गोवा नाम ही काफी है!

Submitted by श्रीमत् on 7 April, 2020 - 23:54

सळसळती लाट, सागराची गाज,
माडातली वाट, खुनावते आज,

banner-vagator.jpg

गोवा नाम ही काफी है!

तुम्हाला कोनी विचारल, "काय मग यंदा कुठे आणि तुम्ही फ्क्त "गोवा" अस्स जरी उच्चारलात तर त्या व्यक्तीच्या चेहर्यावरती जे भाव उमटतात ते फक्त आनि फक्त गोव्याला जाउन आलेल्या व्य्क्तीलाच कळु शकतात. अपवाद फ्क्त पुणेकर. Wink मी गोव्याला जाउन येन्याआधी भरपुर संकेत स्थळ पालथी घातली. पण मनासारखी माहीती हाती येत नव्हती आणि जी काही मिळाली तीही आपल्या बोलीभाषेत नव्हती. काही मित्रांना विचारल तर त्यांनी मला साऊथ गोवा, नॉर्थ गोवा असं काही बाही सांगितल. इथे मी आजही रेल्वे स्टेशन वर गेलो की पुढचा पत्ता विचारण्या आधी ईस्ट किंवा वेस्ट ला कस जायच ते आधी विचारुन घेतो. तिथे हा साऊथ आणि नॉर्थ गोवा मला कितपत सापडतोय हा जरा यक्ष प्र्श्नच होता. ते म्हणतात ना स्वता मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. या उक्तीप्रमाने आधी जाऊन आलो आणि आता मी पाहीलेला गोवा माझ्या नजरेतुन तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

तशी माझी यंदाची तिसरी वेळ गोव्याला जाण्याची. मी हे सेम वाक्य आमच्या पिताश्रींसमोर फेकल होत. तर मला म्हणाले तिकडे जाऊन दिवस रात्र दारु ढोसुन त्या उघड्या नागड्या बायका पाहाण्यापेक्षा तीनवेळा वारीला गेला असतास तर थोड का होईना पुण्य गाठी पडल असतं. कलयुग रे कलयुग इति अण्णा. मी म्हनालो अन्ना सौंदर्य पाहणार्याच्या नजरेत असाव लागत. तुम्हाला नाही झेपणार पुढची शिवी ऐकायच्या आधी मी तिथुन सटकलो हे वेगळ सांगायला नको तर असो.

तिन्ही खेपेला मला उलगडलेला गोवा हा वेगवेगळा होता. गोवा म्हटल की सळसळती तरुनाई, फसफसणारी पेय, ऊसळता समुद्र आणि मासे. बस अजुन काय हवं. मला जर विचाराल तुमचा आवडता टाईम पास कोणता? तर मी सरळ सांगेन "समुद्र्किनारी मस्त शॅक मध्ये बसुन उसळत्या लाटांकडे पाहत हातातल्या चील्ड बियरचा आस्वाद घेने". डोक्यात ना कसला विचार ना कसली फिकीर. कधी कधी मेन्दुला आराम देनं पण फायदेशीर असत. नुस्त्या कल्पनेणेच गार गार वाटत नाही का?.

तर सर्वात पहिल तुम्ही गोव्याला नक्की कशासाठी जाताय हे ठरवा. गोव्याला कोनी, कधी आणि का? जावे यासाठी मी एक चेकलिस्ट केली आहे. यातील सर्व प्रश्नांची उत्तर होकारार्थी येत असतीत तर तुम्हाला गोव्याला जाण्याची नितांत गरज आहे असे समजावे.

१. नुकताच ब्रेकअप झाला असेल
२. बायको आणि बॉसच्या टोमण्यांचा कंटाळा आला असेल
३. रोजच्या दिनचर्येचा वैताग आला असेल.
४. आपल्या राज्यातली दारु व पेट्रोल परवडत नसेल.
५. सर्वात महत्वाच विजय मल्याच घर सचिन जोशी ने नक्की घेतलय की नाही याविषीयी शहानिशा करायची असेल

आता गोव्याला कोणी जाऊ नये यांच्यासाठीही एक चेकलिस्ट आहे.

१. जे चुकिच्या समजुतींप्रमाने वारही पाळतात.
२. ज्यांची बायको "तुम्हाला माझी शपथ आहे" टाईप आहे.
३. जे माणुसकी हाच खरा धर्म आहे हे .विसरुन व्रत वैकल्य आणि पाप पुण्य यातच आपल भल मानतात.
४. जे स्वताच्या बायकोने अलका कुबल आणि दुसर्याच्या बायकोने मात्र कतरीना सारखे वागावे अशी अपेक्षा ठेऊन असतात.
५. ज्यांना मुळात गोवा हे स्वतंत्र राज्य आहे हेच अजुन माहीती नाहीये.

वरील सर्व मत लेखकाची वैयक्तिक आहेत उगाच पर्सनली घेऊ नयेत. कारण ज्या ला आला राग.......त्यालाxxx Wink

वर सांगितल्याप्रमाणे भौगोलीकरीत्या गोव्याचे दोन भाग पडतात. नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा. नॉर्थ गोवा त्यातील बिचेस, शॉपींग मार्केट्स, नाईट लाईफ, वॉटर स्पोर्टस आणि मदिरे साठी प्रसिध्द आहे तर साऊथ गोवा गोअन कल्चर, दुधसागर, फोर्ट्स, जुणे चर्चेस व मंदिरांसाठी प्रसिध्द आहे.

मंगेशी मंदिर परिसर
IMG_20180113_mangeshi.jpg

मंदिरासमोरील दीपमाळ
IMG_20180113_163507_mangeshi3.jpg

त्यामुळे तुमच्या आवडी प्रमाणे तुम्ही राहण्याचा पर्याय निवडु शकता. जर बिचेस पाहायचे असतील तर नॉर्थ गोव्यात कॅन्डोलीम किंवा कलंगुट हा राह्ण्यासाठी उत्तम पर्याय ठरु शकतो. कारण कॅन्डोलीम, कलंगुट, बागा, अंजुना व वागातोर हे बिचेस एकाच लाईन मध्ये आहेत. त्यात आपल्या आवडी आणि बजेट प्रमाने बाईक अथवा गाडी हायर करुन तुम्ही सर्व ठिकाने मस्त आरामात एक्सप्लोर करु शकता.

जर साऊथ गोवा पाहायचा असेल तर पणजी अथवा दोना पावलो राहण्यासाठी उत्तम पर्याय ठरु शकतो. त्यातही दुधसागरला जायच असल्यास सकाळी सहावाजताच निघालेल उत्तम कारण आता नवीन नियमांप्रमाणे फक्त २०० पर्यटकांनाच आत सोडल जाते. त्यामुळे वेळेत नाहीत पोहचलात तर हिरमोड होण्याचीच शक्यता जास्त. गाडीचे पैसे फुकट जाणार नाहीत कारण येताना तुम्ही मंगेशी टेंपल, स्पाईस गार्डन, सेंट फ्रांन्सिस चर्च आणि म्युझयम करु शकता. शक्यतो तिकडचे गाडीवाले पण तसच पॅकेज ऑफर करतात. तुम्हाला किती पॉईंट पाहायचेत यावर तुम्ही त्यांच्याबरोबर भाव कर शकता.मंगेशीला जायचं असेल तर मांसाहार व मद्यपान टाळावे त्यातही गुडघ्याच्या खाली वस्त्रे परिधान केलेली असतील तरच मंदिरात प्रवेश मिळतो. शेवटी आपल्या मंदिराचे पावित्र्य आपण नाही राखलं तर बाहेरच्यांकडून काय अपेक्षा बाळगणारं.

जाण्यासाठीचा उत्तम वेळः नोव्हेंबर ते जानेवारी अखेर पण सिझन असल्यामुळे भाव जरा जास्तच चढे मिळतात. कारण जी एसी ड्बल ऑक्युपेन्सी रूम तुम्हाला इतर वेळी १५०० ते २००० मध्ये मिळते तीच तुम्हाला या काळात ३५०० ते ४५०० च्या रेंज मध्ये ऑफर केली जाते. त्यात सर्व रूम स्लॉट ऑनलाईन वेबसाईटवाले आधीच बुक करतात. त्यामुळे सेम हॉटेलची कॉस्ट वेगवेगळ्या वेबसाईट्स वर वेगवेगळी दिसते. म्हणुन नीट नियोजन केलत तर चांगल्या रेट मध्ये उत्तम रुम मिळु शकते. फॅमेलीसोबत जात असाल तर शक्यतो एसी रुम पहावा कारण गोव्याच वातावरण बारामाही उष्ण व दमट असतं सो बायकोच टेम्परेचर कुल मोड वर ठेवाल तर गोवा अजुन कुल वाटु शकतो अन्यथा नवरत्न तेल व डर्मी कुल बाळ्गणे इष्ट ठरेल. हॉटेल बुक करताना शक्यतो ब्रेकफास्ट इन्क्लुड करुनच घ्यावा. कारण बाहेर साध मसाला ऑम्लेट जरी खायला गेलात तरी ब्रेड्चे पकडुन १०० रु होतात. व सेट ब्रेकफास्ट घ्याल तर १८० ते २०० रु होतात तेही लिमिटेड म्हणजेच पाच सहा जण असाल तर एक्स्ट्रा चहा कॉफी पकडुन रोजचे हजार बाराशे सहज घुसतात.

सडाफटिंग लोकांनी सरळ एखादी डॉरमॅटरी अथवा बीच जवळील शॅक मध्ये साधी रुम पाहावी. ७०० ते १००० मध्ये आरामात चांगली खोली मिळते. सामान (स्वताचेच बरं का) फेकल की बोंबलत फिरायला मोकळं.

Basilica of Bom Jesus
IMG-20180217-WA0004_Bom Jesus.jpg
Inside View of the Church
IMG-20180217-WA0006_BB Inside.jpg

Holy Jesus
IMG-20180217-WA0009_HJ.jpg

फिरण्यासाठीः स्कुटी अथवा बाईक ३५० ते ५०० च्या रेंज मध्ये मिळतात. त्यात गाडी घेताना ती व्यवस्थित चेक करुन घ्यावी कारण आधी भरपुर लोकांनी ती घसटवलेली असु शकते. ब्रेक्स, क्लच, गिअर, इंडीकेटर्स नीट तपासुन घ्यावेत. ए्खादा स्क्रॅच अथवा डेंट पहिल्यापासुनच असेल तर संबधीत व्यक्तीला तिथल्या तिथे तो दाखवुन खातरजमा करुन घ्यावी. कधी कधी मुळ मालक व एजंट वेगवेगळे असु शकतात त्यामुळे शक्यतो गाडीचे फोटो काढुन मोबाईल मध्ये ठेवावेत. जेणेकरुन वाहन परत करताना जर काही बिन बुडाचे आरोप झालेच तर त्या फोटोंचा पुरावा म्हणुन वापर करु शकता अन्यथा नाहक तुमच्या कडुन भुर्दंड वसुल केला जाऊ शकतो. अशा घटना भरपुर झालेल्या आहेत. कारण एक्साईट्मेंट मध्ये बर्याचदा या गोष्टी चेक करायच्या राहन जातात. आणि नंतर आख्या पिकनिकची आईझेड होते. शक्यतो गाडी हॉटेल वाल्यांच्या शिफारशी शिवाय बघावी अन्यथा वेटर्सचा कट पकडुन तुम्हाला पर डे ५०-१०० रु महाग पडु शकतात. आता हा सर्व खटाटोप ज्यांचे मेहनतीचे पैसे आहेत त्यांच्यासाठी. "वावर आणि पावर" वाल्यांच काय? मनात आणल तर ते रनगाडे घेऊन पण फिरु शकतात.

तुम्हाला हवं तर तुंम्ही गोवा टुरिझमच्या हॉप ऑन हॉप ऑफ बस सेवेचा लाभ सुद्धा घेऊ शकता. ह्या बसेस फुल्ली एअर कण्डिशन्ड असून त्यांच्या ओपन डेक वरून तुम्ही ३६० डिग्रीत गोवा पाहण्याची मजा लुटू शकता. अधिक माहितीसाठी खालील संकेत स्थळाला भेट द्या.

आता थोड खाण्याविशयी,

टीप नं १- शक्यतो एकाच ठिकाणी बसुन बिल आणि पोट वाढवण्यापेक्षा फॉरेनर्स स्ट्रॅटेजी वापरावी. हे फिरंगी लोक एक-सवा तासाच्या वर एका शॅक अथवा हॉटेल मध्ये बसत नाहीत. त्यामुळे फायदा काय तर नव नवीन ठिकानं आणि तेथील फुड एक्स्प्लोर करता येत आणि पैसे ही तेवढेच जातात.

टीप नं २- बियर चा पिंट शॅक मध्ये ८० ते १०० च्या रेंज मध्ये मिळतो. तर तोच पिंट दुकानात ४० रु ला मिळतो. चांगल्यात चांगल्या व्हिस्कीचा लार्ज पॅक हॉटेलात अथवा शॅक मध्ये १०० ते १२० पर्यंत मिळतो, पण त्याच व्हिस्की्चा आख्खा खंबा ५०० ते ६०० मध्ये येतो. त्यामुळे एकवेळची दारु बाहेरुन आणुन रुमवर ढोसली तरी बर्यापैकी पैसे वाचु शकतात चॉईस इझ युवर्स.

टीप नं ३- रात्रीचा डिनर लाईव्ह म्युझिक ऐकत करायचा असेल तर शक्यतो बॉलीवूड नाईट असा बोर्ड लावला असेल तरच जावे, अन्यथा "सांगतंय कैरं ऐकतंय बहिरं" अशी अवस्था व्हायची. इंग्लिश गाणी आवडणाऱ्यांसाठी अर्थातच "sky is the limit" भरपुर ऑपशन्स आहेत. पब्स मध्ये जायचं असेल तर टिटोस, कबाना, कोहीबा हे ऑपशन्स आहेतच. कोहिबाला वीकेण्डला जायचं असेल तर कम्पल्सरी शूज व प्रॉपर स्मार्ट कॅज्यअल्स परिधान करावेत. स्लीव्हलेस अथवा थ्री फोर्थ असेल तर माजुर्डे बाउन्सर आत सोडत नाहीत. काही शॅकवाले सुद्धा वीकएंड पार्टीची व्यवस्था करतात.

टीप न. ४- कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी लगेचच मैत्री करू नका अथवा कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करू नका . त्यातही मसाज वाले आणि पेडलर्स पासून सावधान अन्यथा दिल चाहता मधल्या सैफ सारखी अवस्था व्हायला वेळ लागणार नाही. काही लोक तिकडे फुलटाईम गळ टाकूनच बसलेले असतात. मजेतला "म" गळुन सजेत रूपांतर व्हायला एक क्षण पुरेसा असतो. so be careful!

Church of St. Fransis
IMG-20180217-WA0007_st Fransis.jpg
Fort Aguada

IMG_20180113_122123_Agoda Fort.jpg

काही सिलेक्टिव्ह खाण्याची ठिकाणें,

१. सुझो लोबो कलंगुट बीचवर- थोडं महाग आहे पण एकदा तरी ट्राय करायला हरकत नाही
२. साई प्रसाद कलंगुट मॉलच्या मागे - पॉकेट फ्रेंडली आहे पण थोडं अस्वच्छ वाटलं
३. आनंद रेस्टोरंट अँड बार वागातोर - फ्राईड फिश आणि थाळी छान मिळते.
४. रिट्झ क्लासिक पणजी - मस्त थाळी मिळते फक्त आपल्यात लग्नाच्या हॉल मध्ये जशी गर्दी असते सेम तशीच फिलिंग जेवताना येते. अगदी लोक कधी कधी चेअर च्या मागे पण उभे असतात.

टीप- शक्यतो थाळी घेण्यापेक्षा वेगवेगळे पदार्थ ऑर्डर केलेत तर तेवढ्याच पैशात जिभेचे चोचले पुरवता येतात. कारण गोव्यात थाळी मध्ये चपाती येत नाही आणि फिश करी सोडली तर बाकीच्या भाज्या सवतीच्या लग्नाला आलेल्या बायको सारख्या फुगून असतात.

बाकी वरील सर्व हॉटेल्सची माहिती झोमॅटो वर उपलब्ध आहेच. त्यात गोव्यात एक वेळ डॉक्टर भेटणार नाही पण बार आणि दारूची दुकान बाजू बाजूला भेटतील त्यामुळे खाण्या पिण्याची चिंता नसावी.

Dona Paula Sea View
आगोडा फोर्ट व दोना पावलोला शक्यतो संध्याकाळीच भेट द्यावी कारण दुपारच्या रणरणत्या उन्हात आजूबाजूच्या विहिंगम द्रुष्याचा नजारा ठरवुन सुद्धा घेता येत नाही. आगोडा फोर्ट ५. ३० नंतर बंद करतात.

Dona Paula (Ek Duje Ke Liye Spot)
IMG_20180113_133133_DP2.jpg

Statue in front of Miramar Beach
IMG_20180113_135746_MM.jpg

Vagator Beach
IMG-20180114-WA0088_VB.jpg

कसे जाल- ट्रेन ने जाल तर थिविम अथवा मडगावला उतरुन व विमानाने जाल तर दाबोलीम एयर पोर्ट वर उतरून प्राईवेट टॅक्सी अथवा बस ने इप्सित स्थळी जाऊ शकता.

टॅक्सी व बाइकचे साधारण दर तुमच्या माहितीसाठी,

खाली नमूद केलेल्या तक्त्यातील रेट सीज़न प्रमाणे कमी जास्त होत असतात त्यामुळे 100-200 रू वर खाली होऊ शकतात. यापेक्षा जास्त दर मागितल्यास सरळ-सरळ दुसरी टॅक्सी/गाडी पाहावी अथवा वाहतुक पोलिसांशी संम्पर्क साधावा.
Taxi Rates.jpg_page_Taxi Fares.jpgTaxi Rates.jpg_page_2.jpgनॉर्थ गोव्यातील फेमस बीचेस: कलंगुट, बागा,वागातोर,आरंबोल, मँड्रेम, मोर्जीम, अंजुना

साऊथ गोव्यातील फेमस बीचेस: बेनोलिम, कोलवा, वार्सा, पालोलेम, माजोर्डा.

सर्वात महत्वाचं येताना विमानाने येणार असाल तर पाच लिटर दारू आणू शकता. Happy आता प्लीज आनंदाश्रु ढाळण्यापेक्षा जायची तयारी करा पटकन.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलय ! Happy
तरी बरच थोडक्यात आहे ...
पु.लेशु

फारच छान माहिती दिलीत तुम्ही.
आता गोवा हिवाळ्यातच...
तिकडे शाकाहारी लोकांना काही खायला मिळतं का की फक्त फिश आणि बीअर खाणाऱ्यांचीच चंगळ आहे Lol

@ Me_rucha
धन्यवाद, शाकाहारीसाठी पण भरपुर options आहेत. Especially जर तुम्ही north goa मध्ये राहणार असाल.
वर सांगितल्याप्रमाणे zomato वर माहीती उपलब्ध आहे.

मस्त माहिती.

मी खर तर तळ कोकणातली तरी ही गोवा माझं ही खूपच लाडकं.

पावसाळ्यातलं गोवा म्हणजे स्वर्ग धरेवरी अवतरला अशी स्थिती. आणि इतर पावसाळी स्पॉट वर दारुडे जो धिंगाणा घालत असतात ते गोव्यात अजिबात नाही.

मस्त! लेख आधी वरवर चाळला आणि फोटोच पाहिलेत ..
गोवा फार सुण्दर आहे. उगाच दारूमुळे ब्दनाम झालाय. किंवा असे म्हणता येईल की त्यामुळे ईतर बरेच सुंदर गोष्टी झाकोळून गेल्यात.
आताही लेख उघडताना तेच डोक्यात आलेले..
मग तसे आढळले नाही.. तर निवांत वाचला. ईथे लोकं प्रतिसादातही भर टाकतील अशी अपेक्षा आहे.
माझ्याही बरेच आठवणी निगडीत आहेत गोव्याशी..
सर्वात महत्वाची म्हणजे बायको जेव्हा गर्लफ्रेंड होती तेव्हा तिच्याबरोबर गोवा गेलो असताना समुद्रात मरता मरता वाचलेलो. अगदी आमच्या कुंडलीतला मृत्युयोग खरा आहे का असा संकेत देत मनात संशय निर्माण करणारा अपघात..
पण लग्न केले तरीही.. मात्र दुर्दैवाने त्यानंतर ना समुद्रातले वॉटरस्पोर्टस झाले ना गोवा झाला...

धन्यवाद ऋन्मेऽऽष,
ईच्छा असेल तर एकत्र जाऊ वॉटर स्पॏर्टस पण होईल आणि गोवा पण Happy

सर्वात महत्वाची म्हणजे बायको जेव्हा गर्लफ्रेंड होती तेव्हा तिच्याबरोबर गोवा गेलो असताना समुद्रात मरता मरता वाचलेलो. अगदी आमच्या कुंडलीतला मृत्युयोग खरा आहे का असा संकेत देत मनात संशय निर्माण करणारा अपघात..
पण लग्न केले तरीही.. मात्र दुर्दैवाने त्यानंतर ना समुद्रातले वॉटरस्पोर्टस झाले ना गोवा झाला...

नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 12 April, 2020 - 22:17
>>>>>
Light 1 Light 1 Light 1 Light 1 Light 1
एके काळी तुमचा धागा काढायचा अन प्रतीसाद द्यायचा धडाका इतका होता की ऋ नावाची भुताटकी आहे का? अशा आशयाच्या चर्चा अमानवीय भाग-0 या धाग्यावर चालायच्या. त्याचे कारण आत्ता कळले. कदाचित त्या मिळालेल्या पुनर्जन्मात ही शक्ती मिळाली असेल. आता त्या शक्ती ने "झाड" बोकललय.
सॉरी टायपो झाला, झाड बदललंय. Wink

>>>शाकाहारी लोकांना काही खायला मिळतं का >>>>

याच कारणाने घाबरत एकदा गेलो. मडगाव मार्केट म्यु इमारत बाग या मध्यवर्ती( दक्षिण गोव्यासाठी) भागात एक दिवस राहिलो. चार शाकाहारी रेस्टारंटस, फळे मोठाली भरपूर.

समुद्रावर ( कोलवा, बेनोलिंम ६ किमि , वाटर स्पोर्ट्स सहित, )एक फेरी मारण्यापलीकडे काही करत नसल्याने आवडलं. पालोळें, फोंडा, पणजी, बस सर्वीस उत्तम.
आमच्या माफक गरजा सहज पुरल्या.

शिवाय मडगावला सर्व गाड्या थांबतात. मंगळुर सुपरफास्ट १२१३३ गाडीला हल्लीच करमाळी स्टॉप दिलाय त्यामुळे आरक्षण वाढले. अन्यथा ही उत्तम गाडी ठाणे रात्री साडे दहा मडगाव साडेसात सकाळी.