मोठी हो म्हणावंसं वाटत नाही / चिंतन

Submitted by सामो on 23 May, 2020 - 06:26

डिस्क्लेमर - मी काउन्सिलर नाही की मानसोपचारतद्न्य नाही. फक्त एक अनुभव मांडते आहे.

रावपाटील यांची ( मोठी हो म्हणावंसं वाटत नाही) ही कविता वाचली, जी की त्यांनी अन्य एका याच विषयावरील, कवितेवरती 'प्रतिक्रिया' देताना, पोस्ट केलेली आहे. मनात विचारांचे तरंग उमटाले. ही कविता, माझ्या मते 'चाइल्ड ॲब्युझ किंवा गर्दीतील ओंगळ धक्के' या विषयास स्पर्श करते. तसे नसल्यास चू भू द्या घ्या.

पूर्वी, विषयावरती माझ्या मनात, जो कल्लोळ उठायचा, किळस यायची, संताप (हा शब्द थिटा पडावा) अशा भावना धुमसायच्या, त्या विषयावर आता फक्त मनात तरंग उमटतात, ही उत्तम गोष्ट आहे. 'गर्दीतील धक्के/ लहान मुलांचे लैंगिक शोषण' हा अतिशय हीन प्रकार आहे याबद्दल दुमत नसावे. याविषयी इतका तीळपापड होण्याचे कारण हे जे शिकारी (predateos) असतात, हे लहान मुलामुलींना क्वचित विश्वासात घेउन तर कधी भुलवुन, त्यांचा गाफिल क्षणी दावा साधतात. लहान असली मुले तरी त्यांना बरे-वाईट हे कळत असते. त्यात जर वयाने, जरा अधिक मोठी म्हणजे पौगंडावस्थेत असतील तर नक्कीच कळते. लहानपणी एक तर अतिशय तीव्र भावना असतात, मेंदूची जडण घडण होत असते, पौगंडावस्थेत तर रेजिंग हार्मोन्स असतात. त्यामुळे आनंद, दु:ख, राग, घृणा, किळस साऱ्याच भावना, अतिशय प्रखर जाणवतात. आणि त्यांचे अतिशय नकोसे वाटणारे विषारी पडसाद पुढे वारंवार उमटत रहातात. बरं हे विचार, हे पडसाद कसे थांबवायचे हेही कळत नाही. अतिशय नकोसे विचार परत परत येतात, तीच घटना मनात जवळजवळ प्रत्येक वेळी घटते. त्या घटनेमुळे बसलेला मानसिक धक्का पचतच नाही. संपूर्ण जगावरती बालपणी जो आपण विश्वास टाकलेला असतो, तो भंग पावल्याने, असुरक्षित, भेदरल्यासारखे वाटते. बालपण च झाकोळून जाते. याविषयी विशेषत: ज्या भावनांमधुन व्यक्ती (लहान मूल) जाते त्याविषयी जितके बोलावे तितके कमीच आहे. पैकी आऊट & आऊट 'चाइल्ड ॲब्युझ' बद्दल मला काहीही माहीती नाही ना माझे वाचन आहे. हां ल्युसिल क्लिफ्टनच्या या विषयावरच्या अक्षरक्ष: अंगावर काटा आणणाऱ्या, २ कविता मी वाचलेल्या आहेत. परंतु भारतामध्ये बालपण व तेही तीसरीपासून खूप लांब शाळा असल्याने, बसमधून प्रवास करावा लागत असल्याने, हे ओंगळ स्पर्श, शब्द, धक्के मात्र अनुभवलेले आहेत. कोळसा उगाळावा तितका काळाच रहाणार त्यामुळे या बसमधुन खुले आम फिरणाऱ्या ओंगळ पालींबद्दल मला काहीच म्हणायचे नाही. कारण अतिशय कठोर कायदे जोवर अस्तित्वात येत नाही तोवर हा उपद्रव तसाच रहाणार.

मला आठवते, पूर्वी, आजाराची ट्रीटमेन्ट घेताना, मी काउन्सिलिंग सेशनला जात असे. मला तरी तेव्हा काउन्सिलिंगचा उपयोग काहीही झाला नाही पण त्याची कारणे परत वेगळीच आहेत. असो. तर या सेशनमध्ये मी एकदा या विषयावरती बोलण्याचा, व हा धक्क्याचा ओंगळ प्रसंग बोलून दाखविण्याचा प्रयत्न केल्याचे मला स्मरते. पण आपण अपेक्षा करावी सुतळीची व टिकलीही निघू नये - असा काहीसा अनुभव मला आला. माझा internalize होउन अक्षरक्ष: fester झालेला अनुभव, पिकलेला, सडलेला अनुभव जेव्हा बाहेर प्रकट झाला, शब्दात मांडण्याची वेळ आली तेव्हा, त्याची एकदम सगळी पॉवरच गेली होती आणि काउन्सिलरला कळलेच नाही की यापूर्वी त्या प्रसंगाचा मला एवढा बाउ मी का केला. तिने तिचेही उदाहरण दिले की एकदा डिस्नी वर्ल्ड ला किणातरी मिकी माऊस चा मॅस्कॉट झालेल्या माणसाने तिला ' feel' करण्याचा प्रयत्न केला होता जो तिने टिचकीसरशी उडवुन लावला होता. बेसिकली कदाचित अमेरिकन असल्याने तिला याहून भयानक, गंभीर केसेस पहाण्याची सवय असेल, कदाचित मलाच इतका गंभीर प्रसंग नीट मांडता आला नाही, कारण काही का असेना, ती माझी व्यथा, किळस, राग समजू शकली नाही.

पण पुढे, मागे वळून पहातेवेळी मला एक जाणवले, ते हे की असा अनुभव आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर जरुर शेअर करावा, अगदी डिटेलवार. बट बी केअरफुल. अशी व्यक्ती जी प्रगल्भ असेल, जी तुम्हाला समजून घेउ शकेल, जी जजमेंटल नसेल अशी तुमच्या जीवाभावाची व्यक्ती. शक्यतो तिऱ्हाईत. कारण आपले नातेवाईक,near & dear ones आपल्यात गुंतलेले असतात. त्यांना अनुभव पचत नाही, किंवा आपल्या काळजीपोटी ते स्वत:च हतबल होतात.तेव्हा आपले नातेवाईक टाळाच असा मी सल्ला देईन. पण तुमच्या लक्षात येइल, हा जो आपल्याला आतलया आत डायनॅसोर वाटणारा अनुभव असतो, हा बाहेर आल्यावरती, एका अळीइतकाही दिसत नाही. म्हणजे त्याची सत्ता फक्त मनाच्या सांदेकपारीत दडून बागुलबुवा निर्माण करण्याएवढीच असते. प्रत्यक्षात आपण जेव्हा काठ्या आपटुन, धूराने कोंडी करुन, हुसकावुन याला बाहेर काढतो तेव्हा, डोंगर पोखरुन उंदीरसुद्धा निघत नाही. मैत्रिणीलाही तसाच अनुभव दुर्दैवाने आला असेल तर हेही लक्षात येते की आपण एकटे तर नाहीच तेव्हा 'व्हाय मी?' ला काहीही अर्थ नाही. तेव्हा गेट अप गेट गोइंग. स्वतःचे स्वतःलाच सावरायचे असते, स्वतःलाच पटवायचे - "दिलमे सूरज उतारना होगा!". शिवाय आजूबाजूला आपले मायेचे लोक असतातच. जगावरती परत विश्वास टाकायला शिकायचे असते. गुड लक!!

वरील, कविता वाचून, हे सर्व मांडावेसे वाटले.
-------------------------------------------एक पूर्वप्रकाशित धागा खाली देते आहे -----------------------------

"कविता" हा माझा जीव की प्राण असा साहीत्यप्रकार आहे.
कवितांमध्ये असलेली भावना चेतविण्याची क्षमता हाच पैलू नाही तर थोड्या शब्दांत खूप काही मांडण्याची आणि मनावर शाश्वत छाप सोडण्याची क्षमता हे कवितेचे अन्य पैलूदेखील अतिशय आकर्षक आहेत. अतिशय अर्थवाही असा हा साहीत्यप्रकार मला खूप आवडतो याचा अर्थ कळतोच असे नाही. वेड मात्र जबरदस्त आहे.
मी आजवर वाचलेल्या सर्वोत्तम कवितांपैकी एका कवितेबद्दल हा धागा आहे. "आर्ट इज नॉट आर्ट अनटिल इट डिस्टर्ब्स यु" हे वाक्य या पुढील कवितेबद्दल तंतोतंत खरे आहे. ल्युसिल क्लिफ्टन या कवयित्रीची पराकोटीची दाहक, इन्टेन्स कविता म्हणून मला "शेपशिफ्टर पोएम" ही कविता अतिशय आवडते. अतिशय वेगळ्या विषयावरील ही कविता वाचकाच्या हृदयात भीती, घृणा, वात्सल्य आणि करुणा यांचा कल्लोळ माजवते, या सर्व भावना एकाच वेळी उद्दीपीत करते.
या विषयावर मी वाचलेली ही पहीलीच कविता. माझा ल्युसिल क्लिफ्टन या कवयित्रीला , तिच्यातील प्रतिभेला तसेच स्वतःची कहाणी जगापुढे मांडण्याकरता लागणार्‍या धैर्याला कडक सॅल्यूट. विषय सांगत नाही. कविता वाचल्यावर उमगेलच.
_____ जरुर वाचा - shapeshifter poem - Lucille Clifton____________

the legend is whispered
in the women's tent
how the moon when she rises
full
follows some men into themselves
and changes them there
.
.
.
.
who is there to protect her
from the hands of the father
not the windows which see and
say nothing not the moon
that awful eye not the woman
she will become with her
scarred tongue who who who the owl
laments into the evening who
will protect her this prettylittlegirl
.
.
.
.
.
.
______

वरील धागा हा अन्य संस्थळावर पूर्वप्रकाशित आहेच. इथे (मला आठवते त्याप्रमाणे) पहील्यांदा टाकला आहे. जर एखाद्या प्रतिसादामध्ये ही कविता मी नमूद केली असेल तर निदान आठवत तरी नाही.
आज परत ल्युसिल क्लिफ्टनचे समग्र कवितांचे पुस्तक वाचत असताना, तिने भोगलेले हे दु:ख अन त्रास , परत तोच विषय एका अन्य कवितेतून सामोरा आल. अन परत एकदा चर्र झाले. ती कवितादेखील खाली देत आहे.
फक्त काहीतरी भडक लिहायचे हा हेतू नसून, अतिशय वेगळ्या व बोल्ड विषयावरील कविता वाचकांपर्यंत (इंग्रजी कविता आवडणार्‍या) हा हेतू आहेच अन लिहावसं वाटलं हादेखील. अर्थात स्पष्टीकरणाची गरज नसूनही देते आहे.

______ जरुर वाचा - moonchild - Lucille Clifton_________________

whatever slid into my mother's room that
.
.
.
.
the moon understands dark places.
the moon has secrets of her own.
she holds what light she can.

we girls were ten years old and giggling
in our hand-me-downs. we wanted breasts,
pretended that we had them, tissued
our undershirts. jay johnson is teaching
me to french kiss, ella bragged, who
is teaching you? how do you say; my father?
.
.
.
.
I am asked whose tears these are
I always blame the moon.

Group content visibility: 
Use group defaults

बऱ्याच गोष्टी घडताना आपल्याला जो त्रास होतो, तेवढाच किंबहुना त्याहून जास्त त्रास त्या मनात दाबून ठेवल्याने होतो, आणि विशेष म्हणजे जेव्हा आपण ती गोष्ट कुणाजवळ बोलून दाखवतो तेव्हा किंवा त्यानंतर तिची तीव्रता नगण्य होते.

तुमचे विचार आवडले! धन्यवाद..

सामो, हा विषय खुपच मोठा आहे गं! यातुन जाणारी "मी एकटी नाही" हे जेव्हा समजत ना. त्यावेळच्या वेदना अधिक तीव्र-गडद होतात.
आणि तितकाच राग-संताप देखील अनावर होतो.

सामो छान लिहिले आहे.
*********
मला आणि माझ्या मैत्रीणींना असे कित्येक अनुभव आले आहेत. खरंतर पुरूषद्वेष्टीच व्हायचे मी पण घरी वडील, भाऊ "अशीच आमुची माता असती " या दुर्मिळ गटात असल्याने नाही झाले. मला झालेला त्रास माझ्या सोबत भाऊ असला की त्यालाही होत असे. मला म्हणाला होता तुझ्या कडे उगाच कोणी टक लावून पाहिले की मला फार त्रास होतो. (After 30's) आता कोणी बघत नाही हे पाहून खूप छान वाटते. आईची पण इतकी बंधन असायची की बस . फार back ground check केल्याशिवाय कुणाच्या घरी जाऊ द्यायची. माझे लग्न झाले की सुस्कारा सोडला घरच्यांनी. अति त्रासामुळे लवकर लग्न झाले/ उरकले Sad !!
मीच एक लेख लिहू शकते याच्या दूरगामी परिणामांवर. जाऊ द्या पण !

@रावपाटिल - तुम्हाला मी काय म्हणतेय ते बरोब्बर कळलेले आहे.
@मन्या - व्हाय मी? हा एक मोठा फॅक्टर असतो पण मला तरी वाटतं भारतातील निदान शहरातील एकही स्त्री/मुलगी या त्रासापासून वाचलेली नसावी. फक्त आडनिड्या वयात, हा अनुभव आला की एकदम विश्वास उडतो, प्रमाणाबाहेर त्रास होतो
@आदिश्री - जरुर लेख लिही अर्थात तुला वाटलं तरच.