न कमावणारया बायकांना कोणते अधिकार असावेत वा नसावेत?

Submitted by ऋन्मेऽऽष on 9 March, 2020 - 06:35

विविध मतप्रवाहांचा खळखळता झरा असणारया मायबोलीवर आज एका धाग्यावर वाचनात आले की न कमावत्या बायकांना घरखरेदीवेळी ते कुठे कसावे, केवढे असावे वगैरे निवडीचा अधिकार नसावा. त्यांच्या कमावणारया नवरयालाच सर्वस्वी हा निर्णय घ्यायचा अधिकार आहे.

यानिमित्ताने न कमावणारया बायकांना कायद्यानुसार वा नैतिकतेनुसार नेमके कोणते अधिकार बहाल करावेत वा कितपत निर्णयस्वातंत्र्य द्यावे हे जाणून घेण्यास ऊत्सुक.

१) घरखरेदी
२) घराचे ईंटरिअर डेकोरेशन
३) गाडी खरेदी
४) वैयक्तिक दागिने आणि कपडे खरेदी
५) किती अपत्ये असावीत/ नसावीत. शिक्षणाचा आणि एकूणच मुलांच्या पालनपोषणाचा वाढता खर्च पाहता हा फार मोठा मुद्दा आहे.
६) मुलांना कोणत्या शाळेत टाकावे वा मुलांसंबंधित एकूणच आर्थिक बाबींशी निगडीत निर्णय.. जसे की डायपर वापरावा की लंगोट? बेबी सोप वापराव की लाईफबॉय? व्गैरे वगैरे एकूणच...

ईथवर पोस्ट लिहून झाल्यावर लक्षात आले की असे शंभर आकडे लिहू शकतो आणि तरीही बरेच काही शिल्लक राहावे. त्यामुळे जनरलच चर्चा करूया.

आमच्या घरात देखील बायको तुर्तास न कमावती आहे. जर मी उगाचच तिला जास्त अधिकार दिले असतील तर धाग्यावरील चर्चेचा रोख पाहून ते कमी करता येतील Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रिटायर्ड झाल्यावर आणि मुलगा कमावू लागल्यावर( सुना आल्यावर) आपल्याकडे कोणते अधिकार असावेत असे वाटते, ते आधी पुरूषांनी आपल्या न कमावत्या बायकोला आधीच देऊन टाकावेत. कारण हे सर्व पाहतच मुलगा मोठा होत असतो.(आणि तुमच्या लाडक्या लेकीसुद्धा)

न कमावणारया बायकांना????? म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे.
दिवसभर घरासाठी राबून ज्यांना काहीच आर्थिक मोबदला मिळत नाहीत त्यांच्या बद्दल म्हणताय काय?

न कमावणारया बायकांना????? म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे.
दिवसभर घरासाठी राबून ज्यांना काहीच आर्थिक मोबदला मिळत नाहीत त्यांच्या बद्दल म्हणताय काय? + १.

हे कुठे आहे लिंक द्या ना. पॉपकॉर्न आणलेत.
ज्याने/जिने लिहिलंय त्याचं लग्न झालंय का?
सर्व नवरा बायकोनी आपापले अधिकार त्याच्याकडून अप्रुव्ह करून घ्यावेत हा कॉन्फिडन्स सरांना कुठून आला?

असे शंभर आकडे लिहू शकतो आणि तरीही बरेच काही शिल्लक राहावे. >>>सगळे निर्णय नवर्‍यालाच घ्यायचे आहेत तर बायको हवी कशाला? जिच्या बरोबर आपण राहतो (मग ती कमवती असो वा नसो) तिच्या आवडी-निवडी/मत/विचार नको लक्षात घ्यायला?

न कमावणारया बायकांना????? म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे.
दिवसभर घरासाठी राबून ज्यांना काहीच आर्थिक मोबदला मिळत नाहीत त्यांच्या बद्दल म्हणताय काय?
नवीन Submitted by जिंदादिल. on 9 March, 2020 - 16:25
>><<

"त्यांना नोकरी-धंदा न करणार्‍या बायकांना" असे म्हणायचे असेल !

दिवसभर घरासाठी राबून ज्यांना काहीच आर्थिक मोबदला मिळत नाहीत त्यांच्या बद्दल म्हणताय काय?
>>>

होय. त्यांच्याबद्दलच म्हणतोय. मोबदला म्हणाल तर अन्न वस्त्र निवारा या त्यांच्या मूलभूत गरजा तरी नक्कीच पुर्ण केल्या जातात. घराघरानुसार याऊपर आणखीही बरेच काही मिळते.

आमच्या घरात देखील बायको तुर्तास न कमावती आहे. जर मी उगाचच तिला जास्त अधिकार दिले असतील >>> तुम्ही कोण बायकोला अधिकार देणारे Uhoh

मोबदला म्हणाल तर अन्न वस्त्र निवारा या त्यांच्या मूलभूत गरजा तरी नक्कीच पुर्ण केल्या जातात.>>>> वळचणीला आलेलें कुत्रं डोळ्यासमोर आले.

मी न कमावणार्‍या फारच कमी स्त्रीया बघितल्या, जवळ जवळ नाहीच. न कमावणारे पुरुष मात्र बरेच बघितले. योग्य आर्थिक मोबदला दिला जात नाही या वर्गात स्त्रीयांची संख्या खूप आहे. यात होममेकर आणि घराबाहेर पडून नोकरी करणार्‍या अशा दोन्ही स्त्रीया येतील.

होममेकर पुरुषांनाही योग्य आर्थिक मोबदला दिला जात नाही. मात्र घराबाहेर नोकरी करणार्‍या पुरुषांना gender wage gap ला सामोरे जावे लागत नाही असे विदा सांगतो.

नैतिकदृष्ट्या बोलायचे तर लग्न म्हणजे सहजीवन! यात 'अ' ने 'ब' ला निर्णयस्वातंत्र्य दिले आहे ही भाषाच हास्यास्पद.

नैतिकदृष्ट्या बोलायचे तर लग्न म्हणजे सहजीवन! यात 'अ' ने 'ब' ला निर्णयस्वातंत्र्य दिले आहे ही भाषाच हास्यास्पद.>>+१११११
इथे basic मध्येच problem आहे.

नैतिकदृष्ट्या बोलायचे तर लग्न म्हणजे सहजीवन! यात 'अ' ने 'ब' ला निर्णयस्वातंत्र्य दिले आहे ही भाषाच हास्यास्पद.>>>>खरंच आहे.
जर मी उगाचच तिला जास्त अधिकार दिले<>>>>>>>ऋन्मेष, घरी रहायचंय ना?

घर खरेदी सारखेच इतर मोठे निर्णय कुटुंबातील सर्वांच्या सहमतीने घेणे गरजेचे आहे.
ह्या मध्ये खूप मोठी रक्कम लागते.निर्णय चुकण्याची शक्यता असते आणि निर्णय चुकलं तर त्याचा दणका तुम्हाला हमरस्त्यावर असाल तर पायवाटेवर पाठवू शकतो.
पायवाटेवर असाल तर खड्ड्यात गाढू शकतो.
बाकी रोजच्या जीवनात बायकोला पूर्ण अधिकार असावेत तिला जे वाटतं ते ती तुम्हाला विचारून , न विचारून करू शकते.
आणि कधी चुकीच्या निर्णय मुळे ती संकटात आली तरी तिला दोष न देता तिच्या पाठी उभे राहिलात तर ती कधीच एकटी निर्णय घेणार नाही.

केवळ पैसा कमावल्याने घर कुठे, केवढे, कसे असावे किंवा नसावे हे निर्णय घेण्याची क्षमता येते का?
अजून एक धागा पाड.

लग्न म्हणजे सहजीवन! यात 'अ' ने 'ब' ला निर्णयस्वातंत्र्य दिले आहे ही भाषाच हास्यास्पद.
>>>>

सहजीवनात दोघांनाही लाभ समप्रमाणात मिळायला हवा ही अपेक्षा मान्य. पण काही निर्णय घेताना जाणकार, जबाबदार, तसेच त्या निर्णयाच्या परीणामांनी ज्याच्या आयुष्याला जास्त फटका बसणार आहे त्याच्या मताला वा निर्णयाला जास्त वेटेज नको का?
उदाहरणार्थ घरखरेदी असो मुलांची शाळा. एखादी हाऊसवाईफ आपल्या सोयीसुविधा बघत प्राईम लोकेशन, एक्स्ट्रा बाथरूम, जवळची पण महागडी शाळा अश्या विविध खर्चिक निकषांवर निवड करू शकते. मी थोडी काटकसर करते तुम्ही थोडे जास्त पैसे कमवा असा तिचा स्टॅण्ड असू शकतो. यात काटकसर करताना ती आधीच अनावश्यक असलेले खर्च कमी करू शकते. पण चार जास्तीचे पैसे कमवताना तिच्या नवरयाची जी हालत होईल ती त्याचे त्यालाच ठाऊक.

चला एक मानू की जसे बाहेरच्या कामाला मेहनत लागते तशी घरकामालाही लागते. जशी बाहेरच्या कामाला अक्कलहुशारी लागते तशी घरकामालाही लागते. पण बाहेरच्या कामाचे जे मानसिक स्ट्रेस असते, पैसे कमवायच्या जबाबदारीचे जे प्रेशर असते त्याची तुलना घरकामाशी होऊ शकत नाही. अश्यावेळी तो नवराच आपले वर्क-लाईफ बॅलन्स राहील या हिशोबाने आर्थिक बाबींत योग्य निर्णय घेऊ शकतो ना...

केवळ पैसा कमावल्याने घर कुठे, केवढे, कसे असावे किंवा नसावे हे निर्णय घेण्याची क्षमता येते का?
>>>>
निर्णय घेण्याची क्षमता कोणाची जास्त आहे हे एक झाले. तर त्या निर्णयाचा परीणाम कोणावर जास्त होणार आहे वा चुकल्यास कोणाला जास्त भोगावे लागणार आहे हे दुसरे झाले. सध्या मी या दुसरया मुद्स्याच्या अनुषंगाने बोलतोय.

ऋन्मेषने नेहमीप्रमाणे अती उत्साहात आणि आपल्या नावावर आणखीन एका धाग्याची भर ह्या विचारात इथे चर्चा सुरु केली खरी पण जिथे ह्या चर्च म्चा उगम झाला त्याची लिंक द्यायला सोयीस्करपणे विसरला. क्युटी ह्यांचा दक्षिणमुखी घर हा धागा बघून पहिल्या पानाच्या शेवटापासूनचे प्रतिसाद वाचावेत.

घर खरेदी सारखेच इतर मोठे निर्णय कुटुंबातील सर्वांच्या सहमतीने घेणे गरजेचे आहे.
>>>
मत लक्षात घेतले जावेच. घरच्यांची का शेजारच्यांची मित्रांचीही मते घ्यावीत. जाणकारांशी सल्लामसलत करावे. अगदी पोरांचाही दृष्टीकोण तपासावा..
पण ती मते एकत्रित करून निर्णय घ्यायचा अधिकार जो कमावतो त्याच्याकडे नको का?

पण जिथे ह्या चर्च म्चा उगम झाला त्याची लिंक द्यायला सोयीस्करपणे विसरला
>>>

सायो ती मुद्दामच नाही दिली. कारण तिथले संदर्भ न घेता ईथे स्वतंत्र चर्चा अपेक्षित होती.
आणि या आधीचे अनुभव असे आहेत की असे संदर्भ दिल्यास एखाद्या व्यक्तीला वा त्या व्यक्तीच्या मताला टारगेट केल्याचा दोष माथी येतो.

ज्याचं त्याचं ज्याला त्याला ठरवु द्यात. आपण मारे तलवार मारत म्हणालो की यं अन त्यंव तरी प्रत्येकालाच आपल्या सिमीत परीघात जुळवुन घ्यावं लागतं आणि तेच बुद्द्धीमत्तेचे व्यवच्छेदक अंग आहे.

तुम्ही कोण बायकोला अधिकार देणारे Uhoh
>>>

मी म्हणजे मी नाही तर घरातला कर्ता कमावता पुरुष.

घरातली कमावती व्यक्ती स्त्री सुद्धा असू शकते. आणि पुरुष घरकाम करणारा. पण मुद्दाम हे यात मिक्स केले नाही कारण अश्या केस तुलनेत फार कमी असतात. तसे त्यांचे एकूणच प्रॉब्लेम वेगळे असतात.

वळचणीला आलेलें कुत्रं डोळ्यासमोर आले.
Submitted by देवकी on 9 March, 2020 - 18:00
>>>>

कित्येक कमावत्या पुरुषांची अवस्था ऑफिसमध्ये कुत्र्यापेक्षाही वाईट असते. त्यांना वळचणीलाही घेतले जात नाही. आपणही हे आसपास बघत असालच.

व्यापक आणि सुदृढ़ चर्चेसाठी Link देणे आवश्यक / अपेक्षित आहे असे वाटते
>>>>
कसली लिंक. हा स्वतंत्र विषय स्वतंत्र धागा आहे. ईथला विषय वाचूनही त्यावर चर्चा करू शकताच.
अर्थात धागा कुठून सुचला वा आला या माहितीसाठी म्हणून घर घ्यायच्या सल्याचा धगा बघू शकता. तिथे हा विषय अवांतर होता.
मला या मायबोली ॲपवर पटकन लिंक देता येत नाही. फार ऊपद्व्याप करावे लागतात.

अरे वा सायो यांनी लिंक दिली. धन्यवाद Happy

कमावतो ,कमावतो काय लिहलय.
निर्णय योग्य असेल तर फायदा कुटुंबाचाच होतो आणि चुकीचं झाला तर नुकसान कुटुंबाच च होते असा का नाही विचार करत.
नवरा बायकोच नात फक्त व्यवहारी असेल आणि त्या मध्ये इमोशनस लं काहीच जागा नसेल तर लग्न तरी का करायचे .
लिव्ह इन का काय म्हणतात त्या संबंधात राहणे .

त्यांना नोकरी-धंदा न करणार्‍या बायकांना" असे म्हणायचे असेल !>>>> मला हे उत्तर त्याच्याकडून अपेक्षित होते. पण तुम्ही दिलेत.

होय. त्यांच्याबद्दलच म्हणतोय. मोबदला म्हणाल तर अन्न वस्त्र निवारा या त्यांच्या मूलभूत गरजा तरी नक्कीच पुर्ण केल्या जातात. घराघरानुसार याऊपर आणखीही बरेच काही मिळते. >>>> व्वा! स्त्रियांबद्दल एव्हढा लाक्षणिक दुष्टीकोन बाळगून आहेस मग निर्णय स्वातंत्र्य कोणाचे हा बुरसटलेला विचार तरी का करतोस. बाकीचा फाफटपसारा उगाचच मांडलास.

निर्णय योग्य असेल तर फायदा कुटुंबाचाच होतो आणि चुकीचं झाला तर नुकसान कुटुंबाच च होते असा का नाही विचार करत.
>>>>

ज्याची निर्णयक्षमता चांगली त्याने निर्णय घेणे हे ऊत्तमच.
पण फायदा नुकसान कुटुंबाचे असे सरळसोट नसते. फायदा नुकसान कुटुंबातील व्यक्तीनुसार कमीजास्त असतो. आर्थिक बाबींतील निर्णय चुकल्यास जो कमावतो त्यालाच जास्त भोगावे लागते. प्रॅक्टीकल विचार करायला का कचरत आहात सारे?

Pages