परवा स्क्रॅच ऑफ लॉटरीवर, $१० वरती $८० मिळाले.
काल सेम, $१० वरती $७५ मिळाले तर आज, $२० वरती whopping $१२१ मिळाले.
__________________
परंतु मन अतिशय खाते आहे. एक तर भीती की जुगाराचे, व्यसन लागेल, त्यात नवर्याला असली थेरं अज्जिबात खपत नाही त्यामुळे त्याच्या मनाविरुद्ध काही केल्याची बोच.
________
सुदैवाने एक अतिशय चांगली, विचारी आणि हुषार अशी माबोवरचीच एक मैत्रीण आहे. तिचे म्हणणे -
(१) ईझी मनी ची सवय लागेल व आळशी व निष्क्रिय होण्याकडे वाटचाल सुरू होइल.
(२) व्यसन तर नक्की म्हणजे १०० % लागेल.
(३) असा, इझी मनी रहात तर नाहीच पण तू त्या व्यसनात, स्वकष्टाचा पैसा इतका गमावशील की नंतर फक्त हताशपणा येईल.
____________
काही आजारांत व्यक्तीचा स्वतःच्या सवयींवरचा ताबा सुटू शकतो. बायपोलर हे त्याचे उदाहरण. दुसरे असे की पैसा मिळाल्यावर आनंद होतो पण गमावल्यावर फारच खिन्नता येते. म्हणजे स्वतःबद्दल घॄणा वाटते की हे नको करु सांगीतलेले असताना, तू का करतेस.
_____
आता पर्यंत सर्व चक्क १००% सर्व लोक जे लॉटरीच्या दुकानात, दिसलेले आहेत ते आर्थिकदॄष्ट्या अतिशय निम्न वर्गातील, दिसलेले आहेत. यामागे काय कारण असावे? आणि हे मी कमीत कमी ४० वेळा केलेल्या नीरीक्षणातून मत बनविलेले आहे.
______
रविवारी मैत्रीणीबरोबर गुरुद्वारात जाणार आहे. तेव्हा हे सरप्लस धन $१०१ , दान करेन असा निश्चय केलेला आहे. तसे करण्यास नवर्याची आडकाठी तर नाहीच उलट प्रोत्साहनच आहे.
________________________
मला माबोकरांचे 'लॉटरी' या विषयातील उलट-सुलट विचार ऐकून घ्यायला आवडतील. लॉटरी खेळावी की खेळू नये त्यामागील कारणमिमांसा. आपल्या ओळखीमध्ये कोणी या व्यसनाच्या विळख्यात सापडलेले उदाहरण आहे का? अजुन एक - इकडे, म्हणजे अमेरीकेत सर्व लॉटरी तिकीटांच्या मागे, 'अॅडीक्ट झाल्यास उपचारांकरता कॉल करण्याचा एक नंबर सुचवलेला असतो.'
________
हा धागा कोतबो मध्ये काढला असला तरी एक तर मला व्यसन लागलेले नाही परंतु विषय गंभीर आहे.
लॉटरीचे व्यसन लागते का?
Submitted by सामो on 31 January, 2020 - 11:53
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हजार खूप होते अशा काळात दर
हजार खूप होते अशा काळात दर महिन्याला तिकीट काढून वर्षाला हजारात खर्च केलेली व्यक्ती मला माहीत आहे. 20-25-१०० असे बक्षीस लागले तरी ही व्यक्ती खूश व्हायची. कारण हे पैशाबाबत खूश होण नसून , ह्या जुगारातून किक मिळणे हा प्रकार होता.
मला लॉटरीच्या तिकीट kaadhaayachaa मोह अनेकदा होतो. जात्याचा आळशीपणा इथे उपयोगाला येतो :p
Jokes apart, माझे आजोबा सांगायचे - कुठलीही वाईट गोष्ट करावीशी वाटली की ती लांबणीवर टाकावी आणि चांगली गोष्ट करावीशी वाटली की ताबडतोब करावी. कारण कुठल्याही बाबतीत आपले विचार वेळ जाईल तसे बदलतात.
मला स्वत: ला तीन पत्ती मधून जोरदार किक मिळते. कधी व्यसन लागले तर ते जुगाराचे अस जाणवल्यवर त्या रस्त्याला जायचं नाही हे कळलं.
मी आणि घरातले काही सदस्य शेंगदाणे आणि काडेपेतीतल्या काड्या अशा घरातल्याच वस्तू वापरून गंमत म्हणून खेळतो कधी वेळ मिळाला, खूप तल्लफ आली तर.
खेळ संपला की वस्तू परत घरात.
खूप वेळही मिळत नाही रोजच्या कामांमधूनच
वर्णिता धन्यवाद.
वर्णिता धन्यवाद.
>>>>>>>>माझे आजोबा सांगायचे - कुठलीही वाईट गोष्ट करावीशी वाटली की ती लांबणीवर टाकावी आणि चांगली गोष्ट करावीशी वाटली की ताबडतोब करावी.
खूप सुंदर सल्ला आहे हा.
सध्या बाहेर पडण्याचे
सध्या बाहेर पडण्याचे मोटिव्हेशनच $५ ते $१० ची लॉटरी तिकिटे विकत घेणे झालेले आहे. शिवाय तसे केल्यानंतर एक गिल्टी खिन्नता येते. यावरती कॅश घेउन न जाणे हा उपाय आहे पण ......
'एकटेपणाच्या' पुस्तकात वाचलेले होते की 'एकटे' रहाण्याची सवय आधीपासूनच करा. खरेच एकटेपणाची, वेळ आल्यावर नको. खूप वर्षे 'डिस्ट्रक्टिव्ह एकटेपण' अनुभवलेले आहे. आपल्याला वाईट सवयी चटकन लागतात - असे स्वभान आहे. एकटेपणाची सवय व्हावी म्हणुन, एकटे फिरायला जावे तर लॉटरीच्या दुकानाकडे पावले वळतात. दर आठवड्याला आत्ता जरी $५-$१० खर्च होत असला तरी, त्यापेक्षा मला काळजी 'कंपल्शन' ची वाटते आहे.
अजुन तरी आपला कंट्रोल आहे असा भ्रम(?) आहे.
खालील उपाय करीन -
(१) विकत घेतल्याची डायरीत नोंद ठेवणे
(२) कॅश घेउन बाहेर न पडणे
(३) घरच्या घरी व्यायाम करणे कारण पायी रपेट घेण्याच्या मिषानेच बाहेर पडले जाते
(४) मेडिटेशन वाढविणे.
(५) आणि जर खरेदी केले तर स्वतःला शिक्षा करणे - उदा - एक वेळ न जेवणे
अगदी शेवटचा उपाय - डॉक्टरांची मदत.
पण मे मध्ये ३ दा व आत्ता जून मध्ये ऑलरेडी ३ दा तिकीटे घेउन झालेली आहेत. धिस इज टर्निंग इन्टू अ बॅटल. माघार घेण्याची वेळ हीच हीच हीच.
कारण काय आहे याचं?
कारण काय आहे याचं?
मी अधून मधून धुम्रपानाच्या मोहाला बळी पडायला लागलोय. अगदी त्या टपरीवर जाईपर्यंत मला ते करायचे नसते. पण होतेच. काहीतरी राहूसाहेबांची कृपा आहे या बाबतीत.
पण, वैयक्तिक पातळीवर, जेव्हा याचे तोटे अंगलट यायला लागतात तेव्हा मी धूम्रपान थांबवतो, थांबवू शकतो कितीही काळ. आणि ते तोटे होणार नाही अशी खात्री असेल तेव्हा, लगेच... टपरी. व्यसन नव्हे, लहर...
सामो,
सामो,
लॉटरीचे तिकिट घेतल्यावर ते लागले का बघायला वाट बघणे, ती उत्सुकता याची मेंदूला चटक लागते ती घालवायला काहीतरी दुसरे काही मजा येइल असे क्रिएटिव शोधा. तिकीट घ्यावेसे वाटले की स्वतःलाच सांगायचे ते पैसे दुसर्या चांगल्या गोष्टीवर खर्च करुया. मग त्या पैशातून काहीतरी मनाला उत्सुक करणारे, जरा झटपट पण भरीव घडेल असे काही तरी निवडायचे. छोटे आर्ट-क्राफ्टचे किट्स आवडतील का? छोट्या क्रॉस स्टीच, ज्वेलरी किटपासून ते glass etching पर्यंत बरेच पर्याय असतात क्राफ्ट स्टोअरमधे. अगदी १-२ तास ते १-२ दिवस एवढ्या अवधीत होईल असे दर वेळी काहीतरी नविन करायचे.
फिरायला जाताना सोबत कॅमेरा न्या. तोच नेहमीचा परीसर पण दर वेळी काहीतरी नवे मिळते.
>>>>>>>लॉटरीचे तिकिट
>>>>>>>लॉटरीचे तिकिट घेतल्यावर ते लागले का बघायला वाट बघणे, ती उत्सुकता याची मेंदूला चटक लागते
अगदी १००% खरे आहे. होय किक बसते.
>>>>>>ते पैसे दुसर्या चांगल्या गोष्टीवर खर्च करुया. मग त्या पैशातून काहीतरी मनाला उत्सुक करणारे, जरा झटपट पण भरीव घडेल असे काही तरी निवडायचे. छोटे आर्ट-क्राफ्टचे किट्स आवडतील का? छोट्या क्रॉस स्टीच, ज्वेलरी किटपासून ते glass etching पर्यंत बरेच पर्याय असतात क्राफ्ट स्टोअरमधे. अगदी १-२ तास ते १-२ दिवस एवढ्या अवधीत होईल असे दर वेळी काहीतरी नविन करायचे.
फिरायला जाताना सोबत कॅमेरा न्या. तोच नेहमीचा परीसर पण दर वेळी काहीतरी नवे मिळते.
अमेझिंग उपाय आहे. मनाला काहीतरी दुसरा चाळा देण्याचा हा उपाय खूप करुन पहाण्यासारखा आहे. _/\_ आपल्याकडे सेल फोन तर असतोच. बाग आहे, फुले व पक्षी आहेत. किती सुरेख उपाय आहे हा.
--------------------
>>>कारण काय आहे याचं?
पन्नाशी ओलांडल्यावरती फारसा स्किलबेस नसलेला जॉब आपल्याला कोणी देइल का - ही चिंता. ऑटोमेशन आवडत नाही. त्यामुळे मार्ग बंद वाटतात. मग पैसे कसे मिळवायचे तर लॉटरी - हे मी माझे केलेले विश्लेषण. आणि माझ्या मते ते ९०% खरे आहे.
-----------
>>>>>मी अधून मधून धुम्रपानाच्या मोहाला बळी पडायला लागलोय.
तुम्हाला कळतय ही फार मोठी गोष्ट आहे पाटील. इट्स अ ह्युज पॉझिटिव्ह फॅक्टर.
@नानबा
@नानबा
छान उपाय आहे ताटातले वाटीत
माझं सुख, माझं सुख, हंड्या
माझं सुख, माझं सुख, हंड्या झुंबर टांगलं,
माझं दु:ख, माझं दु:ख, तळघरात कोंडलं
हे जरी कितीही खरे असले तरी आपल्या मर्यादा आणि इम्परफेक्शन्सच आपल्याला ' हाडामासाचं' माणूसपण देत असतात. त्यामुळे माझ्या स्ट्रगल्स मांडायला मला लाज वाटत नाही. कोणाला उपयोग झाला तर उत्तमच पण मला इतरांचा उपयोग होतो. जसे स्वाती, वर्णिता, अन्य अनेकांनी सुचविलेले उपाय.
यातून कोणालाही फायदा झाला तर आनंदच आहे.
इच्छाशक्ती वाढवायची आहे. एकदम 'आज ४ पर्यंत मी खाणार नाही' असा काहीतरी अवघड पण केला की तो तुटतो व उत्साह खच्ची होतो असे लक्षात आलेले आहे. मे बी आज एक चित्र रंगवेनच, आज ३ स्तोत्रे म्हणेनच असे काहीतरी आवडेलसे आणि लहान पण करण्यापासून सुरुवात करायला हवी.
सामो, पॉटरी ऍप पाहिलंय का
सामो, पॉटरी ऍप पाहिलंय का?त्यात भांडी बनवून नंतर खोटा खोटा लिलाव करून ती विकता पण येतात.पॉइंटस मिळवून अजून छान छान डिझाइन विकत घेता येतात.लॉटरी ऐवजी पॉटरी चं व्यसन लावून घेता येईल.यातही आपलं भांडं किती खोट्या खोट्या पैश्यात गेलं, कोणत्या प्रिंट्स ना खोट्या आर्ट लव्हर्स कडून खोटा जास्त भाव मिळतो ही उत्सुकता मजेशीर असेल.
अनु ट्राय करुन बघता येइल.
अनु ट्राय करुन बघता येइल.
समस्येचे मूळ 'आर्थिक असुरक्षितता' आहे. जी की बरीचशी 'कपोलकल्पि' आहे. यावरती मध्यंतरी गणित परत एकदा ब्रश अप करण्याचा उपाय करुन पाहीला होता. की मे बी टिचींग मध्ये जॉब मिळेल पुढे. खूप एन्जॉय केले. पण आत्मविश्वास परत मिळाला नाही. पण मजा येते खरी.
ज्योतिषामध्ये खूप रस आहे पण ते फिल्डही गणिताइतकेच व्हास्ट वाटते. त्यामुळे ते व्होकेशनही नको वाटते. कार्ण प्रचंड अनुभव हवा त्यात.
म्हाळसाने उपाय सुचविलेला की बी ए (बिझनेस अॅनॅलिस्ट) फिल्ड मध्ये जा. त्यावर अंमल करायला हवे. प्रॉडक्ट ओनर नावाचे नवीन पद आता फ्लरिश होते आहे.
एकंदर आय नीड टु इन्व्हेस्ट इन माय स्किल्स. पटते आहे. मध्यंतरी एच टी एम एल, सी एस एस, जावास्क्रिप्ट आणि डेटा सायन्स सर्व युडेमी कोर्सेस करुन झाले. पण आय डिड नॉट गेट अ ब्रेक थ्रु कारण त्याकरता प्रॅक्टिकल ज्ञान हवे.
असो!!! सगळीकडे आपल्या एक्स्क्युजेस नकोत हे खरे आहे.
प्रॅक्टिस म्हणून मी सतत अप्लाय करत असते सतत्साध्या इन्टर्व्ह्युला नकार आले की धीर खचतो.
अजिंक्यराव तुम्हाला वाटल्यास
अजिंक्यराव तुम्हाला वाटल्यास धूम्रपानाबद्दल धागा काढा. उबो यांनी प्रतिसादात त्यांची स्ट्रगल व मात लिहीलेली आहे ती मला वाटतं डिजे यांच्या एका धाग्यात आहे. तीही वाचून पहा.
मला सध्या ice cream टाळता येत
मला सध्या ice cream टाळता येत नाही. अगदी alcoholic माणसाला दारू टाळता येत नाही तेवढा फोर्स असतो. कितीही कामात, वाचनात किंवा iPad वर लक्ष दिलं तरी back of the mind, ice cream चालुच असतं. मी खुप वेळ/तास कंट्रोल करते, पण शेवटी स्विगी instamart किंवा blinkit उघडलं जातं आणि ice cream tub घरी येतोच. अगदी दररोज. व्यसनच आहे. कळतं आहे, पण cravings इतके जबरदस्त असतात.
इथे सगळ्यांनी छान उपाय
इथे सगळ्यांनी छान उपाय सुचवलेत, सामो. जर आर्थिक असुरक्षितता वाटत असे तर काहीतरी साईड इनकम चालू करा. जगात काय काय gigs आहेत, ऐकून नवल वाटेल. upwork सारख्या वेबसाइट्सवर खूप प्रोजेक्ट्स असतात. अगदी बेसिक html/css चे पण प्रोजेक्ट्स मिळतील. पैसे सुरुवातीला फारसे नाही मिळाले तरी एकदा जम बसला की बराच client base बनतो, असा अनुभव आहे. लॉटरी पेक्षा नक्कीच जास्त पैसे मिळतील.
business analyst चांगली फील्ड आहे. पण त्यात डोमेन knowledge लागतं. communication पण excellent लागतं. सध्या healthcare मध्ये खूप डिमांड आहे लोकांची. जर इच्छा असेल तर एक्सप्लोर करा.
मॅथ्स मध्ये काही करायचं असल्यास शाळांमध्येही apply करू शकता. this is the right time to apply. (समर)
मॅथ्स आणि स्टॅटेस्टिकस यांना कधीच मरण नाही.
आस्वाद, सविस्तर
आस्वाद, सविस्तर प्रतिसादाबद्दल खूप आभारी आहे. हे ऑप्शन्स जरुर विचारात घेइन.
Pages