Submitted by सूर्यगंगा on 13 March, 2020 - 09:06
रूद्राभिषेक विधी,त्याचे महत्व ,रूद्राभिषेकाचे प्रकार ,स्त्रिला हा विधी करता येतो का,पुजा विधी ब्राम्हनाकडूनच करून घ्यायची की स्वतःसुध्दा करू शकतो, किती वेळ लागतो इ.माहीती हवी आहे.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रुद्राभिषेक बहुतेक पुरुषच
रुद्राभिषेक बहुतेक पुरुषच करतात. रुद्रपठण कोणालाही करता येत असावे. पण जाणकार ब्राह्मण ( पुरोहित) यथाविधी करु शकतो असे वाटते. खूप छान वाटतं रुद्रपठण करताना.
रुद्राभिषेकाचे फल सुध्दा चांगले मिळते. जरुर करुन घ्या.
धन्यवाद
धन्यवाद
http://www.dattamaharaj.com/
http://www.dattamaharaj.com/%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B...
इथं सविस्तर माहिती दिली आहे.
रूद्राभिषेक विधी,त्याचे महत्व
स्त्रिला हा विधी करता येतो का
>> होय. मी स्वतः लघुरुद्राला अनेकदा बसले आहे.
गुरूजी म्हणूनही गेली आहे.
मी शिकले ते वाईचे अभ्यंकर शास्त्री लिंगभेद, जातीभेद न मानता इच्छा असलेल्या सर्वांना शिकवत. (जर देव सर्वांच्या घरी जातो तर वेद का नाही जाऊ शकत? असे म्हणायचे ते. मनापासून शिकण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाला शिकवायचे.)
विधी ब्राम्हनाकडूनच करून घ्यायची की स्वतःसुध्दा करू शकतो, किती वेळ लागतो इ.माहीती हवी आहे.
>> रुद्र म्हणता येत असल्यास स्वतः करू शकता.
15-30 मिनिटे लागतील स्पीड नुसार.
एकादष्णीही करु शकता आपली आपली. (11 वेळा)
लघुरुद्र करायचा असेल तर पुरोहितांना बोलवावे लागेल. 2.5 तास साधारण.(11*11 )
महारुद्र आणि अतिरुद्र पण करता येतो. (121*11 , 121*121)
एकदा पुरोहित बोलवून vs एकदा युटयुब वरून करून बघा. जसे अनुभव तसे ठरवा.
विषय: धार्मिक-साहित्यहितगुज ग्रूप
नानबा तुमचा व्हिडिओ असेल तर
नानबा तुमचा व्हिडिओ असेल तर लिंक द्या ना प्लीज.
लिंकबद्दल धन्यवाद परशुरामजी
लिंकबद्दल धन्यवाद परशुरामजी,खुप छान माहीती आहे तिथे.
धन्यवाद नानबा. रूद्राभिषेक
धन्यवाद नानबा. रूद्राभिषेक केवळ शिवशंकराचा करता येतो की इतर देवांचा पण करतात.
रुद्र म्हणजेच महादेव. म्हणून
रुद्र म्हणजेच महादेव. म्हणून फक्त शंकराच्या पिंडीवर रुद्राभिषेक करत असावेत.
पुण्यात असाल तर वेदमूर्ती डॉ.
पुण्यात असाल तर वेदमूर्ती डॉ. नित्यानंद देशमुख यांना भेटा. हवा असेल तर व्यक्तिगत संदेशातून त्यांचा मोबाईल नंबर देतो.
अनंत छंदी धन्यवाद ,पण मी
अनंत छंदी धन्यवाद .मी पुणेची रहीवासी नाही.
रूद्राभिषेक केवळ शिवशंकराचा
रूद्राभिषेक केवळ शिवशंकराचा करता येतो की इतर देवांचा पण करतात.
>> maruti, swami samarth ase je shankarache awatar samajale jatat tyanchahi karatat.
Rudra cha arth samajun ghya. Net var translation asel. Arthavar chintan Kara. Ek vyapak arth samor yeil. Itar devana karayala harakat nahi he maze mat tyatun alele ahe.
@parashuram - maza video nahiye.
धन्यवाद @ नानबा. मी रुद्रपाठ
धन्यवाद @ नानबा. मी रुद्रपाठ करतो पण लयीत जमत नाही. शब्द अडखळत नाहीत पण श्वास पुरत नाही सलग म्हणायला. पण खूप खूप छान वाटते म्हणायला. भगवान शंकर हे माझं इष्ट दैवत आहे.
धन्यवाद नानबा
धन्यवाद नानबा