अधूरे स्वप्न

Submitted by पारिजातका on 5 May, 2020 - 16:14

निघालो होतो जग जिंकाया
पण स्वप्न ते अधूरेच राहिले होते
दावेल वाट विजयाची असे
सारथी तरी कोठे राहिले होते

दांभिकतेने भरलेल्या जगाने
अस्तित्वच माझे पुसले होते
विनवीत होतो ज्या दगडाला त्यात
देवत्व तरी कोठे उरले होते

ऊन सावलीच्या खेळात या
डाव सारे निसटत होते
जिंकाया साथ देणारे
हात तरी कोठे उरले होते

भूतकाळातील जखमांचे
व्रण काही जात नव्हते
वेदना शमतील असे
मलम तरी कोठे उरले होते

मायेने गोंजारणारे
स्वर निःशब्द झाले होते
जीवन मैफिल रंगवणारे
सूर निरागस कोठे राहिले होते

नयनी अश्रूंसंगे
जगणे कठीण झाले होते
तोडेल पाश बंधनाचे असे
मरण तरी कोठे उरले होते

- प्राजक्ता

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Use group defaults

छान!