Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 1 June, 2020 - 04:36
कोरोना वार्डात
**********
कोरोना वार्डात
चिंतातुर रुग्ण
दाटलेले प्रश्न
मुखावरी ॥
कुणा थोडा ताप
कुणा लागे धाप
कुणा नसे झोप
रात्रंदिन ॥
बाहेरून बंद
कक्षाचे ते द्वार
चाले येरझार
आतमध्ये ॥
स्वतःहून साऱ्या
घराचीच चिंता
जिवलग चित्ता
सदोदित ॥
परी एकमेका
देऊनी आधार
चाले व्यवहार
सबुरीचा ॥
कोरोनाच्या कथा
डोक्यात नाचती
सांभाळावे किती
मनामध्ये ॥
बेचव ते अन्न
येई भरपूर
परी जाई चार
घास आत ॥
त्यात काही होते
काही चिन्हां विना
नशिबाने त्यांना
साथ दिली ॥
इतरांस तेही
होते सांभाळत
आणि धीर देत
वेळोवेळी ॥
परी काही केल्या
नव्हते सरत
दिन उलटत
भरभर ॥
मग दिनमान
तेही उलटले
आले ते भोगले
भोग सारे ॥
थंडावले युद्ध
रोग ओसरला
परी तो उरला
बंदिवास ॥
भयाची सावली
मिटता उरली
मनी भरलेली
कृतज्ञता ॥
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप छान वर्णन केले आहे
खूप छान वर्णन केले आहे
खूपच समर्पक चित्र उभं केलंत
खूपच समर्पक चित्र उभं केलंत शब्दांमधून..
धन्यवाद पुर्वी आणि तेजो
धन्यवाद पुर्वी आणि तेजो
खरंय... चित्रदर्शी वर्णन...
खरंय... चित्रदर्शी वर्णन...
या सगळ्या लढ्यामध्ये तुम्हा डाॅ. चा सहभाग हा कौतुकापलिकडील... त्याकरता सर्वच डाॅ. व वैद्यकीय कर्मचारी यांना अनेक सलाम...
____________/\__________
शशांक धन्यवाद
शशांक धन्यवाद
पुरंदरे शशांक+१०१,
पुरंदरे शशांक+१०१,
डॉ.काका तुम्हीसुद्धा काळजी घ्या...
सुंदर कविता
सुंदर कविता
खुप धन्यवाद
खुप धन्यवाद