अत्तर - १

Submitted by सामो on 9 May, 2020 - 04:33

https://comps.canstockphoto.com/gypsophila-baby-breath-flowers-in-glass-stock-image_csp78341163.jpg
.
ही कथा आहे दोघांची पण मुख्यत्वे तिची. दिसायला ती एक सर्वसामान्य मुलगी होती. तुम्ही शॅलो हल सिनेमा पाहीला आहे का? शॅलो हल सिनेमात प्रत्येकजण व्यक्ती मूळ रुपात दिसते. ज्या व्यक्तीचे जसे अंतरंग त्या अंतरंगाच्या सौंदर्यानुसार तिचे सौंदर्य. असे जर अंतचक्षूंने कोणी मधुराच्या अंतरंगात डोकावले असते तर त्या व्यक्तीला मधुरा अतिशय गोड, सुंदर व भाबडी, खरं तर प्रेमाच्या प्रेमात पडलेली मुलगी आहे हे लक्षात आले असते. या जगात सर्व प्रकारचे लोक आहेत. काही व्यक्तींचे अंतरंग दिलखेचक असेल कोणाचे जिप्सी सौंदर्य असेल कोणी सूर्यफुलासम टवटवीत असेल तर कोणी तळ्यावरील आल्हाददायक सूर्योदयासारखे भव्य आणि स्वर्गिय असेल. मधुरा ही मात्र व्हायोलेटच्या फुलांच्या साध्या पण नीटस फुलगुच्छासारखी होती. काव्यमय, भावुक अंतरंग असलेली अशी व्यक्ती होती. या आकाशी-व्हायोलेट काव्यमय फुलांच्या गुच्छात बारकाईने पहाता काही अजुन तुरे आढळले असते. निस्वार्थी प्रेमाची बेबी पिंक गुलाबकळी, भक्तीचे, समर्पणाचे शुभ्र कमळ , कोमल इवले इवले बेबी ब्रेथ फुलांनचे तुरे आणि तारुण्यातील इच्छांची पोपटी कातरलेली पाने.
तिच्या, विशी-तीशीपर्यंत तर सारे काही आलबेल होते. व्हायोलेटच्या गुच्छावरती स्वप्नाजलाचे रीतसर शिंपण होई व ते परत टवटवीत होत, जोमाने, जीवनेच्छेने सूर्यप्रकाशाकडे चेहरा करुन डोलत.
.
जशी जशी चाळीशी आली, तशी तिला तिच्या घुसमटीची प्रकर्षाने जाणीव होऊ लागली. हेच आयुष्य आहे का? प्रेमशिवाय असेच सुकुन जायचे का? कधीही प्रेमात न पडलेल्या तिच्या मनाने हट्ट करण्यास सुरुवात केली. आता नाही तर कधीही नाही. कधी भेटणार माझा प्रियकर? इतकी वाट पहायला कसे कोणी लावू शकते? का नाही सापडत आपल्याला आपला सखा. साधारण त्याच सुमारास ,दर शुक्रवारी संध्याकाळी काही तास ती पबमध्ये एकाकी व्यतित करु लागली होती. या पबमध्ये अनेक लोक येत. सडेफटिंग, जोडपी, वृद्ध स्त्री-पुरुष, पुरंध्री, तरुण, मध्यमवयीन सर्व प्रकारचे लोक येत. आर्थिक, सामाजिक सर्व थरांतून हे लोक आलेले असत. पिनॅकोलाडा सिप करत एका कोपर्यात बसून गर्दी बघणे व पार्श्वभूमीवर लागलेल्या मंद सुरावटींचा आस्वाद घेणे, हा तिचा दर शुक्रवारचा सायंकाळचा प्रोग्रॅम होऊ लागला होता. त्या गर्दीलाही एक ऊर्जा होती. आनंदी,ऊबदार, स्वच्छंद, खेळकर ऊर्जा. आणि त्या ऊर्जेच्या कल्लोळात ती तिचे एकाकीपण विसरू शकत होती. अनेक चेहरे त्या पबचे शुक्रवारचे रेग्युलर मेंबर होते आणि ती चेहर्यांनीच ओळखू लागली होती.बरं तिला हेदेखील माहीत होते की ही गर्दी दुरुन मोहक भासते परंतु जर तिच्यात शिरायचे म्हटले तर स्वतःला हँडल करता येण्याइतकी चलाखी हवी. जी आमच्या नायिकेत नव्हती.

अत्तर - २

फोटो (मुक्ताधिकार) - https://www.alamy.com/gypsophila-baby-breath-flowers-in-glass-vase-on-bl...

Group content visibility: 
Use group defaults

सामो, आज सुरवात केली आहे वाचायला. कथेचा पुढचा भाग वाचावा इतका रस आत्ता तरी वाटतो आहे Happy
पुढच्या भागाची लिंक प्रत्येक भागाखाली दिलीत तर वाचनात सातत्य ठेवणे सोपे जाईल.