Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23
चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मुलाखत नाहीये. राहुल ला चार
मुलाखत नाहीये. राहुल ला चार लोकांनी ' यंदा कर्तव्य नाही' छाप प्रतिसाद दिले. म्हणुन त्यांनी यू ट्यूब वर पैसे कमावण्याचा उद्देशाविना रिलीज केला.
त्यात थेटर मिळत नाही ते ओटीटी गळचेपी याचा किंचित उल्लेख ही नाही. ते सगळंच माबोवरील एकसट्रापोलेशन आहे. राहुल यातलं काहीही बोललेला नाही.
ते नंतर आलंय ना ? त्यात आहे
ते नंतर आलंय ना ? त्यात आहे असं कुणी म्हटलं आहे का ?
धन्यवाद, आचार्य. बघते.
धन्यवाद, आचार्य. बघते.
मुद्दा काय आहे की चित्रपटांचे
मुद्दा काय आहे की चित्रपटांचे 2 प्रकार आहेत: एक गर्दीत पाहायचा, गर्दीसाठीचा सिनेमा- दुनियादारी, दे धक्का, लय भारी, दिगपाल लांजेकर चित्रपट, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, वगैरे.. दुसरा दर्दी लोकांनी एकट्या दुकट्याने किंवा ज्यांना तो विषय कळू शकतो त्या लोकांसोबत पाहायचा सिनेमा- नाळ, फँड्री, श्वास, अमलताश
पहिल्या प्रकारात theatre experiance मूल्य अधिक असते, तो चित्रपट मोठ्या आवाजात मोठ्या पडद्यावर पाहिला तर मजा वाटते.. त्यासाठी मी तरी 400 रुपयांचे तिकीट काढू शकतो
दुसरीकडे अमलताश किंवा अंतर्मुख करणारे, शांत चित्रपट जे मनाला आनंद देणारे चित्रपट आहेत ते पाहण्यासाठी मी थेटरात जाणार नाही कारण मला तो चित्रपट एकट्याने शांतपणे कोणत्याही व्यत्ययाशिवाय बघायला आवडेल, म्हणून मी तो ott वर येण्याची वाट बघेन.. या आधी कासव चित्रपटासाठी ott सदस्यत्व विकत घेतले आहे. पुढेही घेईन.
आता दोन अजून प्रकार आहे यात: अ. ज्या चित्रपटासाठी थेटरात जाण्याची किंवा ott विकत घेण्याची गरज नाही. दिसला कुठे सहज तर बघा, टाईमपास करा आणि सोडून द्या बाईपण भारी देवा, झिम्मा, अल्याड पल्याड, फुलवंती
ब. हे चित्रपट पाहण्यासाठी थेटरात जाण्याची, ott विकत घेण्याची आणि वेळ वाया घालवण्याची काहीच गरज नसते. - एक डाव भुताचा, नवरा माझा 2, लकडाऊन b positive. दुर्दैवाने ह्याच कॅटेगरीचे चित्रपट जास्त बनतात.
मराठी चित्रपट पाहणाऱ्ऱ्यांपर्यंत पोहचत नाहीत ही प्रेक्षकांची चुक नाही. चित्रपट पाहायला जावं असे थेटर exp चित्रपट बनले आणि प्रेक्षकांपर्यंत पोहचले तर प्रेक्षक जातील बघायला आणि गेले आहेत..
एक डाव भुताचा म्हणजे अशोक
एक डाव भुताचा म्हणजे अशोक सराफ , दिलीप प्रभावळकर, रंजना?
नाही भरत, मास्तुरे तर अजूनही
नाही भरत, मास्तुरे तर अजूनही मस्त वाटतो, त्याच नावाचा मकरंद अनासपुरे सिद्धार्थ जाधव चित्रपट आला आहे इतक्यात. बकवास
घ्या! मला असा काही चित्रपट
घ्या! असा काही चित्रपट आलाय हेच मला माहीत नाही. सुखी आहे मी.
मीही घाबरले
मीही घाबरले
अजिंक्य आवडल्या कॅटेगरीज.
अजिंक्य आवडल्या कॅटेगरीज. दुसरीकडे...यात काही चित्रपट आवडतात, काही नाही. तर ते ओकेच. असे चित्रपट थिएटरमधे बघितले तर आसपास असणारे प्रेक्षक चांगला/ वाईट प्रभाव पाडू शकतात. जे वैतागाचं होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही म्हणता तसं एकट्यानेच बघणं श्रेयस्कर.
मला आचार्यांचा मुद्दा थोडा
मला आचार्यांचा मुद्दा थोडा लक्षात आला. मराठी बद्दल कळकळ सर्वांनाच आहे व एखाद्या कलाप्रकारात आपली भाषा मागे पडू लागली तर आपल्या सगळ्यांनाच वाईट वाटेल. फक्त आचार्य (आणि इतर सहमत) त्यावर मराठी लोकांनी काहीतरी कृती करून निषेध नोंदवला पाहिजे आणि ही भाषेची अवनती रोखली पाहिजे असं म्हणत आहेत. ते करताना त्यांनी इतर भाषेचे बघू नका वगैरे उपाय केवळ उदाहरण म्हणून दिले असावेत. पण मी काय आणि इतर विरोधक काय, प्रॅक्टिकल गोष्टींवर विचार करून त्या उदाहरण म्हणून दिलेल्या उपायांवर फोकस करीत आहेत आणि ते शक्य नाही म्हणून सांगत आहेत. पण ब्रॉडर स्कोपमध्ये मराठीच्या अवनतीवर काहीतरी उपाय करावा, उदाहरणांपैकीच एक असं काही नाही, - असाच जर विचार असेल, तर तो मान्य आहे. अमलताश सिनेमावरून तो आल्यामुळे जरा अस्थानी किंवा अवेळी वाटू शकतो. मराठी सिनेमांना प्रेक्षक मिळावा, पैसे मिळावेत, ग्लॅमर मिळावं, प्रोड्युसर मिळावा, प्राईम टाईम मिळावा, ओटीटी मिळावा - या सर्वांशी सहमत. अमलताशला नाही मिळाला तरी चालेल. सैराट, झिम्मा, झपाटलेला (जुना) अश्या सिनेमांवर ही वेळ येऊ नये इतकीच वैयक्तिक इच्छा आहे. पण दुसरीकडे असं वाटतं की सर्वांची अशी इच्छा असेलच असं नाही. तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे.
एक डाव धोबीपछाड एकदम mad
एक डाव धोबीपछाड एकदम mad कॉमेडी असलेला चित्रपट. z talkies वर कधीतरी लागतो पण youtube zee5 सकट कोणत्याही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध नाही.. का? माहीत नाही. तसंच सचिनचा नवरी मिळे नवऱ्याला देखील कुठेच सापडला नाही..
(कुणाकडे असेल तर लिंक किंवा google drive द्या)
एक डाव धोबीपछाड एकदम mad
एक डाव धोबीपछाड एकदम mad कॉमेडी +१
मस्त टाईमपास पिक्चर
झी कडे rights असतील त्यामुळे इतर ठिकाणी नसावा बहुतेक
एक डाव धोबीपछाड बद्दल मी
एक डाव धोबीपछाड बद्दल मी सुद्धा ऐकून आहे पण कुठेच बघायला मिळत नसल्याने राहिला आहे.
असाच अजून एक चित्रपट म्हणजे आपल्या मराठी रितेश देशमुख आणि जेनेलिया वहिनीचा तुझे मेरी कसम.. फर्स्ट डे फर्स्ट शो थिएटरमध्ये पाहिला होता.. आवडला होता.. पण आता कुठेच नाहीये तो...
एक डाव धोबीपछाड एकदम mad
एक डाव धोबीपछाड एकदम mad कॉमेडी
>>
Ooscar या Sylvester Stallone च्या १९९१ च्या सिनेमावरून छापला आहे
हेमा कनेक्शन मात्र प्युअर नॉस्टॅल्जिक आहे
“ Oscar या Sylvester Stallone
“ Oscar या Sylvester Stallone च्या १९९१ च्या सिनेमावरून छापला आहे” - इंटरेस्टिंग!! हे माहित नव्हतं. आता प्राईमवर $३.२९ भरून ऑस्कर बघणं आलं.
एक डाव धोबीपछाड ढापला आहे???
एक डाव धोबीपछाड ढापला आहे??? हे माहीत नव्हतं . तरी तो आवडतो.
बाय द वे, सिल्वेस्टर स्टॅलनला "अगं हेमा SSSS" म्हणताना इमॅजिन होत नाहीये.
असे असेल तर अजून ढापाढापी
असे असेल तर अजून ढापाढापी केली पाहिजे!
Youtube वर आहे
Youtube वर आहे
Ooscar या Sylvester Stallone
Ooscar या Sylvester Stallone च्या १९९१ च्या सिनेमावरून छापला आहे >>> हे माहिती नव्हतं!!
आमच्या अँकीची किनै सगळीकडे ओळख
सिल्वेस्टर स्टॅलनला "अगं हेमा SSSS" म्हणताना इमॅजिन होत नाहीये. >>>
अगदी!
त्याला सिनेमाभर सहन करणे म्हणजे अवघडच!
एक डाव धोबीपछाड >>> हा खूप
एक डाव धोबीपछाड >>> हा खूप भन्नाट आहे. पुष्कर श्रोत्री, गणेशपुरे, मुक्ता बर्वे, भावे, आणि अशोक सराफ सगळेच धम्माल करतात.
तुझे मेरी कसम >> याच्याबद्दल असे ऐकले आहे की तो ई टिव्ही वाल्यांनी बनवला आणि अजूनही री रीलिजला खूप धंदा करतो त्यामुळे कुठेच ऑनलाईन टाकलेला नाही. आता मागच्या वर्षी पण री रीलिज झाला होता.
@किल्ली: link देता येईल का?
@किल्ली: link देता येईल का?
आता मागच्या वर्षी पण री रीलिज
आता मागच्या वर्षी पण री रीलिज झाला होता.
>>>
धनि धन्यवाद..
म्हणजे आता कुठे पायरेटेड कॉपी असेल तरच शोधावे लागेल.. माझ्या माहितीत तर कुठे रीरिलीज झालेला आजवर बघण्यात आला नाही.
त्या चित्रपटाच्या खूप भारी आठवणी आहेत माझ्या... त्या पुन्हा कधीतरी
एक डाव…. खरेच मस्त आहे. सु
एक डाव…. खरेच मस्त आहे. सु भाला पहिल्यांदा मोठ्या स्क्रीनवर मी त्यात पाहिले. खुप गोड दिसलाय.
मिथुनचा एक आहे सेम स्टोरी, एक डाव.. नंतर आलेला . एक डाव.. हॉलिवुडवरुब घेतलाय नाहित नव्हते त्यामुळे हिंदी एक डाव वरुन घेतलाय असे वाटले होते.
काल ३१चा आनंद अमलताश बघुन साजरा केला. कथेला कसलाही फायदा नसलेले इतके प्रसंग घुसडलेत की बस्स्स्स…
एखादा चांगला एडिटर मिळाला असता तर त्याने ते सगळे कापुन टाकुन एक २० मिनिटांची सुटसुटीत शॉर्ट फिल्म बनवली असती.
ऐशु म्हणाली की रादेने घरातल्या, बाहेरच्या गमती जमती मोबाईलवर शुट करुन यु ट्युबवर टाकल्यासारखे वाटते बघताना
रादेने घरातल्या, बाहेरच्या
रादेने घरातल्या, बाहेरच्या गमती जमती मोबाईलवर शुट करुन यु ट्युबवर टाकल्यासारखे वाटते बघताना
माझी काही मते . -
माझी काही मते . -
चित्रपट बनविताना अनुभवाने तयार झालेल्या काही ढोबळ नियमांचे पालन करणे गरजेचे असते.
जसे कि सीनमध्ये शॉट्स लांबीने छोटे असणे. कॅमेरा बदलून एक्शन रिअक्शन दाखवणे. यामुळे सिन कंटाळवाणा होत नाही.
योग्य तिथे बॅकग्राऊंड संगीत व आवाज वापरणे. (उदा . ग्रामीण सिन मध्ये दूर गायीम्हशींचा, त्यांना हाकलल्याचा, रेडिओ चा आवाज. शहरी सिन मध्ये ट्राफिक चा आवाज.) प्रेक्षकांमध्ये विविध भावना उद्युक्त करण्यासाठी चतुराईने बॅकग्राऊंड संगीताचा व आवाजाचा वापर करणे .
व्यक्ती व गोष्टी पुरेश्या झूम केलेल्या असणे व बॅकग्राऊंड पुरेसे ब्लर केलेले असणे. गरज नसलेल्या गोष्टी फ्रेम मध्ये न दाखवणे. फ्रेम हि कन्टेन्ट रिच असणे.
चित्रपटाच्या कथेशी निगडित नसलेले शॉटस काढून टाकणे, भले ते कितीही चांगले तयार झालेले असोत. (Murder your darlings.)
कथेत गरजेच्या गोष्टी एस्टॅब्लिश करणे (पाणी या चित्रपटात गावातील लोकांना एकत्र आणणे कठीण आहे हे सांगितले आहे , पण लोकांमध्ये भांडणे आहेत हे एस्टॅब्लिश केलेले नाही. काही कारणावरून दोन गटांत हाणामारी होते हे सुरुवातीला दाखवून ते एस्टॅब्लिश करता आले असते. तसेच दुष्काळाची दाहकता प्रेक्षकांपर्यंत पोचत नाही.)
अपयशी झालेल्या मराठी चित्रपटांमध्ये या उणीवा जाणवतात .
चित्रपट निर्मितेचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन मग ते बनविले तर अधिक चांगले होतील असे मला वाटते .
एक डाव...साठी अनेक अनुमोदन,
एक डाव...साठी अनेक अनुमोदन, सगळीच भट्टी भारी जमुन आली होती.
एक डाव भारीच आहे. अशोक सराफचा
एक डाव भारीच आहे. अशोक सराफचा वाढदिवस मला वाटतं तीन की चार जूनला असतो, तेव्हा हमखास झी टॉकीजवर लागतो.
माबो वाचक, चांगले मुद्दे आहेत. पण नुसताच टेक्निकली चांगला सिनेमा असून पुरेसं नाही. गरजेच्या गोष्टी एस्टॅब्लिश करणे हे सटली झालं पाहिजे, नाही तर तिथे बटबटीतपणा येतो. पार्श्वसंगीत, सिनेमॅटोग्राफी चांगली असूनही सिनेमा फालतू असतो असंही होतं. (उदा. राजवाडे अँड सन्स)
पार्श्वसंगीत, सिनेमॅटोग्राफी
पार्श्वसंगीत, सिनेमॅटोग्राफी चांगली असूनही सिनेमा फालतू असतो असंही होतं. >>>> खरंय, पण ते क्रिएटिव्हिटी मधील उणिवांमुळे असेल. तांत्रिक गोष्टींच्या वर क्रिएटिव्हिटी येते.
जर क्रिएटिव्हिटी चांगली असेल आणि तांत्रिक गोष्टींमुळे चित्रपट चांगला बनला नाही तर वाईट वाटते.
तांत्रिक गोष्टींच्या वर
तांत्रिक गोष्टींच्या वर क्रिएटिव्हिटी येते. +१
बिचाऱ्यांनी कष्ट केले पण चुकीच्या सिनेमासाठी केले.
जर क्रिएटिव्हिटी चांगली असेल आणि तांत्रिक गोष्टींमुळे चित्रपट चांगला बनला नाही तर वाईट वाटते >> आणि क्रिएटिव्हिटीच्या नावाने शून्य असेल आणि तांत्रिक बाबी चांगल्या असतील तर त्या तांत्रिक बाबी सांभाळणाऱ्यांसाठी वाईट वाटतं
मिथुनचा एक आहे सेम स्टोरी
मिथुनचा एक आहे सेम स्टोरी
>>
डॉन मुथुस्वामी
@लले,
इथे ही ओळखी
Pages