खाजा अगदी सोप्या पद्धतीने

Submitted by Shreya_11 on 10 May, 2020 - 14:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्य:
एक वाटी मैदा,तीन चमचे तेल,अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर ,चवीपुरते मीठ , अर्धी वाटी दूध , तळण्यासाठी तेल. एक वाटी साखर (पाकासाठी ) .

क्रमवार पाककृती: 

कृती:
१. एका बाऊल मध्ये मैदा, चवीनुसार मीठ, तेल गरम करून घालावे . मिश्रण एकत्रित करून दुधात मळावे.15 मिनिट भिजत ठेवावे.
२. हे पीठ भिजेपर्यंत एका भांड्यात एक वाटी साखर, एक वाटी पाणी घ्या . एकतारी पाक बनवा.
३. आता त्या पिठाचे लहान ५ एकसारखे गोळे तयार करून त्याच्या पातळ पोळ्या लाटाव्यात.
४. प्रथम एक पोळी घ्यावी त्याच्यावर अर्धा चमचा तूप सगळीकडे व्यवस्थित लावून घ्या . त्यानंतर कॉर्नफ्लॉवर सगळीकडे पसरवावे.
५.अश्याप्रकरे हीच कृती पाचही पोळ्यांवर करून त्या पोळ्या एकावर एक ठेऊन त्या पोळ्या एकत्र धरून त्याचा घट्ट रोल बनवा .
६. रोलच्या शेवटी पाण्याची दोन बोटे लावा म्हणजे रोल घट्ट बसेल आणि तळताना तेलात पदर सुटणार नाहीत .
७. बनवलेल्या रोलचे सुरीने अर्ध्या इंचाचे तुकडे करावेत . हे तुकडे जसे कापले आहेत तसेच ठेवून हलक्या हाताने थोडेसे लाटून घ्यावेत .
८. मंद गॅसवर तळावे.
९. खाजा थंड झाल्यावर पाकात बुडवून लगेच काढावा. गुलाबजाम सारखे पाकात मुरात ठेवायची गरज नाही .

मी हे सगळे प्रमाण दुप्पट घेऊन केले . १५ ते १६ खाजे बनले .

khaja.jpeg

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
माझी लांबची भाची ..
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Use group defaults

छान दिसतोय खाजा.
>>१. एका बाऊल मध्ये मैदा, चवीनुसार मीठ, तेल गरम करून घालावे .
फक्त तेल गरम करुन घ्यायचे कि सगळे साहित्य. आणि नुसते तेल तर ते किती गरम करायचे?

खूप मस्त रेसिपी, आणि दिसतायेतही छान.
नाशिक मधील एका प्रॉपर उत्तर भारतीय हॉटेलमध्ये गेल्यावर खाजा स्वीट डिश म्हणून कायम मागवला जातो.

धन्यवाद च्या , कुंद , साधना , अज्ञातवासी , आदिश्री

@ च्या .. फक्त तेल गरम करायचे .. फोडणीसाठी गरम करतो तेवढे
@ साधना ... खाजा खुसखुशीत आणि गोड असतात . गोडाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करता येते .. पाकातील साखरेचे प्रमाण कमी जास्त करून ...

@देवकी ... आमच्याकडे चिरोटे आणि खाजा दोन्ही वेगवेगळे पदार्थ आहेत .. खाजा ला फक्त मैदा वापरतो तर चिरोटे ला रवा आणि मैदा .. करायची पद्धत पण वेगळी .. पाक नाही करत चिरोटे ला .. वरून फक्त पिठीसाखर टाकते .. आईकडून शिकलेय !! सवडीने त्याची पण पाककृती लिहीन .. धन्यवाद !!

धन्यवाद स्वाती२ , आदिश्री , भरत !!

@आदिश्री - पहिल्यांदाच पहिली बकलावा मिठाई .. पण मस्त दिसतेय .. नक्की try करेन ... Thank you !!

अरे किती सुंदर आहे हा बकलावा
रच्याकने, तृप्ती आवटी यांच्या करायला गेले गुळपोळी या धाग्यात गुळपोळी नाही जमली तर त्याचा बकलावा करावा आणि सासरच्या लोकांना खाऊ घालावा असा उल्लेख होता तेंव्हापासून बकलावा म्हणजे काहीतरी भिषण प्रकार वाटायचा ,पण आज समजलं खरंच भीषण आहे पण चांगल्या अर्थाने Lol

आदू Lol
@shreya for you it seems easy. Happy

आदू Lol
@shreya for you it seems easy. Happy

@आदू ... हा धागा काही वाचला नाही . आता शोधून वाचते
पाककृती पहिली बकलावाची खरंच भीषण आहे पण चांगल्या अर्थाने तुमच्या भाषेत

@ आदिश्री. .. Thank you ! सोप्पं काहीच नाहीये पण हे वेगळे पदार्थ करताना exact recipe follow
करते म्हणजे सहसा बिघडत नाहीत हा आतापर्यंतचा अनुभव ..नेहमीच्या पदार्थात एक्सपेरीमेंट्स चालूच असतात कारण बिघडणार नाहीत याची खात्री असते .

धन्यवाद किल्ली .

अपुनने करके देखा. कारण यंदा जानेवारीत एका फ्यामिलीने दिलेला खाजा मुलांना फार्र आवडला होता. आणि हि रेसिपी दिसली. मी फारच होतकरु असल्याने मला वाटतं पुढच्या वेळी स्टेप बाय स्टेप फोटो दिले तर बरे होतील. माझे पाच थर गुंडाळी करताना जरा त्रास देऊ लागले (थिक झाले असावेत) आणि तशा सुरेख कळ्या/पदर वगैरे काहि दिसणार नाहि पण एंड प्रॉडक्ट छान होता. तसेच सईचा पाकाचा धागाही याच वेळी आला त्यामुळे हा आणि तो असे दोन्ही वेगवेगळ्या ब्राउजर मध्ये ओपन करून प्रयत्न करुन पाहिला. तिच्याही धाग्यावर लिहिन. दोघींना मिळून धन्यवाद. मग तो पाक उरला आणि त्यामुळे तो फ्रिज मध्ये ठेऊन काही दिवसांनी गुजा केले (पाणी घालून उकळून गुजा पाक बनवला) त्यामुळे घरातली गोडघाशी मंडळी डब्बल खूश झाली. मी मैदा नेहमीचे इतर प्रकार करण्यापेक्षा काहीतरी वेगळ्यात संपवला म्हणून खूश Wink

हा फोटो...

khajaMay.jpg

हा हा Lol खरं म्हणजे पुढच्या वेळी केले तर डोनट म्हणूनच सांगायला हवेत. गुड ऑबझर्वेशन Happy मला ओरिजीनल सारखे करायला आवडतील पण धागाकर्तीला वेळ मिळाला तर ती स्टेप बाय स्टेप फोटोज देईल तेव्हाच जमेल असं वाटतं. नाहीतर रोल चांगला बनवायला गुरु गाठावा लागेल. सध्याच्या काळात तर अशक्यच आहे. पण ही एक वेगळी गोडाची रेसिपी मिळाली. डोनट तर डोनट.

@ जाई धन्यवाद !
@ वेका .. ओह थोडक्यात मिस झालं .. मी कालच केले पुन्हा एकदा . पोळी अगदी पातळ आणि फुलक्यापेक्षा थोडीशीच मोठी करायची म्हणजे रोल घट्ट बसतो . पुन्हा केले तर अगदी आठवणीने फोटो काढेन. प्रॉडक्ट छान झाला आणि सगळ्यांना आवडला हे महत्वाचं .
@ आदिश्री. अगदी अगदी ... प्रतिसाद वाचायच्या आधी वेका यांच्या फोटो पहिला तेव्हा हेच आलं डोक्यात कि हे डोनट सारखे दिसतायत !!