एकटीच @ North-East India दिवस - १५

Submitted by सुप्रिया राज जोशी on 2 March, 2020 - 03:31

अनुक्रमाणिका > https://www.maayboli.com/node/72984
अनुक्रमाणिका २ > https://www.maayboli.com/node/73598

20 फेब्रुवारी 2017
रोशन, My brother,

प्रिय खूप लहान शब्द आहे तुझ्यासाठी. नात्याने भाऊ असलास तरी माझ्यासाठी जसे मालविका, राधा तसा तू. ज्याच्याकडे सारे सांगू शकेन असा मित्रही तूच. आपण असे भाऊ बहीण आहोत की दोघेही दुःखात असतानाही स्वतः साठी नाही, तर दुसऱ्यासाठी प्रार्थना केली. आनंद किंवा दुःख दोघात फक्त एकालाच झाले, असं सहसा नाहीच. आज हे लिहिताना तुझ्या आठवणीने मन आणि डोळे भरून आले आहेत.

आज तुझा वाढदिवस म्हणजे केवढा आनंदाचा दिवस! आता इथून सर्वात आधी चर्च ला जाईन. तिथे शांत बसून प्रार्थना करेन. तू लोकांना प्रेम आणि सेवा देण्याचे जे व्रत घेतलेस त्याला माझ्याकडून जमेल तसा पाठिंबा देईन. तुझ्या आनंदाचे कारण आणि दुःखात वाटेकरीही व्हायचा प्रयत्न करेन. चुकलास तर वाट दाखवेन. अडचणीत माझी मदत व्हावी असे पाहीन. माझ्याजवळ देण्यासारखे जे जे आहे ते तू खुशाल मागून घे. भावाबहिणीच्या भांडणात तुच जिंकलास तर बरे कारण तू हरलास तर मी कशी जिकणार? आयुष्यभर दोघातली मैत्री टिकावी यासाठी आज प्रार्थना करेन.

ताईचे प्रवासातले एकही पत्र वाचले नाहीस ना? मग कुठच्या भरवशावर मोठ्ठे पत्र लिहू म्हणून प्रवासवर्णन वगैरे गाळून हे इतकुसे पत्र तेवढे पाठवले. शिवाय त्या मालविकाला कसा 'गुडबाय सिक्कीम' व्हिडीओ पाठवला होता तसा तुला 'गुडबाय आसाम' बनवून पाठवते आहे. योगायोगाने कालच आसाम सोडून शिलॉंग ला आले. .

सर्वांना पत्र लिहिले आणि तुला नाही लिहिले तर रुसशील. शिवाय वाढदिवसाच्या शुभेच्छाही पाठवायच्या म्हणून आजचा हा स्पेशल पत्र प्रपंच!
Wish you a very happy birthday dear my little brother. Sending you loads of sisterly love.

तुझी ताई.

गुडबाय आसाम
https://youtu.be/wE-Jq4jOPq4

Group content visibility: 
Public - accessible to all site users