मराठी भाषा दिवस २०२० - शब्दखेळ- चित्रनाट्यधारा

Submitted by मभा दिन संयोजक on 26 February, 2020 - 23:45

मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्व मायबोलीकरांना हार्दिक शुभेच्छा!

मायबोलीवर आपण आजपासून तीन दिवस, म्हणजेच २९ फेब्रुवारीपर्यंत मराठी भाषा दिवस २०२० साजरा करणार आहोत. या तीन दिवसांत आपल्याला खेळायला मिळणार आहेत निरनिराळे खेळ आणि वाचायला मिळणार आहेत विशेष लेख.

या खेळांमधला पहिला खेळ सुरू करूया.
मराठी नाटकं आणि चित्रपट हे मराठी सांस्कृतिक जीवनाचं एक महत्त्वाचं अंग. करमणूकप्रधान, हलक्याफुलक्या चित्रपट आणि नाटकांबरोबरच आशयप्रधान, वास्तवदर्शी नाटकं आणि चित्रपट मराठीत निर्माण होत असतात. हा खेळ खेळण्यासाठी तुम्हाला अशा विविध मराठी चित्रपट आणि नाटकांची नावं आठवून त्यावरून कोडी घालायची आहेत. जो भिडू कोड्याचं उत्तर देईल त्याने/तिने पुढचं कोडं घालायचं आहे.

पहिलं सोप्पं कोडं आमच्याकडून!

मराठी भाषा गौरव दिन ज्यांच्या जयंतीला साजरा केला जातो, त्यांचं हे सर्वाधिक यशस्वी नाटक.

XXसXX

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी नताशा, दिग्दर्शक शब्द आजकाल लिंगनिरपेक्ष रितीने वापरताना पाहिलाय.
कुमार१ अजून काही माहिती सांगा, दिग्दर्शकाने कसला विक्रम केलाय म्हणे

गुलमोहर
गजेन्द्र अहिरे
रजत कपूर

त्याने ओळीने सलग कितीतरी मराठी चित्रपट जोरदार यशस्वी केले आहेत.
अतिशय नेत्रसुखद चित्रण असते.

अवनी, बरोब्बर !
फक्त रजित .
रजत वेगळे, ते कॉर्पोरेट वाले

मी नताशा, दिग्दर्शक शब्द आजकाल लिंगनिरपेक्ष रितीने वापरताना पाहिलाय. >>> हो पण त्यांनी " सुंदर चित्रपट देणारा ." असं म्हणलय. Anyway जाऊदे Happy

हो पण त्यांनी " सुंदर चित्रपट देणारा ." असं म्हणलय. >> बरोबरे :P, चुकलंच माझं
निदान आजतरी मराठीत चुका नकोत व्ह्यायला. Sad

नाटक :
(३) (४) (२) अक्षरे प्रत्येकी

विषय : नवरा, बायको व त्याची रखेल. पण शेवटी नवराबायकोच एकत्र नांदतात.

कुमार1 तुमच्या कोड्याचं उत्तर तुम्ही सांगालच
तोपर्यंत हे सोडवा....
चित्रपट .
..या चित्रपटाचा सूर्याशी तसा काही संबंध नाही
पण तरीही....

Pages