न कमावणारया बायकांना कोणते अधिकार असावेत वा नसावेत?

Submitted by ऋन्मेऽऽष on 9 March, 2020 - 06:35

विविध मतप्रवाहांचा खळखळता झरा असणारया मायबोलीवर आज एका धाग्यावर वाचनात आले की न कमावत्या बायकांना घरखरेदीवेळी ते कुठे कसावे, केवढे असावे वगैरे निवडीचा अधिकार नसावा. त्यांच्या कमावणारया नवरयालाच सर्वस्वी हा निर्णय घ्यायचा अधिकार आहे.

यानिमित्ताने न कमावणारया बायकांना कायद्यानुसार वा नैतिकतेनुसार नेमके कोणते अधिकार बहाल करावेत वा कितपत निर्णयस्वातंत्र्य द्यावे हे जाणून घेण्यास ऊत्सुक.

१) घरखरेदी
२) घराचे ईंटरिअर डेकोरेशन
३) गाडी खरेदी
४) वैयक्तिक दागिने आणि कपडे खरेदी
५) किती अपत्ये असावीत/ नसावीत. शिक्षणाचा आणि एकूणच मुलांच्या पालनपोषणाचा वाढता खर्च पाहता हा फार मोठा मुद्दा आहे.
६) मुलांना कोणत्या शाळेत टाकावे वा मुलांसंबंधित एकूणच आर्थिक बाबींशी निगडीत निर्णय.. जसे की डायपर वापरावा की लंगोट? बेबी सोप वापराव की लाईफबॉय? व्गैरे वगैरे एकूणच...

ईथवर पोस्ट लिहून झाल्यावर लक्षात आले की असे शंभर आकडे लिहू शकतो आणि तरीही बरेच काही शिल्लक राहावे. त्यामुळे जनरलच चर्चा करूया.

आमच्या घरात देखील बायको तुर्तास न कमावती आहे. जर मी उगाचच तिला जास्त अधिकार दिले असतील तर धाग्यावरील चर्चेचा रोख पाहून ते कमी करता येतील Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धागा सारकॅस्टिक आहे का ? कारण आधीच्या त्या धाग्यावर खूपच समजूतदार आणि उलट मतं मांडली आहेत धागालेखकाने ...

धागा सारकॅस्टिक आहे का ? कारण आधीच्या त्या धाग्यावर खूपच समजूतदार आणि उलट मतं मांडली आहेत धागालेखकाने ...
Submitted by radhanisha on 9 March, 2020 - 22:24
>>>>>>>

सुभान अल्लाह ! सुरेख निरीक्षण !!
वावे यांनीही असाच एक ॲंगल त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलेला.

धाग्याच्या हेडरमध्ये जे मुद्दे आहेत ते चर्चेचे मुद्दे आहेत. माझे विचार नाहीत. माझे विचार त्या धाग्यावर लिहिले आहेत. आणि माझे प्रत्यक्ष जीवनातले आचरण तर त्याहीपेक्षा भन्नाट आहे. विचारू नका. स्वतंत्र धागा काढावा लागेल.

पण हा धागा सर्कास्टिकलीसुद्धा काढला नाहीये. माझ्या विचारांशी मेळ खाणारा का नसेना हा समाजात आढळणारा एक विचार आहे तो त्याच्या दृष्टीकोणातून समजून घ्यायचा एक प्रयत्न आहे. प्रतिसादातही मी या विचाराची वकिली करत नसून त्या दृष्टीकोणातून विचार करून बघतोय. येणारया प्रतिसादांतही करेन.

पण आज नाही ऊद्या... आज होळी, रंग बरसे, मध्यरात्रीची आंघोळ आणि मग मांसाहारी जेवण वगैरे एकूणच डोळे जड झालेत. सुस्ती आलीय. त्यात उद्याही धूलिवंदन खेळणे बाकी आहे. तर लवकर झोपेन म्हणतो, शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज ! Happy

वरती ब-याच जणांनी लिहिल्याप्रमाणे धाग्याचा विषय काईच्या काई आहे. कुटुंबात (घरात) राहणा-या सर्व चे मत विचारात घेणे जरूरी चे आहे व सारासार वि्चार करून निर्णय घ्यावा. (अर्थात असे सर्वांना जमेलच असे नाही, कुटुंबात एखादा डोईजड सदस्य असल्यास त्याचेच म्हणणे प्रमाण मानले जाते , इतरजण री ओढतात व निर्णय कालौघात विपरित सिद्ध झाल्यास गप्प बसतात किंवा गिरे तो भी टांग उपर करतात . त्यामुळे प्रत्येक ने परिस्थिति नुरूप निर्णय घ्यावा )

BTW @धागाकर्ता
मला थोडा वेगला प्रश्न आहे. जर पुरुष हा घरात एकमेव कमावता असेल तर त्याला कितपत अधिकार असावेत?
कींवा बायको / कुणीही स्त्री कमावणारी आहे परंतु घरात contribution nil असेल तर काय निकष असावेत?

न कमावणार्या पुरुषाना जे असावेत किंवा नसावेत तेच!
>>>
न कमावणारया पुरुषांना जगण्याचाही अधिकार नसतो. त्यांचे हाल कुत्रा खात नाही. माझाच मागे एक धागा होता. आपल्याकडे पुरुषांवर कमवायचे दडपण असते का? एकदा नजरेखालून घालावा ही विनंती.

https://www.maayboli.com/node/72167

>>>>>>>>न कमावणारया पुरुषांना जगण्याचाही अधिकार नसतो. त्यांचे हाल कुत्रा खात नाही. >>>>>> हे सरसकटीकरण आहे.

तुम्ही भांडत बसा, तो गंमत बघत बसतो.>>> तोच तर त्याचा मनसुबा आहे.
मुळात त्याला मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर तो देत नाही आणि तो देणार नाही हे मला माहित आहे. कारण मग पुर्ण धागाच गंडतोय.

मुळात त्याला मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर तो देत नाही आणि तो देणार नाही हे मला माहित आहे.
>>>>

सर मी काल संध्याकाळपासून कोणाच्याही प्रतिसादांना ऊत्तर दिले नाहीये. कारण होळी आणि रंगपंचमी. आधी आपले सण साजरे करूया, हिंदू संस्कृती जपूया म्हटले Happy
उद्या तुमचा प्रश्न काय आहे तो शोधतो आणि त्याला पहिले ऊत्तर देतो मग तर झाले ...

>>>>>>>>न कमावणारया पुरुषांना जगण्याचाही अधिकार नसतो. त्यांचे हाल कुत्रा खात नाही. >>>>>> हे सरसकटीकरण आहे.
>>>>

या न्यायाने दरवेशाने अस्वलला जगायचा हक्क दिला हे देखील सरसकटीकरण झाले ना Happy

असो,
मी जे वर लिहिलेय त्याचे प्रमाण किती टक्के असावे असे तुम्हाला वाटते? ९० टक्के केसेसमध्ये तसे होत असेल तर सरसकटीकरण करायला हरकत नाही असे मला वाटते.

कारण होळी आणि रंगपंचमी. आधी आपले सण साजरे करूया, हिंदू संस्कृती जपूया म्हटले
>>> नास्तिक असून हे सगळे?

नास्तिक असून हे सगळे?
>>>
म्हणून तर स्माईली टाकली आहे पुढे Happy
मी देव धर्म मानत नाही. त्यामुळे सण मी संस्कृती जपायला नाही तर आनंदासाठी साजरे करतो. लोकं एकत्र येतात आणि सण साजरा करतात हा कुठल्याही धर्माचा वा संस्कृतीचा सर्वात महत्वाचा भाग आहे. मला आवडते हे. टिळकांनी गणेशोत्सव याचसाठी तर सुरू केला. त्यामुळे जिथे स्कोप असतो ते सर्व सण साजरे करतो, मग यात ख्रिस्ती धर्माचा नाताळही आला. पोरं लहान असल्याने मजा येते तो साजरा करायला. तर मुसलमानांच्या रमझान ईफ्तार पार्टी आणि ईदलाही खाण्यापिण्याची चंगळ असल्याने ते सुद्धा आवडते.

जेव्हा बाहेर काम न करणार्‍या पुरुषांचे हाल कुत्रा खात नाही म्हणताय तेव्हा हे लक्षात घ्या की पुरुषांनाच इगो असतो, अरे मी काम केलं पाहीजे, मी बसून राहीलोय, माझी किंंमत काडीचीही राहीलेली नाही. वगैरे.
यात स्त्रीने त्यांना टोमणा मारलेला नसतो. समाजाचा दबाव असतो.
_______________
जेव्हा अस्वल-दरवेशी परिस्थिती असते तेव्हा पुरुष बायकोच्या प्रत्येक हक्काची पायमल्ली करुन तिला मनासारखे वागायला भाग पाडत असतो. हे जे बारीक सडपातळ दिसण्याचे खूळ आहे तेही - "तू अदॄष्य हो, दुर्बळ रहा, खाऊ नकोस की लेऊ नकोस " अशी सुप्त इच्छा दाखवतं असं मला वाटतं. ही विकृती आहे. तिला करीयरचे कसलेही निर्णय घेण्याचे अधिकार नसतात. सरसकटीकरण नाहीये ही वस्तुस्थिती आहे.
काही काही बायकांना नवरे नीट कपडे, गजरे, केसात फूल घालून बाहेर जाउ देत नाहीत का तर मालकीहक्क. बस्स! तू तुझ्या हौशी मारायच्या.

जेव्हा बाहेर काम न करणार्‍या पुरुषांचे हाल कुत्रा खात नाही म्हणताय तेव्हा हे लक्षात घ्या की पुरुषांनाच इगो असतो, अरे मी काम केलं पाहीजे, मी बसून राहीलोय, माझी किंंमत काडीचीही राहीलेली नाही. वगैरे.
यात स्त्रीने त्यांना टोमणा मारलेला नसतो. समाजाचा दबाव असतो.

>>>>>

हे पुन्हा सरसकटीकरण झाले Happy

जरा मूळात जाऊया..
स्टेप बाय स्टेप ऊत्तर शोधूया..
पहिला प्रश्न
पुरुषांचा ईगो असे जे आपण सरसकट म्हटले आहे त्याची उत्पत्ती पुरुषांमध्ये कशी होते? विचार करा आणि ऊत्तर द्या ..

हे असे , हा अधिकार माझा आहे , तुझा आहे , असले प्रत्यक्षात घडत नसते.
पाणी जसे ज्यास्त उंचीकडून कमी उंचीकडे नैसर्गिकपणे वाहाते तसेच सगळीकडे असते.
जो निर्णयक्षम असतो , निर्णय घेण्याचा वकूब ज्याच्याकडे असतो , निर्णय घेण्याचा आत्मविश्वास ज्याच्याकडे असतो ... त्याच्याकडेच निर्णयासाठी पाहिले जाते. तो आपोआपच कुटुंबासाठी त्यांच्या वतीने निर्णय घेत जातो आणि ते बाकिच्यांकडून बिनबोभाटपणे स्वीकारलेही जातात.
मग ती स्त्री आहे का पुरूष हे प्रश्ण गौण होतात. तो कमावणारा आहे का नाही हा प्रश्णच उद्बवत नाही.

आता त्यांना जर मोबदला दिला जातो तर त्या न कमावणारया कश्या हे मला पुन्हा एकदा सांग.
Submitted by जिंदादिल. on 9 March, 2020 - 20:16

>>>>>

जिंदादिल हाच तुमचा रामबाण प्रश्न का?

अहो कमावणारया नवरयाने दिलेला मोबदल्याला तुम्ही कमावणे बोलत आहात का? म्हणजे हा मोबदला ती बाई (बायको) किती उत्कृष्ट काम करतेय यावर नाही तर नवरा किती कमावतोय आणि त्यातले किती बायकोवर खर्च करतोय यावर ते ठरेल. हे म्हणजे तुम्ही ती बायको नवरयावरच विसंबून आहे हेच सांगत आहात.

जो निर्णयक्षम असतो , निर्णय घेण्याचा वकूब ज्याच्याकडे असतो , निर्णय घेण्याचा आत्मविश्वास ज्याच्याकडे असतो ... त्याच्याकडेच निर्णयासाठी पाहिले जाते. तो आपोआपच कुटुंबासाठी त्यांच्या वतीने निर्णय घेत जातो आणि ते बाकिच्यांकडून बिनबोभाटपणे स्वीकारलेही जातात.

>>>>>

सिरीअसली? एकत्र कुटुंबाचे सोडा. किती नवराबायकोंमध्ये एक जोडीदार दुसरया जोडीदाराला दोघांच्या वतीने हवे ते निर्णय घ्यायची स्वत:हून मुभा देत असेल?

सगळे असावेत की. फक्त नीट चर्चा करुन निर्णय घ्यावेत, शक्यतोवर मध्यम मार्ग काढावा. समजा घरासाठी काही मोठी खरदी आहे आणि घरातील कमावणार्‍या व्यक्तिला त्यामुळे बजेटवर ताण येईल असे वाटले तर त्याने जरूर ते नमुद करावे. पैशाचे सोंग आणु नये. हे दोघे कमवत असताना पण होतेच. शेवटी एकत्र नीट नांदताय तर आपोआप दोघे मिळुन निर्णय होतात, व्हावेत.

अहो कमावणारया नवरयाने दिलेला मोबदल्याला तुम्ही कमावणे बोलत आहात का? म्हणजे हा मोबदला ती बाई (बायको) किती उत्कृष्ट काम करतेय यावर नाही तर नवरा किती कमावतोय आणि त्यातले किती बायकोवर खर्च करतोय यावर ते ठरेल. हे म्हणजे तुम्ही ती बायको नवरयावरच विसंबून आहे हेच सांगत आहात.>>>
कितीही कोलांट्या उड्या मार. ती श्रम करते आणि तिला जो काहीही मोबदला मिळतो म्हणजेच ती कमावती आहे.
आता बाळा पुन्हा एकदा सांग बघू. ती न कमवणारी कशी?

BLACKCAT
<<कुठलीही मिळवती बाई माझे स्वप्न पूर्ण करील तर मी तिचे नाव व आडनाव लावून आनंदाने वावरीन. दक्षिणद्वार काय , मी इग्लु मध्ये सुद्धा राहीन व सरपटत घरात शिरीन.>> हे घडतं आहे आता, जसे आता love marriage common वाटते तसें मात्र नाही. तसें सर्रास घडायला काही वर्ष लागतील.
नुकतेच नातेवाईकांमध्ये एकजणाने असे लग्न केले. मुलीचा स्वतःचा flat आहे पुण्यात, स्वबळावर घेतलेला, अर्धे emi झालेत. हा job ला 4-5 वर्ष झाली पुण्यात. मराठी मॅट्रिमोनी site वर दोघे भेटले 15 दिवसात लग्न झाला. हा गेला तिझ्या flat वर राहायाला त्याची बॅग घेऊन जश्या मुली जातात.

नवीन Submitted by जिंदादिल. on 12 March, 2020 - 10:50

>>>

एखाद्या दुकानाबद्दलचा निर्णय घेण्याचा अधिकार मालकाला असतो की नोकराला?
एखाद्या कंपनीबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार बोर्ड ऑफ डिरेक्टर्सना असतो की ऑफिसस्टाफला?
जर बायकोला मोबदला नवरा देणार असेल तर तो घराचा मालक आणि ती नोकर झाली ना? मग घरासंबंधीचे निर्णय घेण्याचा अधिकार नवरयाला आला की बायकोला?

वर मी दिलेल्या उदाहरणातील दुकानातील नोकर आपल्या घरासाठी कमावता आहे. तो आपल्या घरी जाऊन घरासंबंधित हवे ते निर्णय घेऊ शकतो पण दुकानासंबंधित निर्णय घ्यायचा अधिकार दुकानातील मालकालाच. तो मालकाला म्हणू शकतो का मी पण या दुकानात श्रम करून कमावतो मलाही तुमच्याईतकेच अधिकार हवे?

ना बाप बडा ना भैय्या सबसे ब्डा रुपय्या.. थोडं वाईट वाटेल पण टेक्निकल आणि प्रॅक्टीकल विचार हाच राहील.

Submitted by ShitalKrishna on 12 March, 2020 - 13:38
>>>>
माझ्याही एका मित्राने असे केलेय. ऑनलाईन ईंदोरची मुलगी पटवली. लग्न केले. आता तिच्याच बिल्डींगमध्ये तिच्या वडीलांनी घेतलेल्या फ्लॅटमध्ये दोघे राहतात.
मजा म्हणजे तो मुलगा अनाथ होता. काकाकाकूंसोबत राहायचा. बारावीला दोनचार गटांगळ्या खाऊन पास झालेला आणि शिक्षण सोडलेले. एकदोन ठिकाणी या शिक्षणाला साजेसे जॉब करून झालेले. लग्न झाले तेव्हा कुठेही जॉबला नव्हता. थोडक्यात काही फ्युचर नव्हते. पण आता मात्र फेसबूक ईन्स्टावर दोघांचे मौजमजेचे फोटो टाकून ईतर समवयीन लोकांचे हृदय जाळत असतो.
त्यांच्यात निर्णय घेण्याचे अधिकार कोणाला किती आहेत याची कल्पना नाही. असो आपल्याला काय..

पैसे न कमावणारया बायकांना खरंतर कसलेच अधिकार नसावेत.
एकतर पैसे कमावत नाहीत. घरी सगळंच - अन्न वस्त्र निवारा इतर सुखसोयी फुकट मिळतात.
त्याबदल्यात घराकडे मुलांकडे थोडं लक्ष दिलं जातं. त्यामुळे आधीच गृहिणी गृहिणी करुन नको तेवढं महत्व दिलं जातंय.
आणि वर ज्यात त्यात त्यांचे निर्णय, सुचना कशाला विचारात घ्यायच्या? त्यांच्या सुचनांमुळे आलेला जास्तीचा खर्च त्या उचलणार आहेत का?

लोक गंभीरपणे चर्चा करत आहेत हे पाहून रुन्मेष यांना मायबोलीचे इंजिन हा पुरस्कार दिला जावा असे सुचवतो

सस्मित, तुमचा आयडी हॅक तर नाही ना झाला? Wink

Submitted by सायो on 12 March, 2020 - 22:20
Pages
« सुरुवात< मागे१

कदाचित त्यांनी उपरोधाने लिहिले असावे....
माझे स्वत:चे सदतीस टक्के लिखाण असेच असते..

Pages