तू चिडलीस कि...

Submitted by salgaonkar.anup on 24 February, 2020 - 00:50

तू चिडलीस कि
फार गोड दिसतेस
हिरव्यागार कैरीच्या लोणच्याची
लालेलाल फोड दिसतेस

का चिडलीयस ????
काही सांगतही नाहीस
मी ओळखू म्हंटल
तर थांग लागू देत नाहीस
मी कसं ओळखू
मला काही समजतच नाही

माझा प्रयत्न चालू राहतो
मी क्लुप्त्या लढवत जातो
काहीतरी काम काढून
तुझ्या भोवती लुडबुडत राहतो

फोन असो कि मॅसेज
तू रिप्लाय कुणाला देत नाहीस
सतत कामात दिसतेस
माझ्याकडे पाहतही नाहीस

प्रयत्न करून थकतो मी
तुझ्याकडेच बघतो मी
झोप डोळ्याचा ताबा घेते
पापण्यां वरची जागा घेते

इतकी शांत झोप
मला स्वप्नातही येत नाही
तुझी बडबड तिथेही
मला झोपूच देत नाही

तू चिडलीस कि
ही एक गोष्ट
मला हवी तशी होते
या निमित्ताने का होईना
तुझे तोंड बंद राहते

@ अनुप साळगांवकर - दादर

Group content visibility: 
Public - accessible to all site users