गुहेतले छावे

Submitted by Asu on 10 January, 2020 - 02:22

गुहेतले छावे

गुहेतल्या छाव्यांना, तुम्ही नका देऊ हाकारे
सावधान, करती गुरगुर, देती तुम्हास इशारे

अंधार दाटला नगरा, कुंठित झाला वारा
जंगल धुमसतो सारा, देईल कोण सहारा

होतील श्वापदे जागृत, छळतील माणसाला
ओळखतील ना कुणाला, ना खुद्द बापाला

घाबरेल जंगलचा राजा, पडेल उघडी प्रजा
चोर सोडून संन्याशाला, मिळेल उगाच सजा

छावे गुहेत सगळे, तोवर ना जगण्याची भ्रांत
सुटता मोकळे नगरात, होईल फक्त आकांत

धडकी मनात भरते, जगण्याची भीती उरते
कोलाहल माजेल सारा, विस्कटेल हा पसारा

हिंसेचा सर्वत्र मारा, देई कोण कुणास थारा
जंगलात मंगल सारे, अमंगल घडविता कारे?

गुहेतल्या छाव्यांना, तुम्ही नका देऊ हाकारे
सावधान, करती गुरगुर, देती तुम्हास इशारे

- प्रा.अरूण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults