लॉटरीचे व्यसन लागते का?

Submitted by सामो on 31 January, 2020 - 11:53

परवा स्क्रॅच ऑफ लॉटरीवर, $१० वरती $८० मिळाले.
काल सेम, $१० वरती $७५ मिळाले तर आज, $२० वरती whopping $१२१ मिळाले.
__________________
परंतु मन अतिशय खाते आहे. एक तर भीती की जुगाराचे, व्यसन लागेल, त्यात नवर्‍याला असली थेरं अज्जिबात खपत नाही त्यामुळे त्याच्या मनाविरुद्ध काही केल्याची बोच.
________
सुदैवाने एक अतिशय चांगली, विचारी आणि हुषार अशी माबोवरचीच एक मैत्रीण आहे. तिचे म्हणणे -
(१) ईझी मनी ची सवय लागेल व आळशी व निष्क्रिय होण्याकडे वाटचाल सुरू होइल.
(२) व्यसन तर नक्की म्हणजे १०० % लागेल.
(३) असा, इझी मनी रहात तर नाहीच पण तू त्या व्यसनात, स्वकष्टाचा पैसा इतका गमावशील की नंतर फक्त हताशपणा येईल.
____________
काही आजारांत व्यक्तीचा स्वतःच्या सवयींवरचा ताबा सुटू शकतो. बायपोलर हे त्याचे उदाहरण. दुसरे असे की पैसा मिळाल्यावर आनंद होतो पण गमावल्यावर फारच खिन्नता येते. म्हणजे स्वतःबद्दल घॄणा वाटते की हे नको करु सांगीतलेले असताना, तू का करतेस.
_____
आता पर्यंत सर्व चक्क १००% सर्व लोक जे लॉटरीच्या दुकानात, दिसलेले आहेत ते आर्थिकदॄष्ट्या अतिशय निम्न वर्गातील, दिसलेले आहेत. यामागे काय कारण असावे? आणि हे मी कमीत कमी ४० वेळा केलेल्या नीरीक्षणातून मत बनविलेले आहे.
______
रविवारी मैत्रीणीबरोबर गुरुद्वारात जाणार आहे. तेव्हा हे सरप्लस धन $१०१ , दान करेन असा निश्चय केलेला आहे. तसे करण्यास नवर्‍याची आडकाठी तर नाहीच उलट प्रोत्साहनच आहे.
________________________
मला माबोकरांचे 'लॉटरी' या विषयातील उलट-सुलट विचार ऐकून घ्यायला आवडतील. लॉटरी खेळावी की खेळू नये त्यामागील कारणमिमांसा. आपल्या ओळखीमध्ये कोणी या व्यसनाच्या विळख्यात सापडलेले उदाहरण आहे का? अजुन एक - इकडे, म्हणजे अमेरीकेत सर्व लॉटरी तिकीटांच्या मागे, 'अ‍ॅडीक्ट झाल्यास उपचारांकरता कॉल करण्याचा एक नंबर सुचवलेला असतो.'
________
हा धागा कोतबो मध्ये काढला असला तरी एक तर मला व्यसन लागलेले नाही परंतु विषय गंभीर आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाबुआबुनमा
12 January, 2020 - 11:55
"मुलांचे फोटो सोशलसाईटवर प्रसिद्ध करण्यास लागणारी परवानगी" आणि "गेल्या दशकातील उल्लेखनीय घटना" हे दोन्ही बाफ ललीतलेखन ग्रुपमध्ये टाकले आहेत. ते कृपया चालू घडामोडीमध्ये टाकाल का? आभार.

@बोकलत - मी नेटवरही शो धले असता अनेक मनी रिलेटेड साईटसवरती हा सल्ला सापडला की लॉटरी तिकीटे अजिबात घेउ नका. याउलट तोच पैसा तुम्ही 'हाय यिल्ड-हाय रिस्क' गुंतवणूकीत, स्टॉकमध्ये गुंतवा.

stocks आणि शेयर्स हे लॉटरी पेक्षा वेगळे आहे का Happy
तो व्हाईट कॉलर जुगार झाला.>>>> शेअर मार्केटमध्ये 100 पैकी जे 95 फेल होतात त्यांच्यासाठी तो जुगार, बाकी पाच जणांसाठी तो बुद्धिबळाचा पट. Happy

>>>>>पत्रिकेत राहू बलवान असेल तर जातक मद्यपान, जुगार, अनैतिक धंदे यात गुरफटत जातो व त्याचा ओढा आसुरी कृत्ये करण्याकडे असतो, समाजात अशा लोकांना मान नसतो असं वाचलं आहे.>>> माझ्या पत्रिकेत, गुरु-राहू युती म्हणजे, चांडाळ योग आहे पत्रिकेत पण गुरु लिडींग आहे राहू नाही तेव्हा भरकटणे संभव नाही किंबहुना, उत्तरोत्तर सुधारणाच होइल. शिवाय गुरु धनुचा असल्याने स्वराशीत = बलवान आहे.

गुरु लिडींग आहे राहू नाही तेव्हा भरकटणे संभव नाही

व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या रुग्णांची पत्रिका पाहणे मनोरंजक ठरावे

आणि ते त्यातून का सुटत नाही हे पण.

लॉटरी लागून जर श्रीमंत झालात तर त्याचे काय परिणाम होतात त्याचाही विचार करा.

मी मागे लोकसत्तेसाठी हा लेख लिहिला होता.
https://www.maayboli.com/node/64929

माझ्या पत्रिकेत, गुरु-राहू युती म्हणजे, चांडाळ योग आहे पत्रिकेत पण गुरु लिडींग आहे राहू नाही तेव्हा भरकटणे संभव नाही किंबहुना, उत्तरोत्तर सुधारणाच होइल. शिवाय गुरु धनुचा असल्याने स्वराशीत = बलवान आहे.
Submitted by सामो on 1 February, 20
>> एवढं कळतंय तर धागा काढण्याचं प्रयोजनच काय? उगाच टिपी म्हणावं काय?

अरुणकुमार धाग्यात नीट लिहीलय - आपली उलटसुलट मते सांगा. तुम्हाला जबरदस्ती केलेली नाही. किंवा मला कळत नाही म्हणुनही धागा काढलेला नाही.

सवय आणि व्यसन वेगळे असले तरी,
सवयचे कधी कधी व्यसनात रुपांतर होवु शकते.
मुळात, तुम्ही कुठल्या टप्प्यावर आहात मनाने ( खुप आनंदी, दु:खी, सैरभैर, अस्वस्थ) आणि आर्थिक परीस्थितीत( कमी आवज,खुपच ज्यास्त आवक) त्यावर अवलंबून आहे.

>>>>>>व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या रुग्णांची पत्रिका पाहणे मनोरंजक ठरावे>> खरे आहे.
बकी गुरुद्वारात पैसे देउन आले. आता कानाला खडा. परत काही तिकीटावर पैसे खर्च करणार नाही की त्या वाटेने जाणारही नाही.

https://www.youtube.com/watch?v=aedrtWXLJpA

Police inspector is a man of his word. His wife Manthara is obsessed with money and neglects her family in pursuit of getting rich quick. She forces Ram to buy a lottery ticket and he obliges. When he goes into a restaurant for a snack, he finds that he has no money to tip the waitress Piya. He promises her half the money if he ever wins the lottery. And to his surprise, he does!! But Manthara is not about to give up half of this windfall so easily and as Ram and Piya come closer to each other, they discover a growing attraction.

Movie:- Bade Dilwala (1999)
Starcast:- Sunil Shetty, Priya Gill, Archana Puran Singh, Paresh Rawal, Satish Kaushik, Ranjeet, Raju Shrivastava
Directed & Produced by:- Shakeel Noorani
Music by:- Aadesh Shrivastava

वर उल्लेख आलेला बडे दिलवाला हा सिनेमा १९९४च्या It Could Happen to You ( निकोलस केज आणि ब्रिजेट फोंड) या हॉलिवूडच्या सिनेमावरून जसाच्या तसा बेतलेला आहे.

तेच म्हणलं भारतात वेट्रेस असणं, तिला टीप देणं कम्पल्सरी असणं वगैरे कुठून आलं...

https://m.youtube.com/watch?v=m4O_EdDD6oM
नशीबवान
आशा काळे, मोहन जोशी, उषा नाडकर्णीं, अलका कुबल

Tawane sir plus one. Original movie is very sweet. In my humble opinion play the lottery win a million$$ buy a Harley and tour the US. Live life a bit. Happy winning.

<< stocks आणि शेयर्स हे लॉटरी पेक्षा वेगळे आहे का Happy
तो व्हाईट कॉलर जुगार झाला. >>

-------- stocks आणि शेयर्स हे लॉटरी पेक्षा वेगळे आहेत असे मी समजतो...

आपण डोळे बंद करुन कुठलेही स्टॉक्स विकत घेत नाही असे समजतो. आर्थिक शिस्त, थोडाफार अभ्यास, विषयाची आवड आणि वेळ असेल तर फायदा नक्की होतो. मी -क्ष % - +य % या रेंजमधे रहाणार असे ठरवले असेल तर योग्य वेळी बाहेर पडण्यासाठीची शिस्त हवी. हव्यास आणि लोभीपणा नको, जोखिम जशी घ्याल त्या प्रमाणात फायदा मिळण्याची शक्यता वाढते.

लॉटरी मधे तसे काही नाही.... निव्वळ अपघातानेच तुम्हाला काही थोडे मिळेल अन्यथा बहुमोल वेळ आणि पैसा वाया जाणार. विजयाचे गणितच असे आहे की लॉटरी मधे वॉरेन बफेट मिळणार नाही.

<< आता पर्यंत सर्व चक्क १००% सर्व लोक जे लॉटरीच्या दुकानात, दिसलेले आहेत ते आर्थिकदॄष्ट्या अतिशय निम्न वर्गातील, दिसलेले आहेत.>>
----- सहमत.... काहीच श्रम न करता श्रीमंत होण्याची एक आशा असणे खूप वाईट. मला अशा लोकांची दया येते.

लॉटरी मधे कमीत कमी वेळात श्रीमंत होण्याची स्वप्ने बघणारी लोकच मला दिसतात. जरुर काढा, क्वचित एक मौज म्हणून आणि विसरा...

वट्ट १०० $ मध्ये काय आणि किती स्वप्ने बघायची. >>>> नाही तर काय? Lol

झंपीच्या पोस्टशी सहमत.

लॉटरीची तिकीट पाहिली सुद्धा नाही कित्येक 10-20 वर्षात. पूर्वी लहान असताना रस्त्यावर विकताना दिसायचे

>>आता कानाला खडा. परत काही तिकीटावर पैसे खर्च करणार नाही की त्या वाटेने जाणारही नाही.>>> नंतर अनेकदा तिकीट घेतले गेले Sad Sad
असो.
काल लॉटरी किऑस्कपाशी उभी होते एक माणूस त्या मशिनमधील तिकीटांकडे इतक्या प्रचंड हावरट, वखवखलेल्या नजरेने पहात गेला. याईक्स!!! मला वाटलं की मीही तशीच झालेले आहे. क्वचित का होइना, मी घेते तिकीट आणि ती वासना, वखवख आहे दुसरे काहीही नाही.

समहाऊ, मला भयंकर गिल्टी वाटाते व त्याहुनही जास्त स्वतःची घॄणा वाटते. असो.

खरं तर गोंदवलेकर महाराजांच्या एका प्रवचनात ऐकलेले आहे - पोटापुरतेम, चरित्र चालवण्यापुरता पैसे प्रत्येक भक्ताला मिळतात. पण ज्या भक्ताची परीक्षा घ्यायची असते त्याला अधिक पैसा देव देतो.

पोटापुरतेम, चरित्र चालवण्यापुरता पैसे प्रत्येक भक्ताला मिळतात.
>>>>>
भारतात किती जणांना हे मिळत नसतील मेहनत करायची तयारी असूनही. ज्याला मिळतात आणि पोट भरते त्याला नंतर हे तत्वज्ञान सुचते. असो अवांतराबद्दल क्षमस्व. यावर वाद घालायची ईच्छा नव्हती. पण जुगार हा वाईटच. एकदा लत लागली की माणूस त्याच्या ऐपतीच्या पलीकडे जाऊन खेळतो आणि बरबाद होतो.

चरित्र Sad सॉरी चरीतार्थ म्हणायचे होते!!! Sad
>>>>भारतात किती जणांना हे मिळत नसतील मेहनत करायची तयारी असूनही. ज्याला मिळतात आणि पोट भरते त्याला नंतर हे तत्वज्ञान सुचते. >>>> आधी पोटोबा मग विठोबा म्हण आहेच.

Pages