बाजरीच्या झटपट खारोड्या - मराठवाडी वाळवण

Submitted by किल्ली on 14 May, 2020 - 05:11
marathwadi kharodya
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१) २ वाटी बाजरीचे पीठ ,
२) भाजलेले तीळ २ चमचे (फराळाचा चमचा),
३) प्रत्येकी १ टीस्पून जिरे, ओवा,

४) २ हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा लाल तिखट,
५) अद्रकचा छोटा तुकडा ,
६) ४-५ पाकळ्या लसूण ,
(हे तीनही जिन्नस वाटून घ्या, जाडसर पेस्ट बनवा)

७) चिमूटभर हळद ,
८) चवीनुसार मीठ
९) पिण्यायोग्य पाणी

क्रमवार पाककृती: 

१) खारोड्या करायच्या आदल्या रात्री /संध्याकाळी बाजरीचे पीठ कोरडे भाजून घ्या.
२) त्यात १ फराळाचा चमचा दही घालून चांगले फेटून घ्या.
इडलीचं batter असतं त्या consistancy मध्ये भिजवायचं, येथे अंदाजे दीड वाटी पाणी हवं.
३) हे मिश्रण रात्रभर भिजू द्या.

४) दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता ऊन निघायच्या आधी) कढईत तेल घालून तेलात जिरे, ओवा, आलं लसूण मिरची पेस्ट , हळद , तिखट हे घालून परतून घ्या.
५) ह्या फोडणीत २ वाटी पाणी घालून त्याला उकळी येऊ द्या.
६) पाण्यात चवीनुसार मीठ घाला.
७) रात्रभर भिजवलेले बाजरीचे पीठ ह्या पाण्यात घाला. हे मिश्रण हळूहळू घाला आणि पिठलं घोटतो तसे घोटा /हटवा.
८) ह्याला दणदणीत वाफ येऊ द्या.
९) वाफ आल्यावर त्यात तीळ घाला.

१०) हे मिश्रण थंड होऊ द्या .

११) चमच्याने किंवा हाताने (हाताला थोडे तेल लावुन घ्या म्हणजे मिश्रण चिकटणार नाही)हे मिश्रण थोडे थोडे करून जाड प्लास्टिक पेपरवर घाला.
उन्हात वाळवायला ठेवून द्या.

१२) चांगले खडखडीत वाळू द्या.

वाढणी/प्रमाण: 
ह्या प्रमाणात ताटभरुन खारोड्या होतील, एवढ्या तर एखादी चिंगी सहज फस्त करेल, जास्त प्रमाणात करा बरं का..
अधिक टिपा: 

- ह्या खारोड्या, भाजलेले शेंगदाणे, बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर असे सर्व्ह करा. मस्त चटपटीत हेल्थी स्नॅक आहे.
- मराठवाड्यात उन्हाळ्यात वर्षभराच्या खारोड्या करतात.
- गच्चीवर/अंगंणात खारोड्या घालणे हा प्रोग्राम प्रत्येक घरी पाहवयास मिळतो.

ही माझ्या आईची पद्धत आहे, सोपी आहे. लोकं अजुन वेगवेगळ्या प्रकारे हा पदार्थ बनवतात.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sopi n mast..karun baghen..garam garam khayla pan changlya lagtil..cheek sarkhe..

थेट उचलुन खायचं ..सोबत शेंगदाणे हवेतच, कांदा सुद्धा मस्ट आहे Happy

काही लोक तेलात परतुन खातात, पण मला नाही आवडलं तसं

टेबलस्पून, टीस्पून ऐकले होते, आता फराळाचा चमचा कुठला??? त्यात किती टेबलस्पून बसतील?

तसेच उचलून खायचे म्हणजे कसे लागतात चवीला? दात शिल्लक राहतात ना Light 1

साधना, Happy कडकडीत वाळलेले छान कुर्रम्कुर्रम् लागतात. उन्हाळ्याच्या सुटीच्या दिवसात दुपारचं खाणं म्हणजे मेतकुट पोहे, तेलतिखट पोहे, ज्वारीच्या लाह्या, ह्या खारोड्या, तीळ खसखशीच्या कुरडया (ह्यापण कच्च्याच खायच्या) असायचं. आम्ही शहाणी मुलं होतो.... आईच्या मागे भुणभुण न लावता मुकाटपणे डब्यातून (बिस्कीटाचे टीनाचे डबे) काढून खायचो.....

Thank you, killi.
बघते जमतंय का वाळवण Happy टेस्टी वाटतंय.

फराळाचा चमचा म्हणजे ज्या चमच्याने आपण फराळ करतो,पोहे खातो, उपमा खातो ... तोच चमचा पण धुवून घ्यायचा Wink

चवीला मस्त खमंग लागतात.. मी आताच खाल्ले थोडे

>>२) त्यात १ फराळाचा चमचा दही घालून चांगले फेटून घ्या.
३) हे मिश्रण रात्रभर भिजू द्या.
>>
या ठिकाणी भिजवण्यासाठी पाणी किती घालायचे?

अरे वा, बाजरीच्या पिठाच्या खारोड्या पहिल्यांदाच पाहातोय. माझी एक आजी फार सुरेख करते ह्या अर्थात नेहेमीच्या पद्धतीनं.
कच्चा पांढरा कांदा, खारोड्या उन्हाळ्यातलं दुपारचं खाणं असायचं Happy

भिजवण्यासाठी पाणी किती घालायचे?----
इडलीचं batter असतं त्या consistancy मध्ये भिजवायचं, येथे अंदाजे दीड वाटी पाणी हवं

पाची बोटात धरून सांडगे घालतो तसे घालता आले पाहिजे.-------एकदम बरोबर, हेच म्हणायचंय मलाही

रच्याकने आज वाळवणाची पाकृ पोस्ट केली आणि जोरदार पाऊस पडतोय .. हे भगवान

थँक्स किल्ली आणि मंजूताई! माझ्याकडे इं. ग्रो तून आणलेले शेवटचे कपभर पीठ आहे. इथे उन्हाळा सुरु झाला की करुन बघेन.

क्रमवार पाककृतीतली तिसरी पायरी नीट लिहा बरं. त्यात पाण्याबद्दल काहीच नाही. आणि टीस्पून, टेबलस्पून असं स्टँडर्ड मोजमाप लिहा.

पाक कृतीच्या धाग्यात विनोद ठीक आहे. पण ज्याला करुन पाहायची असेल, त्याची फसगत होऊ नये.

क्रमवार पाकृ च्या 5 व्या स्टेप मध्ये पाण्याचं प्रमाण लिहीलंय की, जिन्नस section मध्ये लिहायचं राहीलं

{खारोड्या करायच्या आदल्या रात्री /संध्याकाळी बाजरीचे पीठ कोरडे भाजून घ्या.
२) त्यात १ फराळाचा चमचा दही घालून चांगले फेटून घ्या.
३) हे मिश्रण रात्रभर भिजू द्या.}
याचा अर्थ होतो फराळाच्या चमचाभर दह्यात मिश्रण रात्रभर भिजू द्या.

कुरडयांपेक्षा वाळवणाचा सोपा पदार्थ वाटतोय म्हणून करून बघायचा मोह होतोय. धन्यवाद किल्ली.
ज्वारीचे पीठ वापरले तर चालेल का?

हे आयतं मिळालं (म्हणजे दुकानात) तर खायला आवडेल असं एकूण घटकपदार्थ पहाता वाटतं आहे. आणि बहुदा तळून जास्त आवडेल.

1. इडलीचं batter असतं त्या consistancy मध्ये भिजवायचं, येथे अंदाजे दीड वाटी पाणी हवं

नवीन Submitted by किल्ली on 14 May, 2020 - 19:42
2. पाची बोटात धरून सांडगे घालतो तसे घालता आले पाहिजे.-------एकदम बरोबर, हेच म्हणायचंय मलाही >>>>. किल्ली तुम्ही हे दोन्ही म्हणाला आहात त्यामुळे ती पीठ भिजवण्याची स्टेप मिसलीडिंग / गोधळ निर्माण करणारी झाली आहे. मी किचनक्षेत्रात ढ आहे, पण इडली बॅटरचे सांडगे घालता येणार नाहीत, इतपत कुकिंग माहीत आहे. इडली बॅटर थोडंसं प्रवाही असतं, त्यामानाने सांडग्यांचं पीठ नक्कीच घट्ट असणार.

मीरा,
रात्रभर जे पीठ भिजवायचे ते इडली बॅटर सारखे हवे. दुसर्‍या दिवशी फोडणी देवून २ वाट्या पाणी उकळवायचे आणि त्यात हे पीठ ओतायचे आणि शिजवायचे. हे पीठ शिजवून गार होईल तेव्हा बोटांनी सांडग्याप्रमाणे घालता यावे इतपत घट्ट झालेले असेल.

Pages