्या कामात ढवळाढवळ करणे त्यांना योग्य वाटले नाही.
त्याच्या एका व्हिडीओ बघून त्याच्या संपूर्ण कारकिर्दी ला - त्या व्यक्तीला असे घालून पाडून बोलणे किती योग्य आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सर्व मते वैयक्तिक)<<<
हे वाचलेत का?
>>>>

मते सहसा वैयक्तिकच असतात. ईथे कोणी अमुकतमुक समूहाचा प्रतिनिधी म्हणून लिहित नाहीत. मग काय माबोवर कोणी कोणाची मते खोडायचीच नाहीत का?

हा आता तुम्ही वैयक्तिक आवड व्यक्त कराल की मला लाल रंग आवडतो तर त्यावर कोणी आक्षेप घेणार नाही की लालच का आवडतो? पिवळा किती छान असतो वगैरे वगैरे..

आईची माया ही सर्वोच्च आहे. त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही.
>>>>

पुस्तकी वाक्य आहे. किंबहुना फिल्मी विचार झाला. पोराला जन्म देऊन वारयावर सोडणारया, पोरांचे मनाविरुध आणि पोरींचे हुंडा घेऊन लग्न लावणारया, नवरयाचा राग पोरांवर काढणारया, त्यांना उगाचच मारहाण करणारया, छोट्यामोठ्या कारणांसाठी उपाशी ठेवणारया, पोरांना सोडून अफेअर करत पळून जाणारया अश्या कैक प्रकारच्या माता सापडतील या जगात...

याचा अर्थ बहुसंख्यांकाना ऊबग आला नाहीये.<<<

सर्व मते वैयक्तिक आहेत याचा अर्थ ती बहुसंख्यांची असतीलच / असावीतच असे काही नाही, हेच म्हणणे आहे

तुम्हाला किंवा कोणालाही माझे मत खोडायला मी कसा काय नकार देऊ शकेन? पण म्हणून मला त्या तिघांचा उबग येणे चूक आहे असा अर्थ होईल असे वाक्य प्रतिसादात नको होते

महागुरू स्वतःच्या ताकदीवर चित्रपट चालवू शकत नसत, नेहमी अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जीवावर चालत. दिग्दर्शक म्हणूनही फार काही ओरिजिनल त्यांनी केले नाही, बहुतेक मराठी चित्रपट हिंदी चित्रपटांवर आधारित होते, मला पहा आणि फुले वहा असे असते त्यांचे

बेफि आणि पाटील तुमचे प्रतिसाद त्याला अजून किक देतात
त्याला तो आजार आहेच
त्यामुळे तो मूर्खांसारखे बोलायला लागला की दूर्लक्ष करा
कारण त्याला उचकवल की त्याचे पाळलेले आयडी अंगावर येतात
वर हे तुमचेच नाहीत कशावरून असेही विचारतो
त्यावर दया करा आणि दुर्लक्ष करा

पुस्तकी वाक्य आहे. किंबहुना फिल्मी विचार झाला. पोराला जन्म देऊन वारयावर सोडणारया....>>
हे वाक्य महान असल्यामुळेच त्याला पुस्तकांमध्ये, सिनेमात स्थान मिळाले. आणि काही उदाहरणांमुळे त्याची महानता कमी होत नाही.
पण मुळ मुद्याला तुम्ही सोयीस्करपणे बगल दिली.

सर्व मते वैयक्तिक आहेत याचा अर्थ ती बहुसंख्यांची असतीलच / असावीतच असे काही नाही,
>>>>

जर बहुसंख्यांना उबग आलाय असे काही न्सेलच तर मग मुद्दाच संपला. त्या पोस्टला चर्चेच्या दृष्टीने अर्थ नाही. आणि हे ईतरांनाही कळणे गरजेचे होते Happy

लिहितात. कित्येक उदाहरणे आहेत.
>>>>

ते स्वयंघोषित असतील. त्याला अर्थ नाही.
उदाहरणार्थ मीच उद्या म्हटले की मी माबोवर समस्त शहरूख चाहत्यांतर्फे लिहितो. तर ते चूक ठरेल.
अधिकृत कोणी ही नाही.

अधिकृत<<<

हा शब्द मूळ प्रतिसादात नव्हता

असता तर त्यावर लिहिले असते

नेहमी अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जीवावर चालत. दिग्दर्शक म्हणूनही फार काही ओरिजिनल त्यांनी केले नाही,
>>>>

अशीही बनवाबनवी या ऑलटाईम क्लासिक मराठी सिनेमाचे दिग्धर्शक ते होते.
विषय संपला

अधिकृत<<<
हा शब्द मूळ प्रतिसादात नव्हता
>>>

तो नव्हता कारण तशी पद्धतच नाही माबोवर जे मुद्दाम उल्लेख करावा. ईथे बायडिफॉल्ट सारेच आपली वैयक्तिक मतेच देतात.

कारण त्याला उचकवल की त्याचे पाळलेले आयडी अंगावर येतात
>>>>

शाहरूखने पाकिस्तानला ५५ कोटी दिले
अश्या अफ्वा उठत राहतात. कुठे सिद्ध करत फिरायचे. ज्यांना अमेरीकेतले कटप्पा माझा आयडी वाटतो अश्यंना कुठे स्पष्टीकरणे देत बसावे Happy

ईथे बायडिफॉल्ट सारेच आपली वैयक्तिक मतेच देतात.<<<

यावरच वर लिहिले होते

इथे by default अनेकजण प्रातिनिधिक मते देत असतात

शाहरुख ( ४ चित्रपट सोडले तर, जे चित्रपटही कथानकामुळे अधिक तरले) एक चतुर्थ दर्जाचा कलाकार आहे

आणि त्याचा हा विक्रम फक्त सचिननेच मोडला आहे, पाचवा स्तर गाठून

(डर, बाजीगर, कभी हा कभी ना व अंजाम हे ते चार चित्रपट)

Proud

माया मेमसाब राहिला...
>>>
लोकं बरेचदा स्वदेश चक दे करतात ते सुद्धा राहिले त्यांच्या लिस्टीत..
काही जणांच्या मते खरा शाहरूख त्याच्या प्रेमपटांतलाच...
थोडक्यात काय तर शाहरूखने प्रत्येकाला आवडावे असे काही ना काही दिलेय..
शाहरूख हा चार आंधळे आणि हत्तीच्या गोष्टीमधील हत्ती आहे.. ज्याला जे भावले त्याने शाहरूखला तितकेच समजले Happy

बाई दवे
शाहरूखला चतुर्थ दर्ज्याचा कलाकार म्हटले तर त्या स्केलवर पहिले तीन दर्जे मिसिंगच असतील Happy

To set the records straight: अशी ही बनवाबनवी हा हृषिकेश मुकर्जी दिग्दर्शित बिवी और मकान चा रिमेक आहे. त्यातकं बॅकग्राऊंड म्युझिक सत्ते पे सत्ता च्या बॅकग्राऊंड म्युझिक वर बेतलेलं आहे.

Disclaimer: बनवाबनवी हा अफलातून जमून आलेला सिनेमा आहे.

हृषिकेश मुकर्जी दिग्दर्शित बिवी और मकान चा रिमेक आहे
>>>
मस्त माहिती दिलीत. आता सचिन विरोधक शांत बसावेत.
एका फारसे नावही न ऐकलेल्या चित्रपटाची कथा घेत आपल्या दिग्दर्शनाच्या ताकदीवर एक क्लासिक सिनेमा बनवणे यातच सचिनगिरी सिद्ध होते.
थोडक्यात दादाने तोच संघ घेतला आणि आपली दादागिरी करत परदेशातील परफॉर्मन्स सुधारला. (हे खास फेरफटका यांच्यासाठी Happy )

बिवी और मकान हा हृषिकेश मुकर्जीचा नावाजला गेलेला चित्रपट होता, ज्याचे रिमेक्स मराठी, तेलगु, कन्नड, बंगाली, पंजाबी, हिंदी भाषेत निर्माण झाले.

आत हेपण सांगणं प्राप्त आहे की गांगुली ने नवीन संघाची बांधणी केली. नवीन रणनीतीनं खेळत, यश प्राप्त केलं. त्याच्या संघात निम्म्याहून अधिक खेळाडू नविन होते.

बनवाबनवी चांगला जमून आलेला चित्रपट आहे, पण त्यात सिंहाचा वाटा वसंत सबनीस यांची पटकथा , संवाद आणि अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांचा अभिनय यांचा आहे, महागुरूंचे बाकीचे चित्रपट जसे नवरा माझा नवसाचा बॉम्बे to गोवा, आम्ही सातपुते सत्ते पे सत्ता, भुताचा भाऊ गझब आशा चित्रपटांवर बेतले होते

सचिन पिळगावकर हे नच बलीयेच्या पहिल्या पर्वाचे विजेते आहेत. हिंदीतल्या अनेक मातब्बर दिग्गजांना धूळ चाटवली होती त्यांनी ते सुद्धा या वयात. त्यांच्यासारखा चतुरस्त्र कलाकार पुन्हा होणे नाही.

ऋ मुद्दाम प्रवाहाविरुद्ध प्रतिसाद देतो असं माझं मत झालं आहे,म्हणे अगदी सचिन त्याला आजिबात आवडत नसेल पण बहुसंख्य लोकाना पण तो आवडत नाही म्हंटल्यावर हा त्याला आवडतो असं म्हणणार आणि मुद्दाम डिबेत करत बसणार की तो कसा भारी आहे

नाही असे असते तर आवडते कलाकार मध्ये सचिन नाव नसते... ते नाव त्याने आयडी घेतल्यापासून आहे. त्याचे जुना धागा देखील आहेत - सचिन , स्वप्नील , सई आणि शाखा बद्धल....

नच बलिये मधले बहुतेक कलाकार हे टीव्ही मालिकांतले तरुण किंवा हिंदी चित्रपटांतले दुय्यम कलाकार होते.

मातब्बर दिग्गज नव्हेत हो.
नच बलिये जिंकले तेव्हा वय ४८ होते.

नच बलिये मधले बहुतेक कलाकार हे टीव्ही मालिकांतले तरुण किंवा हिंदी चित्रपटांतले दुय्यम कलाकार होते.>>> शाहरूख, अक्षय, ऋतिक, अमिताभ हे नाचायला पाहिजे होते का? आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ती डान्स स्पर्धा होती. कलाकार दुय्यम असला म्हणजे तो चांगला डान्सर नसतो असं म्हणायचं आहे का तुम्हाला?

Pages