सरमिसळ एक भयंकारी रोमांच भाग पंधरा कोण प्यादे? बकुळा की त्या दुष्ट शक्ती?

Submitted by मुक्ता.... on 10 March, 2020 - 15:53

सरमिसळ एक भयंकारी रोमांच भाग पंधरा

कोण प्यादे? बकुळा की त्या दुष्ट शक्ती?

 " होय सर...बरोबर आहे तुमचं. यात आपल्याला काही एक्सपर्टस ची मदत घ्यायला लागणार आहे. अविनाशने सगळं वर्क आऊट केलं आहे. तो आल्यावर सांगेलच. पण आता त्या काचेजवळ जाऊ नका. इट्स रेड कलर लाईट , जो हल्ला करतोय म्हणजे आत येण्यासाठी त्यांनी काही सोल्युशन काढलं आहे. मला प्रश्न पडला होता कि हा शांत का आहे...बट  सर हिरवा इज डेस्परेट, कारण इट इज ऑफ हाय फ्रिक्वेन्सी आणि लाल हा कमी फ्रिक्वेन्सीचा आहे....लाईट च्या स्पेक्ट्रम चा विचार केला तर. डॉक्टर ही सॅम्पल्स जी तुम्ही पाहिलीत ती आता मी माझ्या ऑफिशिअल लॅब मध्ये पाठवणार आहे. पण धोका एकच आहे. की या शक्ती प्रकाशाच्या वेगाने धावतात.  त्यामुळे मी जर निघाले तर ते मला जिवंत पोचू देणार नाहीत. मला ना माझ्या जीवाची पर्वा नाही डॉक्टर बस्स हे तिथे बंगलोरला पोचलं पाहिजे.....लवकरात लवकर........"

डॉक्टर ऐकत राहिले. खूप धीरगंभीर आणि शांत माणूस. गंगाची ही प्रतिज्ञा ऐकून त्यांना भीष्म आठवले. काय योगायोग, ते गंगापुत्र आणि ही खुद्द गंगेचं नाव सार्थ करणारी.डॉक्टर स्वतःशीच हसले. महाभारत किती युगांचं सार आहे यात. आता इथे प्रत्येकाला कृष्ण व्हावं लागणार. भयभीत अर्जुन ऐन रणांगणावर हात पाय गाळून त्या परब्रम्हासमोर नतमस्तक झाला. आणि त्यातून गीतेचा जन्म झाला. डॉक्टरनी मान हलवली. आणि नवीन कडे पाहू लागले. ज्याच्या पासून हे सुरु झालं..तो काहीच का हालचाल करत नाही..प्रयत्न करत नाही? याच्या या कमकुवत मनाचा भित्रेपणाचा गैरफायदा या दुष्टांनी घेतला. ती देवकी होती म्हणून तरला तरी..आणि आता वत्सल ढाल म्हणून उभी आहे...ते काही नाही आता नवीनची कान उघाडणी करायलाच हवी होती.
पुढचे काही क्षण शांततेत गेले. रात्र काय आणि दिवस काय आता फक्त एकच टार्गेट या संकटातून बाहेर पडणे. हे रहस्य त्याच्या मुळापासून जाणून घेणे. प्रत्येक माणसाची नेमणूक कुठल्या ना कुठल्या चांगल्या किंवा वाईट कामाकरता झालेली असते.फक्त त्याची जाणीव होणे गरजेचे असते. इथे तसाच झालं होत. आता प्रत्येकाच्या जाणिवा हळू हळू जागृत होत होत्या.अवकाश होता तो देवकी अन नवीन यांच्या आत्म जागृतीचा. 

"काय नवीन....कसा आहेस रे....?" नवीनने डोळे उघडले. काचेवर आवाज झाल्यापासून नवीन एका कोपऱ्यात जाऊन बसला होता सर्वांग दुमडून. चोरट्या नजरेने त्याने डॉक्टरांकडे बघून कसेनुसे तोंड केले..." ठीक ठिकाय ...तुम्ही ब ब बघताय ना...ते मला मारायला येतात सारखे.....माय पण आता काही करू शकत नाहीय....ते ते जिंकतील..मी मी मला घेऊन जातील..."

" नवीन. अरे असं काही बोलू नकोस रे...." देवकी कळवळली.....

आता मात्र डॉक्टर चिडले.....पण त्यांनी संयम  ठेवला." "बस्स नवीन, आणखीन किती दिवस स्वतःला हे असं भीतीच्या कोशात बंदिस्त ठेवणार आहेस? एकदा कळलय ना की आपल्या याच भीतीचा फायदा या सगळ्यांनी घेतलाय मग त्यावर मात नको का करायला? अरे त्या देवकी कडे पहा जरा..आणि तुझी माय...प्राण पणाला लावलेत तिने. इतके दिवस तुला त्या गर्तेत लोटायच नाही म्हणून त्या माउलीने तुला काही कळू दिलं नाही. पण हिप्नॉटिझम च्या ट्रीटमेंट नंतर तू बऱ्यापैकी त्या शक्तीच्या प्रभावातून बाहेर आला आहेस. नवीन, त्यांनी देवकी वर बाहेर, ऑफिसमध्ये जाताना अगणित हल्ले केले, मला मारण्याचा प्रयत्न केला,त्या गंगाला त्या पोरीलाही सोडलं नाही, पण कुणी घाबरलं नाही.मैं तुम्हारी हिस्ट्री जानता हुं. कोई भी टुट जाता,जैसे तुम हो गए...लेकीन कब तक इस डर को लेकर बैठोगे? वत्सल चाची कडे बघ अरे या पोरी बघ, जान दाव पे लगा रखी है...और तुम? असाच बघत रहाणार का? और कितना, सब अब आगे बढ चुका है...सब मिट्टी मे मिल जायेगा नवीन, वो सबको खतम करेंगे अगर एक भी गलती हुई...और सबसे बडी गलती तो अंदरोनी डर है...निकालकर फेंक दो नवीन, कमऑन नवीन, बी ब्रेव, हम सब साथ मिलकर मुकाबला करेंगे...मग त्यांचं काहीच चालणार नाही..आणि एक लक्षात ठेव, एक तुझाच नाही अनेकांचा जीव धोक्यात आहे...फक्त विश्वास आणि हिम्मत एवढंच एक संरक्षण आहे...."

नवीन ताडकन उठला, देवकी पण एकदम भांबावली...नविनने डॉक्टरना मागे ढकललं आणि नंतर एकदम त्याने देवकीला मिठी मारली,नि रडायलाच लागला..सगळ्या भावना जणू चार विश्वे एकत्र करून वाहू लागल्या नविनच्या मनातून... कसे रिऍक्ट व्हावे कुणालाच कळेना....पण बाय डिफॉल्ट सगळे गप्प बसले आणि एकटा नवीन हमसून रडत राहिला कितीतरी वेळ....जणू आतला जुना नवीन सम्पून 'नवीन' नवीन जन्माला येणार होता.

इकडे बकुळा ,दोन मांजरी त्या भयाण गुहेत परत आल्या...नवीन च हे रडणं त्यांना आवडलं नव्हतं..
लाल शक्तीने मांजराचे शरीर टाकलं....बाहेर आली...बकुळा भोवती प्रकाशाच्या वेगाने घिरट्या घालायला सुरुवात केली....बकुळाला कळेना काय चाललंय.....आधी लांबून आणि आता जवळून तिच्या अंगाच्या अगदी जवळून...

"आ....आ....आर मी आता काय क्येलय? पण तिचा आवाज तिलाच कळत नव्हता"
बकुळाला काहीच कळत नव्हतं, की हे काय चाललं आहे. तिला अजूनही आपण या दोघांचा आपल्या पद्धतीने वापर करतोय अस वाटलं. नवीन आणि त्याच्या सम्पूर्ण कुटुंबाला संपवलं की तिचा उद्देश सफल होणार होता. बाकी तिची काही मनीषा नव्हती म्हणजे नसावी...कदाचित...पण ते दोघे प्रकाश मय? त्यांचं काय? वत्सल आणि तीच कुटुंब एव्हढच त्यांचं उद्दिष्ट असेल का याचा भरवसा वाटत नव्हता. याच कारण गंगाच्या प्रयोगात दिसलेल्या गोष्टी...असो...
बकुळाचं शरीर काळं पडायला लागलं, आणि अंगावरची स्किन सोलून निघायला लागली जणू धगधगत्या भट्टीत तिला कुणी लोटलं असावं..आता तर तिच्या तोंडून काही शब्दही फुटले नाहीत...पण तिला एका गोष्टीची जाणीव नक्कीच झाली....की हे दोघे हिरवे आणि लाल प्रकाशमान जीव आपल्या आवाक्याबाहेर जाऊ लागलेत...बकुळा तडफडायला लागली होती...
बकुळा निश्चल झाली. तस त्या लाल प्रकाश शक्तीने तिला सोडलं. अवघ्या अर्ध्या मिनिटाच्या काळात तिची ही अवस्था त्या दुष्टाने केली. म्हणतात ना करावे तसे भरावे...आता तरी बकुळाचं मन सूडाच्या आगीतून बाहेर आलं होतं का? तिलाच ठाऊक....

पहाट व्हायला काही अवधी बाकी होता. इकडे नविनच्या दहाव्या मजल्यावरील घराच्या खिडकीबाहेर काही मोठे दगड जमा झाले होते. वेगळेच तुकतुकीत दगड होते ते. त्या लाल शक्तीच्या सांगण्यावरून बकुळानेच ते काचेवर मारले होते.जेणेकरून ती काच फोडून त्यांना आपले इप्सित साध्य करता येईल. याचा अर्थ आता वत्सलची सात्विकता त्यांना फार काळ थांबवणार नव्हती, नक्कीच.
इकडे नवीनच घर जिथे ,ज्या भागात होतं तिथे कुजबूज सुरू झाली होती. आता हे प्राणघातक थैमान सगळ्यांनी थोडंफार बघितलं होतं. त्या भागात अचानक तापमान वाढणे, अचानक जमिनीला हादरे बसणे, आकाशात अचानक लाल आणि हिरव्या प्रकाशाची तिरीप दिसणे असले प्रकार वाढले होते. पण सध्या काही ठराविक लोकांना ते दिसत होते.

त्या अंधाऱ्या गुहेतून चेकाळत आणि विचित्र शाब्दिक चित्कार येत होते...कितीतरी वेळ.....बकुळा निपचित होती...आणि ती दोन मांजरं एकमेकांशी विक्षिप्त चित्कार करत भांडत होती का बोलत होती त्यांनाच माहीत...अचानक दोघेही त्या गुहेतून सपकन बाहेर पडले, त्या मांजराची शरीरं तिथेच टाकून...पारगावातून विजेच्या वेगाने आकाशाकडे झेपावले...त्या दिवशी ऐन रात्री परगावच आकाश हिरव्या नि लाल विजेचे लोळ असावे तसे दिसंत होते. रात्री मधेच काही आन्हिक उरकायला कुणी बाहेर आलं तर त्यांनी हे दृश्य पाहिलं आणि त्याची भितिने बोबडी वळली असणार.कदाचित या घटना सध्या पारगावच्या आकाशापुरत्या मर्यादित असाव्यात किंवा काही मोठा उत्पात घडवण्यासाठीची मोठी तयारी......आणि नवीनच्या घराभोवतीचा परिसर. आतापर्यंत कोणताही मीडिया हाऊस किंवा पोलीस प्रशासन यांच्यापर्यंत हे पोचलं नव्हतं. 

तिकडे बकुळा निपचित पडली होती त्या अंधाऱ्या गुहेत एक विचित्र शांतता पसरली होती. जणू ती शांतता बकुळावर खदाखदा हसत होती. आणि खिजवत होती...ज्यांच्या जोरावर बकुलाचा सूडाग्नी अवलंबून होता त्यांनी तिला पुन्हा एकदा अतिशय वेदनादायक अवस्थेत सोडले होते. इतके दिवस त्या प्रकाश शक्तींना बकुळा नियंत्रित कर होती. अगदी त्यांना मांजराचं शरीर मिळवून देण्यापासून ते शांता आणि नवीन सारखे निष्पाप जीव, त्यांचं आयुष्य उध्वस्त केलं होत..आपल्या सुडाचे मनसुबे रचले होते..कैक वर्ष आयुष्याची फक्त पाप करण्यात लोकांना लुबाडण्यात आणि देशोधडीला लावण्यात तिने नष्ट केली होती...या शक्ती तिला नक्की अपघातानेच भेटल्या का त्यांनीच तिचा शोध घेतला हे वास्तविक त्यांच्याकडूनच उलगडू शकेल..कारण त्या भयानक एकाकि जागेत नक्की काय घडलं....कोण आहेत या प्रकाश शक्ती? त्यांच्या स्पर्शाने दंशाने नक्की काय घडणार होतं त्यांना केवळ काच का मर्यादित करू शकत होती? गायत्री मंत्र , महामृत्युंजय , वत्सल यांचा काय परिणाम त्यांच्यावर होत होता?  खरतर त्यांना नष्ट करण्याचा मार्ग म्हणजेत्या लवलवत्या प्रकाश शक्तींना नष्ट करण्याचा मार्ग नक्कीच बकुळाला माहित होता आणि त्यांना सतत ऊर्जेचा पुरवठा बकुलाच करत होती मग...बकुळाला त्यांनी एव्हढी भयंकर जीवाला बेतणारी इजा त्या दोघांनी का केली असेल? आता तरी याचा अंदाज लावणं कठीण होतं .

" डॉक्टर साहेब हाऊ कॅन यु टॉक टू  नवीन लाईक थिस ? तुम्हाला त्याच अवस्था माहित आहे तरीही तुम्ही ......माझा विश्वास बसत नाहीय..आताची वेळ त्याला [रागावण्याची नाही......अनबिलीव्हेबल ......हुह " देवकी उद्वेगाने म्हणाली.....

"बट देवकी....बेटा मेरी बात समझनेकी कोशिश करो....ये नवीन ऐसाही रहेगा....बस तुम और उसकी माँ .....बचाते रहो...."

"प्लिज डॉक्टर आप कुछ ना ही कहें तो अच्छा........" देवकी चिडून म्हणाली. इतका वेळ आपल्याच विचारात असणारी गंगा एकदम गडबडून उभी राहिली.....देवकीचा आवाज एकदम चढलेला तिने पहिल्यांदाच ऐकला.....डॉक्टर स्मितहास्य करत होते....ते पाहून सायकॉलॉजि शिकलेली गंगा समजली कि ते रिव्हर्स सायकोलॉजी चा वापर करत आहेत. जे अतिशय आवश्यक होतं...देवकीच्या इरिटेट होण्याने तो परिणाम साधला जाण्याची शक्यता वाढली होती........

इकडे खिडकीशी पुन्हा शांता निशब्द बसलेली आणि वत्सल आत्या ध्यानाच्या त्याच अवस्थेत पुन्हा तिच्या समोर आल्या.....या खेपेला आणि कुणाचा तरी वावर तिथे होता....वत्सलने शांताच्या खांद्यावर हात ठेवला आणि वत्सलच्या खांद्यावर ..........कोण?

क्रमश:

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परग्रहावरील लोकांचं संबंध असावा लाल आणि हिरवी प्रकाश कण म्हणजे, त्यांना पृथ्वीवर राज्य करायचं असेल, सुरुवात नवीन च्या घरापासून. Aliens type Lol

Shitalkrishna अंदाज बांधाच, पुढच्या भागामध्ये रहस्य उलगडणार आहे....
पुभावाप...अर्थात पुढच्या भागाची वाट पहा

Pudhacha bhag taka ho. Nahitar asa kara, sagale bhag lihun magach ethe post kara. Khup interesting ahe. Maja yetey vachatana
. Aliens asatil asa tari vatatay.. pn mukta ji twist ananyat patait ahet..so.. waiting for next part..

मस्त वेगात चालू आहे कथा... बऱ्याच वेळा प्रतिसाद देणे जमले नाही. पण उत्सुकता ताणली गेलीय भरपूर. लवकर टाका पुढचा भाग.

परग्रहावरील लोकांचं संबंध असावा लाल आणि हिरवी प्रकाश कण म्हणजे, त्यांना पृथ्वीवर राज्य करायचं असेल, सुरुवात नवीन च्या घरापासून. Aliens type Lol>>>>>>>>>>>>>>>>मला ही तसेच वाटत आहे.. बाकी कथा खूप सस्पेन्सिव होत चालिये.. उत्कंठा वाढतिये