लॉकडाऊन काळात बड्डे सेलिब्रेट कसा करावा?

Submitted by ऋन्मेऽऽष on 23 April, 2020 - 14:56

सु. सू. - बाहेर परिस्थिती काय आणि तुम्ही बड्डे सेलिब्रेट काय करता असा विचार कोणाच्या मनात आल्यास त्वरीत मला विपू करा. लागलीच "लॉकडाऊन काळात बड्डे सेलिब्रेट करावा का?" असा स्वतंत्र धागा काढण्यात येईल.
सु.सू. संपली !

तर गेल्या महिन्याभरात बरेच जणांच्या कुटुंबात कोणाचा ना कोणाचा तरी बड्डे या लॉकडाऊन काळात आला असेल. ईतरवेळी घरच्यांसोबत बाहेर जेवायला जाणे किंवा मित्रांना घरी बोलावून पार्टी करणे, अगदी आदल्या रात्री बारा वाजता उत्सवमुर्तीच्या घरी धडकणे अश्या प्रकारे आपण हा दिवस साजरा करतो. सध्या यातले काहीही करता येणे शक्य नाही. गेला बाजार केक कापायचे म्हटले तरी तो बाजारातून आणता येईल याची खात्री नाही. अश्यात घरची सुगरण बायकोला मस्का मारून तिलाच होममेड केक चॅलेंज घ्यायला लावणे हाच पर्याय शिल्लक राहतो. पण लॉकडाऊनमध्ये तेरावा महिना, जर बड्डे दस्तुरखुद्द बायकोचाच असेल तर तूच केक बनव, तूच काप, आणि तूच खा असे सांगून आपण फक्त टाळ्यांपुरते शिल्लक नाही राहू शकत.

येस्स! तर ईथेही तीच गोची झाली आहे.
यात एक चांगले आहे की हा बायकोचा मोस्ट ईकोनॉमिक बड्डे एव्हर ठरण्याची दाट शक्यता आहे. पण बजेटबाबत जरी बायको नेहमीसारखी तोडफोड न करता तडजोड करायला तयार झाली तरी आपल्या बिटर हाल्फने एफर्टस घ्यावेत अशी तरी तिची नक्कीच अपेक्षा असणार. मायबोलीकरांना हे वेगळे सांगायला नको कारण येथली अर्ध्या जनतेला बायको असेल तर उरलेली अर्धी जनता स्वत! कोणाची तरी बायको असेल.

तर प्लीज प्लीज प्लीज या काळात आपण बड्डे सेलिब्रेट केले असल्यास ते अनुभव आणि केले नसल्यास आयडीया जरूर शेअर करा. धाग्याचा फायदा सर्वांनाच.

मी आयता बाळू वाटायला नको म्हणून आधी माझ्या डोक्यातील आयड्या लिहितो.

१) गिफ्ट - आमच्याकडे आदल्य रात्री बाराचा बड्डे करायचे फार फॅड आहे. बायकोचे माहेर जवळच असल्याने ते सुद्धा दरवर्षी पावणेबारालाच सो कॉलड् सरप्राईज धाड घालतात. यावेळी जर आले तर ते खरेखुरे सरप्रईज ठरेल. पण लॉकडाऊन नियम तोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे ते बाद झाले. तरी त्यावेळचे सेलिब्रेशन मस्ट आहे.
मग आता काय करायचे विचार करता लक्षात आले की मुलीचे गेले दोन बड्डे बारा वाजता ट्रेजर हंट खेळत साजरे केले आहेत. हाच पैतरा बायकोसोबत वापरता येईल. गिफ्ट लपवण्याच्या प्लानमध्ये मुलीलाही सामील करता येईल. पण किमान तीनचार छोटे छोटे गिफ्ट यासाठी प्लान करावे लागतील. या लॉकडाऊन काळात ते कसे मॅनेज करावे हा प्रश्न आहे. माझे डोके तर चॉकलेटसच्या पुढे जात नाहीये. तुमच्या सुपीक डोक्यात काही असेल तर सुचवा.

२) डेकोरेशन - बड्डे सेलिब्रेशन म्हटले की हे आलेच. अन्यथा ईतर पार्टी आणि बड्डे पार्टीमध्ये फरक तो काय?
तर नुकतेच झालेल्या मुलीच्या बड्डेला घरात होते नव्हते तेवढे सारे फुगे फुगवून फोडून झाले आहेत. फार हॅपी बड्डेची पताका एका भिंतीवर लावता येईल.
अजून एक आयड्या होती. घरातले पोरीच्या जन्मापासूनचे सारे सॉफ्ट टॉईज एकत्र केले तर छोटेमोठे सहज चाळीसेक जमतात. त्यांना मोक्याच्या जागी स्थानापन्न करून घराला डेकोरेशन कम पार्टी क्राऊडचा फिल देणे. पण हे याआधी एकदा करून झाले आहे आणि त्याचा फोटो फेसबूकवर शेअर करूनही झाले आहे त्यामुळे हे बाद झालेय. आता घरात दोनेक चमचमत फिरणारे डिस्को बल्ब तेवढे आहेत माहौल बनवायला. तर टाकाऊपासून टिकाऊ बनवतात तस्स् घरगुती गोष्टींपासून डेकोरेशनच्या काही आयड्या असतील तर प्लीज शेअर करा.

३) मेनू - नाईलाजाने केक तिलाच बनवायला लावणार. सध्या बंद असलेल्य नॉनवेजचा जुगाड करून आईला बनवायला सांगयचा प्लान आहे. मला स्वत:ला सूप, मॅगी, चहा, कॉफी, उकडलेले अंडे आणि हाल्फफ्राय असे मोजकेच जीवनावश्यक खाद्यपदार्थ बनवता येतात. तरी माझ्यासारख्यालाही काही बनवता येण्यासारखे पण तरीही नेहमीपेक्षा वेगळी स्पेशल डिश असे काही असेल तर सांगा. कांदा कापणे, भाजी चिरणे वा काही मळणे अशी मूलभूत मदत आईकडून घेऊ शकतो. तिलाही सूनेच्या वाढदिवसाला हातभार लावत एका आदर्श सासूचे उदाहरण या लॉकडाऊन काळात ज्मतेसमोर ठेवता येईल.

४) सोशलसाईटवर बायकोप्रेमाचे पोवाडे रचणे - हे खरे तर एक नंबरला हवे एवढे याचे महत्व आहे. पण हेच आहे जे या लॉकडाऊन काळात क्सलीही अडचण न येता जमू शकते. त्यामुळे याचे टेंशन नसल्याने मागे ठेवले. तरी नेहमीसारखे एखादा छानसा लेटेस्ट फोटो टाकण्याऐवजी तिचे दुर्मिळ फोटो जुन्या लॅपटॉपच्या उत्खनणातून शोधून एखादा स्लाईड शो बनवावा असा विचार करतोय. त्यासाठी एखादे चांगले ॲप असल्यास सुचवू शकता.

५) वात्सल्याचे ट्रंपकार्ड - जनरली स्त्री असो वा पुरुष, जर ते कोणाचे आई वा बाबा असतील तर त्यांच्यासाठीचे बेस्ट गिफ्ट मुलांनी खटपट करून दिलेले ग्रिटींग कार्डच असते. नवरयाने दिलेला नौलखा हार ते आपल्या मैत्रीणीला तिची जळवायच्या हेतूने दाखवतील पण मुलांनी बनवलेले कार्ड निव्वळ कौतुकानेच दाखवताहेत. तर विचार करतोय पोरीला चावी द्यावी जेणेकरून ती आपले निम्मे काम फत्ते करेल. एखादे ग्रीटींग कार्ड नाही तर एखादी भिंतच तिच्याकडून रंगवून घ्यावी. जे या सेलिब्रेशनमध्ये सेल्फी पाँईंट म्हणून सुद्धा वापरले जाऊ शकते.

६) ईतर चुटूरपुटूर काही करता येईल का याचाही विचार करतोय. जसे गेले दिड महिन्याची वाढलेली दाढी काढणे. दिवसभर तिच्या आवडीची गाणी वाजवणे. ईतर लॉकडाऊन दिवसांपेक्षा हा दिवस वेगळा आणि स्पेशल आहे असे तिला दिवसभर वाटत राहील हे बघणे.

मला सल्ले देणारयांसाठी एक तळटीप - आमच्या घरासमोर एक मेडीकल शॉप कम जनरल स्टोअर, अपना बाजार, छोटेसे सुपरमार्केट, एक वाणी आणि एक भाजीवाला ईतके सामान मिळवायचे सोर्सेस आहेत.

______

वरची पोस्ट लिहून झाल्यावर थोडे मुलीशीही डिस्कशन झाले. ती मम्माचा सरप्राईज बड्डे सेलिब्रेट करायचे या कल्पनेनेच सुपर्र एक्सायटेड झाली. तिनेही चटचट काही आयड्या दिल्या. जसे की,
बलून्स नाहीयेत तर बलून शेपचा पेपर कट करून रंगवायचा आणि भिंतीला चिकटवायचा. त्या बलूनवर रंगीत कागदाचे तुकडे चिकटवत डिजाईन करायची. ट्रेजर हंटरमध्ये लपवायच्या गिफ्ट काय तर चॉकलेटस आणि ग्रीटींग असे दोन पर्याय सुचवले. एक लपवायची जागा फिक्स करून लगोलग क्ल्यू सुद्धा रचला. कहर म्हणजे केक मम्माला बनवायला लावायचे हे तिला पटलेच नाही. माझ्याच मोबाईलवर यूट्यूब लाऊन त्यात How to make banana cake असे सर्च करून मलाच दाखवू लागली. आणि तो मी बनवावा अशी ईच्छा व्यक्त केली जी मी धुडकाऊन लावली.
एकूण लॉकडाऊनमधील बड्डे सेलिब्रेशन हि दुर्घटना नसून एक संधी आहे असे मला वाटू लागलेय. ईतरांचेही अनुभव आणि आयड्या आल्यात तर वाचायला आवडतील Happy

धन्यवाद,
ऋन्मेष Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते सेलेब्रेटींचे मित्र मैत्रिणींचे विडीओ दाखवतात ना, त्या सेलेब्रेटींविषयीची छान छान (तोंडदेखली ?) मते तसे विडीओ मागवा जवळच्यांकडून. कधी आणि कसे दाखवायचे ते चिट टाकून ट्रेजर हंट सारखे पण करता येईल

रच्याकने आम्हाला आयड्या कधीपर्यंत देता येतील? तारीख?

यात एक चांगले आहे की हा बायकोचा मोस्ट ईकोनॉमिक बड्डे एव्हर ठरण्याची दाट शक्यता आहे. पण बजेटबाबत जरी बायको नेहमीसारखी तोडफोड न करता तडजोड करायला तयार झाली तरी आपल्या बिटर हाल्फने एफर्टस घ्यावेत अशी तरी तिची नक्कीच अपेक्षा असणार.
>>>>
कृपया इस भ्रम मे ना रहे. सुत समेत वसुला जायेगा.

आस्मादिक तावडीत सापडलेला बकरा झालेत. बायको आणि पोरीने , पोरीची मागील वर्षाची मराठीच्या वहीचे चार पाने भरून याद्या बनवल्यात माझ्याकडून कायकाय उकळायचे आहे त्याच्या. नशीब "भाई तूम साईन करते हो या नही?" करत माझ्या कडून त्या खाली सह्या नाही घेतल्या.

बिस्किटांचा केक बनवा, तुनळी वर भरपूर रेसिपीज सापडतील, सोपा असतो आणि विशेष सामान आणावे लागणार नाही Happy
Fridge मध्ये ठेवून no bake केक करतात, तोही पाहा
जे सोपे वाटेल ते करा

एखादं भारी surprise खाजगी प्रेम पत्र लिहा Happy
त्यात तुमचे फोटो चिकटवा, prints असतील तर , नसतील तर बदामाची design काढा लाल पेनाने Happy
दिवाळीच्या lighting ची माळ असेल घरात तर ती decoration साठी वापरता येईल, heart किंवा कुठल्याही आकारात भिंतीवर सेलोटेपने चिकटवायची

बिस्किटांचा केक सोप्पा असतो आणि मस्त होतो. इथे माबोवर सोपा केक नावाची पाकृ आहे.
माझ्या एका बहिणीच्या (कॉलेज गोइंग) मुलाने तिच्या वाढदिवसाच्या आधी एकदोन दिवस आम्हाला सगळ्यांंना (जवळच्या नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींना) मेसेज करून तिला शुभेच्छा देण्याचे व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठवायला सांगितले आणि ते सगळे एकत्र करून मोठ्ठा दहा बारा मिनिटांंचा एकच व्हिडिओ तयार केला. बिस्किटांचा केक त्याने स्वतः केला आदल्या रात्री आईबाबा झोपल्यावर आणि बारा वाजता त्यांना उठवून केक आणि व्हिडिओचं सरप्राइज दिलं Happy ( त्याच्या बाबांना माहिती होतं अर्थात)
व्हिडिओ बघायला आम्हालाही खूप मस्त वाटलं!

सर्व काम बायको आणि आई च्या गळ्यात मारून आपण माबो वर हुण्दडायचे. मला कसा स्वैपाक येत नाही याचे बबड्या युक्त गायन करायचे.
मस्त आयड्याय..

धन्यवाद पाफा आणि वावे फॉर विडिओ आयड्या...
कोणाकोणाला विडिओ रिक्वेस्ट करता येईल याची नावे सध्या पटकन डोळ्यासमोर येत नाहीयेत. पण बघतो विचार करून.

@ पाफा, तारीख २९ एप्रिल.
त्यानंतर आलेली आयड्याही २७ मेच्या लग्नाच्या वाढदिवसाला वापरता येईल. पण आशा करतो तेव्हा लॉकडाऊनमध्ये नसू Happy

केकच्या सल्यांबद्दल धन्यवाद. पण ते शिरावर घेतले तर सर्व एनर्जी त्यातच जाईल. आणि फसला तर..... याचेच चान्सेस जास्त आहेत
याऊलट बायकोला तसेही केक बनवायची आणि प्रयोग करायची आवड आहे. आणि तिने ऑलरेडी काही दिवसांपूर्वीच बड्डे केकच्या दिशेने प्रयोग करायला घेतले आहेत.
त्यामुळे केक व्यतिरीक्त काही जमते का बघतो

त्यात तुमचे फोटो चिकटवा, prints असतील तर , नसतील तर बदामाची design काढा लाल पेनाने Happy
>>>>>

किल्ली ही छान आयड्या होती पण बायकोनेच आधी असे मला देऊन झालेय. एक मोठे ड्रॉईंग बूक ज्यात आमचे फोटो, सभोवताली डिजाईन आणि काही सेंटी डायलॉग वगैरे...
तसेही आता हार्ड कॉपी मिळणे अशक्य. त्याच बूकमधील फोटो चोरावे लागतील Proud

मायबोली वरचा वेळ कमी करुन तो घरात द्यावा जमल्यास
खूप चांगले गिफ्ट ठरेल बायकोला ...
Submitted by आशुचँप on 24 April, 2020 - 03:43
>>>>>

आमच्याकडे प्रत्येकाला त्याचा पर्सनल टाईम दिला जातो. कितीही प्रेम ऊतू गेले तरी चोवीस तास एकमेकांच्या डोक्यावर बसायचे नाही. पण गरजेला नेहमी उपलब्ध राहायचे. ते मी करतो. आणि यावर स्वतंत्र लेख लिहू शकतो Happy

जरूर लिहा, तुमच्याच लिखाणाची आज देशाला गरज आहे
शिंक आली तर शिंकावे का ऑफिसमध्ये, घरात, मिटिंग मध्ये
हा एक उपयुक्त विषय आहे

माझ्या मुलाचा जन्म दिवस lockdown
मध्येच होता आणि साजरा पण केला.
माझ्या मजल्यावर decent kutumb आहेत.
बिल्डिंग च्या खाली विनाकारण कोण्ही जात नाही गरजे पुरताच आणि सर्व नियम चे काटेकोर पालन करून.
कोणाची ट्रॅव्हल हिस्टरी पण नाही.
त्या मुळे सर्व एकत्रच असतात .
सर्वांनी मिळून केक बनवला,समोसे बनवले .
अजून काय बनवले आणि वाढ दिवस मस्त साजरा केला.
सम वयस्क मुल सुद्धा आहेत त्याच्या बरोबरची.
फक्त मर्यादित लोक.
फक्त माझ्या मजल्यावर चीच.

देवकी,
आशुचॅम्प यांनी वैचारीक मतभेद बाजूला सारून लिहा अशी विनंती केली आहे तर मान द्यायलाच हवा.

@ बबन, धन्यवाद.
पण आपण मदत आणि सेलिब्रेशन वेगळे ठेऊ शकतो. सध्याही शक्य ती मदत करत आहे, जमेल झेपेल ती करत राहीनच.

सर्वांनी मिळून केक बनवला,समोसे बनवले .
अजून काय बनवले आणि वाढ दिवस मस्त साजरा केला.
>>>>>

प्रशांतजी ग्रेट! पण हे आमच्याकडे शक्य नाही. ईथे एकही जण जीवनावश्यक गरजेशिवाय घराचा ऊंबरठाही ओलांडत नाही. मुलांना ती गरजही पडत नसल्याने मुले कधीतरी पाचेक मिनिटे आपापल्या खिडकीत बसून एकमेकांशी ओरडून ओरडून थोडीफार बोलली तर तेच त्यांचे हायेस्ट लेव्हल ऑफ सोशल ईण्टरॲक्शन आहे.
त्यामुळे आम्ही घरातले पाच जीव जे काही धुडगुस घालू तेच.

सर्व काम बायको आणि आई च्या गळ्यात मारून आपण माबो वर हुण्दडायचे. मला कसा स्वैपाक येत नाही याचे बबड्या युक्त गायन करायचे.
Lol

वरचा धागा काढो न काढो
हा नक्कीच काढणार
धन्यवाद आशू २९ Happy

यात वैयक्तिक मतभेद बाजूला सारून वगैरे मनाचे श्लोक तुम्ही जोडलेत का?
आतापर्यंत लेखात पाणी ओतून पांचट करत होता ते काय कमी होतं आता लोकांच्या वाक्यात पण पाणी ओतू लागलाय

यात वैयक्तिक मतभेद बाजूला सारून वगैरे मनाचे श्लोक तुम्ही जोडलेत का?
>>>>

मी वैयक्तिक मतभेद बाजूला सारून असे कुठे लिहिले दखवता का? Happy

Pages