आणि कोरोना वर यशस्वीरित्या मात केली...

Submitted by Priya ruju on 3 April, 2020 - 04:01

मायबोलीचे बरेच सभासद परदेशात आहेत. कोरोनामधून बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे असे सगळीकडून वाचायला मिळत आहे. सभासदांपैकी कोणी हे अनुभवले किंवा जवळच्या कोणाचे पाहिले असेल तर कोरोनावर कशी मात केली हे वाचायला आवडेल. एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आर्या अग
काळजी घे गो
फो नं बदललायस का?

मी-आर्या तुम्ही बर्‍या झालात हे वाचुन आनंद झाला. चार चौघात विचारु नये पण वय किती आहे तुमचे? ऑफिस जॉइन केलं असं म्हणताय म्हणाजे जास्त नसावं असा कयास आहे. वयावर अवलंबुन त्रासाचे प्रमाण कमी जास्त असावे असे वाटले म्हणुन विचारलं.

10 septला माझ्या मिस्टरांच्या कंपनीत सर्वांचीच कोरोना चाचणी केली गेली. 11 sepला मिस्टरांचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला. त्यांना कंपनीच्याच डाॅ. ची ट्रिटमेंट सुरू झाली. त्यांनी सांगितले घरातील कुणाची टेस्ट इतक्यात करू नका. काही दिवसांनी किंवा लक्षणे जाणवली तर करा. मिस्टरांच्याच बरोबरीने आम्ही म्हणजे मी आणि मुलांनी सुद्धा लगेच अॅटिबायोटिक्स (डाॅ. नी सांगितलेले), झिंक आणि विटामीन सीच्या गोळ्या सुरू केल्या. माझ्या मिस्टरांना थकवा जास्त येऊ लागला. दुसरे कोणतेही लक्षण नाही. मला आणि मुलांना तर काहीच जाणवले नाही. आम्ही सर्वजण असे समजूनच चाललेलो की आपल्याला कोरोना झाला आहे. चौदा दिवसानंतर म्हणजे परवा माझी आणि मुलांची टेस्ट केली. काल तिघांचाही रिपोर्ट निगेटिव्ह आला. आज मिस्टरांची टेस्ट केली. रिपोर्ट ऊद्या येईल.
पंधरावीस दिवसात मला आणि मुलांना अजिबात कसलेच लक्षण जाणवले नाही. याकाळात आम्ही सर्वजण एकत्रच राहत होतो. एकसारखीच औषधे घेत होतो. मी तर घरातील सर्व काम मुले सांभाळून एकटीच करत होते. मिस्टरांना थकवा असल्याने ते विश्रांती घेत होते. आता आम्हा तिघांचे रिपोर्ट पंधरा दिवसानंतर निगेटिव्ह आल्याने आपल्याला नक्की कोरोना झाला होता की फक्त मिस्टरांनाच झाला होता आणि आपण पहिल्यापासून निगेटिव्हच होतो की काय, असे वाटू लागले आहे. कारण साधी कणकण देखील मला आणि मुलांना जाणवली नाही. सर्वजण घरात एकत्र राहत असताना एक पाॅझिटिव्ह आणि बाकी तिघे निगेटिव्ह ही शक्यतादेखील खूप कमी वाटते. त्यामुळे आपल्याला लक्षणविरहीत कोरोना होऊन गेला असेच समजून चालते आता. बाकी, मिस्टरांचा रिपोर्ट ऊद्या येईलच.

Cuty माझ्या दोन मित्रांची अगदी अशीच केस आहे. दोघांना करोना झाला, ७ सप्टेंबरला चाचणी पॉझिटिव्ह आली. एकाला घरीच उपचार मिळाले. एकाला छातीत इन्फेक्शन दिसत होते म्हणुन रुग्णालयात भरती व्हायला सांगितले पण बेड मिळायला दोन दिवस लागले म्हणुन घरीच होता. मग सहा दिवस रुग्णालयात राहून घरी आला. दोघांच्याही घरच्याना लक्षणे दिसली तर चाचणी करा म्हणुन सांगितले. दोघेही बरे झाले. आता तीन आठवडे होऊन गेले दोघांनाही काही लक्षणे नाहीत घरच्यांना नाहीत त्यांच्या परत चाचण्या केल्याही नाहीत.

तरी तुम्ही काळजी घ्या, तुमच्या मिस्टरांना लौकर पूर्ण बरे होण्यास शुभेच्छा.

अशीच केस माझ्या एका मित्राची होती.. ऑफिस मधे 2 3 जन कोरोना positive आले म्हणून त्याने सुद्धा टेस्ट केली त्याची पण positive आली..त्रास मात्र काहीच झाला नाही म्हणे..ताप नाही कणकण नाही..थकवा नाही..सर्दी नाही गळ्यात खवखव सुद्धा नाही..
14 दिवस ऑफिस मधून सुट्ट्या भेटल्या त्या निवांत रूमवर quarantine राहुन Netflix पाहत एन्जॉय केल्या म्हणे.
7 दिवसाने परत चेक केले तर रिपोर्ट negative आलेला.
तो रोज प्राणायाम योगा करायचा आधीपासूनच..

आमच्या शेजारी रहाणारे नवरा-बायको-बायकोची आई तिघे जण पॉझिटीव्ह झाले. त्यातल्या नवर्‍याला फार अशक्तपणा आला १० दिवसानंतर. तिघांनाही घरी सोडले आहे. पण १० दिवस फक्त सकाळ संध्याकाळ व्हीटॅमीन सी च्या गोळ्या, ताप आला तर पॅरॅसिटेमॉल आणि खोकला आला तर अजुन एक औषध, हॉस्पिटलच्या एका रूम मधे १० दिवस झोपायला तिघांना सेपरेट बेड आणि बेडशीट, उशी, चादर. सकाळी चहा-नाश्टा, दुपारी जेवण, संध्याकाळी नाश्टा/फळे आणि रात्री जेवण या व्यतिरिक्त सकाळ-संध्याकाळ डोक्टरांकडुन १० फुटांवरुन चौकशी. रुमची साफ-सफाई, रात्री मच्छर चाऊ नये म्हणुन गुडनाईट, फॅन, ट्युबलाईट या व्यतिरिक्त अजुन काहीही केले नाही. एकही इंजेक्षन दिले नाही की कसले ऑक्सिजन / व्हेंटीलेटर सुद्धा लावले नाही.

बील किती यावे....??? अंदाज...??? तिघांचे प्रत्येकी २ लाख. १० दिवसांनी ६ लाखांचे बील चुकते करुन ते घरी आले अन आता कोरोना निगेटिव्ह आलेले आहेत तरी वर उल्लेख केलेल्या सेवे व्यतिरिक्त काहिहि औषधोपचार झालेले नसताना ६ लाखांचं बील झालं याचा त्यांना प्रचंड मानसीक धक्का बसला आहे.

*******************

समोरच्या घरात रहाणार्‍या काका आणि त्यांचा मुलगा ताप आला म्हणुन सरकारी दवाखान्यात एंटीजेन टेस्ट करुन आले अन टेस्ट पॉझिटीव्ह आली. पण ६ लाखांचं बील झालेला अनुभव समोरच्या घरात आलेला असल्यामुळे ते काका अन त्यांचा मुलगा जोपर्यंत जास्त त्रास होत नाही तोपर्यंत हॉस्पिटल अ‍ॅडमीट न होण्याचा निर्णय घेऊन मोकळे झाले. सरकारी आरोग्यसेवेने त्यांना घरीच ऑशधोपचार करण्यासाठी कीट पाठवले अन संध्याकाळी एकदा फोन करुन तब्ब्येतीची चौकशी केली. काकांची सून आधी प्रचंड दहशतीखाली पण नंतर स्वतःछी पुर्ण काळजी घेऊन नवर्‍याची अन सासर्‍याची योग्यप्रकारे सेवा करु लागली. आम्ही शेजार्‍यांनी दिवसातुन एकदा डबे दिले पण त्यांनी नम्रपणे ते नाकारले. तिने सर्व प्रकारे काळजी घेऊन १४ दिवसांनंतर दोघांचीही टेस्ट निगेटिव्ह आली. सुनेने टेस्ट केलीच नाही. खर्च किती आला तर फक्त ३५०० रुपये. आता बोला...!

DJ आमच्या भागात एक रुग्णालय आहे. तिथे पाच दिवसांचे २ लाख रुपये पॅकेज आहे प्रत्येक रुग्णाला. वेगळ्या खोलीचे.
वेगळी औषधे, ऑक्सिजन लागल्यास वेगळा चार्ज.
तिथून एक नर्स महिन्यातुन एकदा येते आमच्याकडे, बाबांना अटेंड करायला. ती आज सांगत होती आयसीयुत असलेल्या लोकांचे बिल १६ - १८ लाख वगैरे आले आहे.
डोळे पांढरे व्हायला लागले ऐकूनच.

बाप रे।

पण १० दिवस फक्त सकाळ संध्याकाळ व्हीटॅमीन सी च्या गोळ्या, ताप आला तर पॅरॅसिटेमॉल आणि खोकला आला तर अजुन एक औषध, हॉस्पिटलच्या एका रूम मधे १० दिवस झोपायला तिघांना सेपरेट बेड आणि बेडशीट, उशी, चादर. सकाळी चहा-नाश्टा, दुपारी जेवण, संध्याकाळी नाश्टा/फळे आणि रात्री जेवण या व्यतिरिक्त सकाळ-संध्याकाळ डोक्टरांकडुन १० फुटांवरुन चौकशी. रुमची साफ-सफाई, रात्री मच्छर चाऊ नये म्हणुन गुडनाईट, फॅन, ट्युबलाईट या व्यतिरिक्त अजुन काहीही केले नाही. एकही इंजेक्षन दिले नाही की कसले ऑक्सिजन / व्हेंटीलेटर सुद्धा लावले नाही.............................................

सेम हिच सगळी ट्रिटमेंट आई,भाऊ,बहिण आणि मेहुणे यांना मिळाली होती सरकारी विलगीकरणात..एक रुपया पण खर्च नाही... आणि टेस्ट पण मोफतच.....

क्यूटी, मिस्टरांची टेस्ट निगेटीव्ह आली तरी काळजी घ्या. अशक्तपणा बराच येतो म्हणे!

एंजल, आराम करा, औषधे वेळेवर घ्या, लवकर बरे व्हा __/\__

या आजारात सरकारी दवाखान्यामध्ये उपचार घेणे चांगले खाजगी दवाखान्यात लाखो रु. खर्चण्यापेक्ष

अँजेल्स, हो, पण आमच्याकडे (हैद्राबाद) सरकारी दवाखान्यात जागा नाही. म्हणुन होऊच नये याची जास्तच काळजी घेत आहोत.

तुम्हाला लौकर पूर्ण बरे होण्यास शुभेच्छा!

govt. servant असल्यामुळे आम्ही लाँकडाऊन काळातही जनतेच्या सेवेत होतो. त्यामुळे सदर आजाराची लागण होणारच अशी मानसिक तयारी होतीच. म्हणून लक्षणे दिसताच लगेच दुसर्या दिवशी उपचार चालू केले.अंटीजेन टेस्ट +ve आली.आणि आता मी घरीच विलगीकरण कक्षात राहून या आजारावर मात करत आहे

मानव काका मी दवाखान्यातून टेस्ट करुन गोळ्या औषधे घेउन घरीच quarentine राहिले आहे. covid center or कुठल्या ही सरकारी दवाखान्यात नाही

Cuty, मी आर्या काळजी घ्या

angelsss - तुम्हीही काळजी घ्या.

खाजगी दवाखाने अव्वाच्या सव्वा बिले लावताहेत त्यात जर कळले की तुमचा एखादा विमा आहे किंवा घरचे कोणी चांगल्या नोकरीला किंवा चंगला पगार मिळतो तर मुद्दाम खाजगी दवाखान्यात पाठवतात. कारण सरकारी खाट गरजुला मिळावी. ह्यात किती खरे अन किती खोटे माहित नाही पण ही एकीवात माहिती आहे. आपण अडुन रहायचे म्हणे की आम्हाला सरकारी ईलाजच करायचा आहे. पण सरकारी ईस्पीतळात खुप घाण असते ( हे ही ऐकीवातच आहे, मी कधी गेले नाहीये) ती सहन होत नाही म्हणुन बरेच जण खाजगी मध्ये जातात.

मन:पूर्वक धन्यवाद मृणाली, हर्पेन, मानव, नादिशा, मी_अनु, लंपन, वर्णिता, वावे, मंजूताई, किल्ली, भावना, विनिता, अवल, डीजे, व्हीबी!

<<आर्या, सविस्तर वेगळ्या धाग्याची वाट पहात होते.....<< नक्किच मंजूताई, सविस्तर लिहिन सगळ. Happy
<<फो नं बदललायस का?<<< नाही ग, फोन नंबर तोच आहे. Happy
<<चार चौघात विचारु नये पण वय किती आहे तुमचे?<< डीजे , वय ५१ आहे.

Pages