लॉकडाऊन काळात बड्डे सेलिब्रेट कसा करावा?

Submitted by ऋन्मेऽऽष on 23 April, 2020 - 14:56

सु. सू. - बाहेर परिस्थिती काय आणि तुम्ही बड्डे सेलिब्रेट काय करता असा विचार कोणाच्या मनात आल्यास त्वरीत मला विपू करा. लागलीच "लॉकडाऊन काळात बड्डे सेलिब्रेट करावा का?" असा स्वतंत्र धागा काढण्यात येईल.
सु.सू. संपली !

तर गेल्या महिन्याभरात बरेच जणांच्या कुटुंबात कोणाचा ना कोणाचा तरी बड्डे या लॉकडाऊन काळात आला असेल. ईतरवेळी घरच्यांसोबत बाहेर जेवायला जाणे किंवा मित्रांना घरी बोलावून पार्टी करणे, अगदी आदल्या रात्री बारा वाजता उत्सवमुर्तीच्या घरी धडकणे अश्या प्रकारे आपण हा दिवस साजरा करतो. सध्या यातले काहीही करता येणे शक्य नाही. गेला बाजार केक कापायचे म्हटले तरी तो बाजारातून आणता येईल याची खात्री नाही. अश्यात घरची सुगरण बायकोला मस्का मारून तिलाच होममेड केक चॅलेंज घ्यायला लावणे हाच पर्याय शिल्लक राहतो. पण लॉकडाऊनमध्ये तेरावा महिना, जर बड्डे दस्तुरखुद्द बायकोचाच असेल तर तूच केक बनव, तूच काप, आणि तूच खा असे सांगून आपण फक्त टाळ्यांपुरते शिल्लक नाही राहू शकत.

येस्स! तर ईथेही तीच गोची झाली आहे.
यात एक चांगले आहे की हा बायकोचा मोस्ट ईकोनॉमिक बड्डे एव्हर ठरण्याची दाट शक्यता आहे. पण बजेटबाबत जरी बायको नेहमीसारखी तोडफोड न करता तडजोड करायला तयार झाली तरी आपल्या बिटर हाल्फने एफर्टस घ्यावेत अशी तरी तिची नक्कीच अपेक्षा असणार. मायबोलीकरांना हे वेगळे सांगायला नको कारण येथली अर्ध्या जनतेला बायको असेल तर उरलेली अर्धी जनता स्वत! कोणाची तरी बायको असेल.

तर प्लीज प्लीज प्लीज या काळात आपण बड्डे सेलिब्रेट केले असल्यास ते अनुभव आणि केले नसल्यास आयडीया जरूर शेअर करा. धाग्याचा फायदा सर्वांनाच.

मी आयता बाळू वाटायला नको म्हणून आधी माझ्या डोक्यातील आयड्या लिहितो.

१) गिफ्ट - आमच्याकडे आदल्य रात्री बाराचा बड्डे करायचे फार फॅड आहे. बायकोचे माहेर जवळच असल्याने ते सुद्धा दरवर्षी पावणेबारालाच सो कॉलड् सरप्राईज धाड घालतात. यावेळी जर आले तर ते खरेखुरे सरप्रईज ठरेल. पण लॉकडाऊन नियम तोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे ते बाद झाले. तरी त्यावेळचे सेलिब्रेशन मस्ट आहे.
मग आता काय करायचे विचार करता लक्षात आले की मुलीचे गेले दोन बड्डे बारा वाजता ट्रेजर हंट खेळत साजरे केले आहेत. हाच पैतरा बायकोसोबत वापरता येईल. गिफ्ट लपवण्याच्या प्लानमध्ये मुलीलाही सामील करता येईल. पण किमान तीनचार छोटे छोटे गिफ्ट यासाठी प्लान करावे लागतील. या लॉकडाऊन काळात ते कसे मॅनेज करावे हा प्रश्न आहे. माझे डोके तर चॉकलेटसच्या पुढे जात नाहीये. तुमच्या सुपीक डोक्यात काही असेल तर सुचवा.

२) डेकोरेशन - बड्डे सेलिब्रेशन म्हटले की हे आलेच. अन्यथा ईतर पार्टी आणि बड्डे पार्टीमध्ये फरक तो काय?
तर नुकतेच झालेल्या मुलीच्या बड्डेला घरात होते नव्हते तेवढे सारे फुगे फुगवून फोडून झाले आहेत. फार हॅपी बड्डेची पताका एका भिंतीवर लावता येईल.
अजून एक आयड्या होती. घरातले पोरीच्या जन्मापासूनचे सारे सॉफ्ट टॉईज एकत्र केले तर छोटेमोठे सहज चाळीसेक जमतात. त्यांना मोक्याच्या जागी स्थानापन्न करून घराला डेकोरेशन कम पार्टी क्राऊडचा फिल देणे. पण हे याआधी एकदा करून झाले आहे आणि त्याचा फोटो फेसबूकवर शेअर करूनही झाले आहे त्यामुळे हे बाद झालेय. आता घरात दोनेक चमचमत फिरणारे डिस्को बल्ब तेवढे आहेत माहौल बनवायला. तर टाकाऊपासून टिकाऊ बनवतात तस्स् घरगुती गोष्टींपासून डेकोरेशनच्या काही आयड्या असतील तर प्लीज शेअर करा.

३) मेनू - नाईलाजाने केक तिलाच बनवायला लावणार. सध्या बंद असलेल्य नॉनवेजचा जुगाड करून आईला बनवायला सांगयचा प्लान आहे. मला स्वत:ला सूप, मॅगी, चहा, कॉफी, उकडलेले अंडे आणि हाल्फफ्राय असे मोजकेच जीवनावश्यक खाद्यपदार्थ बनवता येतात. तरी माझ्यासारख्यालाही काही बनवता येण्यासारखे पण तरीही नेहमीपेक्षा वेगळी स्पेशल डिश असे काही असेल तर सांगा. कांदा कापणे, भाजी चिरणे वा काही मळणे अशी मूलभूत मदत आईकडून घेऊ शकतो. तिलाही सूनेच्या वाढदिवसाला हातभार लावत एका आदर्श सासूचे उदाहरण या लॉकडाऊन काळात ज्मतेसमोर ठेवता येईल.

४) सोशलसाईटवर बायकोप्रेमाचे पोवाडे रचणे - हे खरे तर एक नंबरला हवे एवढे याचे महत्व आहे. पण हेच आहे जे या लॉकडाऊन काळात क्सलीही अडचण न येता जमू शकते. त्यामुळे याचे टेंशन नसल्याने मागे ठेवले. तरी नेहमीसारखे एखादा छानसा लेटेस्ट फोटो टाकण्याऐवजी तिचे दुर्मिळ फोटो जुन्या लॅपटॉपच्या उत्खनणातून शोधून एखादा स्लाईड शो बनवावा असा विचार करतोय. त्यासाठी एखादे चांगले ॲप असल्यास सुचवू शकता.

५) वात्सल्याचे ट्रंपकार्ड - जनरली स्त्री असो वा पुरुष, जर ते कोणाचे आई वा बाबा असतील तर त्यांच्यासाठीचे बेस्ट गिफ्ट मुलांनी खटपट करून दिलेले ग्रिटींग कार्डच असते. नवरयाने दिलेला नौलखा हार ते आपल्या मैत्रीणीला तिची जळवायच्या हेतूने दाखवतील पण मुलांनी बनवलेले कार्ड निव्वळ कौतुकानेच दाखवताहेत. तर विचार करतोय पोरीला चावी द्यावी जेणेकरून ती आपले निम्मे काम फत्ते करेल. एखादे ग्रीटींग कार्ड नाही तर एखादी भिंतच तिच्याकडून रंगवून घ्यावी. जे या सेलिब्रेशनमध्ये सेल्फी पाँईंट म्हणून सुद्धा वापरले जाऊ शकते.

६) ईतर चुटूरपुटूर काही करता येईल का याचाही विचार करतोय. जसे गेले दिड महिन्याची वाढलेली दाढी काढणे. दिवसभर तिच्या आवडीची गाणी वाजवणे. ईतर लॉकडाऊन दिवसांपेक्षा हा दिवस वेगळा आणि स्पेशल आहे असे तिला दिवसभर वाटत राहील हे बघणे.

मला सल्ले देणारयांसाठी एक तळटीप - आमच्या घरासमोर एक मेडीकल शॉप कम जनरल स्टोअर, अपना बाजार, छोटेसे सुपरमार्केट, एक वाणी आणि एक भाजीवाला ईतके सामान मिळवायचे सोर्सेस आहेत.

______

वरची पोस्ट लिहून झाल्यावर थोडे मुलीशीही डिस्कशन झाले. ती मम्माचा सरप्राईज बड्डे सेलिब्रेट करायचे या कल्पनेनेच सुपर्र एक्सायटेड झाली. तिनेही चटचट काही आयड्या दिल्या. जसे की,
बलून्स नाहीयेत तर बलून शेपचा पेपर कट करून रंगवायचा आणि भिंतीला चिकटवायचा. त्या बलूनवर रंगीत कागदाचे तुकडे चिकटवत डिजाईन करायची. ट्रेजर हंटरमध्ये लपवायच्या गिफ्ट काय तर चॉकलेटस आणि ग्रीटींग असे दोन पर्याय सुचवले. एक लपवायची जागा फिक्स करून लगोलग क्ल्यू सुद्धा रचला. कहर म्हणजे केक मम्माला बनवायला लावायचे हे तिला पटलेच नाही. माझ्याच मोबाईलवर यूट्यूब लाऊन त्यात How to make banana cake असे सर्च करून मलाच दाखवू लागली. आणि तो मी बनवावा अशी ईच्छा व्यक्त केली जी मी धुडकाऊन लावली.
एकूण लॉकडाऊनमधील बड्डे सेलिब्रेशन हि दुर्घटना नसून एक संधी आहे असे मला वाटू लागलेय. ईतरांचेही अनुभव आणि आयड्या आल्यात तर वाचायला आवडतील Happy

धन्यवाद,
ऋन्मेष Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बड्डेला केक कापतांना "गो कोरोना गो" ही कविता पण म्हणा.
Submitted by वीरु on 26 April, 2020 - 14:40

थाळ्या पण बडवा आणि पणती, दिवे टॉर्च पण लावा
असेही येईल पूढे Happy
Submitted by आशुचँप on 26 April, 2020 - 14:48

£€$€£

दोन्ही आयड्या सिरीयसली छान आहेत. हे औचित्य साधून संदेश देता येईल Happy

छान सुरुवात झाली...
मनापासून धन्यवाद सल्यांचे आणि हुरुप वाढवणारया तसेच धागा वर आणणारया सर्वच प्रतिसादांचे. Happy

शेवटही छान झाला. भले ईथे सल्ले क्मी आणि गोंधळ जास्त झाला. पण त्यामुळे हुरुप टिकून राहिला हे ही नसे थोडके. या लॉकडाऊन काळात हे जास्त महत्वाचे होते. आशूचॅम्प अज्ञातवासी आणि ईतर सर्वांचेच मनापासून आभार.

आणि आशा करतो महिन्याभराने लग्नाच्या वाढदिवसाला परिस्थिती बदललेली असेल. सेलिब्रेशनसाठी नाही तर एकूणच लोकं कंटाळायच्या आत जनजीवन हळूहळू तरी सुरळीत व्हावे.

छान झाला
ईथे आलेल्या आयड्यात विडिओ शुभेच्छा छान कल्पना होती. पण नाही जमवता आली.
ट्रेजर हंट, सजावट, केक, पोरांचा डान्स, आदल्यारात्रीचे सेलिब्रेशन, बरेच दिवसांनी छान दाढी करून पुर्ण कपडे घालणे वगैरे बाकी सारे उत्तम झाले.

या धाग्याचा समारोप राहिलेला.
फेसबूक पोस्टच कॉपी/पेस्ट करतो.

-------------

Mamma's Lockdown Birthday !
Pari Style special celebration Happy

जेव्हा मी परीला सांगितले की चार दिवसांनी मम्माचा बड्डे येतोय पण लॉकडाऊनमुळे आपल्याला नेहमीसारखा सेलिब्रेट करता येणार नाही तेव्हा लगेच तिचे डोके धावायला सुरुवात झाली.

मम्मासाठी ग्रीटींग वगैरे बनवणे तर नेहमीचे होतेच. पण यावेळी डेकोरेशन नाही करू शकणार तर तिने आयड्या दिली - आपण बलून शेपचे पेपर कट करून त्याला कलर करूया. आणि दोरी लाऊन भिंतीला चिकटवूया.

आपल्याच बर्थडेचा केक मम्मा स्वत:च बनवणार हे तिला पटतच नव्हते. माझा मोबाईल खेचून घेतला, यू ट्यूबवर सर्च केले, *How to make banana cake* आणि मला तो विडिओ दाखवू लागली. अपेक्षा होती की मी तो केक बनवावा. पण कसेबसे मी तिला समजवले हे मला झेपणारे प्रकरण नाही. तसे तिने डोरा केक बनवायची आयडिया दिली. दोन पारले जी ची बिस्कीटे घेत मध्ये जाम लावायचा. झाला डोरा केक. सोबत मला डोरा केक कसा बनवतात हे माहीत नाही या अज्ञानाची लाज काढून झाली. बाकी तिने जे सांगितले ते तरी खरे आहे की मला चुना लावला कल्पना नाही Happy

शेवटी आमचे एका गोष्टीवर एकमत झाले - ट्रेजर हंट
नुसते नाव घेताच ती सुपर एक्सायटेड झाली आणि पटपट गिफ्ट लपवायच्या तीन जागा सुचवल्या. ईतकेच नव्हे तर लगोलग तीन क्ल्यू सुद्धा तिनेच रचून मला अवाक केले

1. Runu rides me and have lots of fun. I am Runu's favourite toy.
Ans. - Cycle

2. I am rectangular in shape. I make things hot. But only eating things. If you don't have me you can make things hot on the gas.
Ans. - Oven

3. Runu loves to sleep with me and tell pari to sleep with me and him
We are three big and five small
Ans. - Teddy Happy

आता तीन गिफ्टसचीही गरज होती. त्यात एक चॉकलेट, दुसरे तिचे ड्रॉईंग कम ग्रीटींग, आणि तिसरे तिने मम्माला बड्डे विश केलेले लेटर... Happy

कागदी फुग्यांच्या डेकोरेशनचा प्लान तर ऐनवेळी बारगळला. पण तिने एक छानपैकी भिंत भरून टाकणारे ड्रॉईंग काढले. ते ड्रॉईंग काढताना खुर्चीचा दांडा आणि सायकलवर तोल सांभाळत ऊभे राहायच्या नादात पडूनही झाले. तरीही रडून झाल्यावर पुन्हा तसेच ऊभे राहत ड्रॉईंग पुर्ण केले. शेवटी तिच्या लाडक्या मम्माचा बड्डे होता Happy

माझ्याकडून मी तिला काही हेल्प केली तर फक्त दिड महिन्याची दाढी काढून छान कपडे घालून वेळेवर तयार झालो.
तर रुनुने तिला चॉकलेट, केक संपवायला आणि लुंगी डान्समध्ये गॉगल घालून नाचायला कंपनी दिली.
बाकी केकसह, बिर्याणी, सॅंडवीच, चाट अशी किचनची जबाबदारी खुद्द मम्मानेच घेतली.
आणि मम्माचा एक पुढील बराच काळ लक्षात राहणारा लॉकडाऊन बड्डे सेलिब्रेट झाला Happy

ज्याची भिती होती तेच झाले
लग्नाचा वाढदिवस सुद्धा लॉक डाऊनमध्येच आला... Sad
आता लॉकडाऊनमध्येच लॉकडाऊन दिवसाचे सेलिब्रेशन कसे करावे....
यावेळी सल्ले नको. फक्त पाठीवर हात ठेऊन लढ म्हणा _/\_

Pages