मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरातील प्रदर्शने, कार्यक्रम - २०२०

Submitted by Srd on 29 January, 2020 - 23:15

मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरातील प्रदर्शने, कार्यक्रम - २०२०.

काही मोजकी प्रदर्शने आणि जागा पाहा.

लोकप्रिय प्रदर्शनांचा प्राईम टाईम हा फेब्रुवारी महिना असतो. मुलांच्या परीक्षेच्या अभ्यासाला जोर पकडलेला नसतो, वातावरण गार असते. मुख्य कार्यक्रम जानेवारीत महिन्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात होत असतात.

१) पंचविसावे फळे फुले प्रदर्शन, मुंबई महापालिका यांचे.
वीरमाता जिजाबाई उद्यान(राणीबाग),मुंबई (भायखळा स्टेशनपाशी) - ३१ जाने, १,२ फेब्रुवारी.
मागच्या वर्षी लहान मुले खूप आली होती. विविध सेल्फी पॉइंटस फुलांचे देखावे होते. बच्चेकंपनी खुश.
यावर्षी मुंबईतील गेटवे, म्हातारीचा बूट वगैरे फुलांचे आकार असणार आहेत. रोपे, कुंड्या,विक्रीचे अनेक स्टॉल्स.
(शुल्क नाही.)
शिवाय राणीबागेत नवीन आणलेले प्राणी. २६ जानेवारीला उदघाटन झालेली दालने पाहता येतील. ज्येष्ठांना नि:शुल्क. इतरांना ५०.

● दरवर्षी बागकामाचा तीन दिवसांचा कोर्स पहिल्या दिवशी दहाला सुरू होतो. दहा ते पाच. शुल्क पाचशे रु, सर्टिफिकेट मिळते.( विनाशुल्क विना प्रमाणपत्र तीनही दिवस बसता येते.)
----------------------------

२) पर्यटन प्रदर्शन

३,४,५ फेब्रुवारी २०२०
३ फे - फक्त बिझनेस एजंटसाठी
४ फे दु दोन ते सात, सर्वांसाठी
५ फे दु अकरा ते सात.सर्वांसाठी

TTF ,Fairest Media. Site - ttfotm dot com.
Bombay exhibition center. Goregaon east.
बान्द्रा बोरिवली हायवेवर आहे.

हेच प्रदर्शन पुन्हा सप्टेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात असते. साईट पाहा. माझ्या नातेवाइकाला सायकल टुअर हवी होती. एकाने सायकलच टांगलेली. अपेक्षेप्रमाणे तो सायकल टुअरवालाच होता. मालाडचे (परांजपे बहुतेक. नाव विसरलो.) टुअरवाले होते. पण नंतर दिसले नाहीत.

OTM हे परदेशातील सहलींसाठी आहे. ते अगोदर TTF बरोबर होते पण आता त्यांचे प्रदर्शन साधारण त्याच वेळी दुसरीकडे भरते.
----------------------------

३)झाडांचे प्रदर्शन

फ्रेंडस ओफ ट्रिज यांचे - ८,९ फेब्रुवारी, रुपारेल कॉलेज आवार. माटुंगा रोड रेल्वे स्टेशन ( पश्चिम रेल्वेचे) समोर). गुलाब, इतर फुलझाडे, निवडुंग, अनेक बोनसाई.

---------------------------

४) काला घोडा आर्ट फेस्टीवल २०२०

शनिवार १ फेब्रुवारी ते रविवार ९ फेब्रु २०२०.
रोज सकाळी दहा ते दहा. पहिल्या दिवशीच ब्रोचर मिळवा. Official site kala ghoda art festival
दमून जाल एवढे भरगच्च कार्यक्रम असतात.

अधिक माहिती बातमी holidayfi

चारही ठिकाणी हौशी फोटोग्राफरांना भरपूर संधी.
---------------------------
धाग्याचे शीर्षक अधिक व्यापक केलं आहे. तुम्हाला माहिती झालेल्या चांगल्या कार्यक्रमांची, प्रदर्शनांची नोंद करा.

नवीन मुंबई, ठाणे फार दूर नाही. तिथलेही कार्यक्रम असावेत.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!

अशाच प्रकारे इतरही प्रदर्शन/ कार्यक्रम बद्दल वेलोवेली माहिती दिल्यास ईच्छुकांना भेंट देता येइल.
जस की गेल्या आठवड्यात महालक्ष्मी सरस प्रदर्शन होते BKC ला. बहुतेक काल शेवटचा दिवस होता.

त्या 'मुंबईतील सार्वजनिक कार्यक्रम' धाग्यात टाकायलं हवं होतं.
---------
आणखी एक इवेंट असतो हिंदुस्तान टाईम्सचा प्रायोजित ' No tv day' म्हणून. बहुतेक १ मार्च. या दिवशी फ्री हेलिकॉप्टर राईड मुलांसाठी असते, हौशी फोटोग्राफरांसाठी फोटो स्पर्धा असते.
-----------
2016 चे kala ghoda ब्रोशर (पन्नास पानी)

त्यातले एक पान

उत्तम धागा
फक्त मुंबईतील कार्यक्रम २०२० अस बदला, आणि या वर्षातील सर्व प्रदर्शने, कार्यक्रम, कार्यशाळा, सभा , परिषद याविषयीची माहिती इथे टाकता येतील

मस्त धागा माहिती देत राहा... भायखळा राणीबाग आमच्या घरापासून चालत पंधरा मिनिटे. तेथील प्रदर्शनाला जाणे झालेय दोनेक वेळा. मला फळफूल बागकामाची आवड नाही. पण राणीबाग माझा आणि मुलीचा विकेंडचा पडीक अड्डा असल्याने तिथे जाणे व्हायचेच. यात प्रदर्शनही बघणे झालेले. सध्या राणीबाग नवीन केलेय तेव्हा या प्रदर्शनाचाही जोर जास्त असावा...

काळाघोडा नेहमी वाटते जायला हवे पण साला योगच येत नाही. सध्या नवी मुंबईला असल्याने आता आणखी लांब झाले...

@ ऋतुराज , अगोदर असा एक धागा आहे याची @हर्पेन यांनी आठवण करून दिली. त्यात २०१७ नंतर नोंदी नाहीत. तिथे कॉपी पेस्ट केलंय.
धाग्याचे शीर्षक व्यापक केलं आहे. सभासदांनी त्यांना माहिती असलेले कार्यक्रम द्यावेत.

कालाघोडा ब्रोशर डाउनलोड लिंक कालाघोडा 2020 बुकलेट, siteवरची link, size 23 mb.

मी ही हे प्रदर्शन पाहिले आज
खूपच सुंदर, भुईचाफ्याचा कंद घेतला
यावेळी तरी कमी झाडे होती असे वाटले
तरीही चुकवू नये असे प्रदर्शन
नक्की बघा

हे म्हणजे आमच्या बंगलोरच्या लालबागच्या फ्लॉवर शोसारखं दिसतंय. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला जोडून दहाबारा दिवस हा शो असतो. आम्ही खूप वेळा जातो. यावेळी मात्र नाही जमलं.
वरचा डबेवाला मस्त आहे.

चारपाच वर्षांपूर्वी झाडं विकणारे बंगालचे रोपे विक्रेते पाच सहा होते. संत्री/मोसंबिची रोपे दीडशे रपयांस होती. प्रत्येक रोपाला वीसपंचवीस फळेही होती. मुख्य म्हणजे रोपांना भला मोठा मुळांचा झुपका होता व माती अजिबात नव्हती. म्हणजे रोपे पाठवणे हलके होते. नंतर कधी ते दिसले नाहीत. यावेळी एकजणच होता पण ती रोपे नव्हती.
आता पुढच्या शनिवारी रविवारी रुपारेल कॉलेज आवारातले प्रदर्शन.

मध्य रेल्वेने औषधी वनस्पतीची बरीच रोपे मांडलेली. सबजा/कापुर /थाईम / ओरिगानो / मिरी / लवंग / दालचिनी / पिंपळी / पानवेल /तुळस / सताप /ओल स्पाईस / वेखंड . नावाची पाटी आणि झाड एकाच फ्रेममध्ये आले ते फोटो काढले.

छान धागा. मस्त प्रदर्शन.
वरती ऋतुराज यांनी म्हटल्याप्रमाणे फेब्रुवारी 2020 ऐवजी फक्त 2020 करता येईल का शीर्षक?
म्हणजे वर्षातील सर्व कार्यक्रमांची नोंद इथे ठेवता येईल.

चारपाच वर्षांपूर्वी झाडं विकणारे बंगालचे रोपे विक्रेते पाच सहा होते. >>>>> हो हो अगदी बरोबर, त्या वेळी त्यांच्याकडे बरीच विविधता पण होती

>>>फेब्रुवारी 2020 ऐवजी फक्त 2020 करता येईल का शीर्षक?
म्हणजे वर्षातील सर्व कार्यक्रमांची नोंद इथे ठेवता येईल.
- वरणतूपभात

हो करता येईल. अजून संपादन आहे. बदल केला आहे. परंतू लोकप्रिय प्रदर्शनांचा प्राईम टाईम हा फेब्रुवारी महिना असतो. मुलांच्या परीक्षेच्या अभ्यासाला जोर पकडलेला नसतो, वातावरण गार असते. मुख्य कार्यक्रम याच महिन्यात होत असतात.
------------------------
शनिवारी टिवीवर राणीबाग प्रदर्शनाची बातमी,फोटो दाखवले गेल्याने रविवारी गर्दी वाढली असणार. उत्सफुर्त संगीत कलाकारांसाठी तिथे मंच ठेवला होता. बऱ्याच जणांनी कला सादर केली. प्रेक्षकही बसून ऐकत होते.

जे रोपे विक्रेते दुरून येतात त्यांना फायदा होईल. इथून स्टॉल शुक्रवारी काढला की तो रुपारेल कॉलेजच्या ग्राउंडला लावतील. शनिवार रविवार तिकडचे फ्रेंड्स ओफ ट्रीजचे प्रदर्शन आटपले की परत जातील.
पुर्वी अशाच तारखा लावत. पण कुणा एकालाच वीकेंड मिळायचा.

मॅजेस्टिक गप्पा फेब ७--१६ विले पारले पूर्वं
बाकी गोरेगाव पूर्व, बोरीवली पूर्व अनेक कार्यक्रम असतात.
चित्रपट महोत्सव नुकताच संपला.
संगीत महोत्सव, गायकांच्या जन्म/ पुण्यतिथीचे कार्यक्रम सतत असतातच.

गोरेगावच्या पर्यटन प्रदर्शनाला गेलो होतो. पण ते सामान्य पर्यटकांसाठी नाही। फक्त टुअर ओपरेटरांसाठी आहे. खेप फुकट गेली.
----------------
रुपारेलच्या प्रदर्शनाला मागच्या वर्षी गेलो होतो. काही झाडे वर्गांत मांडलेली होती. तिथे उजेड कमी होता. Flash टाकला तर फुलांचे फोटो फसतात.

इथेच प्रत्येक प्रदर्शनाची माहिती दिल्यानंतर येण्याची इच्छा असलेले मायबोलीकर एखादी ठराविक वेळ ठरवू शकले तर मिनी गटग पण होऊ शकेल..

Pages