माझ्या अंथरुणापाशी कुणी भळभळत्या सुगंधाचा तो आदीम धूप जाळेल का?
म्हणजे त्या तमातूर घनदाट शुभ्र सुगंधात ही स्वप्नं घुसमटून बेशुद्ध होतील....
आणि.... मला झोप लागेल!
माझ्या खोलीत अपार श्रद्धेनं लाविल का कुणी थरथरत्या शांततेचे ते अथांग दिवे?
म्हणजे त्या अखोल निष्पाप रंध्रमयी उष्म्यात जळून जातील माझे निरागस अपराध
आणि... मला झोप लागेल!
माझ्या कानांपाशी मनस्वी आत्म्यासह कुणी गुणगुणेल का ते अधांतराचे निर्गूण गीत?
म्हणजे मग अस्तित्वाची सगळी थडगी सुरांच्या भुईखाली गुंगून अनाकार अवलय होतील
आणि.... मला झोप लागेल!
कुणी थोपटेल का मला? संध्याकाळच्या अनिश्चित अहेतूक वाळूच्या किंचित उबदार मऊशार तळव्यांनी?
म्हणजे मग मेंदूवरच्या सुरकुत्यांतले सारे प्रश्न भुरभुर उडून जातील अनुत्तरांच्या प्रगाढ क्षितीजा कडे...
आणि... मला झोप लागेल!
असे काहीही... अगदी काहीही... करा कुणीही.
म्हणजे... मला झोप लागेल!
फार सुंदर.
फार सुंदर.
वाह!
वाह!
सुंदर
सुंदर
सुंदर!
सुंदर!
आवडली
आवडली
अप्रतिम
अप्रतिम
क्या बात!
क्या बात!
अस्वस्थता पोचली.
अस्वस्थता पोचली.
कविता आवडली.
कविता आवडली.
हैराण करून गेली कविता. ..
हैराण करून गेली कविता. ..
अनेकदा आठवेल अशी कविता!
अनेकदा आठवेल अशी कविता!
आशय आणि शब्द.. क्या बात!
आशय आणि शब्द.. क्या बात!
अप्रतिम !
अप्रतिम !
हैराण करून गेली कविता. .. >>>
हैराण करून गेली कविता. .. >>>> अगदीच...
सुंदर.
सुंदर.
Oh my God!
Oh my God!
धन्यवाद!
धन्यवाद!
अस्वस्थ!
अस्वस्थ!
छानच
अप्रतिम
छानच.
छानच.
तगमग आणि तळमळ उत्कटपणे व्यक्त झाली आहे.
खूपच अप्रतिम
खूपच अप्रतिम
<<<< माझ्या अंथरुणापाशी कुणी
<<<< माझ्या अंथरुणापाशी कुणी भळभळत्या सुगंधाचा तो आदीम धूप जाळेल का?
म्हणजे त्या तमातूर घनदाट शुभ्र सुगंधात ही स्वप्नं घुसमटून बेशुद्ध होतील...
माझ्या खोलीत अपार श्रद्धेनं लाविल का कुणी थरथरत्या शांततेचे ते अथांग दिवे?
म्हणजे त्या अखोल निष्पाप रंध्रमयी उष्म्यात जळून जातील माझे निरागस अपराध
>>>>>
फार फार सही लिहिलंय हे...!! एवढ्या उत्कट प्रार्थनेला यश येणार नाही असं होणार नाही..!!
सुंदर!
सुंदर!
अप्रतिम कविता आणि प्रत्येक
अप्रतिम कविता आणि प्रत्येक शब्द.
मला तुमच्याच 'झोप येत नाही' या लेखाची आठवण झाली.
अप्रतिम कविता आणि प्रत्येक
अप्रतिम कविता आणि प्रत्येक शब्द.
मला तुमच्याच 'झोप येत नाही' या लेखाची आठवण झाली.>>+१
अवलय म्हणजे?
अवलय म्हणजे?
खूप आवडली.
खूप आवडली.
धन्यवाद!
धन्यवाद!