अक्कलशुन्य माणसं

Submitted by आगबबूला on 2 May, 2020 - 12:12

आज संध्याकाळी बायकोच्या मैत्रिणी घरी आल्या. खरं तर बायको आणि बायकोच्या मैत्रिणी पण मेडिकल फिल्ड मधल्या असल्याने त्यांना सध्याच्या परिस्थितीचं गांभीर्य असेल असा माझा समज साफ खोटा ठरला. आल्या आल्या स्वयंपाक घरात गेल्या आणि आणि तिथे बायकोसोबत गप्पा मारत बसल्या. अर्धा तास गप्पा मारल्यावर मस्त चहा नाष्टा केला आणि त्यात अजून म्हणजे माझ्या लहान मुलीला त्यांच्याकडे घ्यायला बघत होत्या. नन्तर त्यातल्या एका मैत्रीणीला फोन आला तर फोनवर बोलते थांब थोड्या वेळात येते. बायकोने विचारलं कोणाचा फोन होता तर बोलली इथून ज्या मैत्रिणीकडे जाणार आहे तिचा फोन होता. नंतर कोणत्या मैत्रिणीकडे जाऊन आल्या त्याची लिस्ट बायकोला सांगितली. त्या जवळ जवळ पाच सहा जणांच्या घरी जाऊन आमच्या घरी आल्या होत्या. इथून पुढे किती जणांच्या घरी जाणार होत्या देव जाणे. आणि लोकांच्या घरी जाण्याचं कारण काय तर यांना स्वतःच्या घरी बसून कंटाळा येतो म्हणून. त्यांना तिथेच दोन शब्द ऐकवायचं मन करत होतं. पण ओळखीचे असल्याने काही बोलू शकत न्हवतो. ही असली पढतमूर्ख अक्कलशुन्य माणसं आहेत म्हणूनच कोरोना एव्हडा फोफावत चाललाय. पुढच्या वेळी आल्या तर नक्कीच दोन शब्द ऐकवणार आहे. कोरोना होऊन संबंध बिघडण्यापेक्षा आधीच बिघडलेले बरे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मोकळा संवाद हवा. आपले मतभेद आहेत तर त्यात बाहेरच्यांना किती डोकावू द्यायचे याचेही भान हवे.
>>>
स्वाती,
हो याच्याशी सहमत आहे
आपले तसेही ऑलमोस्ट सारेच विचार छान असतात आणि पटतात.

मी माझ्या पोस्टमध्ये त्या कारणास्तव त्यांच्याशी भांडू नका वा घाबरून राहा असे सुचवले नव्हते. तर त्या शक्यतेकडे लक्ष वेधले होते. त्यातला एक धोका दाखवला होता.

आणि मग त्या फण्दात न पडता त्याखाली सोशलसाईटवर फोटो टॅगचा पर्याय दिलेला जिथे साप भी मरे और लाठी भी ना तुटे हे साध्य होईल.

प्रत्येक धाग्या वर एक च माणुस वायफळ बडबड करत असतो.. एक ही मुद्दा खाली पडू देत नाही.
बोअर.
धाग्या विषयी- स्वाती-२ ला अनुमोदन.

एखादा पुरुष आपल्या बायकोचा परपुरुषासोबत फोटो बघून तो आंबट्शौकीन असेल आणि आपल्या बायकोचा बलात्कार करेल या भितीने त्याच्याशी भांडायला जाणे हे तुम्हाला योग्य वाटते..

सिरीअसली?
Submitted by ऋन्मेऽऽष on 3 May, 2020 - 13:21

हि आदर्श परिस्थिती झाली
ती सगळीकडे नसते.
म्हणून एक शक्यत उपस्थित केली. जी नजरेआड होऊ नये.
बाकी मला नाते हवे तर ते आदर्शच हवे अन्यथा नको असा स्टॅन्ड नाही घेऊ शकत आपण
Submitted by ऋन्मेऽऽष on 3 May, 2020 - 19:27

माझ्याच दोन पोस्ट ईतके वर्षांनी का कोट केल्यात?

खरचं कां ? नाही धागा या मे महिन्यातलाच आहे.

लॉकडाऊनचा एक महिना म्हणजे एक वर्ष
आता त्या पोस्टचा संदर्भ कुठे आठवत बसणार
बरे कोट करणारयांनी काही टिप्पणीही नाही केली
लाईक केल्यासारखे माझ्या पोस्ट वर आणल्यात
अश्याने कोणी त्या आयडीला माझाच डुआयडी म्हणेन. हल्ली फार झालाय हा त्रास.

Pages