मराठी भाषा दिवस २०२० - शब्दखेळ- चित्रनाट्यधारा

Submitted by मभा दिन संयोजक on 26 February, 2020 - 23:45

मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्व मायबोलीकरांना हार्दिक शुभेच्छा!

मायबोलीवर आपण आजपासून तीन दिवस, म्हणजेच २९ फेब्रुवारीपर्यंत मराठी भाषा दिवस २०२० साजरा करणार आहोत. या तीन दिवसांत आपल्याला खेळायला मिळणार आहेत निरनिराळे खेळ आणि वाचायला मिळणार आहेत विशेष लेख.

या खेळांमधला पहिला खेळ सुरू करूया.
मराठी नाटकं आणि चित्रपट हे मराठी सांस्कृतिक जीवनाचं एक महत्त्वाचं अंग. करमणूकप्रधान, हलक्याफुलक्या चित्रपट आणि नाटकांबरोबरच आशयप्रधान, वास्तवदर्शी नाटकं आणि चित्रपट मराठीत निर्माण होत असतात. हा खेळ खेळण्यासाठी तुम्हाला अशा विविध मराठी चित्रपट आणि नाटकांची नावं आठवून त्यावरून कोडी घालायची आहेत. जो भिडू कोड्याचं उत्तर देईल त्याने/तिने पुढचं कोडं घालायचं आहे.

पहिलं सोप्पं कोडं आमच्याकडून!

मराठी भाषा गौरव दिन ज्यांच्या जयंतीला साजरा केला जातो, त्यांचं हे सर्वाधिक यशस्वी नाटक.

XXसXX

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतीय राजकारणातल्या एका प्रसिद्ध व्यक्तीच्या जीवनातल्या वादग्रस्त कालखंडावर बेतलेलं मराठी नाटक. प्रमुख कलाकाराचे पिता लेखक , दिग्दर्शक आहेत.

सखाराम बाईंडर

मुंडकोपनिषदातील एका सुक्ताने यांच्या एका पुस्तकाची सुरुवात होते. लेखक म्हणून ते प्रसिद्धा आहेतच पण चित्रपट दिग्दर्शक म्हणून देखील बरेच काम केले आहे. यांचा स्टुडिओ सांगलीत होता जिथे त्यांनी त्यांचा पहिला चित्रपट निर्मिला.

पुढचा प्रश्ण :
एक उत्तम कलाकाराचे नाटक.. जवळ जवळ एकपात्रीच.. एकाच कलाकाराने वठविल्या अनेक भूमिका असे हे नाटक:
XXX XXX

@ निलाक्षी: हसवा फसवी.

आता माझा प्रश्न पुन्हा विचारतो.

मुंडकोपनिषदातील एका सुक्ताने यांच्या एका पुस्तकाची सुरुवात होते. लेखक म्हणून ते प्रसिद्धा आहेतच पण चित्रपट दिग्दर्शक म्हणून देखील बरेच काम केले आहे. यांचा स्टुडिओ सांगलीत होता जिथे त्यांनी त्यांचा पहिला चित्रपट निर्मिला.

पुढचा प्रश्न -

मराठीतल्या एका थोर, प्रयोगशील लेखिकेचा अभिनय असलेल्या या चित्रपटात एक अतिशय महत्त्वाचा कवीही महत्त्वाच्या भूमिकेत होता.

चित्रपट ओळखा.

एक कप च्या - कमल देसाई लेखिका आणि किशोर कदम (सौमित्र) कवी

आता कोडं अजून कोणीतरी टाका.

महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तीमत्वाशी आडनाव-साधर्म्य असणाऱ्या एका जेष्ठ नाटककार, समीक्षक आणि विचारवंताचे
एक गाजलेले नाटक, यात रेखा सबनीस ने काम केले होते.

गो पु देशपांडे म्हणजे उध्वस्त धर्मशाळा असेल.

अशोक जैननी लिहिले होते की गो पु इतके जहाल डावे आहेत की त्यांची नाटके सोविएत रशियात पण भुमिगत करावी लागत Happy

'नाटक सांगतय ....
त्याची ऐका आता कहाणी....' >>
एका लग्नाची गोष्ट ?

Pages