करोनानंतरच जग !!

Submitted by विवेक नाईक on 13 April, 2020 - 06:16

करोना सारख्या संकटा नंतरच जग हे संपुर्ण बदलेल अशी मला खात्री आहे.

त्या पुर्वी करोना सारख्या संकटापुर्वच मा मोदीजींनी ज्या समयोचीत उपाय योजना राबवल्या ज्या भारताच्या फारच कामी आल्या त्या पुढील प्रमाणे ,

१ जन धन योजना :
२. आयुष योजना
३ . मन की बात मधुन सरळ जनतेशी संवाद !
४. मेक ईन ईंडिया
५. आधार कार्ड

त्या शिवाय भारत श्री रामदेव बाबाचे सुद्धा ऋणी असणार आहेत ज्यांनी कपाल भातीची सवय जन मानसाला लावली. अश्या आरोग्याच्या सवई सतत जनतेवर बिंबवल्या पाहीजेत जेणे करुन जनता अरोग्यावान राहील.

करोनानंतर जग सुद्धा पूर्णपणे बदललेले असेल. ज्या देशामुळे ह्या करोनाचे संक्रमण पुर्ण जगात झाले तो देश अगोदरच जगाच्या मनातुन उतरलेला आहे. जागतीक पातळीवर त्याची छी थु होत आहे. पण लवकरच त्यादेशाचा व्हीटो पॉवर सुद्धा जाईल ह्या अशी प्रगत देशाची मागणी पुढे येत आहे.

उत्पादनात सर्वात पुढे असलेला हा देश आता मागणी कमी असल्याने संकटात सापडणार त्याच बरोबर अमेरीके सकट युरोपियन व जपान सारख्या देशाने आपल्या देशा चे चीन मधले कारखाने हलवण्याचे आदेश दिलेले आहेत. लवकरच चीन मधले कारखाने बंद पडतील. हे सर्व कारखाने उच्च प्रतीचा माल बनवतात. उरलेले खेळ णी वैगेरे बनवणारे कारखाने तिथे उरले तरी त्याने काहीही फरक पडणार नाही. त्या चीन ने चालाखी करुन कारखाने हलवण्यास नकार दिला तरीही चीन मध्ये बनलेल्या मालाला उठाव असणार नाही.

भारताला ह्या सर्वामुळे पुढे येण्याची चांगली संधी उपलब्ध होईल. वेळीच देशातल्या प्राईव्हेट सेकृरने हालचाल करुन जास्तीत जास्त कारखाने आपल्या पदरी पाडुन घ्यायला पाहीजेत. अश्या मोठ्या काराखान्यामुळे बरेच छोटे कारखाने ( अ‍ॅनसिलियरी युनिटस) उदयास येतात.

भारतात आरोग्य क्षेत्रात अमुलाग्र बदल होईल अशी अपेक्षा आहे. भारतीय नागरीकाला आधार कार्ड बरोबरच ईतर निगडित बेनिफिट्स मिळायला पहीजेत. आधार कार्ड सर्व क्षेत्रात अनिवार्य होईल. त्यामुळे चोरी , गुन्हे कमी व्हायला मदत होईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users