मराठी चित्रपट कसा वाटला? - 1

Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23

चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओके ऋन्मेष.

माझा स्वभावदोष आहे. थोडक्यात सांगितले आणि संपले. त्यानंतर पेशन्स संपतात.
अ‍ॅक्च्युअली ऑकुटपासून हे सगळे वाद झडलेले असल्याने पुन्हा पहिल्यापासून प्रतिसाद द्यायचा कंटाळा येतो. हे जुने झालेले असल्याने सगळ्यांना माहीतच आहे हे गृहीतक होते. आता विचार केल्यावर ग्यानबाची मेख ध्यानात आली.

काही वर्षांनी मराठीत ही बनणार नाहीत. किंवा अमलताश छाप सुमार बनतील. ते आजही बनतच आहेत की!
यावर उपाय काही नाही, तो आहे समजून अघोरी काही करायची गरज नाही. कारण ते शक्य नाही. आपल्या भाषेवर तितकं आपलं प्रेम नाही टाइप निष्कर्ष काढायचा असेल तरी हरकत नाही. मला वैयक्तिक फालतू सिनेमा ला फालतूच म्हणायला जमतं. आता ते भारी आहेत असं कुणाला वाटलं तर त्यांनी तसं लिहावं. पण ते त्या कलाकृती वरच लिहावं. शेर शिवराय छाप सिनेमे ओटीटी वर येतात, त्यामुळे आकस आहे ला काही अर्थ नसावा. मोबदला कमी आहे याचं कारण तुलनेत प्रेक्षक कमी या व्यतिरिक्त काही आहे असं वाटत नाही.
बाकी चित्रपटसृष्टी वाचवायला काहीही करायची, जसं झुंडीने थेटरात जा... इ. किंचितशी ही इच्छा नाही. कालाय तस्मै नमः! मेले तर वाईट वाटेल. पण त्याचा अर्थ गरज न्हवती हाच आहे हे मनाशी आधीच ठरवलं आहे. त्यात दोष ना कुणाचा. इव्होल्यूशन असच झालं.

पुन्हा त्याच वळणावर आली गाडी.
सिनेमा फालतू आहे कि नाही हा मुद्दाच नाही. रजनीकांतचा डॉन आणि अमलताश शेजारी शेजारी ठेवून बघा.
डॉन हिट आहे तिकडे. पण फालतू पेक्षा फालतू आहे. पण लोकांनी उचलून धरला म्हणून मार्केट आहे.
तुमच्या गळ्याला बंदूक लावून मराठी चित्रपट किंवा स्पेशली अमलताश बघा अशा धाटणीची चर्चा इथे नाहीच चाललेली.

एक्झॅक्टली. मार्केट आहे.
ते निर्माण झालं की सगळे येतील विथ मोबदला. ओटीटी हा पैसे कमवायचा (कमी गमावायचा) धंदा आहे. यात प्लॅटफॉर्मला नगण्य पैसे मिळतात. तुमचा सिनेमा आहे म्हणून आमचा प्रेक्षक टिकला, नवा आला असं होणार आहे का? विचार करा, तुम्ही आम्ही अमलताश कुठल्याशा सदस्य नसलेल्या प्लॅटफॉर्म वर आलाय म्हणून तो बघायला त्या प्लॅटफॉर्म चे सदस्यत्व घेऊ का? कदाचित घेऊ ही! पण किती लोक घेतील?
हपाला +१ द्यायचा राहिला.

जेव्हां बॉलीवूड मोठ्या स्केलला सिनेमे बनवत होती तेव्हां त्या स्केलला बनवले तरच आम्ही बघू असे तमिळ प्रेक्षक म्हणत होता का ?
प्रेक्षकांनी कसे का होईना ओबड धोबड सिनेमे उचलून धरले, आज त्यांचे सिनेमे स्केलच्या दृष्टीने हिंदीच्या पुढे गेले.

माझी क्षमता संपली. पटवून देणे हा काही आपला धंदा नाही.
ज्याचा त्याचा समज ज्याच्या त्याच्या पाशी. प्लस वन देऊन मोकळे होणे हे सोपे आहे.

साऊथ पॅटर्न आपण फॉलो केला तर एक प्रेक्षक म्हणून आपण काय कमावू आणि काय गमावू याचा शांतपणे विचार करून बघूया. कदाचित मी चुकत सुद्धा असेल.

महाराष्ट्रात इतर भाषिक चित्रपटांना थिएटर दिलेच नाही आणि मराठी चित्रपटच प्रदर्शित केले तर नक्कीच मराठी चित्रपटांचा प्रेक्षक वर्ग वाढेल. भले नाईलाजाने का असेना लोकं बघतील. त्यातून कमाई होईल आणि दर्जा देखील सुधारेल असे गृहीत धरू. गृहीतच धरावे लागेल कारण दर्जा सुधारेलच याची खात्री देता येणार नाही. आपण कसेही चित्रपट बनवले तरी आपल्या चित्रपटाला थिएटर मिळणार हे मराठी चित्रपट निर्माते दिग्दर्शकांना माहीत असणार आणि त्यांच्या स्पर्धेला असलेले इतर भाषिक दिग्दर्शक निर्माते कट झाले असतील. त्यामुळे आपल्याला देखील नाईलाजाने ते जे बनवतील तेच आवडून घ्यावे लागणार. आशा करूया आपण कमावून दिलेल्या पैशाला ते जागतील आणि आपल्यासाठी चांगलेच चित्रपट बनवतील.

ईतर भाषिक आपले दुकान घेऊन इतर राज्यात जातील. मराठी चित्रपटात शाहरुख ऋतिक अक्षय अमिताभ वगैरे कोणी नसणार, ते आपल्यातूनच यावे लागणार. यांच्यासारखेच करिष्माई स्टार आले तर ठीक नाहीतर जे जसे असतील तेच आवडून घ्यावे लागणार.

जे पडद्यावरील कलाकारांबाबत तेच पडद्यामागील दिग्दर्शक, संगीतकार आणि तंत्रज्ञ यांनाही लागू.. ते आपल्या मातीत तयार होतीलच यात मला शंका नाही. पण नाहीच झाले तरी जे असतील तेच आवडून घ्यावे लागतील.

सध्या आपण मातृभाषेचा दुराभिमान बाळगत नसल्याने इतर भाषेतील कलाकृतींचा जो थिएटर मध्ये जात आनंद उचलतो त्यावर आपल्याला मराठी प्रेमासाठी काही प्रमाणात पाणी सोडावे लागणार. पण आपण हे मराठी चित्रपट सृष्टीच्या भल्यासाठी करूच. आपण असे स्वताला इतर भाषिकापासून तोडल्याने आता आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान बाळगावाच लागणार आणि आमचा अमुक तमुक बाब्या कलाकार कसा भारी हे इतर भाषिकांना पटवून द्यावेच लागणार.

एवढ्या इंग्लिश फ्रेझेस नाही समजत पण ग्रेटर शब्द आहे म्हणजे काहीतरी कौतुकच असेल असे पकडून आभार मानतो Happy

थेटरात सिनेमा लावायला पैसे लागतात. मराठी सिनेमे लागत नाहीत कारण निर्मात्यांकडे पैसे नसतात. मुद्दाम थेटर दिलं नाही, वगैरे जो आरडाओरडा होती, तो विनोदी आहे. खेळ का लागत नाहीत, हे निर्माते, अभिनेते यांना माहीत असतं. पण रडारड केली की प्रसिद्धी मिळते, राजकारणी सहभागी होतात आणि मराठीचा मुद्दा अस्मितेचा होतो.

अशा धाग्यावर पुन्हा पुन्हा लिहायचं म्हणजे भीती असते कि वेगळा धागा काढा ही सूचना कुणी तरी करेल.
अशी वेळ येऊ नये. माझा मुद्दा मी आता स्पष्ट करत नाही. त्याला नाझीछाप सक्तीची आणि द्वेषाची झालर चिकटवण्याचा उद्योग झाला आहे, ते मायबोलीवर आता नेहमीचं आहे. साजिरा ने इकडं चक्कर टाकावी. दामले मास्तर येऊन गेले आहेत , पण त्यांचं म्हणणं नीट समजलेलं नाही.

एक वैतागवाडी प्रतिक्रिया असते तशी प्रतिक्रिया आहे कि ओटीटी वाले मराठी नको म्हणतात. आता त्यावर हा धंदा आहे ही घोडेछाप प्रतिक्रिया आहे. हे वाद माबोवर पण शिळे झालेत. धंदा असेल तर मराठी माणूस बघणार नसेल तर कसा वाढेल ? यावर दर्जा येतो. दर्जा म्हटलं कि ज्या अमराठी सिनेमांना आपण डोक्यावर घेतो त्यात नेमकं काय असतं ?

दाक्षिणात्य सिनेमा बाळबोध होता तेव्हां हिंदीत शोले, क्रांती, शान च्या स्केलला सिनेमे बनत होते. आता चांगला सिनेमा कुठला हे फार अवघड आहे.
आनंद, बावर्ची, थोडा सा रूमानी हो जाये, गोलमाल (जुना) , दामाद हे सिनेमे आवडणारा वर्ग पण मोठा आहे आणि शोले पण. शोले सोडला तर इतर सिनेमाची कथा रेंगाळत राहते. शोलेत कथा आहे का ? तरीजे काही मनावर गारूड करतं ते सिनेमा.
मेकॅनाज गोल्ड सिनेमाची कथा काय आहे ? चार ओळींची आहे. पण आपण पाहतो तो सिनेमा. त्यासाठी प्रचंड पैसा लागतो. असा पैसा जर परतीची आशा असेल तर गुंतवला जाईल.

मराठीचं मार्केट हे मराठी माणूस आहे. मराठी माणूस हिंदी सिनेमे बघतो. मग हे सोडाच,
परत मराठी सिनेमाच्या नावाने गळा काढायला नको.
दर्जा वाली मंडळी - किल्ला काय वाईट सिनेमा आहे का ? काय अवस्था आहे किल्लाची ?

पूर्वी दर्जेदार नसलेले पण लोकप्रिय सिनेमे कोठारे, महागुरू लोकांनी दिले. त्या वेळी निर्मितीमूल्यं सुधारत गेली. सिनेमास्कोप, डॉल्बी असे तंत्रज्ञान वापरले गेले. हे दोघे बाजूला झाल्यावर नवा मध्यमवर्गीय सिनेमांचा ट्रेण्ड आला. श्वास पासून सुरू झाला. हे सिनेमे वेगळे होते. ज्याचं कौतुक अन्य भाषिक करतात. पण त्यांना थेटरच मिळत नाही. थेटरच मिळालं नाही तर धंदा कसा होणार ? मल्टीप्लेक्स वाले त्यांना जे निर्माते नफ्यातून कट देतात त्यांनाच थेटर देतात.

साउथला उलटं आहे. हॉलीवूड आणि बॉलीवूडला स्क्रीन मिळवायला झगडावे लागते.
पुष्पा काय दर्जेदार सिनेमा थोडीच आहे ? पण हवा करून चालवायचा ट्रेण्ड त्यांनीही ढापला आहे. एव्हढ्या स्क्रीन्स त्यासाठी लागतात. त्यात मराठी सिनेमाला स्क्रीन्स मिळत नाहीत. ते सगळेच वाईट असतील का ?
कुणीच पाहिला नाही तर चांगला सिनेमा कसा कळणार ? आणि स्क्रीन मिळणार नसेल तर कशाला कोण बनवेल ?

यात बदल करावा म्हणून मोहीम चालवा हा आग्रह अजिबात नाही. फक्त ही परिस्थिती आहे.
बदलायची तर सरळ आहे, महाराष्ट्रात मराठी सिनेमाला स्क्रीन्स मिळायलाच पाहीजेत. तसा कायदा आहेच.

इथे साऊथचे लोक हिंदी बोलत नाही त्याला आपण राजकीय भूमिका म्हणतो आणि मराठीसाठी आग्रह धरआ कि त्याला द्वेष म्हणतो. असं गंडलेलं लॉजिक असेल तर चर्चा काय करणार ?
इथे समाप्त.

चिनूक्स, चांगला चाललेला माऊली सलमान खानसाठी उतरवला होता. दुनियादारी उतरवला तेव्हां मनसेनं खळ्ळंखट्याक केलं होतं.
पुन्हा स्क्रीन्स मिळाले आणि तुफान चालला होता सिनेमा.

द बॉक्स सारख्या ठिकाणीही चित्रपट लावू शकतात.

परवा न्यूज मध्ये होत की नाट्यगृहांमध्ये मराठी चित्रपट दाखवायला परवानगी देण्याची मागणी केली आहे आणि विचार सुरू आहे.

ह खरंच उपाय आहे का

छगन भुजबळ यांनी मल्टीप्लेक्सला परवानगी देतानाच मराठी चित्रपटांसाठी प्राईम स्लॉट्स राखून ठेवण्याची अट घातली होती. पाच वर्षे मल्टीप्लेक्सना करमाफी होती. ती या मल्टीप्लेक्स वाल्यांनी पाळलीच नाही. करमणूक कर नसताना प्रेक्षकांकडून तो वसूल केला. आणि भाजप सेना सरकारने पुन्हा मराठी सक्ती आणल्यावर काय जादू केली समजत नाही पण दोन दिवसात प्राईम टाईमची अट कायद्यातून शिथील केली.

चिनुक्स धन्यवाद सांगितल्याबद्दल.

धोधो धंदा होत असेल तर चित्रपट्गृह कोणताही चित्रपट का नाकारेल असे मला वाटते. चित्रपट लावायला निर्मात्याला पैसे द्यावे लागतात हे माहित नव्हते.

मी पाहात असलेल्या नेफ्ली, प्राईम, दिस्ने, झी इत्यादीबर मराठी चित्रपट आहेत. अमलताशचे निदान नाव तरी ऐकले होते. नावही न ऐकलेले मराठी चित्रपट ओटीटीवर आहेत.

त्यामुळे मला वाटते की राहुल देशपांडे विडिओत काही वेगळे बोलत असला तरी त्याची बोलणी पैश्यांवरुन फिसकटली असावीत. ऑटीटी जितके पैसे देत होते ते राहुलला कमी वाटले असावेत. it’s fair from his point of view. त्याने यु ट्युबवर सिनेमा टाकुन तितकेच कमावले असावेत. तिथे त्याने डोनेशनचा ऑप्शनही ठेवलाय, लोक डोनेशन देताहेत. मराठीअस्मितावाल्यानीही आपला खारीचा वाटा द्यावा.

ओटीटी वाल्यांनी मराठी सिनेमा या वर्षी नको इथपासून भूमिका घेतली आहे असे राहुल देशपांडे याचे म्हणणे आहे. इथून चर्चा सुरू झाली. आता नेहमीप्रमाणे अमक्या तमक्या ने पैसे द्यावेत असे बोर्ड घेतलेल्या मंडळींचे आगमन झाले आहे.

यांचे कशालाच कसले संबंध नसलेले प्रतिसाद हा आता वेगळ्या मनोरंजनाचा विषय आहे.

मी अमलताश युट्यूबवर पण पाहिलेला नाही त्यामुळे त्या चित्रपटासाठी चर्चा आहे अशा समज झालेल्यांचा सत्कार करीन. मुलाखत पाहिली असती तर? Lol

मराठीत सौंदर्य, स्वॅग आणि मुख्य म्हणजे ग्लॅमर आणा ब्वॉ.
आता हिंदी सिनेमाबद्दल - काल कोणता तरी मनोज बाजपाई चा चित्रपट पहात होते ज्यात कडक बेडरुम सीन होता. पण मला काही बघवला नाही Sad अर्रे यार ग्लॅमर-ग्लॅमर!!!

काल रात्री ४-५ पोस्टी आल्या होत्या त्या वाचून गेलो होतो. सकाळपर्यंत ३०-३५ नवीन येतील असे वाटले नव्हते Happy

र.आ यांचा उद्देश साउथ मॉडेल तंतोतंत फॉलो करावे किंवा हिंदी वा इतर भाषांचा द्वेष करावा असा वाटला नाही. मी त्यांच्या पोस्टींमधली दोन वाक्ये संदर्भाला देतो:

मराठी भाषिकांनी या ओटीटी वाल्यांना झटका दिला तरच जागेवर येतील हे >>>
अशी नफ्याची गणितं असतील तर मराठी प्रेक्षकांनी यांचा नफा कमी करावा. >>>>

यातून मला समजले ते असे, की मार्केट फोर्सेस मुळे जर चांगल्या मराठी चित्रपटांनाही थिएटर्स व ओटीटी वर स्पेस मिळत नसेल, तर मराठी भाषिकांनी मार्केट फोर्सेसद्वारेच त्यावर आवाज उठवावा. म्हणजे उद्या एका थिएटर ने बराच काळ नवीन मराठी लावलेलेच नाहीत व इतर भाषिकच लावले जात आहेत असे दिसले तर एक ग्राहक म्हणून नाराजी दाखवून तेथे इतर सिनेमेही पाहू नका. त्यातून त्यांना कळू दे की तुम्ही आम्हाला डावललेत तर धंद्यावर परिणाम होईल. इथे कोणी द्वेष करायचा वा कायदा हातात घ्यायचा प्रश्नच नाही. एक ग्राहक म्हणून नाराजी दाखवणे आहे.

हा मुद्दा असेल तर मी पूर्ण सहमत आहे. इन फॅक्ट चित्रपटापुरतेच नाही, तर एकूणच सर्व क्षेत्रात मराठीबद्दल एक उदासीनता किंवा इव्हन तुच्छता दाखवली जाते (उदा: जाहिरातीतील मराठी भाषांतरे) त्याविरूद्ध कायद्याच्या चौकटीत, "मार्केट फोर्सेस"चा वापर करून आवाज उठवायची गरज आहे. यात द्वेष नाही.

आता हे सगळे करण्याइतका हा प्रश्न कोणाला भेडसावत आहे का - म्हणजे थोडक्यात "कोणाला याची काही पडली आहे का", लोक संघटित होतील का, तसे झाले तर कायद्याच्या चौकटीत राहतील का की यावर कोणीतरी राजकीय पोळी भाजून तिसराच प्रश्न उभा करेल - हे सगळे प्रश्न येतीलच. हे प्रॅक्टिकल नसेल. विशफुल थिंकिंग आहे. पण पेपर्स, टीव्ही सिरीज, जाहिराती, सिनेमे यात मराठीचे जे दळभद्रीकरण चालले आहे त्यावरचा राग कोणी मार्केट फोर्सेस द्वारे दाखवला तर ते चांगलेच आहे.

यातून भिकार मराठी चित्रपट थिएटर अडवून बसलेत, पाहायला पब्लिक नाही आणि थिएटर मालक तेथे दुसरे लावू शकत नाहीत असे व्हायला नको. पण म्हणूनच यात सरकारी नियम किंवा राजकीय पक्ष नकोत. लोकांनाच ठरवू दे. थिएटर मालकांना अजून न जाणवलेला एक ग्राहकवर्ग आहे व त्याला नाराज करून चालणार नाही हे यातून दिसायला हवे आहे.

फा +१

मराठीला मिळणारी दुय्यम वागणूक, त्याविषयी मराठी माणसाचंच औदासिन्य ह्या बाबतीत तुझ्याशी आणि र.आ. शी सहमत. बाकी केवळ मराठी म्हणून एखादं सब-स्टँडर्ड प्रॉडक्ट (सिनेमा, नाटक किंवा इतर काही) मी एक ग्राहक म्हणून कितपत घेईन ह्याविषयी मात्र साशंक आहे.

बरोबर आहे. इथे थिएटरमध्ये मराठी पिक्चर येतात तेव्हा बर्‍याचदा पहायला गेलो आहे. (नाळ १ ,२/ चंद्रमुखी, गुलाबजाम) अर्थात ट्रेलर बघूनच आवडणार नाही असं वाटल्यास जात नाही. केवळ मराठी आहे म्हणून नाच गं घुमा आणि बाईपण भारी देवा टाईप बघणार नाही. पण वर फाचा मुद्दा आहे त्याप्रमाणे मराठी माणसं एकत्र येऊन बहिष्कार वगैरे घालतील असं वाटत नाही.

फेफ, सायो - हो आणि सामाजिक जबाबदारी वगैरे म्हणून बघू नयेच. पण तसे सांगण्याचा उद्देश नाही. थिएटर्स हे भिकार पिक्चर्सची धर्मशाळा बनायला नकोत Happy

पण सध्या चित्र असे आहे की चांगल्या पिक्चर्सनाही स्पेस मिळत नाही. हे अर्थात अशा मुलाखतींमधून किंवा पेपर मधे वाचतो त्यावरून. चिनूक्सने जे लिहीले आहे ते एक वेगळीच साइड दाखवते. त्यातले आर्थिक गणित मला माहीत नाही. म्हणजे केजो, बडजात्या व पैसे देऊन शहराशहरात लोकांचा "प्रतिसाद" निर्माण करणारे साउथ चे निर्माते - यांच्याशी मराठी निर्माते स्पर्धा करू शकतील का हे ही आहे. इथे गृहीत धरतोय की एका ठराविक थिएटरमधे एका ठराविक वेळचा शो हा मराठी चित्रपट, पुष्पा टाइप साउथ वाले पिक्चर्स व केजो/बडजात्या यांचे बिग बजेट पिक्चर्स या सर्वांकरता एकाच रेटने विकला जातो. तसे नसेल तर कल्पना नाही. म्हणूनच त्यातले आर्थिक गणित माहीत नाही लिहीले.

अमित - अमलताश यू ट्यूबवर २ लाख १० हजार लोकांनी आत्तापर्यंत - दोन आठवड्यांत- पाहिला आहे. नेफिवर इतर भाषिक पिक्चर्समधले तुलनेने कमी पाहिलेले चित्रपट अनेक असतील. मग नेफिला हा का नको? कदाचित असा काही पिक्चर आहे आणि त्याला प्रेक्षक मिळतील हे त्यांच्या खिजगणतीत नसावे. यांचे निवडणारे लोक जे निकष वापरतात त्यात अजून असे मराठी पिक्चर आलेलेच नाहीत, असेही असेल. (तुलनेने अ‍ॅमेझॉन प्राइम वर आहेत.)

या कमर्शियल कंपन्यांचा "आकस" वगैरे असण्याचे काहीच कारण नाही. पण हे मार्केटच त्यांना अजून जाणवले नसेल. आपल्याही निर्मात्यांचे मार्केटिंग कमी पडत असेल. अजून बर्‍याच मराठी लोकांनाही मुळात अमलताश या नावाचा एक पिक्चर आलाय हेच माहीत नाही.

मराठी पिक्चर्सला १२० रूपये तिकीट असायचे तेव्हां हिंदीतल्या बड्या सिनेमाला ३५० रूपये तिकीट असायचे. किक सारख्या चित्रपटाचं.
आता सहाशे, सातशे कितीही असतं. ९०० रूपये तिकीट होतं तेव्हां कोण जाईल असा विचार केला होता, पण तो शो आधी फुल्ल झालेला. मराठीला अजूनही १८० किंवा २२० असं तिकीट पाहिलंय. ३०० रूपये जर मराठीला तिकीट लावलं तर प्राईम टाईम मिळेल मराठीला. कारण टक्केवारीचा हिशेब असतो.

सलमान, केजो वगैरे लोक पहिल्या आठवड्यात ५०% प्रत्येक स्क्रीनला देतात. त्यामुळे सगळ्या स्क्रीन्स त्यांनाच मिळतात. तेलगू आणि तमिळ सिनेमाची तिकीटे पाच पाच हजारला जातात पहिल्या आठवड्यात. म्हणून पुष्पाने पठाण, जवानचे आठवड्याचे रेकॉर्ड एका दिवसात तोडले.

मल्टीप्लेक्स जेव्हां महाराष्ट्रात येत होते तेव्हां त्यांनी पाच वर्षे करमाफी मागितली होती. त्या वेळी मराठीला प्राईम टाईमची function at() { [native code] }अ घातली होती. यात मला वावगं काहीच वाटत नाही. दक्षिणेला साऊथच्या सिनेमालाच प्राईम टाईम असतो. कानडी प्रेक्षकांनी पुष्पा नाकारला. कारण तिथे दोन कन्नड सिनेमे रिलीज व्हायचे होते. कर्नाटकात सध्या कन्नड वेदीके जोरात आहे.

अमालताश नेफी वर येऊदे की. मी शक्यतो सगळे ( शिवाजी आणि चरित्रपट सोडून) मराठी सिनेमे सबस्क्रिप्शन - पैसे भरून - आय पी अशा उतरत्या भाजणीत बघतो. फालतू वाटला तरीही मराठी असेल तर थोडा जास्त बेऑडा देतोच.
फक्त रडारड, राजकारण याचा कंटाळा आलाय. उत्स्फूर्त आणि समूहाने मराठी लोक करतील ते मिडियोकर आणि भीक नको प्रकार असेल असं मलाच का वाटतं कोण जाणे. झिम्मा आणि बाई पण लसावी बनेल ही मूर्तिमंत भिती वाटते.

बाकी मार्केट आहे समजल्यावर नेफ्ली येईल असे वाटते. त्यांनी डिसायपल हा अगदी अनवट ठेवला आणि हा नाही याचं कारण काय असेल तेच जाणोत. ते आकस नसावे असं वाटतं. पैसे/ प्रेक्षक मिळणार असतील तर ओटीटी वाटेल ते ठेवतील. त्या टायसन ची बकवास मॅच सुद्धा ठेवली त्यांनी.

कानडी प्रेक्षकांनी पुष्पा नाकारला. कारण तिथे दोन कन्नड सिनेमे रिलीज व्हायचे होते
>>
या माहितीचा सोर्स प्लीज...

फारेंड छान मांडले.

लोकं थिएटरला ठराविक चित्रपटच बघायला जातात. मराठीत असे गेल्या वर्ष दोन वर्षभरात आलेले आणि बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केलेले चित्रपट म्हणजे
झिम्मा
बाईपण भारी देवा
नाच ग घुमा
नवरा माझा नवसाचा
फुलवंती??
काही ऐतिहासिक चित्रपट..
वगैरे वगैरे..

यांनी मोजक्या बजेट मध्ये जमेल तेवढी मार्केटींग केली असेल ज्याचा फायदा बॉक्स ऑफिसवर दिसला.
पण त्यांनतर येते ती माऊथ पब्लिसिटी.

पण सॉरी.. इथे मला खेदाने म्हणावेसे वाटते की मी मराठी सोशल मिडियावर बरेच लोकांना या चित्रपटाबद्दल निगेटीव्ह बोलताना पाहिले.
अर्थात एखादा चित्रपट कोणाला नाही आवडला तर ते त्याचे मत, त्याची आवड. पण आपले मत आपल्याजवळ ठेवणे हा देखील एक पर्याय असतो. ते मत बोलून दाखवल्याने निगेटीव्ह माऊथ पब्लिसिटी होते आणि चित्रपटाला त्याचा फटका बसतो. जे आपण मराठी चित्रपटांबाबत सहज टाळू शकतो.

थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघायला पैसे खर्च करावे लागतात. पण वर जे म्हटले त्यासाठी कुठले पैसे खर्च करायची गरज नाही. चित्रपट आवडला तर ते बोलून दाखवावे आणि नाही आवडला तर ते बोलू नये आणि त्याची निगेटीव्ह पब्लिसिटी टाळावी.

जास्तीत जास्त मराठी लोकांनी हे पाळले तर मराठी चित्रपटसृष्टीला त्याचा फायदाच होईल.

नवीन वर्ष येतेय. संकल्प करून टाका Happy

र आ,
इसकाळ च्या सोर्स बद्दलही शंका आहे.
इथे दणक्यात चालू आहे पुष्पा 2...

(कॉर्पोरेट बुकिंग कांसिदर करायचं नाही असं ठरवलं अन् ॲक्च्युअल ओक्युपंसी वर हिट फ्लॉप ठरवायचं ठरवलं तर बरेच सिनेमे फ्लॉप ठरतील, त्यामुळे ती मोजपट्टी फक्त पुष्पा 2 ला लावता येणार नाही

Pages