सरमिसळ एक भयंकारी रोमांच भाग सतरा...मिशन नवीन ..शिलेदार निघाले...

Submitted by मुक्ता.... on 23 March, 2020 - 16:08

सरमिसळ एक भयंकारी रोमांच भाग सतरा...मिशन नवीन ..शिलेदार निघाले...

तिच्या हाताची बोटं थोडी हलायला लागली..व्ह्यूफ व्ह्यूफ...फुssssss तिच्या नाकातून आणि तोंडातून सुस्कारे बाहेर आले...थकावट सरळ सरळ जाणवत होती. शरीर काळपट पडलेलं, दणदणीत होतं त्या लाल प्रकाशाने तिची ही अवस्था करण्यापूर्वी...आत्मा त्या जळक्या शरीरातुन सुटकेची धडपड करत होता जणू. नक्की काय त्या शक्तीच्या मनात होतं काय ठाऊक.
इतक्यात जमीन दुभंगली. साटकन त्यातून एका बाईचं शरीर बाहेर आलं आणि त्या पाठोपाठ ती गुहा हिरवा आणि मुख्यतः लाल प्रकाशाने भरून गेली. तिथे आता दोन स्वयंप्रकाशित आकृत्या उभ्या राहिल्या...त्यांनी ते बाईचं शरीर म्हणजे अर्थातच आपलं आपली देवकी,तीला ला निर्जन गुहेतल्या जमिनीवर ठेवलं. देवकी बेशुद्ध होती. 

बकुळा आणि तीच ते भाजलेलं शरीर....आता त्यात सुटकेची वाट पाहणारा बकुलाचा आत्मा होता. जरी शरीर निपचित होत.तरीही  त्रासाची असहनीय जाणीव नक्कीच होती. कारण ओरडता येत नव्हतं...बकुळा तीच जिने त्यांना सतत मदत केलं केली होती. तिला नवीनच संपूर्ण कुटूम्ब उध्वस्त नाही तर नष्ट करायचं होत..कार कारण त्यांच्यामुळेच बकुळा गावातून काढली गेली होती. तिला..देशोधडीला लावली होती....तिचे काळे धंदे बंद झाले होते...वीस पंचवीस वर्षांपूर्वी...महिपती म्हणजे नवीनचे वडील ते जिवंत कि मृत हे कुणालाच ठाऊक नव्हते....म्हणजे कदाचित बकुळाला असतीलही...

तर ती लाल शक्ती आणि ती हिरवी शक्ती यांच्यात काहीतरी असंबद्ध भाषेत म्हणजे थोडक्यात अमानवी भाषेत बोलणे झाले.ती लाल शक्ती अधिक तेजस्वी दिसायला लागली. आणि त्यातून एक ज्योत निघाली. ती  बकुळेच्या शरीरात शिरताच...बकुळा हालचाल करायला लागली. हळूहळू तिच्या गुडघ्यात आणि स्नायूंमध्ये प्राण दिसायला लागले....ती मान उचलण्याचा प्रयत्न करायला लागली, पण अंगात काहीच त्राण नसल्यानं ते फारसे जमले नाही. कशाबशा होताच तळवे पालथे घालून आपल्या पायाच्या बोटानी गुडघ्यांचा आधार घेत तिने थोडे आपलं शरीर पुढ रेंगसले .....डोळे किलकिले केले...आपल्याच शरीराच्या दर्पाने तिला क्षणभर मळमळून आले...ऊफु....स्स्स्सस्स्स्स ........निश्वास तोंडातून बाहेर पडले...किलकिल्या डोळ्यातून त्या प्रकाशित आकृत्या काही बाही बरळत नाचताना म्हणजे इकडे तिकडे फिरताना दिसल्या.....

"कोचाकींनी टीव्ह टिव्ह .....बिक बिक....."हिरवा म्हणाला.....

"बिच्याकिनी......बबब बकुळा.......स्टिक स्टिक स्टिक .......भुई बिनबिक..."लाल काहीसा टिवटिवला......

काही काळ तसाच गेला.....त्यांचे असले सांकेतिक भाषेत बोलणे आणि नाचणे सुरूच होते.......मानवी मेंदूला न समजणारे....

अर्थ त्यांनाच माहित...अगदी बकुळा सुद्धा.....काहीही काळत नव्हतं तिला......पाठीला बाक होता...पण बकुळा उभी राहिली...आपला सगळा जोर एकवटून....अगदी काही तासांपूर्वी रसरशीत असलेल्या  आणि आता चिपाड खपाटीला गेलेल्या तोंडातून अस्पष्ट आणि अस्फुट उदगार काढून बकुळा म्हणाली...." मुडदा वशिवला रं तुमचा.....मला माराया निगालात...इसरू नका...तुमचे प्राण माज्या हातात हैत....त्ये पाणी आनि कुणाला बी गावलं ....का मंग सम्पलात....."

लाल आकृती पुढे झाली आणि बकुळाला केसाला धरून खेचलं आणि परत भिरकावला. आधीच अशक्त असं शरीर आणि त्यात परत या जोरदार धक्यामुळे बकुळा भेलकांडून  खाली  पडली. पुन्हा सरकत सरकत पुढे आली आणि उभी राहिली कशीबशी. आता ती काही बोलण्याच्या मनस्थितीत आणि शारीरिक अवस्थेत राहिली नव्हती.
" गीच्याक गीच गीच, कोचाकींनी भ्याव भ्याव...."
लाल शक्ती या असल्या न समजणाऱ्या भाषेत किंचाळली...बकुळाला एक लाल झोत मारून देवकीजवळ सरकवली.
सर्रर्रर्रर्रर्र....धुस्स...
त्या ओलसर कोंदट गुहेत एकेकाळी राणी असणाऱ्या बकुळाला आज ही अशी मानहानी पचवावी लागत होती. बरोबर देवकीजवळ बकुळा सरकत थांबली.
हुफ्फ हुफ्फ...आह...
श्वास लागलेल्या बकुळाला लक्षात आलं इथे काहीतरी आहे. तिने मोठ्या कष्टाने मान वळवून वर बघितले तर ती चमकलीच त्या बाईच्या चेहऱ्यावरील केस बाजूला केल्यावर बकुळाचा गोंधळ आणखीन वाढला देवकीला बघून. आत्यंतिक कष्टाने देवकी बेशुद्ध होती. देवकीचे दोन्ही हात तिच्या अंगाखाली होते मान किंचित वर आणि ती पालथी पडली होती. इतके स्पर्श आणि धक्के बसूनही ती निश्चलच होती.
खूप जास्त मार बसल्याने बकुळाची परत शुद्ध हरपली.

आणि त्या शक्ती परत जमिनीत घुसल्या, त्या पडक्या मंदिरासारख्या ठिकाणी , भुसकन बाहेर आल्या. शांताच्या वर्णनाप्रमाणे त्यांनी त्या वास्तूच्या छतावरील चार दिशातील मनोर्यांना गोल गोल प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. तिथे असलेल्या दगडावरची रहस्यमय लिपी वाचायला म्हणजे जोरजोरात वाच्यायला सुरुवात केली...
टिंग टिंग
इकडे नविनच्या घरी बेल वाजली. गंगा, डॉक्टर टंडन यांनी कान टवकारले. त्यांना कल्पना होतीच म्हणा की अविनाश आणि विजयसर येणार आहेत. पण गंगाने तरीही अविनाशला फोन लावून खात्री केली. आणि मग दार उघडलन. त्यांना आत घेतलं. काही क्षण ते सगळे एकमेकांकडे बघत बसले. पण नंतर भानावर येऊन गंगाने त्यांना बसायला सांगितले आणि पाणी दिले. अविनाशने घरातील आवश्यक सामान जे गंगाने सांगितले होते ते तिच्या ताब्यात दिले.
"नवीन असा का बसलाय?" विजय सरांनी नविनकडे रोखून बघत म्हटले. इतक्या वेळ कुणाच्या अस्तित्वाचे भान न ठेवता नविनने अढ्याला डोळे लावले होते तो विजेचा शॉक बसावा तसा उठला. आणि विजय सरांना बिलगला, ऑक्सअबोक्शी रडत त्याने देवकी देवकी असा पुकारा केला.
"एक एक मिनिट, देवकी? देवकी वहिनी कुठाय? ओह माय गॉड, गंगा, काय आहे सगळं?" अविनाश एक झटक्यात पटापट हे वाक्य बोलून गेला.

"ओह अविनाश प्लिज काम डाऊन,लेट हर स्पीक'विजय सर अविनाशला म्हणाले खरतर दमच दिला.

"ते ते, द ददेवकी वहिनी आज सकाळी काही स स सामान जे आता त तुम्ही आणलं ते आणायला ब बाहेर गेली. दादा तेव्हा ज जागा होता. मी आणि डॉक्टर सर आम्ही कालच्या जगरणाने आणि थकव्याने झोपलो होतो. अविनाश वहिनी परत आलीच नाहीये हो सकाळ पासून....."गंगाला आता रडू आवरलं नाही. ती मटकन कौच वर बसली. अविनाशला आता गिल्टी वाटायला लागलं. आपण उगाच असे पटकन बोलून गेलो...हे लोक किती वाईट अवस्थेतून जात आहेत..आणि गंगा..अविनाशने विचार केला...आपला हातरुमाल गंगाला काढून दिला.."हे गंगा आय आम सॉरी यार...लुक मी असा भरभर बोलतो, यु नो...माझ्या ओल्ड गर्लफ्रेंड ला आय मिन वत्सला मावशीला माहितीय अँड आपण टू मेनी डेज रोज बोलतोय सो इट वास फ्रेंडली...बट आय आय शुड हॅव अंडरस्टुड युअर कंडिशन, खूप हार्षं झालो ना? हे घे , प्लिज तू डोळे पूस, शेमबुड पण पूस..."
गंगाने चमकून वरती पाहिले " डोन्ट वरी मी नाक नाही पुसलाय...स्वच्छ आहे तो" अविनाशने हसू दाबून धरलं...पण गंगा हा अविनाशचा स्वभाव ओळखून होती...ती खुदकन हसली...पण डोळे गळतच होते....
"गंगा काय झालंय ते नीट शांत होऊन सांग...रीलक्स प्लिज..." विजय सर म्हणाले

"सांगते, सकाळी वहिनी बाहेर गेली. साधारण आठ च्या सुमाराला. आम्हाला खरतर आत्याने सांगितलं होतं की बाहेर ती बरोबबर असल्याशिवाय जायचं नाही पण आम्ही उठलो तेव्हा वहिनी आधीच बाहेर गेली होती. जवळपास दोन तास झाले होते. आणि दादा हवालदिल...मी आणि दादा निघालो तिला शोधायला...पण डॉक्टर सरानी थांबवलं, त्यांना शंका आली ती वहिनी किडनाप झाल्याची..आम्ही गेलो तर आमची तीच अवस्था झाली असती. विशेष करून दादा, त्याच्या जीवावर उठलेत ते..मग जरा न्यूज लावल्या तर एक व्हिडिओ होता व्हायरल चक्र या कार्यक्रमात. जिथे विचित्र घटना लोक मोबाईल कॅमेराने शूट करून त्या चॅनेल ला पाठवतात. त्यात वहिनी सारखा कुर्ता घातलेली तिच्याच सारखी बाई होती...जी अंधुक लाल प्रकाशात जमिनीत खेचली गेली. ती पाठमोरी असल्याने चेहरा समोर नाही आला. आणि तो व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचं टायमिंग सकाळी सव्वा आठ च्या सुमारच आहे आणि एरिया इथल्या थोडा पुढचा आहे.मला खात्री आहे ती वहिनीच होती आणि लाल प्रकाश..जमिनीत वहिनी..,'
गंगाने ओंजळीत चेहरा झाकून घेतला. तिला पुन्हा रडू कोसळले.
"गंगा कशावरून ती वहिनीच? आणि लाल प्रकाश तिला जमिनीत का खेचेल? लुक डिअर, देअर आर सम विमसीकल फेनोमेन आर गोईन ऑन...आमच्याकडे काही डेटा आलाय...वेल यु कॅरी ऑन..."

"अरे अविनाश...पारगावातून काही विचित्र घटना घडल्यात...जमिनीतून आणि त्या जंगलाच्या दिशेने काही आवाज येतात भूकंप होताहेत तिथेच फक्त...लोकांच्या घराखालून काही पास होतंय...तिथल्या स्थानिकांनी काही व्हिडीओ व्हायरल केलेत रे..आणि अविनाश इथल्या आकाशात रात्री लाल आणि हिरवे उजेड दिसतात....आणि आणि प प पारगावातही...अविनाश हे बरच मोठं काही आहे.."

"ओह आय मिन सिरियसली..तुझे धागे जुळत असतील तर...वहिनी कदाचित पारंगावात असेल म्हणजे बकुळा आणि दोज @@##%% ते पण तिथेच अड्डा जमवून असतील, बघू आता वत्सला मावशीचा ध्यानाचा सेशन सम्पूदे मग बोलू" अविनाश म्हणाला.

"गंगा बाळा, ते देवकीला काहीच इजा करू शकणार नाहीत खात्री बाळगा...कारण तिचा आत्मा आणि त्याचं वलय दोन्ही एक विशिष्ट पातळीवर आहेत...आणि तिला मी जोडला जाण्याचा प्रयत्न करतो...तू आणि अविनाश दोघे बंगलोरला निघा ते सॅम्पल घेऊन...आणि लगेच...अविनाश असल्याने काही संकट जवळ येऊ शकणार नाही म्हणजे शक्यता कमी आहे. एक तासात निघा....त्या शक्ती इकडे रात्री दहा नंतर जास्त उद्दीपित होतात. आता त्या वेगळ्या कामात आहेत...तुमची जाण्याची व्यवस्था झालेली आहे. मी तुमच्या हेड शी बोललो आहे. त्यात तुम्ही सायंटिस्ट आहात त्यामुळे स्पेशल हेलिकॉप्टर ने तुम्ही जाणार आहात...फक्त एक करायचं मनात भिती हा शब्द नाही. आणि महामृत्युंजय सुरू ठेवा...इकडचे मी आणि डॉक्टर साहेब सांभाळतो...होय ना सर? तुमची रिव्हर्स सायकॉलॉजी आज देवकीवर प्रभावी ठरेल..." विजय सर म्हणाले...
त्यांनी नि डॉक्टर टंडन नि एकमेकांकडे बघून स्मित हास्य केले....
गंगाने वरिष्ठांशी बोलून नीट चर्चा केली. तिने त्याना सगळ्या घटनांची आणि आपल्या प्रयोगाची कल्पना दिली...तिचे वरिष्ठ दाणी सर एकदम अलर्ट झाले. त्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेतील सर्व आपत्तीकालीन यंत्रणा सुसज्जीत केल्या. या गोष्टी गुप्त ठेवायच्या असल्याने त्यांनी ठराविक सायंटिस्ट ना थांबण्याची परवानगी दिली....हा प्रयोग त्यांच्या पूर्णांश काचेच्या आच्छादन असलेल्या नवीन प्रयोगशाळेत करण्याचे ठरले...जी अग्रीकल्चरल प्रयोगांसाठी बांधण्यात आली होती. तिथे बाहेरून एक तंबू सारखे आच्छादन देण्यात आले जेणेकरून गुप्तता पाळली जावी...

गंगाने निघण्याची तयारी केली. तिने त्या बाटल्या सांभाळून व्यवस्थित बॅग मध्ये भरल्या. टाईट शर्ट, जीन्स आणि त्यावर एक लेदर कोट असा तिने पेहराव केला. काही कपडे घेतले. क्विक स्नॅक्स घेऊन गंगा आणि अविनाश निघाले बंगलोरला...

आता हालचालींना वेग आला. देवकीला पळवून काय साध्य होणार होते ते त्या शक्तींना ठाऊक...पण त्यांचे असे देवकीवर केंद्रित होणे काही काळ आपल्या मिशन नवीन टीम च्या फायद्याचे होते. अर्थात हे फक्त पुढचे छत्तीस तास....

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान चाललंय.
पुढचे भाग पण लवकर लवकर टाकलेत तर कथेचा वेग आणि पकड सैल होणार नाही.

छान....
पुढील भाग टाका पटकन...