लॉकडाऊन काळात बड्डे सेलिब्रेट कसा करावा?

Submitted by ऋन्मेऽऽष on 23 April, 2020 - 14:56

सु. सू. - बाहेर परिस्थिती काय आणि तुम्ही बड्डे सेलिब्रेट काय करता असा विचार कोणाच्या मनात आल्यास त्वरीत मला विपू करा. लागलीच "लॉकडाऊन काळात बड्डे सेलिब्रेट करावा का?" असा स्वतंत्र धागा काढण्यात येईल.
सु.सू. संपली !

तर गेल्या महिन्याभरात बरेच जणांच्या कुटुंबात कोणाचा ना कोणाचा तरी बड्डे या लॉकडाऊन काळात आला असेल. ईतरवेळी घरच्यांसोबत बाहेर जेवायला जाणे किंवा मित्रांना घरी बोलावून पार्टी करणे, अगदी आदल्या रात्री बारा वाजता उत्सवमुर्तीच्या घरी धडकणे अश्या प्रकारे आपण हा दिवस साजरा करतो. सध्या यातले काहीही करता येणे शक्य नाही. गेला बाजार केक कापायचे म्हटले तरी तो बाजारातून आणता येईल याची खात्री नाही. अश्यात घरची सुगरण बायकोला मस्का मारून तिलाच होममेड केक चॅलेंज घ्यायला लावणे हाच पर्याय शिल्लक राहतो. पण लॉकडाऊनमध्ये तेरावा महिना, जर बड्डे दस्तुरखुद्द बायकोचाच असेल तर तूच केक बनव, तूच काप, आणि तूच खा असे सांगून आपण फक्त टाळ्यांपुरते शिल्लक नाही राहू शकत.

येस्स! तर ईथेही तीच गोची झाली आहे.
यात एक चांगले आहे की हा बायकोचा मोस्ट ईकोनॉमिक बड्डे एव्हर ठरण्याची दाट शक्यता आहे. पण बजेटबाबत जरी बायको नेहमीसारखी तोडफोड न करता तडजोड करायला तयार झाली तरी आपल्या बिटर हाल्फने एफर्टस घ्यावेत अशी तरी तिची नक्कीच अपेक्षा असणार. मायबोलीकरांना हे वेगळे सांगायला नको कारण येथली अर्ध्या जनतेला बायको असेल तर उरलेली अर्धी जनता स्वत! कोणाची तरी बायको असेल.

तर प्लीज प्लीज प्लीज या काळात आपण बड्डे सेलिब्रेट केले असल्यास ते अनुभव आणि केले नसल्यास आयडीया जरूर शेअर करा. धाग्याचा फायदा सर्वांनाच.

मी आयता बाळू वाटायला नको म्हणून आधी माझ्या डोक्यातील आयड्या लिहितो.

१) गिफ्ट - आमच्याकडे आदल्य रात्री बाराचा बड्डे करायचे फार फॅड आहे. बायकोचे माहेर जवळच असल्याने ते सुद्धा दरवर्षी पावणेबारालाच सो कॉलड् सरप्राईज धाड घालतात. यावेळी जर आले तर ते खरेखुरे सरप्रईज ठरेल. पण लॉकडाऊन नियम तोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे ते बाद झाले. तरी त्यावेळचे सेलिब्रेशन मस्ट आहे.
मग आता काय करायचे विचार करता लक्षात आले की मुलीचे गेले दोन बड्डे बारा वाजता ट्रेजर हंट खेळत साजरे केले आहेत. हाच पैतरा बायकोसोबत वापरता येईल. गिफ्ट लपवण्याच्या प्लानमध्ये मुलीलाही सामील करता येईल. पण किमान तीनचार छोटे छोटे गिफ्ट यासाठी प्लान करावे लागतील. या लॉकडाऊन काळात ते कसे मॅनेज करावे हा प्रश्न आहे. माझे डोके तर चॉकलेटसच्या पुढे जात नाहीये. तुमच्या सुपीक डोक्यात काही असेल तर सुचवा.

२) डेकोरेशन - बड्डे सेलिब्रेशन म्हटले की हे आलेच. अन्यथा ईतर पार्टी आणि बड्डे पार्टीमध्ये फरक तो काय?
तर नुकतेच झालेल्या मुलीच्या बड्डेला घरात होते नव्हते तेवढे सारे फुगे फुगवून फोडून झाले आहेत. फार हॅपी बड्डेची पताका एका भिंतीवर लावता येईल.
अजून एक आयड्या होती. घरातले पोरीच्या जन्मापासूनचे सारे सॉफ्ट टॉईज एकत्र केले तर छोटेमोठे सहज चाळीसेक जमतात. त्यांना मोक्याच्या जागी स्थानापन्न करून घराला डेकोरेशन कम पार्टी क्राऊडचा फिल देणे. पण हे याआधी एकदा करून झाले आहे आणि त्याचा फोटो फेसबूकवर शेअर करूनही झाले आहे त्यामुळे हे बाद झालेय. आता घरात दोनेक चमचमत फिरणारे डिस्को बल्ब तेवढे आहेत माहौल बनवायला. तर टाकाऊपासून टिकाऊ बनवतात तस्स् घरगुती गोष्टींपासून डेकोरेशनच्या काही आयड्या असतील तर प्लीज शेअर करा.

३) मेनू - नाईलाजाने केक तिलाच बनवायला लावणार. सध्या बंद असलेल्य नॉनवेजचा जुगाड करून आईला बनवायला सांगयचा प्लान आहे. मला स्वत:ला सूप, मॅगी, चहा, कॉफी, उकडलेले अंडे आणि हाल्फफ्राय असे मोजकेच जीवनावश्यक खाद्यपदार्थ बनवता येतात. तरी माझ्यासारख्यालाही काही बनवता येण्यासारखे पण तरीही नेहमीपेक्षा वेगळी स्पेशल डिश असे काही असेल तर सांगा. कांदा कापणे, भाजी चिरणे वा काही मळणे अशी मूलभूत मदत आईकडून घेऊ शकतो. तिलाही सूनेच्या वाढदिवसाला हातभार लावत एका आदर्श सासूचे उदाहरण या लॉकडाऊन काळात ज्मतेसमोर ठेवता येईल.

४) सोशलसाईटवर बायकोप्रेमाचे पोवाडे रचणे - हे खरे तर एक नंबरला हवे एवढे याचे महत्व आहे. पण हेच आहे जे या लॉकडाऊन काळात क्सलीही अडचण न येता जमू शकते. त्यामुळे याचे टेंशन नसल्याने मागे ठेवले. तरी नेहमीसारखे एखादा छानसा लेटेस्ट फोटो टाकण्याऐवजी तिचे दुर्मिळ फोटो जुन्या लॅपटॉपच्या उत्खनणातून शोधून एखादा स्लाईड शो बनवावा असा विचार करतोय. त्यासाठी एखादे चांगले ॲप असल्यास सुचवू शकता.

५) वात्सल्याचे ट्रंपकार्ड - जनरली स्त्री असो वा पुरुष, जर ते कोणाचे आई वा बाबा असतील तर त्यांच्यासाठीचे बेस्ट गिफ्ट मुलांनी खटपट करून दिलेले ग्रिटींग कार्डच असते. नवरयाने दिलेला नौलखा हार ते आपल्या मैत्रीणीला तिची जळवायच्या हेतूने दाखवतील पण मुलांनी बनवलेले कार्ड निव्वळ कौतुकानेच दाखवताहेत. तर विचार करतोय पोरीला चावी द्यावी जेणेकरून ती आपले निम्मे काम फत्ते करेल. एखादे ग्रीटींग कार्ड नाही तर एखादी भिंतच तिच्याकडून रंगवून घ्यावी. जे या सेलिब्रेशनमध्ये सेल्फी पाँईंट म्हणून सुद्धा वापरले जाऊ शकते.

६) ईतर चुटूरपुटूर काही करता येईल का याचाही विचार करतोय. जसे गेले दिड महिन्याची वाढलेली दाढी काढणे. दिवसभर तिच्या आवडीची गाणी वाजवणे. ईतर लॉकडाऊन दिवसांपेक्षा हा दिवस वेगळा आणि स्पेशल आहे असे तिला दिवसभर वाटत राहील हे बघणे.

मला सल्ले देणारयांसाठी एक तळटीप - आमच्या घरासमोर एक मेडीकल शॉप कम जनरल स्टोअर, अपना बाजार, छोटेसे सुपरमार्केट, एक वाणी आणि एक भाजीवाला ईतके सामान मिळवायचे सोर्सेस आहेत.

______

वरची पोस्ट लिहून झाल्यावर थोडे मुलीशीही डिस्कशन झाले. ती मम्माचा सरप्राईज बड्डे सेलिब्रेट करायचे या कल्पनेनेच सुपर्र एक्सायटेड झाली. तिनेही चटचट काही आयड्या दिल्या. जसे की,
बलून्स नाहीयेत तर बलून शेपचा पेपर कट करून रंगवायचा आणि भिंतीला चिकटवायचा. त्या बलूनवर रंगीत कागदाचे तुकडे चिकटवत डिजाईन करायची. ट्रेजर हंटरमध्ये लपवायच्या गिफ्ट काय तर चॉकलेटस आणि ग्रीटींग असे दोन पर्याय सुचवले. एक लपवायची जागा फिक्स करून लगोलग क्ल्यू सुद्धा रचला. कहर म्हणजे केक मम्माला बनवायला लावायचे हे तिला पटलेच नाही. माझ्याच मोबाईलवर यूट्यूब लाऊन त्यात How to make banana cake असे सर्च करून मलाच दाखवू लागली. आणि तो मी बनवावा अशी ईच्छा व्यक्त केली जी मी धुडकाऊन लावली.
एकूण लॉकडाऊनमधील बड्डे सेलिब्रेशन हि दुर्घटना नसून एक संधी आहे असे मला वाटू लागलेय. ईतरांचेही अनुभव आणि आयड्या आल्यात तर वाचायला आवडतील Happy

धन्यवाद,
ऋन्मेष Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिप्स - लोकांना टाईमपास हवाच असतो, त्यांना फावला वेळ असतो म्हणून तोंडी लावतात याला

आणि त्याला तर अटेंशन सिकिंग चा आजार आहेच
त्यामुळे त्याचंही फावतंय

कोणाची ट्रॅव्हल हिस्टरी पण नाही.
त्या मुळे सर्व एकत्रच असतात .
सर्वांनी मिळून केक बनवला,समोसे बनवले .
अजून काय बनवले आणि वाढ दिवस मस्त साजरा केला.
>>> सोशल डिस्टंसिन्ग चा मजाक बनवून ठेवला आहे...

सोशल डिस्टंसिन्ग चा मजाक बनवून ठेवला आहे...
>>>

प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी आहे याबाबत.
काही ठिकाणी सोसायटीत आतल्या आत एकमेकांकडे जाणे येणे चालू आहे.

काही गरज नाही सेलेब्रेट करायची.
परत वर तोंड करुन सांगता येईल बायकोला यावर्षी बड्डे सेलेब्रेट न केल्याने तुझं वय वाढलच नाही १ वर्षाने.

हो पण ते चुकीचे आहे... यातल्या एखाद्याला बाहेरून कोरोना लागला - भाजी घेताना वगैरे समजा तर किती लोकांना पसरेल...

काही गरज नाही सेलेब्रेट करायची.
परत वर तोंड करुन सांगता येईल बायकोला यावर्षी बड्डे सेलेब्रेट न केल्याने तुझं वय वाढलच नाही १ वर्षाने.

नवीन Submitted by जेम्स बॉन्ड on 24 April, 2020 - 22:21
>>>>
खुदा से डर बाॅन्डा,
झुठ बोलके तू वो एक पल निकाल लेगा, पर तेरे जिंदगी का और एक पुरा साल तुम्हे उसे झेलना पडेगा. वो एक साल तूम कैसे झेलोगे वो आज मै तुम्हे नही बताऊंगा. तुम्हे अपनी जी जान लगानी पडेगी. तूम ये गलती करो तो ये एक साल तुम्हारे जिंदगी से कोई नही छीन सकता. Biggrin

काही गरज नाही सेलेब्रेट करायची.>> हे मला पन वाटलेलं आता अ‍ॅडल्ट पणी कसले बर्थडे साजरे करतात ते सुद्धा जग भर लोक मरत असताना असे वाटलेले पण त्यांची गरज असेल कदाचित व ह्यांची मानसिक गरजही आहे बी एम सी च्या स्टाफला एक दिवस जेवण द्या. किंवा पोलिसांची चौकी असेल तिथे मिठाई जेवण पाणी नेउन द्या. पटल्यास.

चाळीत राहात असाल तर मधल्या पटां ग णात उभे राहुन शाहरुखचे प्रिटी वुमन गाणे म्हणता येइल. आज पासुन दुकाने उघडली आहेत. त्यामुळे
केक डेकोरे शन चे सामान फुगे वगिअरे मिळूनच जाईल. संध्याकाळी मन्नत वर चक्कर मारा व्हर्चुअली. किंवा शारुखचा नेटफ्लिक्स वर एपिसोड आहे तो बघा. आवडेल तुम्हास्नी.

बायकोची हौस पुरवण्यापायी काही ही घडु शकते.

काही गरज नाही सेलेब्रेट करायची.>> हे मला पन वाटलेलं आता अ‍ॅडल्ट पणी कसले बर्थडे साजरे करतात ते सुद्धा जग भर लोक मरत असताना असे वाटलेले पण त्यांची गरज असेल कदाचित व ह्यांची मानसिक गरजही आहे बी एम सी च्या स्टाफला एक दिवस जेवण द्या. किंवा पोलिसांची चौकी असेल तिथे मिठाई जेवण पाणी नेउन द्या. पटल्यास.

चाळीत राहात असाल तर मधल्या पटां ग णात उभे राहुन शाहरुखचे प्रिटी वुमन गाणे म्हणता येइल. आज पासुन दुकाने उघडली आहेत. त्यामुळे
केक डेकोरे शन चे सामान फुगे वगिअरे मिळूनच जाईल. संध्याकाळी मन्नत वर चक्कर मारा व्हर्चुअली. किंवा शारुखचा नेटफ्लिक्स वर एपिसोड आहे तो बघा. आवडेल तुम्हास्नी.

बायकोची हौस पुरवण्यापायी काही ही घडु शकते.

सोशल distancing ha शब्द (त्याच्या अर्थासहित ) चुकीचं आहे आपल्याला ह्या संसर्ग जन्य साथी मध्ये सोशल distance ठेवायचे नाही तर physical distance ठेवायचे आहे.

झुठ बोलके तू वो एक पल निकाल लेगा, पर तेरे जिंदगी का और एक पुरा साल तुम्हे उसे झेलना पडेगा. वो एक साल तूम कैसे झेलोगे वो आज मै तुम्हे नही बताऊंगा. तुम्हे अपनी जी जान लगानी पडेगी. तूम ये गलती करो तो ये एक साल तुम्हारे जिंदगी से कोई नही छीन सकता. Biggrin

हं !!!!! या तुम्हीपण भरलेल्या फुग्याची हवा काढायला.......(नाराज व खट्टु बाहुली).
अरे...................त्यांची पत्नी एक वर्षाने तरुण रहात आहे हा फायदा पण बघाना...............शाफॅ सतत बोलु शकतात...बोलो ना क्या लगाती हो?????? वर मस्का तो पण मोफत.

बी एम सी च्या स्टाफला एक दिवस जेवण द्या. किंवा पोलिसांची चौकी असेल तिथे मिठाई जेवण पाणी नेउन द्या.

अमा, तुम्ही देलेली आयडिया पण खुपच छान आहे. किंवा कोणा गरजु कुटूंबला बड्डेसाठी करणार असणारा खर्च द्यावा.

अरेच्या !
तिकडे लोक मैलोनमेल प्रवास करतायेत कित्येक जण उपाशी आहेत.. आणि तुम्ही बड्डे कसले सेलिब्रेट करतायेत छाप देणारे महानसदगृहस्थ इकडे आले नाहीत वाटतं.
नुसते भांडी घासून हात दुखून आले म्हंटल तर तावातावाने भांडत होते इकडे तर लोक चक्क बड्डे सेलिब्रेट करतायेत हा तर चक्क घोर अपराध झाला नाही का हो सद्गृहस्थ...

तिकडे खाऊगल्ली च्या धाग्यावर लोक विविध पदार्थ करून खातायेत.
इतर लोक उपाशी आहेत म्हणून आपण खायचे नाही असे जाऊन म्हणा सगळ्यांनी !!
काय लॉजिक आहे हे??
अरे ज्यांना मिळतंय ते खातायेत.

उगाच लोक भांडत सुटतात विनाकारण...

मी भांडी घासायला छान वातावरण केलं आहे
रात्रीची आणि दुपारची जेवणं झाली की किचनचा फॅन लावतो, मोबाईल वर मस्त जुनी हिंदी गाणी लावतो, आणि लिक्विड वॉश ने एकेक करत तालासुरात भांडी घासतो
I am loving it

पण आशुचांप,

लिक्विड सोपने भांडी घासावीत की बारने?
धागा काढावा का?

बार गीजगोळा होतो, सगळं राडरिबिट
त्यापेक्षा लिक्विड बरे
हात पण मृदू मुलायम राहतात, वास पण छान येतो लिंबाचा
आता नुसत्या लिंबाच्या साली ने घासा म्हणू नका

पण बार स्वस्त पडतो. लिक्विड सोपं महाग पडतो.
लिंबाचं साल इज नाईस ऑप्शन. युह आर राईट!
बिटर हाल्फ आली ना, तर तिला ही आयड्या देईल.

आयडिया देऊन काय उपयोग
शेवटी भांडी आपल्यालाच घासावी लागतात
त्यामुळें आपल्याला आवडेल ते आणावे

अरेच्या !
तिकडे लोक मैलोनमेल प्रवास करतायेत कित्येक जण उपाशी आहेत.. आणि तुम्ही बड्डे कसले सेलिब्रेट करतायेत छाप देणारे महानसदगृहस्थ इकडे आले नाहीत वाटतं.

>>>>

बड्डे सेलिब्रेट करावा की न करावा यासाठी मी वेगळा धागा काढला आहे.
बाकी आपला आजचा मेनू धाग्याचा मुद्दा योग्य आहे.
लॉकडाऊन काळात मनोरंज्न नाही शोधले तर मानसिकदृष्ट्या कोसळून जाऊ त्यामुळे हे गरजेचेही आहे.

आयडिया देऊन काय उपयोग
शेवटी भांडी आपल्यालाच घासावी लागतात
त्यामुळें आपल्याला आवडेल ते आणावे

नवीन Submitted by आशुचँप on 25 April, 2020 - 22:02
+420

+786

हे चिन्ह वापरू नका तुम्हाला माझा डु आयडी समजले जाईल. Happy
एकूणच आंतरजालावर हे मी सुरू केलेय ते देखील ऑर्कुटकाळात. बरेचदा डु आयडी आपले बिल मुद्दाम माझ्यावर फाडायला हे वापरतात.

डोन्ट वरी रुन्मेषजी, असं कुणालाही वाटणार नाही.
मात्र संशयकल्लोळ नाट्य अंक दुसरा निर्माण करण्यासाठी हा प्रतिसाद आलाय हे मी चांगलंच जाणून आहे.
घ्या वाढला अजून एक प्रतिसाद!

Lol
अजून एक वाढला.
या धाग्यावर प्रतिसाद वाढवण्यात मी खारीचा वाटा उचलतोय, ती हळूहळू मगर होईल.

धाग्याचा मुद्दा योग्य आहे.
लॉकडाऊन काळात मनोरंज्न नाही शोधले तर मानसिकदृष्ट्या कोसळून जाऊ त्यामुळे हे गरजेचेही आहे.+ १७८६ Happy

नशीब समजा त्यांनी कॉपी राईट नाही मागितला
Happy
नवीन Submitted by आशुचँप on 25 April, 2020 - 22:19
>>>>

नाही पण हल्ली बरेच ओरिजिनल आयडी सुद्धा सर्रास हे +७८६ वापरताना दिसतात. कदाचित आणखी २० वर्षांनी याचा जनक मी आहे हे कोणाला सांगूनही खरे वाटणार नाही म्हणून कुठेतरी हे नोंदवणेही गरजेचे आहे.

786 चे जनक तुम्ही??₹

या अल्ला, या खुदा
हे वाचण्यापूर्वी मी मुका बहिरा का नाही झालो

Pages