तैमुरची मम्मी ते आरवची आई

Submitted by Tushar Damgude on 3 May, 2020 - 01:31

" अरे आराध्याच्या आई ? काय आश्चर्य , आज चक्क इकडे कुठे ?

"इकडे कुठे म्हणजे ? अहो भाजी आणायला आणि काय कारण असणार इकडे येण्याचे ? "

"हो तेदेखिल खरे आहे म्हणा....."

"...आणि तुम्ही आज इकडे कशा तैमुरच्या मम्मी ? म्हणजे फक्त भाजी घ्यायला इतक्या लांब ?"

" अहो त्या मल्होत्राच्या मनीषकडे दोन साड्या फॉल पिकोला टाकायच्या होत्या तसंच म्हटलं आठवड्याची भाजी घेऊन जावं"

" तरी इतक्या लांब ?"

" अहो तुमच्या मनात आहे तसं काही नाही, ते शाहीदचं प्रकरण तुमच्या सलमान सारखं कधीच संपलय. आणि आमच्या कफ परेडचा नेहमीचा ताजी ताजी भाजी विकणारा नेहमीचा म्हातारा मागच्या महिन्यात चचला. तेव्हापासून इकडे यावं लागतं, काय करणार .... "

"काय करणार काय म्हणताय तैमुरच्या आई ? घरी ती तुमची म्हातारी सेंसॉर बोर्ड गेल्यापासून नुसती बसूनच असते ना ? तिला पाठवायचं , तेवढाच पायाला व्यायाम ! "

"उंऽऽऽऽऽऽ आमची म्हातारी का ? तिचं अडलंय खेटर, दिवसभर देवपुजा, भजनीमंडळं , हास्यक्लब, भिशा यात टाईमपास करते पण कामाला म्हणून ह्हात लावत नाही. "

"हे मात्र खरं असेल , त्यामुळेच आधीची अमृता पळून गेली असेल , अगदी अर्धी झाली होती हो पोर ...."

"माझं मेलं नशीबच फुटकं म्हणून या घरात पडले, तुमचं आपलं बरं आहे, तुमची सासू अजून किमान कमावती तरी आहे. "

"कमावती ? अहो तो मिळणारा सगळा सरकारी पगार फक्त तीच्या नट्ट्यापट्ट्यावरच खर्च होतोय. म्हातारचळ लागलाय तीला. आज काय तर इकडे दौरा, उद्या काय तर तिकडे दौरा, एक्का कामाला म्हणून कधी हात लावत नाही "

"चालायचंच , आपलंच नाणं खोटं असल्यामुळे कुणीही यावं आणि आपल्याला बोल लावावा ....."

"रामा भगवंता, हे बरीक मनातले बोलला बघा. आमच्या ध्यानाला आता सासरेबुवांनी कबड्डीचं छोटं दुकान टाकून दिलंय. बसतंय दिवसभर चड्डी घालून घरातच कबड्डी कबड्डी करत. नणंद आली कि तिच्या टोमण्यांनी जीव अगदी कानकोंडा होऊन जातो"

" पण एक बरं आहे तुमचे, तुमचे सासरेबुवा अद्याप खमके आहेत, मला सासरा नाही, सासूला विचारायला कोणी नाही. त्यात आमचं ध्यान मात्र एका मागोमाग एक लाखाचे बारा हजार करत सुटलंय. काय ते त्यांचे एकेक आचरट चित्रपट आणि त्यांची नावं, मी देखिल पहायची हिंमत करत नाही म्हणजे बघा"

"आपल्या दोघींच नशीबच फुटकं ......बाकी काय म्हणता तैमुरची मम्मी ......"

"काय बोलायचं आणि काय सांगायचं आराध्याच्या मम्मी ? जे चाललंय ते ठिक आहे म्हणून कसेतरी आले दिवस ढकलायचे "

"बाकी तुमचा " कि एँड का " कसा चालला ? "

"तुमच्या " ऐ दिल है मुश्किल " पेक्षा चांगला चालला असं म्हणत होते माझ्या ओळखीचे पत्रकार "

"बरं झालं तुमच्या ओळखीच्या पत्रकारांवरून आठवलं , तुमच्या सध्याच्या P.R.O. कंपनीचा फोन नंबर उद्या पाठवा ना जरा "

"का हो ? "

" नाही म्हणजे असं आहे कि माझ्या आराध्याला मागच्या महिन्यात गालगुंड आले, त्या आधी कांजीण्या आल्या, सध्या थंडी मुळे सर्दी सुरू आहे पण एकही बातमी नाही हो टिव्ही ला, जिकडे तिकडे तुमच्या तैमुरचीच चर्चा, P.R.O. वर दोन पैसे जास्त खर्च झाले तरी चालेल हो नाहीतर कसं व्हायचं माझ्या छबकडीचं भविष्यात ..."

"चला मला उशीर होतोय , मी नंतर भेटते तुम्हाला, आमचं ध्यान घरी आलं आणि जेवण तयार नसलं म्हणजे सगळं घर डोक्यावर घेईल "

"बरं बरं तेवढं त्या कंपनीचा फोन नंबर पाठवायचं लक्षात ठेवा"

"हो हो नक्की पाठवते ......वाट बघा ! "

"अच्छा, बाय "

"बाय , सी या "
___________________________

( तैमुरच्या आईला टाटा करुन थोडं पुढे गेल्यावर )

"अरे आरवच्या मम्मी तुम्ही देखिल इकडे ? "

" हो मी नेहमीच इकडे येते, इकडे भाजी जरा स्वस्त आणि ताजी आहे ना ,आणि आराध्याच्या मम्मी, मी मगाशीच पाहिलं होतं तुम्हाला दोघींना"

"अच्छा मग यायचं ना गप्पा मारायला, तैमुरची मम्मी होती ती "

" ह्हो माहितेय, मी मागचा आकार बघूनच ओळखलं तिला, काय म्हणत होती सटवी ..."

" सटवी ? "

" हो मग काय तर, आमच्या ह्यांच्या वर अगदी वाईट नजर होती सटवीची , पण मी चांगली खमकी निघाले ..."

" हो ते मात्र खरं आहे, मी ट्विटर वर वाचत असते ना तुमचे सगळे"

" तुमचं मात्र एक बरं आहे आराध्याच्या मम्मी, तुम्ही करतानाच असा नवरा केलाय कि तुम्हाला किमान या गावभवान्यांची तरी कसली चिंता नाही."

" म्हणजे ? काय म्हणायचं काय आहे तुम्हाला आरवच्या मम्मी ?

" म्हणजे तसं काही नाही हो , उगाचच गैरसमज करुन घेऊ नका, आमच्या ह्यांच कर्तृत्वचं असं आहे कि ते बाहेर पडले कि जीवाला काय घोर लागलेला असतो म्हणून तुम्हाला सांगू......"

" हो मी चांगलच अनुभवलं आहे ना 'खाकीच्या' वेळी "

" माझं मेलं नशीबच फुटकं, पण काय करणार माहेरी आमच्या आईचं असं, आणि वडलांच तसं, मग पदरी जे पडलं तेच पवित्र म्हणून दिवस ढकलायचे आता"

" तरी तुमचं बरंय आरवच्या मम्मी, आमच्या इथे म्हणजे एकीकडे नणंद , दुसरीकडे सासू , तिसरीकडे सासरा ................... "

" @@ ?!@ % $+%': blah "

" $+%' :-= @ (()&+= ##$: blah blah "

" Blah blah "

" Blah blah blah "

तुषार दामगुडे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कबड्डीचं दुकान , गावभवान्यांची चिंता नाही, हे विनोद फार वाईट आहेत. तरी हसू आलंच.
पी आर मस्त.

तैमूरच्या मम्मीची सावत्र मुलं तिच्याकडे राहत नाहीत का?

मागचा आकार बघूनच ओळखलं, सिरीयसली? एकतर दुसऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर काही कारण नसताना विनोद करायचे आणि वरून हे असं मागचा आकार वगैरे Uhoh फारच चिप वाटत आहे सगळं लिखाण.

अच्छा आज आरव कोण ते कळला. भरत, thank you for the enlightenment Lol

वरून हे असं मागचा आकार वगैरे Uhoh फारच चिप वाटत आहे >>>> आपल्याला चीप वाटून काय? तिला स्वतःला तिच्या बटचा फार अभिमान आहे. अगदी कॉफी विथ करणमध्ये चर्चा करून को- स्टार्स आणि जनतेकडून 10 पैकी किती मार्क्स टाइप सर्व्हे वगैरे करण्या इतपत. नुसतं Kareena butt असं गुगल केलं तर तिच्या स्वतःच्या कमेंट्स वाचायला मिळतील.

मागचा आकार म्हटल्यावर त्यात न आवडणारं (?) काहीतरी डोळ्यासमोर येतं यावरून काही लोकांची कल्पनाशक्ती नेमकी कुठल्या अंगाकडे धावतेय हे उघड होतं. तुमच्या मनात आहे ते माझ्या हातात म्हणजे लिखाणात नाही हो.

Thank you for the enlightenment Meera. तुषार तुम्हाला डबल मिनिंग लिहायची फारच हौस दिसते.

च्रप्स तुम्ही एखादी म्हण वापरली असेल तर मी तरी ती या आधी कधी ऐकली नाही. त्यांच्या प्रतिसादाला डबल मिनिंग म्हणाले मी. माझा हा शेवटचा प्रतिसाद.

तुषार दामगुडे, मायबोलीवर स्वागत!

लेख ठीकठाक आहे. ताऱ्याना फारसे फॉलो करत नसल्यामुळे संदर्भ लक्षात यायला वेळ लागला. आरव समजायला थोडा जास्तच वेळ लागला. संदर्भ कळल्यावर मात्र गम्मत वाटली वाचायला.

मायबोलीवर अखिल विश्वातील व खास करून भारतातील राजकीय नेत्यांवर वाट्टेल ती टीका केली जाते, त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यावर यथेच्छ टिप्पणी केली जाते. हे विनोदनिर्मितीसाठी केले जात नाही तर करणारे हमरीतुमरीवर उतरून गलिच्छ भाषेत भांडतात.

त्यामानाने हे लिखाण खूपच मवाळ आहे. आणि विनोदी लेखनात टाकलेले आहे. त्याचा इतका निषेध बघून थोडी गम्मत वाटली.

तुमचे राजकारण, मराठा मोर्चा याबद्दलचे लेख आधी वाचले आहेत.एकदम समंजस वाटले.
हा ओके आहे.पहिल्यांदा वाचायला मजेशीर.

हे विनोदी आहे? आजिबात आवडलं नाही.
सेलिब्रेटी असले म्हणुन काय वाट्टेल ते लिहायचं? सासुंबद्दल लिहिलंय ते काहीही आहे. कब्बडीचं दुकान, मागचा आकार ...

मला आवड ल विनोदी आहे. कारण ह्या तिघी ट्विट र इन्स्टाग्राम वर उगीच पोझां मारत फिरत असतात. त्यात आनि एक मिरा राजपूत पण घ्या. मलाइका अरोरा, उग्ग्गीच आज हिने जिमला काय घातले तिने प्रा टीत काय केले ह्याव अन त्याव डीटेल त्यात ट्विंकल तर मोस्ट इरिटेटिन्ग. उगीच लिबरल असण्याचा खोटा आव आणते.

मला आवड ल विनोदी आहे. कारण ह्या तिघी ट्विट र इन्स्टाग्राम वर उगीच पोझां मारत फिरत असतात. त्यात आनि एक मिरा राजपूत पण घ्या. मलाइका अरोरा, उग्ग्गीच आज हिने जिमला काय घातले तिने प्रा टीत काय केले ह्याव अन त्याव डीटेल त्यात ट्विंकल तर मोस्ट इरिटेटिन्ग. उगीच लिबरल असण्याचा खोटा आव आणते.

राजकीय नेत्यांवर वाट्टेल ती टीका केली जाते, त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यावर यथेच्छ टिप्पणी केली जाते.
>>>>>>>>

राजकीय नेतेच का, सई स्वप्निल शाहरूख यांच्या व्यक्तीगत आयुष्यावर वा दिसण्यावरून काय कमी वाह्यात बोलले जाते. खोटेही सर्रास फिरवले जाते.
काही लोकं तर केवळ मला राग यावा म्हणून शाहरूखवर खालच्या पातळीवर जाऊन टिका करतात तेव्हा खरेच हसावे कि रडावे हे समजत नाही.
आताही या धाग्यात जर शाहरूख असता वा गेला बाजार आर्यन सुहना वा अबराम यांच्या अम्मीजान असत्या तरी धागा एव्हाना शंभर पार गेला असता....

बाई दवे,
आरव कोण ? मला अजून नाही समजले

आणलास की शाहरुख
आता करतोय बघ 100 पार
आगे बढो रूनमेसभाय
हम तुम्हारे साथ है

आपल्याला चीप वाटून काय? तिला स्वतःला तिच्या बटचा फार अभिमान आहे. अगदी कॉफी विथ करणमध्ये चर्चा करून को- स्टार्स आणि जनतेकडून 10 पैकी किती मार्क्स टाइप सर्व्हे वगैरे करण्या इतपत.>>>>

असे असेल तर विषयच संपला. आणि असे असेल तर दुसरीला त्यावरून बोलण्याचा अधिकार आपोआप मिळतो, कारण एकीला जे भूषणावह त्याची दुसरीला असूया वाटून ती काहीतरी तिखे बोल सूनवु शकते. Lol

या दवे बाई कोण आहेत
वरती नावे वाचली पण कोणी या नावाचे दिसले नाही
Submitted by आशुचँप
>> यावर नवीन धागा येणार आहे.

Pages