लॉटरीचे व्यसन लागते का?

Submitted by सामो on 31 January, 2020 - 11:53

परवा स्क्रॅच ऑफ लॉटरीवर, $१० वरती $८० मिळाले.
काल सेम, $१० वरती $७५ मिळाले तर आज, $२० वरती whopping $१२१ मिळाले.
__________________
परंतु मन अतिशय खाते आहे. एक तर भीती की जुगाराचे, व्यसन लागेल, त्यात नवर्‍याला असली थेरं अज्जिबात खपत नाही त्यामुळे त्याच्या मनाविरुद्ध काही केल्याची बोच.
________
सुदैवाने एक अतिशय चांगली, विचारी आणि हुषार अशी माबोवरचीच एक मैत्रीण आहे. तिचे म्हणणे -
(१) ईझी मनी ची सवय लागेल व आळशी व निष्क्रिय होण्याकडे वाटचाल सुरू होइल.
(२) व्यसन तर नक्की म्हणजे १०० % लागेल.
(३) असा, इझी मनी रहात तर नाहीच पण तू त्या व्यसनात, स्वकष्टाचा पैसा इतका गमावशील की नंतर फक्त हताशपणा येईल.
____________
काही आजारांत व्यक्तीचा स्वतःच्या सवयींवरचा ताबा सुटू शकतो. बायपोलर हे त्याचे उदाहरण. दुसरे असे की पैसा मिळाल्यावर आनंद होतो पण गमावल्यावर फारच खिन्नता येते. म्हणजे स्वतःबद्दल घॄणा वाटते की हे नको करु सांगीतलेले असताना, तू का करतेस.
_____
आता पर्यंत सर्व चक्क १००% सर्व लोक जे लॉटरीच्या दुकानात, दिसलेले आहेत ते आर्थिकदॄष्ट्या अतिशय निम्न वर्गातील, दिसलेले आहेत. यामागे काय कारण असावे? आणि हे मी कमीत कमी ४० वेळा केलेल्या नीरीक्षणातून मत बनविलेले आहे.
______
रविवारी मैत्रीणीबरोबर गुरुद्वारात जाणार आहे. तेव्हा हे सरप्लस धन $१०१ , दान करेन असा निश्चय केलेला आहे. तसे करण्यास नवर्‍याची आडकाठी तर नाहीच उलट प्रोत्साहनच आहे.
________________________
मला माबोकरांचे 'लॉटरी' या विषयातील उलट-सुलट विचार ऐकून घ्यायला आवडतील. लॉटरी खेळावी की खेळू नये त्यामागील कारणमिमांसा. आपल्या ओळखीमध्ये कोणी या व्यसनाच्या विळख्यात सापडलेले उदाहरण आहे का? अजुन एक - इकडे, म्हणजे अमेरीकेत सर्व लॉटरी तिकीटांच्या मागे, 'अ‍ॅडीक्ट झाल्यास उपचारांकरता कॉल करण्याचा एक नंबर सुचवलेला असतो.'
________
हा धागा कोतबो मध्ये काढला असला तरी एक तर मला व्यसन लागलेले नाही परंतु विषय गंभीर आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

+१००१ देवकी. ती मला सांगते तू केव्हा जातेस तिकीटं खरेदी करायला तेव्हा न जाता स्वतःला गुंतव कशात तरी. मला फोन करत जा.
खूप सपोर्टीव्ह आहे. Happy

जळतेय तुमची मैत्रीण. तुम्हाला मोठी लॉटरी लागेल म्हणून.
तुम्ही एक लिमिट ठरवून घेत राहा लॉटरी. यु विल थँक मी लेटर.

>> लॉटरीचे व्यसन लागते का?

लागू शकते का? हो नक्कीच. याबद्दल शंका वा दुमत असण्याचे कारणच नाही. लॉटरीपायी पैसा खर्च होऊन वाताहत झालेली उदाहरणे पाहिली आहेत. मराठीत जुगार म्हणतात. कॅसिनो हे त्याचेच एक भावंड. शब्द वेगवेगळे असले तरी मुलभूत तत्व तेच असते. यात एक भीषण मानसिकता बनते ती अशी कि "हरले म्हणून काय झाले? बस्स एकदा जिंकणे आवश्यक आहे. एकदाच. मग हरलेले पैसे किरकोळ वाटतील एवढी रक्कम मिळेल" हि मानसिकता खूप घातक असते. एक किस्सा ऐकला होता. सिंगापोरला एक गृहिणी रोज दुपारी वेळ घालवण्यासाठी म्हणून कॅसिनोला जायची. तिला सवय लागली. आणि अनेक दिवसानी जवळचे सगळे पैसे संपल्यावर तिला मानसिक उपचार घ्यावे लागले होते.

होय अतुल पाटील, हेच ऐकले आहे. मी २ दिवस लंचटाइममध्ये तिकीट घेतले. आज मात्र सकाळी पहीले काम तेच केले. ही धोक्याची घंटी वाटली मला.
___
@च्रप्स Happy नाही ती जळकी नाही हो Happy

लॉटरीचे व्यसन लागते का?

लागू शकते का? हो नक्कीच. याबद्दल शंका वा दुमत असण्याचे कारणच नाही. लॉटरीपायी पैसा खर्च होऊन वाताहत झालेली उदाहरणे पाहिली आहेत. मराठीत जुगार म्हणतात. कॅसिनो हे त्याचेच एक भावंड. शब्द वेगवेगळे असले तरी मुलभूत तत्व तेच असते. यात एक भीषण मानसिकता बनते ती अशी कि "हरले म्हणून काय झाले? बस्स एकदा जिंकणे आवश्यक आहे. एकदाच. मग हरलेले पैसे किरकोळ वाटतील एवढी रक्कम मिळेल" हि मानसिकता खूप घातक असते. >>>+ १११११११११११११११११११११११११११११११११११११११११

पत्रिकेत राहू बलवान असेल तर जातक मद्यपान, जुगार, अनैतिक धंदे यात गुरफटत जातो व त्याचा ओढा आसुरी कृत्ये करण्याकडे असतो, समाजात अशा लोकांना मान नसतो असं वाचलं आहे.

तुम्ही इतके दुबळे आहात का कि व्यसन लागेल?
स्वतःला विचारा ...

प्रत्येक व्यसनी स्वतःबद्दल असाच फाजील आत्मविश्वास (OVERCONFIDENCE) बाळगून असतो.मग ते दारूचे असो जुगाराचे असो किंवा कोकेन/ ब्राऊन शुगरचे असो.

( व्यसनमुक्ती केंद्रात काम केल्यावर आलेल्या अनुभवावरून सांगतो आहे)

माझे आजोबा दर शुक्रवारी एक सिक्सटी मारतात. 92 वर्ष वय आहे. पण शुक्रवार म्हणजे शुक्रवार - बाकी कधीच नाही.
आता हे व्यसन आहे का? नक्कीच - पण लिमिट ठरलेली आहे.
स्वतःवर कंट्रोल असेल तर का नको आनंद घ्यायला. मग दारू असो , सिगारेट नाहीतर गॅम्बलिंग.
म्हणून सामो ना विचारले - स्वतःवर कंट्रोल असेल तर बिंदास लिमिट मध्ये करा लॉटरी.

आता हे व्यसन आहे का? नक्कीच -पण लिमिट ठरलेली आहे.
असे कित्येक निवृत्त लष्करी अधिकारी माझ्या पाहण्यात आहेत.

आपण लिहिले आहे ती सवय आहे.

मूळ आपली व्यसनाची व्याख्या चुकीची आहे.

व्यसन म्हणजे एखादी गोष्ट केली नाही तर आपल्याला भयंकर अस्वस्थ वाटते.आपल्या रोजच्या व्यवहारात अडथळा येतो. नीट काम करणे शक्य होत नाही. आणि विचार सारखे परत परत त्याच व्यसनाकडे वळतात. ब्राऊन शुगर सारख्या व्यसनात तर ते घेतले नाही कि हगवण लागते उलट्या होतात पोटात मुरडा होतो.

तेंव्हा सवय आणि व्यसन यातील फरक समजून घ्या हि विनंती.

जेव्हा सकाळी उठल्या उठल्या आपण दिवसाची सुरुवात, लॉटरीचे तिकीट घेउन करतो तेव्हा ती धोक्याची घंटा नक्की आहे.
शिवाय या या ३ दिवसांत मी एकूण ३० तरी स्क्रॅच ऑफ तिकीटे विकत घेतली. प्रत्येकी ३-५-१०-२५ डॉलर्स ची. जेव्हा जिंकायचे नाही तेव्हा पुढची बॅच घेत असे. हां माझ्या मूळ २० डॉलर्स ना हात लावत नव्हते पण , ...... कंट्रोल कमी होता हेही खरे आहे.
____________
माझी विचारसरणी अशी होती की स्वतःला पैसे कमावण्याची एक संधी का देऊ नये? पण त्या कमावण्यामागे गमावणे जास्त आहे हे तर्कानेही कळो येते. जर लॉटरी अशी सहज, लागली असती तर लॉटरीचा धंदाच बसला असता.
अजुन एक बटबटीत मनी-पॉर्न मला जे दिसले ते म्हणजे प्रत्येक लॉटरीच्या, दुकानाबाहेर मोठे फलक असत ज्यावर असे - आमच्या दुकानात तिकीट घेउन, $१००० ची लॉटरी लागली. $५०० लागले वगैरे.
ती जाहीरात नक्की खरी होती पण मला ती एखाद्या भडक नटलेल्या वेश्येसारखी वाटली. खुणावणारी, शुक-शुक करणारी, लालूच दाखवणारी व खूप अशी निम्न म्हणा ना.
किंबहुना तो भपका पाहूनच धोक्याची घंटी वाजली.
__________
>>>>>>>तुम्ही इतके दुबळे आहात का कि व्यसन लागेल?>>>>>>>>> मी दुबळी नसेनही पण व्यसन अतिबलवान असेल तर??? च्रप्स मला आपले म्हणणे कळते आहे पण मला पटत नाही.

वरचे ते दारू पिणे सवय आहे की व्यसन हे ती सोडल्यावरच समजू शकते. दारूबाबत व्यसनाला सवय घोषित करायची सवय असते दारू पिणारयांना Happy

च्रप्स, धूम्रपान, मद्यपान , गांजापान सुरू करणारी कुठलीही व्यक्ती मला यात आयुष्यभर गुरफटून रहायचे आहे, मला रोजच / वेळोवेळी घ्यायची आहे,व्यसन लावूनच घ्यायचे म्हणुन सुरवात करत नाहीत.
प्रत्येकाच्या पुढे तुमच्या आजोबांसारख्या एखाद्या व्यक्तीचा आदर्श असतो. "असे कसे ताबा न राहण्याइतपत लोक व्यसन करतात? एवढाही कंट्रोल करता येत नाही लेकाच्याना?" असाच विचार ते व्यसनी लोकांबद्दल करत असतात. ९० च्या वर जगणाऱ्या मोजक्या आजी आजोबांचे उदाहरण घेतात पण व्यसनापायी वाट लागलेल्यांची कित्येक उदाहरणे त्यांना नको असतात. कुणी व्यसनात अडलेल्याने जरी त्यांना सावध करण्याचा प्रयत्न केला तरी "मी तुमच्या सारखा मूर्ख नाही, मी कंट्रोलमध्येच घेणार आहे आणि काही अपाय होत असेल वाटले तर मी सरळ सोडून देईन" असाच सगळ्यांचा विचार असतो. तरीही कित्येक लोक व्यसनात पूर्ण अडकतात. ते कमी शिकलेले कमी आयक्यू असलेलेच असतात असे नाही, उच्चशिक्षीत, प्रचंड आयक्यू असलेलेही असू शकतात.
त्यात काय, कंट्रोल ठेवायचा लीमिटमध्ये घ्यायची एवढंच असतं तर कुणीही व्यसनात अडकलं नसतं.
आपल्याला (अद्याप) व्यसन लागलं नाही म्हणजे इतरांनाही लागणार नाही असे गृहीत धरणे चूक.
ज्या कुठल्याही गोष्टींमध्ये व्यसन लागण्याचे पोटेंशियल आहे त्याबद्दल सावधगिरीचा इशारा देणे उत्तम बाकी लोक स्वतः काय तो निर्णय घेवोत.

आपल्याला (अद्याप) व्यसन लागलं नाही म्हणजे इतरांनाही लागणार नाही असे गृहीत धरणे चूक.
+१००

एवढंच नव्हे तर आपल्याला आज व्यसन नाही म्हणून उद्या तीच सवय व्यसन होणार नाही याची कोणीही खात्री देऊ शकत नाही

हा एक उतार आहे. आपण घसरणीला केंव्हा लागता ते समजत नाही. आणि एकदा घसरणीला लागलात कि त्यातील ९० % लोकांचा कपाळमोक्ष नक्की असतो.

कधी विचार केला आहे की लोकांना बीअर व व्हिस्कीचेच व्यसन का लागते आणि पाईनॲपल ज्यूस वा फ्रूटी पिण्याचे का नाही?

कधी विचार केला आहे की लोकांना पत्ते व जुगाराचेच व्यसन का लागते आणि सापशिडी वा ल्युडो खेळायचे का नाही?

नवऱ्याला अज्जिबात खपत नाही ते केल्याची बोच का लागली?
पैसे दान करायला नवऱ्याची आडकाठी नाही, प्रोत्साहनच आहे हे का महत्त्वाचे आहे?

करा बिनधास्त. शेअर मार्केट अँप्रोच वापरा. म्हणजे तुम्ही सलग तीन दिवस जिंकलात आणि चौथ्या दिवशी लॉस झाला तर पाचव्या दिवशी कमी किमतीची लॉटरी घ्यायची. सहाव्या दिवशी लॉस झाला तर सातव्या दिवशी परत कमी किमतीची लॉटरी आणि जर सहाव्या दिवशी प्रॉफिट झाला तर सातव्या दिवशी जास्त किमतीची लॉटरी घ्यायची. अजून डिटेल्स मध्ये जायचं असेल तर फिबोनासी अँप्रोच वापरा.

"माझ्या बाबतीत अमुक गोष्ट होणार नाही" हे कुणालाच वाटू नये कुठल्याच गोष्टीबाबत. पण जवळपास सगळ्यांना वाटतं - मग ते व्यसन लागणं असो, भरधाव आणि बेपर्वाईने गाडी चालवून अपघात होणं असो, ज्याच्या प्रेमात पडलोय त्या व्यक्तीकडून फसवणूक होणं असो, दुष्कृत्ये करून कधीतरी पकडले जाणं असो इ. इ.

वरचे ते दारू पिणे सवय आहे की व्यसन हे ती सोडल्यावरच समजू शकते. दारूबाबत व्यसनाला सवय घोषित करायची सवय असते दारू पिणारयांना
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 1 February, 2020 - 00:19
>>> फारच धास्ती घेतली ब्वॉ डॉक्टरांची.

Pages