रिकोटा चीज बर्फी

Submitted by अमया on 28 April, 2009 - 18:15
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

रिकोटा चीज 15 oz डबा
unsalted butter 1 cup (मी 3/4 th वापरते)
साखर 8 oz ( 1 cup );( मिल्क मेड चालेल .. प्रमाण अन्दाजे)
Milk pawder 1 cup
वेलदोडा पावडर आवडीनुसार,
केशर , बदाम ,पिस्ते सजावटी करीता

क्रमवार पाककृती: 

एका microvave safe Bowl मधे Butter melt करा.
इतर साहित्य घाला आणी व्यवस्थीत मिक्स करा.
१० मिनीटे microvave करा.
बाहेर काढुन परत व्यवस्थीत मिक्स करा आणी परत ३ते५ मि. microvave करा. या वेळात मिश्रण सुटुन येत. लालसर दिसत..
यामधे नन्तर केशर, वेलदोडा पावडर घाला.
एका प्लेट्ला तुपाचा हात लावुन त्यावर हे मिश्रण पसरवा.
वरुन बदाम काप, पिस्ते ई घालुन सजवा. थोडे गार झाल्यावर फ्रीज मधे ठेवुन सेट करा . सेट झाल्यावर वड्या कापा.

वाढणी/प्रमाण: 
वड्याच्या साईझ नुसार (मध्यम आकाराच्या) अंदाजे ३० ते ४० वड्या होतात
माहितीचा स्रोत: 
मैत्रीण
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थँक्यु! थँक्यु!!
लवकरच करून बघते. मस्त कृती. आणि पटकन होणारी.
एक प्रश्ण : रिकोटाचीजमधलं पाणी निघून वड्या/बर्फी कोरडी होते का १०-१५ मिनिटं मायक्रोव्हेव केल्यावर? लोण्याऐवजी 'स्मार्टबॅलन्स ब्लेंड' घालून करून पाहीलंय का कोणी?

ही बर्फी एकदम खुटखुटीत किंवा कोरडी नाही होत. मी पहिल्यांदा केली त्यावेळी थोडी सॉफ्ट होती. एक दोन मिनीटे जास्त मायक्रोवेव मधे फिरवाव लागलेल; एक दोनदा केलीस तर तुला अन्दाज येईल. मी लोण्याऐवजी 'स्मार्टबॅलन्स ब्लेंड' घालून करून पाहील नाही.

रि. चीझ मुळे ही बर्फी "मलई बर्फी" सारखी लागते का चवीला ?
मिल्क पावडर कोणत्या ब्रान्ड ची वापरता ?