‘रात’

Submitted by jpradnya on 26 March, 2020 - 12:45

‘रात’
आज पुन्हा रात जागी
काळोखात नहायलेली
वाट पहात उद्याची
दमलेली भागलेली

आज प्रसवली रात
आज उगवला चांद
त्याच्या स्पर्शाने मोहरे
रात झाली धुंद धुंद

तिला गवसला सूर
माजे सत्याचे काहूर
आज जरी रात जागी
तरी चांदणे टिपूर

रात माझी ही आगळी
घाले स्वप्नांची रांगोळी
आज डोळे उघडून
रात पूर्ण विसावली

- प्रज्ञा

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users