लांबड कथा..

Submitted by मन्या ऽ on 8 April, 2020 - 13:17

लांबड कथा..

कोणतीही कथा वाचताना "यार! शेवट वेगळा हवा होता" किंवा "फारच ताणलीये राव कथा." असं वाटल असेल तर हा धागा तुमच्यासाठीच आहे.

तर लोक हो, महत्वाचं म्हणजे
या कथेला शेवट नसेल.

तेव्हा तुम्हाला हवे तसे ट्विस्ट कथेत टाका!
मग तो नवरसांचा विचार न करता टाकलात. तरीही चालेल.

नियम फक्त एकच ट्विस्ट टाकताना कथेची कंटीन्युटी ठेवा..
चला तर मग करुया लांबड कथेला सुरवात आपल्या पारंपारिक कथांच्या वर्ल्डफेमस ओळीने..

एक होत आटपाट नगर..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी चाललीय Lol

इकडे चित्रा आणि विचित्रा एकमेकींच्या रुपांची अदलाबदल झालेली पाहून चकीत होतात, दोघी मोठ्याने ओरडतात आणि धाय मोकलून रडायला लागतात. राजवाड्यात पूर येतो, भूकंप करत असलेली धरणीही क्षणभर चकीत होऊन पाहू लागते अन् भूकंप थांबतो. याचं सगळं श्रेय राजाला मिळतं कारण त्यानेच दहा मांत्रिक बोलवून भूकंपविरोधी जप सुरु केलेला असतो. नागरिक आनंदाने नाचत रस्त्यावर येऊन नाचायला लागतात, राजाच्या नावाने जल्लोष करु लागतात, खूश होऊन राजाला भेटायला राजमार्गाने राजवाड्याकडे जायला निघतात पण काय! राजवाड्याकडूनच जोरजोराने पुराचे लोंढे वाहत येताना दिसतात आणि....

भूकंप विरोधी जप करायला जे पुरोहित बोलावलेले असतात त्यापैकी दोन जण बोबडे / तोतरे असतात आणि नेमके ते दोघेही पूर्व दिशेला बसल्याने सामूहिक आवर्तनात त्यांचे विशिष्ट बोबडे उच्चार मिसळून इंद्र देव सन्तुष्टिकरण याग घड़तो आणि मग पर्जन्य देव त्याना अनेक आशीर्वाद देत त्यांच्या स्थानावर अविरत पाऊस पडेल आणि कधीच पाण्याचे दुर्भिक्ष्य नसेल ऐसा वरदान देतो.....

हेच स्थान पुढे तूंबाड नावाने कलीयुगात प्रसिद्ध झाले.

राजवाड्याकडूनच जोरजोराने पुराचे लोंढे वाहु लागतात आणि त्याचबरोबर एक संदूकही त्या पुराच्या पाण्यात तरंगताना दिसू लागते... राजास त्यांच्या पूर्वजांचे बोल आठवतात - जब जब धरती फटेगी ...आसमान फटेगा तब कयामत आ जायेगी... आणि भू गर्भातून निघालेल्या आणि आता पूर्णपणे मोकळे झालेल्या त्या संदूकिकडे अतिशय घाबरलेल्या नजरेने पाहत असतानाच तिकडे सर्व प्रकारच्या अमानवीय शक्तिपासून वसुंधरा वासियांचे नेहमीच रक्षण करणाऱ्या महर्षि बोकलत ह्यांचे आगमन होते...

राजवाड्याकडूनच जोरजोराने पुराचे लोंढे वाहु लागतात आणि त्याचबरोबर एक संदूकही त्या पुराच्या पाण्यात तरंगताना दिसू लागते... राजास त्यांच्या पूर्वजांचे बोल आठवतात - जब जब धरती फटेगी ...आसमान फटेगा तब कयामत आ जायेगी... आणि भू गर्भातून निघालेल्या आणि आता पूर्णपणे मोकळे झालेल्या त्या संदूकिकडे अतिशय घाबरलेल्या नजरेने पाहत असतानाच तिकडे सर्व प्रकारच्या अमानवीय शक्तिपासून वसुंधरा वासियांचे नेहमीच रक्षण करणाऱ्या महर्षि बोकलत ह्यांचे आगमन होते...>>>>

महर्षी बोकलत त्यांचे दिव्य मंत्र उजळून वसुधेच्या संरक्षणार्थं सिद्ध होतात. बोकलत पहीली चाल चालणार एवढ्यात त्यांच्या दृष्टीस 'ती' पडते !
ती !
तिच ती !!

तीच ती, जिने १० वी चे राजाचे पेपर तपासले असतात.

बोकलत तरातरा तिच्याकडे जातो आणि जाब विचारतो. ती जे सांगते, त्यातून एक अगम्य सत्य बाहेर येते...

"आमाला target दिलं व्हतं.... जास मुलास्नी नापास केलं की Rechecking मध्ये बक्कळ कमाई व्हती... म्या डोकं चालवून सा पोरांना नापास करण्यापासून वाचीवल अन राजाला सात इषयात नापास केलं... पण हाय रे किस्मत... त्या भिकारड्या राजानं reval ला टाकलेचं न्हाई... अन् मला नोकरी सोडाय लागली"

बोकलत ला नवीनच घबाड हाती लागलं... पण त्याला हे समजेना की ती गावठी का बोलत आहे.

राजेपदासाठी minimum qualification १० वी पास असणे आवश्यक असते. राजाने ती च्या कडे दयेची भीक मागितली असते पास करण्यासाठी पण त्यासाठी ती ने rechecking ला टाकायला सांगितले असते. एक तर राजाकडे वेळ कमी असतो राजेपदासाठी फॉर्म भरण्यासाठी. फॉर्म भरताना 10 वी गुणपत्रिका जोडावी लागणार असते आणी rechecking च्या रिझल्ट ला वेळ असतो. ती च्या वर दबाव टाकुन खोटी गुणपत्रिका बनवतो आणि बिंग फुटू नये म्हणून ती ला पेटीत कोंबून पेटी पुरवून टाकतो.
ज्या काळात ही घटना घडली असते तेंव्हा बोलीभाषा गावठी असते. हळूहळू लोकांची हॉलीवूड चे सिनेमे पाहून भाषा बदलते पण ती ची भाषा तशीच रहाते.
बोकलत च्या हातात आता फार मोठे घबाड लागले आहे. अब क्या करेगा बोकलत? वाचते रहिये लांबड कहानी का अगला भाग.....

बोकलत च्या हातात आता फार मोठे घबाड लागले आहे. अब क्या करेगा बोकलत? वाचते रहिये लांबड कहानी का अगला भाग.....>>>>

आपल्यावरची आपबिती तिनं महर्षी बोकलत यांना सांगितल्यानंतर ती जोरजोरात रडायला लागली. त्या दिवशी केवळ गतजन्मातल्या काही पुण्यकर्मांमुळे ती पेटीतून बाहेर पडून बोकलतांसमोर आली होती. तिच्याकडून सगळी हकीकत ऐकल्यानंतर बोकलतांच्या मुखमंडलावर खुदकन हसू उमटलं कारण आता त्यांचे पाचही बोटं मधात असणार होते. राजाला अपात्र ठरवून राजेपद मिळवता येणार होतं, पेटीत असताना मृत्यूपश्चात तिनं मिळवलेली विद्या आयतीच हाती पडणार होती, तिला प्रपोज करता येणार होतं आणि..आणि....
बोकलतांचे विचार मनात आणि उरलेली दोन बोटं हवेतच राहीले..एक अनाहूत संकट समोर उभं ठाकलं होतं.तेथे हडळीचा आशिक अवतरला होता !

आता नक्की काय होणार ? बोकलत तिला प्रपोज करणार का ? ती दोघांपैकी कुणाकडे जाणार की एकाला विद्या आणि दुसऱ्याला लाईन देणार ? बोकलतांना राजेपद मिळणार का ?

प्रश्नांची उत्तर मिळण्यासाठी वाचत रहा लांबड कथा....

बोकलतांच्या मनातले मनसुबे हडळीच्या आशिकाने लांबून बघतानाच ओळखले होते ... बोकलत जिला आपली बनवू पहात होते ती त्याची एक्स गल्फ्रेंड होती.. त्याला साम्रज्य जिंकायचे होतेच आणि तिलाही राणी बनवायचे होते .. राजाचा राजेपदा प्रतिस्पर्धी असल्यामुळे त्याने दहावीच्या पेपर्सवर काॅन्सन्ट्रेट केल होत ... तरीही एका विषयात तो नापास झालेला असतो.. पण स्वताच्या लिखाणावर काॅन्फिडन्स असल्यामुळे त्याने पेपर रिचेकींगला टाकलेला असतो..रिझल्ट आल्यावर तो त्या विषयात टाॅपर असतो... पण तोपर्यंत राजाने धोक्याने सत्ताही जिंकलेली असते... आणि नंतर तिला प्रपोज करेपर्यंत राजाने तिला गायब केलेली असते.. तिच्या शोधात तो जंग जंग पछाडतो..पण ती काही सापडत नाही.. त्यामुळे तेलही गेले तुपही गेले हाती राहीले धुपाटणे अशी अवस्था होते Sad ... आता तिला बघून त्याला फारच आनंद होतो...पण नुकततेच बोकलतांचे विचार त्यांचा चेहर्यावर वाचून तो खवळतो.. दुसर्यंदा तिला गमवायच नाही म्हणून तो झटकन मंत्र म्हणून बोकलतांना बरणीत बंद करतो ... महर्षी बोकलतांना आपल्यासोबत काय झाले याचा विचार करतात.. मग त्यांच्या लक्षात आल्यावर ते बरणीमुक्त मंत्राचा जप करतात.. पण त्याचा काहीच उपयोग होत नाही.. इथे हडळीचा आशिक त्यांचे प्रयत्न बघून हसत असतो... पण निमीषार्धात बोकलत बरणीबाहेर असतात ... त्यांच्या बरणीबाहेर येण्याच रहस्य विचारता ते सांगतात " क्युकी मेरे टूथपेस्ट में नमक है " बोकलत बरणीच बूच कुरतडून बाहेर आलेले असतात Proud

आता बोकलत आणि हडळीचा आशिकमधे कोण जिंकणार ... आणि 'कोण होईल ती चा पती ' स्पर्धा कोण जिंकणार ... उत्तर मिळण्यासाठी स्टे ट्युन्ड विथ लांबड कथा ...

बोकलत बरणीच बूच कुरतडून बाहेर येतात आणि घराच्या दिशेने चालु लागतात कारण दुरदर्शनवर शक्तीमान सिरियलची वेळ झालेली असते.

घराच्या दिशेने चालु लागतात कारण दुरदर्शनवर शक्तीमान सिरिअलची वेळ झालेली असते.>>> तेवढ्यात सगळीकडे अंधार होतो. आणि लोक एकेक करत दिवे घेऊन घराच्या गॅलरीत, खिडकीत, टेरेसवर दिसु लागतात.. अशा छान वातावरणात "ती" दिसते. तीच ती.

ती चे तिथे आगमन होताच महर्षी बोकलत आणि हडळीच्या आशिक तिथे अवतरतात... शेकडो लोकांच्या उपस्थितीत ती या दोघांना दिल्या जाणार्या चॅलेन्जची घोषणा करते ... " जो कोणी पहिल्यांदा टेम्पल रन मधे शंभर हिरे कमवत हायस्कोअर करेल तोच या स्पर्धेत विजयी ठरेल " ... टाळ्यांच्या गजरात लोक याचे स्वागत करतात ... हडळीच्या आशिकाच्या चेहेर्यावर हास्य पसरते कारण तो या खेळाचा बादशहा असतो... पण महर्षी बोकलतही स्पर्धेत उतरतात... स्पर्धा सुरू होते .. दोघही जण आपापले कौशल्य पणाला लाऊन जिंकायचा प्रयत्न करतात... अखेरीस तो क्षण येतो... बोकलत जिंकणणारच असतात की तितक्यात त्यांचा मोबाईलच चार्जिंग संपत .... Proud

आता स्पर्धेत कोणता नवा ट्वीस्ट येणार...
जाणून घेण्यासाठी पाहत रहा लांबड कथा

आईग्ग Rofl

चेहर्यावर वीज चमकावी तशी चमक चमकते...

आता पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी स्टेय ट्यूनड अॅट लांबड कथा...

नवीन Submitted by अजय चव्हाण on 15 April, 2020 - 09:02

तो प्रकाश असतो, लख्ख स्वच्छ झालेल्या स्टीलच्या ताटाचा.

"ती" म्हणते "पेटीत लॉकडाऊन मधे राहून माझे केस खुप वाढले होते, पार्लरमध्ये जायला वेळच मिळाला नाही. मला फेशीयल, ....(इथे सर्व भगिनींनी तुमच्या मनातली यादी वाचावी) करायचे होते पण
वेळच नव्हता, मग फिर मैने एक ताट घाश्या, अभी मेरे पास टाईम ही टाईम है. तुम बसो भांडत" असे म्हणून ती जाते.

आगे जानने के लिए पढते रहिये......

इकडे कथा लिहिणार्‍या लोकांचा मॅनेजर ओरडत येतो. अरे, तुमच्या फन्क्शनॅलिटी नीट चालत नाहियेत आणि तुम्हाला कथा सुचतायत?
अप्रेझलमधे बघून घेईन अशी गर्भित धमकी देऊन तो जातो..
कथा लेखक घाबरतो. 'मरु दे चित्रा विचित्रा राजा वगैरे.. नाहीतर वाजायचा आपलाच बाजा वगैरे' असा विचार करून तो कोड डिबग करायला घेतो... पण....

अप्रेझलमधे बघून घेईन अशी गर्भित धमकी देऊन तो जातो..

पण लोकं त्याला फाट्यावर मारतात कारण अर्धा मार्च नी पुरा एप्रिल लॉकडाउन मधे गेलेला असल्याने अप्रेझल करणार कधी नी कसले वर कोणाला नोकरीवरुन काढायचे नाही नी पगार कापायचा नाही हा आदेश असतो.

Lol
पण लोकं त्याला फाट्यावर मारतात>>>

म्यानेजरला फाट्यावर मारून लोकं माबो लॉगिन करतात. अमानवीय धागा वरच असतो त्याच्यावर पुन्हा बोकलत बागडताना दिसतात.

पुढे

बोकलताना बागडताना बघून लोक हर्षाने टाळ्या वाजवतात. ये बघून हाआ अधिक चिडतो.
"चल एक डाव अजून खेळू, पण खरोखर टेंपल रन!" हा आ आव्हान देतो. बोकलत ते स्वीकारतात. ते बघून हडळ बोकलतना किलर स्माईल देते. ते बघून बोकलत अजून चेकाळतात. हाडळीचा आशिक त्यावर खूप चिडतात. पण हडळ म्हणते,
"इट्स माय चॉईस!!!!"
पुन्हा टेंपल रन होणार,
"राक्षसमंदिरात!!!!"
स्टे ट्युन्ड!!

राक्षसमंदिरात आल्यानंतर तेथे अस्तित्वात असलेल्या मायाजालामुळे टेंपलरनचा तिघांनाही विसर पडतो. तिघेही संमोहीत झाल्याने मनातील सुप्त विचार बाहेर पडू लागतात. बॅकग्राऊंडला नदिम-श्रवणचं म्युझिक वाजायला लागतं आणि आशिक हडळीच्या आसपास फिरत गाणं गायला लागतो,

जो भी कसमें खाई थी हमनें
वादा किया था जो मिल के
तूने ही जीवन में
लाया था मेरे सवेरा
क्या तुम्हे याद है
क्या तुम्हे याद है
क्या तुम्हे याद है

दिन वो बड़े हसीन थे
रातें भी खुशनसीब थी
तूने ही जीवन में
लाया था मेरे सवेरा
क्या तुम्हे याद है
क्या तुम्हे याद है
क्या तुम्हे याद है

गाणं रंगात आलेलं असतं. हडळीच्या तोंडून 'हां मुझे याद हैं' ऐकताच बोकलतांना अपार दुःख होतं.

त्या दु:खाचा प्रभाव पडून पार्श्वभागाचं संगीत एकाएकी बदललं जातं आणि आता बोकलत गाऊ लागतात,

तू प्यार है किसी और का
तुझे चाहता कोई और है
तू प्यार है किसी और का
तुझे चाहता कोई और है
तू पसन्द है किसी और की
तू पसन्द है किसी और की
तुझे मांगता कोई और है
तू प्यार है किसी और का
तुझे चाहता कोई और है

हडळीलाही आता राहवत नाही, तिला वेगळंच गाणं स्फुरत असतं...

पुढे....

हडळ मोठ्या जोशात येऊन गाणे म्हणू लागते.

आये मेरे महफील में मसल वाले मजनू,
कोल्हापूरी श्वाजनेगर नाम क्या है जुगनू,
हिरो जैसी चाल, बदनपे है बाल,
हाय अल्ला हाय अल्ला देखो देखो
हाय अल्ला हाय अल्ला आंखे वाके सेको सेको
हुलाला हुलाला हुलाला जिंगालाला
हुलाला हुलाला हुलाला जिंगालाला
जिंगालाला जिंगालाला हाय हाय हाय हाय!!!

हडळीचे हे गाणे ऐकून मायाजाल घाबरून तुटते, पुढे-

मायाजाल तुटताच राक्षसमंदिरात बदल घडायला सुरूवात होते. भूतकाळातला देखावा साकार व्हायला सुरूवात होते. तिघे विस्मयचकीत होऊन बघू लागतात. जुनं एक एक दृश्य दिसायला लागतं. ते बघून बोकलत आणि हडळीच्या आशिकाला समजतं, आपण पूर्वजन्मातील मित्र आणि अमित्र आहोत ! दोघं एकमेकांना कडकडून मिठी मारतात. जिवाशिवाचं मिलन होतं. ते बघून हडळीलाही गदगदून येतं.
मित्र, अमित्राला अधीरराज मल्लपाची आठवण होते. ऐनवेळी घात केलेला अधीरराज !!
कुठे आहे तो ?
कुठे आहे ??

आणि ही हडळ ? कोण आहे ती ??
मल्लप्पाची पत्नी ???

दोघांना उत्तरं हवी असतात.

पुढे...

नंतर पुन्हा एकदा आशिक हडळीसमोर गुडघ्यावर बसून गाण म्हणायला लागतो

तुम दिल की धड़कन में रहते हो, रहते हो
मेरी इन साँसों से कहते हो, कहते हो
बाहों में आ जाओ, सपनों में खो जाओ
तुम दिल की धड़कन में रहते हो, रहते हो

ते ऐकुन हडळीच्या गालावर लाजेने लाली चढते .. एकदम झकास लाजते ती

हे दृष्य बघून महर्षी बोकलतांच्या डोळ्यासमोर त्यांच्या स्वप्नांचे इमले कोसळतात.. तरीही ते हार मानायला तयार नसतात.. त्याचा मनात नवीन खलबत चालू होतात..

एकंदर टेम्पल रनचा सर्वांना विसर पडतो आणि गाण्यांच्या भेंड्या सुरू होतात Proud

राक्षसमंदीरातील थरार जाणून घेण्यासाठी पाहत रहा लांबड कथा

महर्षी बोकलत हडळीच्या आशकावर संमोहनास्त्र सोडतात. त्याने हाआ आपण इथे कशासाठी आलोय हेच विसरून जातो. हे बघून हडळ प्रचंड चिडते, व बोकलतांकडे झेपावते, मात्र ते तिला अलगद कॅच करून तिच्या डोळ्यात बघतात. आणि काय आश्चर्य, बोकलत की काली आंखो मे हडळ इस कदर डूबी, की ती बोकलताना म्हणते,
"मला घेऊन चला."
हे ऐकून बोकलत्यांच्या चेहऱ्यावर लाली चढते, व ते तिला घेऊन राक्षसमंदिरातून बाहेर येतात.

Pages