यूट्यूब हे म्हटलं तर वेळ वाया घालवणारं नाहीतर योग्य हेतूसाठी वापरलं तर फार उपयुक्त साधन आहे. कित्येकदा मी गूगल करण्याऐवजी सरळ यूट्यूबवरच शोध घेते.
करमणूक म्हणा किंवा नवीन स्कील्स शिकणं म्हणा, यूट्यूब या सगळ्यांचं भांडार आहे.
यूट्यूबवर बरेच छान कॉन्ट्रीब्यूटर्स आहेत. माझे आवडते असे आहेतः
स्कील्स लर्निंग (शिक्षण्/नोकरी/करीयर् इ.)
Traversy Media (टेक्निकल स्कील्स)
Bridging the Gap (बिझनेस अॅनलिसिस)
Nihongo no mori (जपानी भाषा)
आरोग्य
Rujutadiwekarofficial
Damle Uvach
करमणूक्/पर्यटन इ.
MostlySane
Bharatiya Touring Party
Dhanya Te Foreign
Rang Pandhari
तुम्ही कोणते चॅनल्स सबस्क्राइब केलेत जे तुम्हाला उपयुक्त वाटले आहेत किंवा करमणूकीसाठी आवडतात ते लिहा. शक्यतो लिंकही द्या. तुमचे आवडते यूट्यूबर्स कोण आहेत?
यातून माहित नसलेले अनेक उपयुक्त चॅनल्स कळतील असं वाटतंय. तर सांगा तर मग!
एक नंबरफाइल नावाचा चॅनल आहे.
एक नंबरफाइल नावाचा चॅनल आहे. गणितात रुची आहे पण फार गती नसलेल्या माझ्यासारख्या अनेकांना आवडेल. गणितातल्या फार वेगवेगळ्या विषयांवर विडिओज असतात.
बरोबर टवणेसर, मी बघते
बरोबर टवणेसर, मी बघते Numberphile. : https://www.youtube.com/channel/UCoxcjq-8xIDTYp3uz647V5A
एक अजून आहे Mind Your Decisions. हा Presh Talwalkar नावाच्या माणसाचा आहे. गणितातली मस्त कोडी वगैरे असतात. : https://www.youtube.com/channel/UCHnj59g7jezwTy5GeL8EA_g
मी करमणुकीसाठी अधूनमधून हे
मी करमणुकीसाठी अधूनमधून हे चॅनेल्स पाहत असतो
https://www.youtube.com/c/NarendraModi/videos
https://www.youtube.com/c/DevendraFadnavis/videos
https://www.youtube.com/c/bjp/videos
https://www.youtube.com/channel/UCQ0tRvD62m7rxQI7O9tKnhQ/videos
चॅनेल ची नावे तरी इंग्रजीत
चॅनेल ची नावे तरी इंग्रजीत लिहत जा रे... शोधायला बरे पडेल अमच्यासारख्याना...
मध्यंतरी अॅगथा ख्रिस्तीचं एक
मध्यंतरी अॅगथा ख्रिस्तीचं एक पुस्तक इथे ऐकलं. मोठा खजिना आहे इथे:
White Window : https://www.youtube.com/channel/UCZSJTE_YezEPh2Qwk4VeakQ/videos
मी सध्या जिमी कीमेल बघतोय.
मी सध्या जिमी कीमेल बघतोय.
Specially त्याचे आणि matt damon चे विडिओज
मी पाककृती फ़ूड़ शी related
मी पाककृती फ़ूड़ शी related हे channels बघते.
गावरान एक खरी चव
Mrunalini bendre
Jen's kitchen
The terrace kitchen
Food lovers tv
Your food lab
Hebbar kitchen
Nivedita saraf recipies
मला जनरली होम डेकोर,
मला जनरली होम डेकोर, गार्डनिंग रिलेटेड चॅनल्स बघायला आवडतात. उर्मिला निंबाळकरचे दोन तीन व्हिडिओज पाहिले आहेत पण जनरली कपडे, स्टायलिंग वगैरे १० सेकंदापेक्षा जास्त बघायचा पेशन्स नसतो.
OUR STUPID REACTIONS ,
OUR STUPID REACTIONS , Justin Burke,, Harmonium Guru, Set India, Star Plus, AsapDcience, Sciencium
Kaashi Arts,
Kaushiki Chakraborty , Pt. Ajay Chakraborty, Bidisha Ghosh, Gopal Sangeet, Sanjeevani Bhelande, VoxGuru, Pt. Sanjiv Patki
याशिवाय शेकडो आहेत. पाकृची जास्त असतील.
CAPITAL TV - फुलटू धमालhttps:
CAPITAL TV - फुलटू धमाल
https://www.youtube.com/c/CAPITALTVINDIA/videos
नवे चॅनेल: Dorkly
नवे चॅनेल: Dorkly
क्लासिक गेम्सचे मजेशीर व्हिडीओज
Angry Sun hates Mario - https://youtu.be/4-j7B_5IP7w
What really happens when Mario destroys castles-
https://youtu.be/g39fv_lYt2k
सध्या पर्यटनाचे -
सध्या पर्यटनाचे -
[ visa2explore ] - हरिश बाली, हिंदीमध्ये. खाणे आणि पर्यटन स्थळे भारतात.
[ Delhi Food Walks ]- by Anubhav Sapra इंग्रजीत. देशातले विविध राज्यांतली खादाडी.
[ Extreme Roads ] - by Vaishali Seta , हिंदीत. देश आणि परदेशातले प्रवास अनुभव रेल्वे, विमान, बोट वगैरे.
--------------------
हॉटेलिंग, खादाडी(only veg) , राहाणे,.प्रवास पर्यटन ( अधार्मिक) इत्यादी परदेशी लोकांचे भारतातले अनुभव
[ TRAVEL VLOG IV ] by Ivana Perkovik ,in English.
-------------------
Gardeningचे सध्या नाही subscribe केले. पण
[ Garden Up ] by Ekata , इंग्रजीत. होम इनडॉर्स गार्डनिंग टिप्स. चांगला चानेल.
कॉमी, SRD Thanks for sharing.
कॉमी, SRD Thanks for sharing..
सुलेखा तळवलकरचा चॅनेल अलिकडेच
सुलेखा तळवलकरचा चॅनेल अलिकडेच सबस्क्राइब केला.
संपदा जोगळेकर, यतीन कार्येकर, लीना मोगरे, शुभांगी गोखले इत्यादींच्या मुलाखती आवडल्या.
सुलेखा तळवलकरच्या सिरीजमधे
सुलेखा तळवलकरच्या सिरीजमधे निशिगंधा वाड आणि अशोक शिन्देची मुलाखत फार आवडली.
निशिगंधा वाडची विद्वत्ता तिच्या प्रत्येक शब्दात दिसते, अर्थपूर्ण आणि सुंदर भाषा !
अशोक शिन्देनी अॅक्टर होण्या आधी त्याच्या वडिलांबरोबर मेकप अर्टिस्ट म्हणून काम केल्याची जी जर्नी सांगितली ती फार इंङरेस्टिंग वाटली, त्याचे वडिल म्हणजे विक्रम गायकवाड यांचे गुरु !
मुलींचा मेकप करत लहानाचे मोठे झाल्यामुळे स्त्रियांना रिस्पेक्ट देणे, त्यांच्याबरोबर काम करताना कंफर्ट लेव्हल मेन्टेन करण्याइतकेच महत्त्व प्रोफेशनॅझिमला देणे वगैरे त्याला मिळालेली वडिलांची शिकवण या आठवणी सांगितल्या आहेत , नक्की पहा तो एपिसोड !
सुलेखा तळवलकरच्या चॅनलवर
सुलेखा तळवलकरच्या चॅनलवर निशिगंधा वाडची आणि शुभांगी गोखलेची मुलाखत सगळ्यात जास्त आवडली. इन जनरल सुलेखा तळवलकरपेक्षाही मला ‘रंगपंढरी’ जास्त आवडलं. नीना कुलकर्णीची मुलाखत एक्दम भारी आहे. मधुवंती गोखले प्रभुलकर मुलाखतकर्ती म्हणूनही खूप आवडली.
मलाही सुलेखाचा शो आवडला.
मलाही सुलेखाचा शो आवडला. निशिगंधा वाडचा एपिसोड मला बोअर/हेवी वाटला थोडा! पण अशोक शिंदे आणि केदार शिंदे या दोन्ही शिंदे मंडळींचे एपिसोड खूप आवडले. अशोक सर तर ग्रेटच आहेत. टोटल रिस्पेक्ट फॉर हिम! शुभांगी गोखलेचाही एपिसोड छान आहे, ती किती मोकळेपणाने बोलली आहे. निवेदिता सराफ आणि अमर ओक यांचेही एपिसोड आवडले.
Ok tested channel follow करतं
Ok tested channel follow करतं का कोणी इथे ? मला फार मजा येते पाहायला त्यांचे व्हिडीओज.
[ https://youtu.be
[ https://youtu.be/w780Krx9GFs ]
हा विडिओ [ Harmonium Guru ] - @रानभुली आवडला.
श्रीलंकन ट्रॅडीशनल मी च्या या
श्रीलंकन ट्रॅडीशनल मी च्या या व्हिडिओत काय भारी निळे पेय बनवलेय तिच्या भावाने! निळी गोकर्ण फुले + नारळपाणी + काकडी रस + लिंबू + सब्जा + खोबर्याचे पातळ तुकडे! केवळ अहाहा!
https://www.youtube.com/watch?v=lJk4JaLNyd4
माझा अत्यंत आवडता युट्यूबर,
माझा अत्यंत आवडता युट्यूबर, फिलॉसॉफी ट्युबचा ऑलिव्हर थॉर्न, त्याने आपण ट्रान्सजेंडर असून, स्वतःला ऍबीगेल थॉर्न असे घोषित केले आहे. तत्वज्ञान आणि सामाजिक प्रश्नांवर तो उत्तमोत्तम प्रदीर्घ व्हिडीओ बनवत असे. त्याचे व्हिडीओ प्रॉडक्शन बाबतीत इतके सरस असतात की सिनेमा पाहिल्यासारखे पहिले जावेत.
हे काहीसे धक्कादायक होते. त्याचे बरेच व्हिडीओ अगदी मनापासून पहिले होते, त्यामुळे हा बदल जवळच्या व्यक्तीत झाल्या सारखं वाटलं. त्याने कमिंग आउट व्हिडीओ अत्यंत सुरेख बनवला आहे. नेहमीप्रमाणेच पार्श्वसंगीत, व्हिडिओची स्क्रिप्ट अत्यंत उत्तम आहे. भारतात राहिल्यामुळे ट्रान्सजेंडर व्यक्ती आपल्यासाठी निदान बाहेरचे तरी असतात, किंवा मुळात हा सगळा काल्पनिक प्रकार असल्यासारखीच आपली समजूत असते. त्यामुळे ऍबीचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून नवीन विश्व पाहिल्यासारखे झाले.
व्हिडीओ च्या सुरुवातीस ऑली समोर येतच नाही. एक तिऱ्हाइत व्यक्ती येतो आणि तो आपणच ऑली असल्यासारखे बोलतो. ह्यातून सूचित करायचे होते, कि हा तिऱ्हाइत असो किंवा खुद्द ऑली असो, कॅमेऱ्यासमोर दोघेही ऍबीनी वठवलेली सोंगेच होती ! ऑली म्हणजे The man who disappeared. त्याची आठवण येणार.
Identity: a trans coming out story
https://youtu.be/AITRzvm0Xtg
ऑलीचे जुने उत्तम व्हिडीओ-
Work, or the 5 jobs I had before YouTube
https://youtu.be/c_X-812q_Jc
Abortion and Ben Shapiro
https://youtu.be/c2PAajlHbnU
Witchcraft, gender and Marxism
https://youtu.be/tmk47kh7fiE
Mad Marx - मार्क्स वर चार भागांची मालिका
https://youtube.com/playlist?list=PLvoAL-KSZ32f2WAqejJdLM2ByZWKpREt8
What was liberalism ? पाच भागांची मालिका.
https://youtube.com/playlist?list=PLvoAL-KSZ32e9ziASGC8ZWwrvV4fEXoRj
आस्तिक ,भाविक असाल तर-
आस्तिक ,भाविक असाल तर-
Vrata Parva Tyohar आणि Bhakti Gyan असे channels सापडले. त्यात हिंदू धर्मातील विविध धार्मिक कथा, व्रतांच्या कथा असे 5-10 मिनिटांचे व्हिडियो आहेत. हिंदीत आहे आणि थोडा लहान मुलांना गोष्ट सांगितल्याचा टोन आहे पण मला आवडलं गोष्टी ऐकायला.
लहान मुलांना सांगायलाही काही गोष्टी सापडतील.
उदा: शनीमहाराजांची साडेसाती असलेले लोक शनिवारी हनुमानाच्या मंदिरात जातात.पण त्यामागे स्टोरी काय आहे?
https://youtu.be/5waKw0aZ8GI
किंवा वसंत पंचमीला सरस्वती पूजेचं काय महत्व आहे?
धमाल स्टँड अप कॉमेडीज -
धमाल स्टँड अप कॉमेडीज -
https://www.youtube.com/user/amitandon17 - अमित टंडन यांचा हा चॅनल
_________
ऐश्वर्या मोहनराज -
https://www.youtube.com/watch?v=TCd61oVMCXs&list=LL&index=10
https://www.youtube.com/watch?v=kdFZJV6Y-IY&list=LL&index=12
https://www.youtube.com/watch?v=1EpOFzNo0MY&list=LL&index=11
https://www.youtube.com/watch?v=G8YVbCxZqjs&list=LL&index=7
_____
रम्या रामप्रिया -
https://www.youtube.com/watch?v=QZ1rVaab7gU&list=LL&index=9
https://www.youtube.com/watch?v=7kvbD2swZV0&list=LL&index=8
_________
उरुज अश्फाक-
https://www.youtube.com/watch?v=EzJhTb564iA&list=LL&index=6
_________
जिया सेठी-
https://www.youtube.com/watch?v=3ryUlaVqYLY&list=LL&index=5
https://www.youtube.com/watch?v=TPezIQHsVt8&list=LL&index=4
https://www.youtube.com/watch?v=-w8jeRhf7cg&list=LL&index=3
https://www.youtube.com/watch?v=lmYRoVsZuuo&list=LL&index=2
https://www.youtube.com/watch?v=nqpvoRwPC1Q&list=LL&index=1
अमित टंडनचे विडिओ पूर्ण नसतात
अमित टंडनचे विडिओ पूर्ण नसतात म्हणजे मूळ कार्यक्रमातला थोडा भाग असतो.
इंटरमिटंट फास्टींग्/ किटो
इंटरमिटंट फास्टींग्/ किटो डाएट
डॉ एरीक बर्गः https://www.youtube.com/c/DrEricBergDC/videos
पेटी शिकणाऱ्यांना Gopal
पेटी शिकणाऱ्यांना Gopal Sangeet आवडेल.
अर्थात आपल्याला ही कला का येणार नाही तेही कळलं.
आताच अभि अॅन्ड नियू नावाच्या
आताच अभि अॅन्ड नियू नावाच्या चॅनेलचा शोध लागला. चांगला वाटतोय.
https://www.youtube.com/channel/UCsDTy8jvHcwMvSZf_JGi-FA
Indian LCHF & Ketogenic Diet
Indian LCHF & Ketogenic Diet community by Indians & For Indians.
A way to manage diabetes, obesity, PCOS & NAFLD through LCHF / Ketogenic Diet the Indian way
https://www.youtube.com/c/dLifeHealthcareFoundation/featured
नमस्कार मायबोलीकर्स.
नमस्कार मायबोलीकर्स.
मी, माझ्या भाच्या, वहिनी आणि माझ्या मुली मिळून आम्ही रेसिपीजचे चविष्ट नावाने यूट्युब चॅनेल उघडला आहे. यात मासे, रानभाज्या, चमचमित स्नॅक्स व अजून बरेच वैविध्यपूर्ण रेसिपीज आम्ही टाकणार आहोत. सध्या माझी भाची बनवतेय माझ्या व माझ्या वहिनीच्या मार्गदर्शनाखाली. नक्की सगळ्यांनी सब्सक्राईब करा. आणि लाईक, कमेंटही.
त्यातील काही रेसिपीज
व्हेज स्प्रिंग रोल - https://youtu.be/B8pFLgXcNl4
तळलेले बोंबिल https://youtu.be/MNaQIABvkSY
शेवळं रानभाजी https://youtu.be/mdmiKhKSkQA
मटार पॅटीस https://youtu.be/OLv5iyQwX68
@जागू - बोंबिल तर सुपर्बच.
@जागू - बोंबिल तर सुपर्बच. मटार पॅ टिसही सोप्पे आहेत करीन आज उद्यात. स्प्रिंग रोल्स माहीत नव्हते आता करेन.
इथे कोणी country life blog
इथे कोणी country life blog बघत का? अझरबईजान मधील बाई आहे , डोळे निवतात तो निसर्ग बघून अशक्य भारी आहेत व्हिडीओ.
सामो धन्यवाद.
सामो धन्यवाद.
मी बघते लंपन . भयंकर सुंदर
मी बघते लंपन . भयंकर सुंदर असतात ते व्हिडीओ. त्या बाई निगुतीने करतात सार
श्री लंकेतील १) village
श्रीलंकेतील पाककृती चानेल १) village kitchen ,
2) Traditional Me
हे दोन थोडेसे तसेच आहेत. पण असे पदार्थ खाल्ले जात असतील का आणि त्या भागांत वीजही नाही! म्हणजे श्रीलंकेत कुठे असेल?
बाकी निसर्ग म्हणून मजा.
जागू, अभिनंदन! मध्यंतरी
जागू, अभिनंदन! मध्यंतरी मायबोलीकरांनी आपापल्या यु ट्युब चॅनेल्सची माहिती देणारे स्वतंत्र धागे काढले होते. तुम्हीही काढा.
भरत एक दोन दिवसांत काढते.
भरत एक दोन दिवसांत काढते. धन्यवाद.
एक चायनीज मुलगी Dianxi Xiaoge
एक चायनीज मुलगी Dianxi Xiaoge तिचेही गावातील विडियो छान असतात.
Fit tuber
Fit tuber
ह्या channel वरचे video पाहून मला सगळं जग खोटं वाटायला लागलं आहे
<<ह्या channel वरचे video
<<ह्या channel वरचे video पाहून मला सगळं जग खोटं वाटायला लागलं आहे
हाहा.
दूरदर्शन सह्याद्रीवर दुसरी
दूरदर्शन सह्याद्रीवर दुसरी बाजू नावाच मुलाखतीचा कार्यक्रम आहे. त्यात भरत दाभोळकरांची मुलाखत ऐकली. विक्रम गोखले मुलाखत घेतात. मुलाखतकार म्हणून प्रभावी वाटले नाहीत. ब्रेक आला की भरत दाभोळकरांनाच सांगत होते की तू कुठला मुद्दा बोलतोयस ते लक्षात ठेव.

भरत दाभॉलकरांची पूर्वी बहुतेक खुपते तिथे गुप्ते मधली मुलाखत ऐकली होती ती आवडली होती. (शोधून पाहिली पण नाही मिळाली यूट्यूबवर.)
सुलेखा तळवलकरने घ्यायला हवी त्यांची मुलाखत. बाकी मुलाखतकार म्हणून सुधीर गाडगीळच सर्वात जास्त आवडतात.
वाह.. मी सुद्धा काल च भरत
वाह.. मी सुद्धा काल च भरत दाभोळकरांची मुलाखत पहिली ... आवडली
ब्रेक आला की भरत दाभोळकरांनाच
ब्रेक आला की भरत दाभोळकरांनाच सांगत होते की तू कुठला मुद्दा बोलतोयस ते लक्षात ठेव. >>
पाहिला हा व्हिडिओ आत्ता. फार वाईट मुलाखतकार आहेत विक्रम गोखले.
बाकी मुलाखतकार म्हणून सुधीर
बाकी मुलाखतकार म्हणून सुधीर गाडगीळच सर्वात जास्त आवडतात. >>>> +12345
Arnika paranjape- बांधणीच्या
Arnika paranjape- बांधणीच्या कविता
आपल्या मायबोलीकर आहेत म्हणून पहिला भाग पहिला
कंटेंट पाहून प्रेमात पडलोय त्या चॅनेल च्या.
अक्षर गण वृत्ते, मात्रा लघु गुरू आणि विविध वृत्त, त्यावर बेतलेली गाणी, याचे स्टोप्स घेत इतका मस्त चाललाय प्रवास,
शाळेत इतक्या रसाळपणे शिकवले असते तर.....
हो.खूप मस्त चॅनल आहे तो.
हो.खूप मस्त चॅनल आहे तो.
वृत्त नव्याने शिकायला लागलेय.
मराठी अभिनेत्री युट्यूब वर
मराठी अभिनेत्री युट्यूब वर आहेत पण सध्या पाककृतींचे चॅनेल करण्याची सगळ्यांची धडपड दिसतेय. निवेदिता नंतर आता मेघा दाढेने पण सुरु केले आहे. मग सई लोकूर कशी मागे राहील? बिग बॉस नंतर तसेही कामे कोणाकडेच नाहीत. हिंदीमध्ये शिल्पा शेट्टी आधीपासूनच होती. माधुरी दीक्षितही अधून मधून पाककृती टाकत असते, उकडीचे मोदकबिदक बनवते.भरीस भर म्हणून डॉक्टर नेने ही रेसिपीज टाकतात. . ह्यांना भराभर फॉलोअर्स पण मिळतात.
मी कोणाचेच अजून विडिओ पहिले नाहीयेत. पण ह्या लोकांच्या suggestions टाइम लाईन वर येत राहतात. फक्त मेघाचा एक विडिओ पहिला. नेहमीसारखीच कॉन्फिडन्टली बोलते. पण रेसिपी खूपच सामान्य वाटली. ज्यासाठी युट्यूब बघायची गरज नाही. ह्या सगळ्यांकडे नवीन काहीच नाही. त्याच त्या रेसिपीज... मग इतके एक्स्पर्ट शेफ वगैरे असताना ह्यांचे विडिओ का पाहावे बरे ?
ह्या सगळ्याजणी एरवी किचनमध्ये जात असतील का हाही प्रश्न पडला.
मला दीपिका कक्कर चे आवडतात ,
मला दीपिका कक्कर चे आवडतात , रेसिपीवाले.
तिने सांगितलेला बिर्याणी मसाला करून ठेवला होता.
2-3 वेळा बिर्याणी केली , मस्त झालेली. आणि पटापट
https://youtu.be/NIoNZhqB_2U
https://youtu.be/NIoNZhqB_2U
सध्या मी वरील youtube चॅनलवर मुंशी प्रेमचंद, शरतचंद्र चटोपाध्याय (मूळ कथा बंगाली असाव्यात) यांच्या हिंदी कथा ऐकते आहे. वाचन फार छान केलं आहे. वेगळ्या लहेजाची हिंदी भाषा ऐकायला छान वाटतं. जवळजवळ 100 वर्षांपूर्वीच्या कथा ऐकायला मजा येते. तो काळ आपोआपच डोळ्यासमोर उभा राहतो. काही कथा फिलमी वाटतात पण तरी ऐकायला छान वाटतं.
ऐकता ऐकता कधी कधी झोपही लागून जाते
याशिवाय गेले वर्षभर मी निलेश मिसरा यांचे चॅनल पण subscribe केलं आहे. तिथल्या कथा पण अलीकडच्या काळातील हिंदी भाषेत आहेत. पण bollywood हिंदी नव्हे. त्याही फार मस्त वाटतात ऐकायला. निलेश मिसरा हे उत्तम कथाकथन करतात. अगदी कमी प्रमाणात संगीत वापरून कथाकथन केलं आहे.
दुसरी बाजू आणि अर्निकाबद्दल
दुसरी बाजू आणि अर्निकाबद्दल +1
दुसरी बाजू मध्ये मंगला खाडिलकर यांची मुलाखत पण फार छान झाली आहे. म्हणजे त्या वि गो पेक्षा खूपच सरस आहेत. अगदी ऐकत रहावस वाटत त्या बोलतात तेव्हा. त्यांच्या संपूर्ण मुलाखतीमध्ये अगदी नगण्य वेळा इंग्रजी शब्द वापरले आहेत त्यांनी. बाकी उच्चार, आवाजाची फेक उत्तमच आहे! मी अनेक वर्षांनी मंगला खाडीलकर यांना ऐकलं. त्यामुळे असेल कदाचित पण मला त्यांचं बोलणं फार प्रभावी वाटलं!
अर्निकाने कॅमेरा थोडा व्यवस्थित सेट करायला हवा अस कधी कधी वाटतं. तिच्या बाबांबरोबर जे विडिओ आहेत त्यात हे प्रकर्षांने जाणवलं. पण अर्थात मूळ विषय एव्हढा सुंदर रीतीने ती उलगडून सांगते की त्यापुढे कॅमेरा वगैरे फार फरक पडत नाही.
जेम्स बॉड मुव्हीज नावाचे एक
जेम्स बॉड मुव्हीज नावाचे एक चॅनेल सापडले त्यात सर्व मुव्हीज दहा दहा मिनिटांच्या भागात आहेत. मी कसीनो रॉयल स्पेक्टर व द वर्ल्ड इज नॉट इनफ बघितले अजूनही आहेत. ह्या त सोय म्हण जे आव ड लेले शॉट्स अॅक्क्षन सीन्स विनोदी संवाद हिरोइन ची एंट्री वगैरे रिवाइन्ड करून परत परत बघता येतात. उदा स्पेक्टर चा ओपनिन्ग शॉट फार छान आहे. व तो साउन्ड ट्रॅक लगेच स्पॉ टिफाय वर सापडला.
इथले लिंक बघून भाउ तोरसे कर बघायला सुरू केले. मजेशीर आहेत.
महा एम टीबी महा बोअर व भिकार चॅनेल आहे व त्यावर अनील थत्ते विनोदी भांड टाइप गौप्य स्फोट करत असतात. आता त्यांचे चॅनेल पण येणार आहे. गलिच्छ पत्रकारितेचे उदाहरण आजिबात बघू नका. टोटल वेस्ट ऑफ टाइम.
Pages