गुलाबजाम

Submitted by salgaonkar.anup on 27 April, 2020 - 02:13

गोल गरगरीत
माव्याचा गोळा
रंग दुधाळी
दिसायला भोळा

पिठ मळताना
थोडं घालू दूध
पाकाला साखर
फक्त चार मुठ

मंद अलवार
परतू तुपात
गुलगुलेल गोळा
बदामी रुपात

पाकात घालू
जायफळ वेलदोडा
मूरु दे सावकाश
धीर धरा थोडा

इतर मिष्ठान्नावर
याचाच धाक
याला पोहायला
एकतारी पाक

विसरु डाएट
करु क्लुप्ती
खाऊ मनभर
मिळवू तृप्ती

चवीने चाखून
विसराल दाम
नाव तयाचे
गुलाबजाम
©अनुप साळगांवकर
IMG_20200425_074710_857.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुलाबजामचा फोटो आणि कविता वाचून काळजात अलगद एक कळ आली (आपल्या आवडत्या व्यक्तीला खूप दिवसांनी बघितल्यावर येईल तशी).

गुलाबजाम इज लव्ह !!!!!!!!!