अक्कलशुन्य माणसं

Submitted by आगबबूला on 2 May, 2020 - 12:12

आज संध्याकाळी बायकोच्या मैत्रिणी घरी आल्या. खरं तर बायको आणि बायकोच्या मैत्रिणी पण मेडिकल फिल्ड मधल्या असल्याने त्यांना सध्याच्या परिस्थितीचं गांभीर्य असेल असा माझा समज साफ खोटा ठरला. आल्या आल्या स्वयंपाक घरात गेल्या आणि आणि तिथे बायकोसोबत गप्पा मारत बसल्या. अर्धा तास गप्पा मारल्यावर मस्त चहा नाष्टा केला आणि त्यात अजून म्हणजे माझ्या लहान मुलीला त्यांच्याकडे घ्यायला बघत होत्या. नन्तर त्यातल्या एका मैत्रीणीला फोन आला तर फोनवर बोलते थांब थोड्या वेळात येते. बायकोने विचारलं कोणाचा फोन होता तर बोलली इथून ज्या मैत्रिणीकडे जाणार आहे तिचा फोन होता. नंतर कोणत्या मैत्रिणीकडे जाऊन आल्या त्याची लिस्ट बायकोला सांगितली. त्या जवळ जवळ पाच सहा जणांच्या घरी जाऊन आमच्या घरी आल्या होत्या. इथून पुढे किती जणांच्या घरी जाणार होत्या देव जाणे. आणि लोकांच्या घरी जाण्याचं कारण काय तर यांना स्वतःच्या घरी बसून कंटाळा येतो म्हणून. त्यांना तिथेच दोन शब्द ऐकवायचं मन करत होतं. पण ओळखीचे असल्याने काही बोलू शकत न्हवतो. ही असली पढतमूर्ख अक्कलशुन्य माणसं आहेत म्हणूनच कोरोना एव्हडा फोफावत चाललाय. पुढच्या वेळी आल्या तर नक्कीच दोन शब्द ऐकवणार आहे. कोरोना होऊन संबंध बिघडण्यापेक्षा आधीच बिघडलेले बरे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ऋ न्मेष
त्यांचं काय मनावर घेताय?
त्यांचा करिअर चा चॉईस चुकलाय आणि प्रचंड नैराश्य आलंय त्यांना

त्यामुळे असं भलतंच बोलताहेत.

सोडून द्या

पुढच्या वेळी आल्या तर नक्कीच दोन शब्द ऐकवणार आहे>>>तुम्ही हे याच वेळी करायला हवं होतं पण ठीक आहे पुढील वेळी संकोच नको.

त्यांचं काय मनावर घेताय?
त्यांचा करिअर चा चॉईस चुकलाय आणि प्रचंड नैराश्य आलंय त्यांना

त्यामुळे असं भलतंच बोलताहेत.

सोडून द्या
>>>>
Happy
आग लागली बरोबर, की मूळव्याध उपटली? (ही तुमचीच भाषा)
तुम्हीही लवकर बरे व्हा!!!
बादवे त्या धाग्याची बरी आठवण केलीत. त्यांनंतर काय घडामोडी झाल्यात, हेही लिहायचा मानस आहे.

अदू - तुमच्या भावनेचा आदर आहे
पण मी उठसुठ सगळीकडे काय कमेंट नाय करत नाही
सध्या लॉक डाऊन मुळे वेळ आहे त्यामुळे
नैतर कोणाला इतका फावला उद्योग आहे त्याच्या पोस्ट वाचून त्याला उत्तर देत बसायला
तो एक आजारी आहे म्हणून मी एक सामाजिक कर्तव्य म्हणून त्याला मदत करतोय इतकेच

मी तर इतके प्रतिसाद दिले त्याला, इतके धागे वर आणले, तरी त्यांचा माझ्यावर राग. Sad
असो, मी चांगलं काम करतच राहीन... मगर वाटा उचलतच राहीन.

रु नवीन विषय आला बघ
सोशल प्लॅटफॉर्म वर नाव लपवून एकमेकांवर प्रेम करावे का
आयुष्य खरंच लहान आहे का

नवीन धागा येऊ दे पटकन
दुसऱ्यांच्या धाग्यावर किती टाईमपास करावा
आपल्याकडे इतकी क्षमता असताना
शोनाहो

अद्यातवासी तुमची मगर सगळीकडेच हिंडू लागलीय
तिचे लवकर नामकरण करा Happy
नवीन Submitted by आशुचँप on 3 May, 2020 - 13:59
>>>>
धागा काढावा का??

कहीं जलन की बू आ रही है!
नवीन Submitted by सुबोध खरे on 3 May, 2020 - 14:00
>>>
जरा चेक तो करना जनाब! जाळ आणि धूर संगटच निघत आसल.

काही id मुद्दाम टार्गेट करत आहेत त्यांना,त्यांचा प्रत्येक मुद्दा अगदी चुकीचाच, बेजाबदारच कसा, येडपट type चाच कसा ये दाखवत आहेत,>> +111

आज संध्याकाळी बायकोच्या मैत्रिणी घरी आल्या. खरं तर बायको आणि बायकोच्या मैत्रिणी पण मेडिकल फिल्ड मधल्या असल्याने त्यांना सध्याच्या परिस्थितीचं गांभीर्य असेल असा माझा समज साफ खोटा ठरला.

ही धाग्याची सुरुवात आहे

यावर अज्ञातवासी यांची माझ्या प्रतिसादावर गरज नसताना केलेली वैयक्तिक टिप्पणी

छान, आणि विनाकामाची सगळी यंत्रणा कामाला लावा..
स्वतः डॉक्टर अशी पदवी लावून असले सल्ले देणाऱ्या महानुभावाना कोपरापासून सलाम

जिज्ञासा +१
बायकोच्या मैत्रीणी आलेल्या तेव्हाच त्यांना हटकायचे ना. स्पष्टच सांगायचे - 'आम्ही सोशल डिस्टंसिंग पाळतोय, तुम्हीही पाळा आणि सुरक्षित रहा. भेटी गाठींची ही वेळ नाही.' भलत्या गोष्टीत भीड बाळगू नये. आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी घ्यायचा वाईटपणा. मैत्रीणींना राग आला तर बायको 'माझे काहीच चालत नाही नवर्‍यापुढे' असे म्हणून चार खोटी टिपे गाळू शकतेच.
नात्यातील स्त्रीचा किस्सा - देशी मंडळींच्या प्ले डेट्सच्या रिक्वेस्ट्स ना ' नाही ' म्हणून कंटाळली. मंडळी अशीच तुमच्या बायकोच्या मैत्रीणींसारखी सेल्फ इनवाईट वाली. शेवटी रिस्क नको म्हणून मुलांना जरा कणकण वाटतेय असे सांगितले तेव्हा पासून फोन येणे बंद.

>>बायकोच्या मैत्रीणींच्या नजरेत नाही व्हिलन बनता येत.. त्यांनी ठरवले तर काड्या करून संसार उद्ध्वस्त करतील आपला हि भिती असतेच>>
आपला संसार खरेच इतका तकलादू असतो का की बाहेरच्या कुणीही त्याला धक्का लावावा? इतरांच्या नजरेत तुम्ही कुणी का असेना, जोडीदार एकमेकांसाठी ढाल असतील तर कुणी काही बिघडवू शकत नाही.

स्वाती2, पोस्ट पटली.
या बाबतीत भीड न बाळगता पहिल्या भेटीच्या वेळेस ठाम नकार देणंच योग्य ठरलं असतं.

खरचं अक्कलशुन्य लोक आणि बेजबाबदार. असे लोक मूळ उद्देशा ला असफल करतात.
आमच्याकडे ही संख्या बरीच आहे. Colony मधला
common swimming pool अक्कलशून्य लोकांनी आग्रह करून उघडला आहे. काल त्यात 30 adult आणि तेवढीच लहान मुले खेळत होती. हे सगळे सोशल डिस्टन्स पाळून झाले असे म्हणे. कसे शक्य आहे हे तो काही समुद्र आहे का आणि काय गरज होती. लोकांना थोड्या दिवसासाठी सुद्धा मौजमजेचा त्याग करता येत नाही. Sad
अतुल ठाकूर म्हणतात त्याप्रमाणे योगायोग आहे आपले वाचणे.

आपला संसार खरेच इतका तकलादू असतो का की बाहेरच्या कुणीही त्याला धक्का लावावा? इतरांच्या नजरेत तुम्ही कुणी का असेना, जोडीदार एकमेकांसाठी ढाल असतील तर कुणी काही बिघडवू शकत नाही
>>>

हि आदर्श परिस्थिती झाली
ती सगळीकडे नसते.
म्हणून एक शक्यत उपस्थित केली. जी नजरेआड होऊ नये.
बाकी मला नाते हवे तर ते आदर्शच हवे अन्यथा नको असा स्टॅन्ड नाही घेऊ शकत आपण

अज्ञातवासी वाद धाग्या पुरते ठेवावेत... प्रत्येक धाग्यात कोरी पाटी ठेवावी... एखाद्या धाग्यात विवाद झाला म्हणजे तो शत्रू झाला असे नाही ना... दुसऱ्या धाग्यात डूख धरून कशाला राहायचे... मनस्ताप तुम्हालाच...

Sad
च्रप्स तुम्हालाही असं वाटतं? मी फक्त माझं मत मांडलं तर लोक कसे धावून येतात बघितलं ना!
श्यया!!!!!
मायबोली सहिष्णू राहिलेली नाही. माझी मगर कशी मोठी होणार?

>>बाकी मला नाते हवे तर ते आदर्शच हवे अन्यथा नको असा स्टॅन्ड नाही घेऊ शकत आपण>> असा स्टँड घ्यायची गरजही नाही. आपल्या प्रॉयॉरिटीज काय हे ठरवून त्या दिशेने वाटचाल नक्कीच करता येते. आणि स्वतःच्या इगोसाठी आपल्या जोडीदाराला कुणी व्हिलन ठरवणार असेल तर असे लोकं आपले फ्रेंड्स कसे म्हणावे?

स्वतःच्या इगोसाठी आपल्या जोडीदाराला कुणी व्हिलन ठरवणार असेल तर असे लोकं आपले फ्रेंड्स कसे म्हणावे?
>>>

काहीतरी चुकतेय
मी ते आदर्श फ्रेड्सबद्दल नाही तर नवरा बायकोच्या नात्याबद्दल बोलतोय.
दरवेळी ते आदर्श नसेलच जे कोणी मित्र म्हणवणारयांनी कान भरले तरीही डळमळीत नाही होणार..
त्यामुळे काळजी घ्यावी.
अर्थात एखादा मित्रापेक्षा जोडीदाराव्र विश्वास दाखवत असेल, पण नेमके नवराबायकोत भांडण झालेल्या स्थितीत कोणी मित्र म्हणवणारया व्यक्तीनेच काड्या केल्या तर यू नो हुमायुन नेचर कसे वर्क करते.
त्यामुळे एखादी व्यक्ती तुमच्या जोडीदाराची खास आहे पण तिने तुमच्यावर डूख धरला आहे आणि याची तुमच्या जोडीदाराला कल्पना नाही हि स्थिती नेहमीच धोकादायक आहे.

>>स्वतःच्या इगोसाठी आपल्या जोडीदाराला कुणी व्हिलन ठरवणार असेल तर असे लोकं आपले फ्रेंड्स कसे म्हणावे?
>>>

काहीतरी चुकतेय
मी ते आदर्श फ्रेड्सबद्दल नाही तर नवरा बायकोच्या नात्याबद्दल बोलतोय.>>
आदर्श फ्रेंडस बद्दल मी देखील बोलत नाहीये. नवराबोयकोच्या नात्याबद्दलच बोलत आहे. आपल्या नात्यात दुरावा आणू शकणार्‍या व्यक्तीला वेळीच ओळखून सुरक्षित अंतरावर ठेवावे. बरेचदा मागे वळून बघितले की रेड फ्लॅग्ज दिसतात ज्याकडे कपलने दुर्लक्ष केलेले असते.

>> एखादी व्यक्ती तुमच्या जोडीदाराची खास आहे पण तिने तुमच्यावर डूख धरला आहे आणि याची तुमच्या जोडीदाराला कल्पना नाही हि स्थिती नेहमीच धोकादायक आहे.>> असणारच. नातेवाईक , फ्रेंड्स , कार्यालयीन सहकारी अशी बरीच मंडळी यात येतात. वेस्टेड इंटरेस्ट असतात, हेतू साध्य झाला नाही की डुख ठेवणे होते. पण या मंडळींसमोर घाबरुन झुकण्याने वरवर शांतता वाटली तरी व्हायचे ते नुकसान होतेच. यासाठीच कपलच्या प्रायॉरिटीज स्पष्ट हव्या. मोकळा संवाद हवा. आपले मतभेद आहेत तर त्यात बाहेरच्यांना किती डोकावू द्यायचे याचेही भान हवे. आपले नाते चांगले ठेवणे हे सावध राहून सातत्याने करावे लागतेच .

खरे तर आगबबूला तुम्ही बायकोशी भांडण करणे सगळ्यात सेफ आहे. थोडे वाद झाले तरी त्यांना या सगळ्यातले धोके पटवून द्या. फारतर त्या सगळ्यांना 'माझा नवरा कोणी घरी आले की भांडण उकरून काढतो नी डोकं आऊट करतो' असं सांगतील. पण आपल्या जीवापेक्षा त्याचे फार काही नाही. आणि चांगल्या हेतूने वाद घालण्यात काहीच चूक नाही.

खरे तर आगबबूला तुम्ही बायकोशी भांडण करणे सगळ्यात सेफ आहे. थोडे वाद झाले तरी त्यांना या सगळ्यातले धोके पटवून द्या. फारतर त्या सगळ्यांना 'माझा नवरा कोणी घरी आले की भांडण उकरून काढतो नी डोकं आऊट करतो' असं सांगतील. पण आपल्या जीवापेक्षा त्याचे फार काही नाही. आणि चांगल्या हेतूने वाद घालण्यात काहीच चूक नाही.+1111

बोकलत, कोणताही सल्ला वापरा पण सद्यस्थितीत असे प्रकार थांबवा. तुम्हाला लहान मुलगी पण आहे त्यामुळे तिच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही नक्कीच काहीतरी उपाय योजना केली असेलच अशी आशा बाळगतो.

Pages