शुभ प्रभात..

Submitted by बुन्नु on 23 January, 2020 - 16:25

या दोन्हीही चित्रांमध्ये सकाळच्या सावल्या दाखवण्याचा प्रयत्न केलाय...

१.
Morning_Door.JPG

२.
Morning_roundwindows.JPG

कसं जमलंय ते नक्की सांगा ..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर, आवडले.
चित्रकारांबद्दल मला आदर वाटतो. चित्रकला हा माझा शालेय जीवनापासूनचा शत्रू आहे ! इ. ६वीत तर मी वार्षिक परीक्षेत चित्रकलेत नापास झालो होतो. शब्दांचे जितके प्रेम तितकीच रेषांची अगदी भीती वाटते.
....
इथे व्यं मा यांचे एक अवतरण आठवते:
शब्दांपेक्षा रंग हे कमी वापरातले माध्यम चित्रकाराचे असते, म्हणून तो भाग्यवान !”
.......
तसे तुम्ही नक्कीच आहात . Bw

खूप छान.
मी तज्ञ नाही पण कॅनव्हासच्या पांढर्या रंगाचा दोन्ही चित्रात छान उपयोग करता आला असता असे वाटले.

खुप सुंदर जमली आहेत. रंगही अगदी फ्रेश राहीलेत.

वॉटरकलरमध्ये पेपरचा पांढराभाग आवर्जुन वापरतात. (हँडमेड पेपर असेल तर अगोदर ओला करुन घेतला किंवा फक्त पाण्याचा वॉश मारला तर बेस सुरेख आणि सफाईदार रेखाटता येतो.)

राजदीप, कुमार सर, पशुपत आणि अप्पा अभ्यासपूर्ण प्रतिसादाबद्दल आभारी आहे...

पांढर्या रंगाचा दोन्ही चित्रात छान उपयोग करता आला असता असे वाटले.

वॉटरकलरमध्ये पेपरचा पांढराभाग आवर्जुन वापरतात. (हँडमेड पेपर असेल तर अगोदर ओला करुन घेतला किंवा फक्त पाण्याचा वॉश मारला तर बेस सुरेख आणि सफाईदार रेखाटता येतो.) >> अगदी बरोबर. हा प्रयत्न नेहमीच असतो पण ते जमवायला सध्या तरी कठीण जातंय.

खरतर पहिल्या चित्रात दरवाज्याच्या आजूबाजूला दिलेला फिक्कट निळा रंग नंतर दिलाय आगोदर पांढरा होता. पण का कुणास ठाऊक मला काहीतरी खटकत होतं म्हणून मी वॉश दिला. ते म्हणतात ना सगळं जमून आलेलं, आणि शेवटी एका फटक्यात घालवून बसलो (या साठीही मराठीत काहीतरी म्हण असेल).

“ शब्दांपेक्षा रंग हे कमी वापरातले माध्यम चित्रकाराचे असते, म्हणून तो भाग्यवान !” >> नक्कीच. हे वाक्य खूप आवडलं. तसच माझंही आवडीचं एक वाक्य इथे देतो ..

Art is not about perfection, it is about expression.