आला रे आला कोरोना आला

Submitted by सिद्धेश्वर विला... on 16 March, 2020 - 08:38

आला रे आला कोरोना आला

कुठे राहिला तो आंदोलनवाला

दंगली साऱ्या हवेत विरल्या

देश आपसूक शांत झाला

यापूर्वी कधीही असा कुणी

घेतला नव्हता धसका

दंगेखोरांना कोरोनाने येऊन

दाखवलाय चांगलाच हिसका

रस्त्यावर उतरून साले

नाचत होते नंगानाच

कोरोनाच्या भीतीने ठेवलीय

त्यांच्या मानगुटीवर टाच

जीव घेणाऱ्याच्याच आता

पोटात गोळा आला

शांतप्रिय लोकांच्या मात्र

जीवात जीव आला

आला रे आला ,,कोरोना आला

कोरोनाच्या येण्याने मात्र भारत प्रकाशात आला

"गो कॅरोना गो कॅरोना" असं आठवले त्याला बोलला

जगभरात प्रसिद्ध झाली त्याची हरिमुखीं लाईन

कोरोना आलाय देशात खरा पण बाकी सर्व फाईन

रस्त्यावरून जरी खोकला कुणी तरी फाटते वीतभर

करोनाच्या भीतीने केलंय सर्वांच्याच मनात घर

खपले सारे कशे केव्हा याचा करा नीट अभ्यास

सूचना पाळा वैद्यांच्या , धरा मनी ध्यास

आलाय तसा जाईल तो , उगाच टेन्शन नको

ऊन आलंय आता डोक्यावरती होऊ सर्व पास

=================================

सिद्धेश्वर विलास पाटणकर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

ह्ही ह्ही ह्ही

आपण जाणकार , मी विद्यार्थी

फेल झालो बुवा

परत येईन काळजी नको

करेन डोक्याचं दही

..