हे गगना तू मजला ताऱ्यांचे दान दे

Submitted by सिद्धेश्वर विला... on 1 June, 2020 - 07:41

हे गगना तू मजला ताऱ्यांचे दान दे

तुजपर्यंत पोहोचण्यास पुष्पक विमान दे

घेऊन जा उंच नभी, अंबरात राहू दे

गगनातुनी सुंदर ती वसुंधरा मज पाहू दे

हे धरती तू मजला हरितसृष्टी दान दे

मुक्तपणे विहारण्यास घनदाट रान दे

काम क्रोध मत्सराने व्यापली धरा ऊभी

प्रेम क्षमा शांती फुलवण्या देहात त्राण दे

हे वरुणा तू मजला चैतन्य वरदान दे

झुळझुळ ती ऐकण्या अंतरी दोन कान दे

जीवन तू सृष्टीचे , फुलवतोस धरा सारी

कोपू नको कधी पुन्हा, संयमाचे वाण घे

हे समीरा तू मजला निर्भयता दान दे

कणाकणात पोहोचण्यास वाहण्याचा मान दे

पोहोचावे सत्वरी उखडून त्या मत्सरा

फुलवुनी चैतन्य जगी , षड्रिपूंचे प्राण घे

हे अग्नी तू मजला , दग्धता प्रदान दे

वैरभाव हवन सारा आहुतीचा मान घे

पंचभूत नमन तुम्हा तुम्हासमोर लहान रे

प्रेमसुख न्हाऊ घाला , मम् पंचेंद्रिये दान घे

===================================

सिद्धेश्वर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छानच जमली आहे. शाळेची किंवा संस्थेची प्रार्थना म्हणून किंवा मुलांच्या आवाजात कोरस छान वाटेल. कोणी चाल लावली तर बघा रेकोर्ड करून.