एकटीच @ North-East India दिवस - ६

Submitted by सुप्रिया राज जोशी on 7 January, 2020 - 00:17

अनुक्रमाणिका > https://www.maayboli.com/node/72984

11 फेब्रुवारी 2017

प्रिय शारदा,

काल आपल्या अनघाचा साखरपुडा झाला. मी येऊ शकले नाही. तू माझ्यावर रागावणार नाहीस, उलट तुला माझ्या प्रवासाबद्दल माहीत असतं तर तू स्वतःहून मला घरचा समारंभ सोडून इथे पाठवलं असतसं, असं मला वाटतं. माझे जे जे उद्योग चालू असतात त्याच्याबद्दल तुला कुतूहल नि कौतुक असते हे मला माहित आहे, आणि हे ही चांगलेच माहित आहे की तुझ्या दुःखाच्या, आनंदाच्या प्रसंगात मी जवळ असले की तुला आधार वाटतो. म्हणूनच या पत्राद्वारे तुझ्याशी संवाद साधायचा प्रयत्न करते आहे.

प्रवास मस्तच चाललाय. एकटेपण हे कधीकधी वरदान असतं, जवळ कोणीच जिवाभावाचं नाही मग फक्त तेव्हाच आपल्या स्वतः च्या गरजा आपल्याला नीट कळतात. त्या भागवण्यासाठी काय पाऊल उचलावे हा विचार करायचा अवधी मिळतो. रोजच्या जीवनात संसाराच्या एकेक जबाबदाऱ्या पार पाडतापडता स्वतः शी अशी मैत्री साधता येईल का? म्हणून वरदान म्हटलं.

आज पहाटे पहाटे जाग आली. तंबूमधून बाहेर डोकावून पाहिल तो नजारा सुंदर दिसत होता.
WhatsApp Image 2020-01-07 at 10.39.46 AM.jpeg

नदीच्या लगत जी दाट हिरवी झाडी आहे ती पाण्यात वाकून आपले प्रतिबिंब न्याहाळत होती. जशी माझी चाहूल लागली तसे माझा राखणदार कुत्रा शेपूट हलवत माझ्याजवळ आला. वेळ माहित नाही पण निरव वातावरण होते. नदीकिनारी आम्ही दोघांनी वरच्या टोकाच्या त्रिवेणीपर्यंत फेरफटका मारला. संगमाच्या कुशीतच दगड लहानसे बेट तयार झाले आहे तिथली दगडगोट्यांचे एकापेक्षा एक नमुने बघून तर मला हिरेमाणके सापडल्या सारखा आनंद झाला. खरेच, राधाला तर असे दगड रत्न माणकांपेक्षा मौल्यवान वाटतात. मला तिच्यासाठी किती दगड वेचू नि किती नाही असे झाले.

फेरफटका मारताना मधे मी टॉयलेटला गेले तर तो कुत्रा माझे आटपेपर्यंत तिथेच थांबून राहिला. अनोळखी जागी अनोळखी कुत्रे वाटाड्या बनून अशी सोबत करतात हे अनेकांनी अनुभवले आहे. या कुत्र्याला मी कुठच्या जमातीतली वाटले, कुत्राच जाणे कारण फिरून परत आले तशी त्याने मला अंगभर चाटून त्यांच्या टाईपची अंघोळ घातली.

एक couchsurfing नावाची community आहे. त्याचे मेम्बर्स आपापल्या रहात्या ठिकाणी भेट देणाऱ्या माझ्यासारख्या प्रवाशांना मदत करतात. समुदायातील अनोळखी लोकाबद्दल परस्पर मैत्री आणि विश्वास हे रहिवासी आणि प्रवासी दोघेही जोपासतात. याच समुदायातील एक अनोळखी प्रवासी मुंबईवरून गाडी घेऊन North East ची रोडट्रीप करायला येणार आहे हे मी तेथील फोरम वर वाचले. आज त्याला भेटून त्याच्याच गाडीतून गंगटोक ला जायचे असा प्लान केला होता, त्यानुसार तो मला इथे भेटला. निसर्गरम्य त्रिवेणीच्या काठावर कोणीही तासनतास निवांत बसावे. पण थोड्याच वेळात तिथे लोकांची ये जा सुरु झाली. आपल्याकडे कशी गणेशविसर्जनाची धुमधाम असते, तशीच सरस्वती विसर्जनासाठी त्रिवेणी संगमावर गर्दी होऊ लागली. अर्थात नदीच्या गुणधर्मा नुसार ती कुठचेही प्रदूषण पोटात ठेऊन घेणार नाहीच. पण नदीचे एवढे नितांत सुंदर रूप पाहिल्यावर त्याच प्रवाहात इकडून तिकडे वाहणाऱ्या मुर्त्याचे दृश्य बघायला जीवावर आले. मग आम्ही इथून काढता पाय घेतला.
saraswati.jpg

छान गप्पा मारत गँगटोक ला पोहोचतच होतो की आमचा रस्ता चुकला आणि दूरचा पल्ला पार करावा लागला. गंगटोकलगतच्या डोंगराला वळसा घालून पूर्ण प्रदक्षिणा घालून पार दुसऱ्या टोकाने आता शहरात एन्ट्री मारावी लागणार होती. चुकूनच चुकलेल्या ह्या वाटेवर गंगटोक टेकडी चा वेगळाच देखावा पहाता आला तो विलोभनीय होता.
51849522_10156862330487778_381792343159734272_n.jpg

ही वाट गर्द जंगलातून जाते ती पार करताना प्राकृत निसर्गसौंदर्य अनुभवायला मिळाले. रॉबर्ट फ्रॉस्ट या कवीने त्याच्या एका कवितेचा सुरेख शेवट केलाय ,"Two roads diverged in a wood, and I took the one less traveled by, and that has made all the difference."
या चुकलेल्या वाटेच्या निमित्ताने त्या ओळींची आठवण झाली खरी, पण तुला काय नि मला काय नि कोणाला काय ... आपल्या नेहेमीच्या परिघाबाहेर पाऊल टाकून काहीतरी वेगळे करायच्या विचारांना कृतीत उतरवण्यासाठी या ओळी मोठी प्रेरणा देतील.

हॉस्टेल वर पोहोचताच बांगलादेशी हॉस्टेल मेटने (त्याला मी डेल्टा म्हणायचे पण त्याचे खरे नाव रुबेल) माझा ताबा घेतला. "ताई मी तुला एक दिवस केवढे मिस केले." एक दिवसाच्या ओळखीवर दुसऱ्याच दिवशी सहवास तुटला तरी अशी आठवण येते? मग आयुष्यभराचा सहवास सोडून कोणी जिवलग दूर गेले असेल तर कसे करमायचे? मला तुझे दुःख कळते आणि इथे दूर असले तरी कालच्या दिवशी तुझी आठवण सतत मनात होती. दोघेजण एकमेकांहून किती अंतर दूर आहेत यावर कोणी कोणाच्या हृदयाच्या जवळ आहे नाही हे ठरत नसतं. हे फक्त तुझ्यामाझ्या साठी नाही, दुसऱ्या जगात निघून गेलेल्या तुझ्या जीवलगासाठीही लिहिले आहे. रुबेल ची बडबड थांबणार नव्हती मग सरळ पंघरुणाच्या आत शिरून पत्र लिहायला घेतले. आज पत्र लवकर संपवून लवकर झोपायचा बेत आहे .
अनघाला खूप खूप शुभेच्छा! उद्या एक सुंदर प्रार्थना स्थळाला भेट देणार आहे, तेव्हा सर्वांसाठी प्रार्थना करेन.

तुझी
(तुमच्याकडच्या तीन पिढ्या मला ताई म्हणूनच हाक मारतात, गम्मत आहे ना D)
सुप्रियाताई .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज काल स्वतःचे फोटो काढणं सेल्फी स्टिक मुळे सहज शक्य झालाय. सेल्फी स्टिक स्टॅन्ड वाला पण मिळतो तो कुठेही उभा करू शकतो आणि फोटो काढण्याचं बटण तुमच्या हातात असत. त्यामुळे लांबवर मोबाईल "सेल्फी स्टॅन्ड "वर उभा करून हातातल्या बटणाने सेल्फी काढू शकता. दोन तीन रिटेक्स घेऊ शकता . सगळं शक्य आहे , हाताच्या बोटावर. सोलो ट्रिप वाले तीच आयडिया वापरतात.

भरत यांनी पोस्ट केलेली व्हिडीओ क्लिप बघितली आणि अगदी अगदी झालं . माणसाला कौतुक करण्यासाठी शब्द शोधावे लागतात पण चुका दाखवण्यासाठी सटासट शब्द तयार असतात. तो युनिव्हर्सल माणसाचा स्वभाव आहे . कुठे तरी आपण हे करू शकत नाही हि जेलसी पण असते. मग चला काही तरी चुका शोधा आणि स्वतःच्या दुखऱ्या नसेला शांत करा हि प्रवूत्ती आहे . त्याला इलाज नाही . दुर्लक्ष करणारे योग्य . ज्यांना दुर्लक्ष करण जमत नाही ते लिहीण /एक्प्रेस करण थांबवतात . सुप्रिया तुम्ही असं करू नका

आभा यांच्या पोस्टला संपूर्ण अनुमोदन . जगू द्या ना त्यांना त्यांचे मापदंड घेऊन . हायकर्स जसे स्वतःच्या स्वार्थासाठी काही अपघात घडल्यास इतर यंत्रणांना कामाला लावतात तशाच या पण वागतात असं समजा हवं तर. टॅक्स पेयर तर त्या स्वतःही असतीलच कि . काहीतरी वेगळे अनुभव वाचायला मिळताहेत त्याचा आनंद घ्या कि Happy

@ सुप्रिया,

You are living many people’s dream actually.
I Envy you Happy

पु भा प्र.

धाग्याला थोडे अवांतर तरी इथे वारंवार उल्लेख होत आहे म्हणून - उत्तर अमेरिकेत सामान्यपणे येणार्‍या खर्चामुळे तीन दिवसांनंतर सर्च/रेस्क्यू थांबवतात. पुढे जर शोध चालू ठेवायचा असेल तर आप्तेष्टांना पैसे भरावे लागतात. अनेकवेळा नॅशनल पार्क्स शिवाय इतरही संस्थेतील स्वयंसेवक मदतीस उतरतात. ते स्वयंसेवकांना लागणारे साहित्य्/खाणे इ साठी स्वतःचे बिल पाठवतात. काही काही खाती जर अधिक जोखीम घेणारा गिर्यारोहक असेल तर त्याला स्वतंत्र विमा घ्यायला लावतात. त्यामुळे टॅक्सपेयर वर अनावश्यक भार येत नाही. युरोपातही अशा पद्धतीची यंत्रणा आहे. भारतातील नियम माहिती नाही. त्यामुळे लेखिका टॅक्सपेयर आहे की नाही पेक्षा भारतातील नियम काय याची माहिती अधिक उपयोगी पडेल. कुणाला माहिती असेल तर प्लीज लिहा.

मिडीयातून रोज लहान-मोठ्या प्रवासात स्त्री असुरक्षित असल्याच्या इतक्या बातम्या येतात की ही लेखमाला परीकथेपेक्षा सुरस आणि सुरम्य वाटत आहे. भारतीय बाई मिहीर विरानी मेला तरी तुलसी विरानी साठी रडते. "जपून गं, आता कुठल्या कागदावर सही करू नको" असे गवार निवडता निवडता तुलसीला ऐकू जाणार नाही तरी सल्ले देते. Happy मग इथे तर लेखिका ऐकू शकते, लिहू शकते. सो प्लीज कट देम सम स्लॅक... उगीच अमुक-ढमुकने निगेटीव्ह/पॉझिटीव्ह कॉमेंट केल्या म्हणण्यात काय अर्थ आहे. होते काहींची भावनिक गुंतवणूक किंवा असतात काही लोक टू रॅशनल. संस्थळावर लिहीण्यात आणि वाचण्यात हीच तर खरी गंमत असते.

सीमा +1

लेखिकेला नाही का दोन पोलिसांनी मदत केली? निव्वळ स्वतःला काही तरी वेगळं करायचं आहे म्हणून किंचितही प्लॅंनिंग न करता दुर्गम भागात जाऊन सरकारी यंत्रणेवर थोडा का होईना भार टाकणे हे योग्य आहे का? आली लहर आणि केला कहर टाईपच आहे हे!

हा ही भाग आवडला. छान चाललाय प्रवास.
तंबूत राहणं मला नेहमीच आवडतं. मजा येते, खासकरून असं एकटं, डोंगरावर.

Pages