रेंगाळतो आहे..

Submitted by मन्या ऽ on 26 May, 2020 - 09:44

रेंगाळतो आहे..

आजतोवर वाचलास तु
हा एक योगायोग आहे
एक नजर टाक बाहेर
तुझा मृत्यु दारात रेंगाळतो आहे

भरल्यापोटीचे तुझे भुकेचे डोहाळे
काही केल्या संपत नाहीत
डोळे उघडुन बघ जरासे
गरजुंची आज दैना आहे
एक नजर टाक बाहेर
तुझा मृत्यु दारात रेंगाळतो आहे

अपेयासाठी रांगा लावुनी
काय तु कमावतो आहेस?
आज तु वाचलास परि
तु उद्याचे बुकींग करुन ठेवतो आहेस

जीवाचा आटापिटा करत
तुझ्याच हितासाठी
देव स्वतः झुंजतो आहे
तरीही क्षुल्लक कारणे देऊन
तु रस्ते धुंडाळतो आहेस

क्षणभर नजर टाक बाहेर
तुझा मृत्यु दारात रेंगाळतो आहे..

-दिप्ती भगत
(९मे,२०२०)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किल्लीताई, यतीन प्रतिसादासाठी धन्यवाद! Happy
@राजेंद्र, धन्यवाद!
बुकिंगऐवजी मरण>>>
बुकींग हा शब्द २ कारणांसाठी लिहिला आहे. Happy
१. दारु पिऊन कोणाच भल होणार आहे! आणि
२. दारु इतकी महत्वाची नाही कि दारुसाठी रांगा लावुन स्वतःसोबत कुटुंबातील इतर सदस्यांचा जीव धोक्यात घालावा..

@प्रतिकदा, हो आत्ताच वाचली तुझी कविता. मस्त लिहिलीये.. Happy

आवडली !!! दारूला विरोध म्हणून जास्त आवडली !!!
मला कवितेतले काळत नाही पण या कवितेचा सोल खूप छान वाटला .
दिवसेंदिवस तुमचे लिखाण आणखी चांगले होत चालले आहे . पुलेशु .

@डॉ.काका, हो न्युज वाचताना-बघताना तेवढी एकच खंत मनाला आत पोखरत होती. त्याचेच प्रतिक म्हणजे ही कविता.. Sad

@ नौटंकी, धन्यवाद!