फुल्ल गर्दीत सोडला कुण्णीतर्री

Submitted by सिद्धेश्वर विला... on 31 December, 2019 - 03:34

फुल्ल गर्दीत सोडला कुण्णीतर्री

कुबट घाण वास

लोक सारी हैराण झाली ,

जणू नको झाला श्वास

घु खाऊन बी येणार नाही

इतका भयानक होता

कोणी सोडली हि दुर्मिळ ढूसकी ?

कोण हीचा निर्माता ?

शोधू लागलो चेहरे सारे

पण सारेच निर्विकार

कोणीही त्यातील वाटत नाही

मग कोण हा ढूसकीकार ?

केस जळाले , श्वास कोंडला

अहो किती हा अत्याचार ?

कोण घेऊनि सडका बोचा

उडवतो वासांचे हे बार

दहशतवादी परवडले राव

ते गोळ्या घातलात थेट

असले ढुसके नको रे बाबा

उचमळून टाकले बाहेर ऑम्लेट

आधीच वास , त्यात नको तो त्रास

हतबल झाले सारे

ढुसकीकार मात्र निर्विकारपणे

सोडे वासाचे फवारे

दीन बापुडे घेऊनि नाके

कोंडूनी धरती श्वास

गुदमरूनि गेल्यावर सोडती

मग पुन्हा येई घाण वास

कुठले पांग मी आता फेडितो

हे समजत नव्हते मजला

माफी मागत सुटलो साऱ्यांची

ढुसक्या बाजूला राहिला

===============================

सिद्धेश्वर विलास पाटणकर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

तूज्या घाण वास मारनाऱ्या लिखाणाला मायबोलीवर टाकून कशाला घाण करायलास रं?. पळ इथनं, तुजं लिवलेलं पण मागं ठिवू नकू. जवा तवा संस्कार दाकिवतो हिकडं.

धन्यवाद तुलसी साहेब .. धन्यवाद .. जरा आम्हालापण यांचे नवगावफेलफूल कळले तर बरे होईल ...