सोनचाफा : ३ शेवट . . .

Submitted by सोहनी सोहनी on 28 December, 2019 - 02:24

https://www.maayboli.com/node/72830 - - सोनचाफा : १

https://www.maayboli.com/node/72833 सोनचाफा : २

सोनचाफा : ३ शेवट . . .

-- - - - - - -
"मी निघालीये मैत्रिणींसोबत जायला आणि तू दिलेली मरूम रंगाची कुर्ती घातलीय, खूप छान दिसतेय, तू बाहेर ये म्हणजे दिसेल तुला” मी फोन ठेवून डोळे चोळत वरच्या रूमच्या बाहेर उभा राहिलो.

श्री २ ३ मिनिटात बाहेर आली, किती गोड़ दिसतेय, मला पाहून कसली लाजली, २ मिनीत एकमेकांना पाहतच राहिलो. वाटलं तिने जाऊच नये, थांबवून घ्यावं तिला, मी मेसेज करणार होतो नको जाऊस प्लिज, आज आपण बाहेर जाऊयात तू सांगशील तिथे,
तोच हॉर्न वाजला आणि ति त्यांच्या नकळत मला बाय करून निघून गेली....

श्री गेल्यापासून कसली हि हुरहूर, मन थाऱ्यावर नसल्यासारखं, अचानक थकवा जाणवतोय आतून, जाऊदेत. . . थोडा टीव्ही पाहुयात बरं वाटेल . ..

__ __ __ __ __

हिटलरच्या फालतू सिरीयल चालू होत्या, खूप मज्जा घेऊन पाहत होती, एक तास मी तिथेच बसलोय आणि तिला त्याच काहीच नव्हतं, मी हि असाच बसलो होतो.
तिला काय झालं देव जाणो आणि अचानक तिने न्यूज चॅनेल लावला.
सगळीकडे पाऊस, कुणी बुडालं, कुणी वाहून गेलं, आवाज येत राहिले आणि मी हि वाहून गेलो, माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात काळ्या पावसात.

श्री गेली, मी पूर्ण दिवस तिच्या कॉलची मेसेजची वाट पाहत राहिलो, संध्याकाळ उलटून गेली न राहवून मी फोन केला, पण बंद . . .
काय झालं काही कळायला मार्ग नाही, नक्की कुठे गेलीये, मी पण मूर्ख नीट पत्तादेखील विचारला नाही तिला. ते कुठे आहे काही माहित नाही जाणार तरी कुठे शोधायला, पण मी खूप घाबरलो. घरी तरी कसं जाणार विचारायला, नाहीच राहून मी आठेक वाजता तिच्या दारावरून हळूहळू चालत गेलो. आतून कोणाच्यातरी रडण्याचा आवाज येत होता, मी आता अजूनच घाबरलो, तिचे वडील फोनवर बोलत होते ते ऐकलं, "अहो बातमीमध्ये श्री नाही दिसत आहे, ती ठीक असेल, पोलीस तिकडे गेले आहेत आणि श्रीचा मामा आणि भाऊ तिकडेच आहेत"

काहीतरी झालं काळजात, पण मला ती भावना तिथल्या तिथेच नष्ट करावीशी वाटली इतकी भयानक भावना. मी धावत जाऊन घरी टीव्ही लावली, सगळे चॅनेल लावले, आणि एका चॅनेलवर बातमी पाहून हादरलो. . .
चार मुलींचा कड्यावरून कोसळून मृत्यू. . तीन मुलींचे शव सापडले. चौथ्या मुलीला शोधत होते. त्या तीन मुलींचे चेहरे पाहून मी जागचा खाली कोसळलो. श्री सोबत गेलेल्या त्या तीन मुली होत्या आणि चौथी डेडबॉडी मिळाली होती. मी अर्धा मेलोच होतो.
मुरूम रंगाच्या कुर्ती मध्ये माझी श्री निष्प्राण पडली होती.
हृदयातून एक कळ मेंदूपर्यंत पोहोचायला मी बेशुद्ध होतो. . .

"वाटेवरून परतीच्या तुझ्यासवे फुललेला तो स्वर्णचाफा देखील कोमेजला
तू हलकेच हात हातीचा सोडता जीवनफूलाचा पराग पार उडुनी गेला . . ."
__________

आम्ही अगदी लहानपणा पासूनच ओळखतो तुमच्या केदारला, सानुला लहानपणापासून आवडतो म्हणाली.
म्हणून तर आम्ही स्वतः पुढाकार घेतला. . .

"आई मला तिच्यासोबत एकांतात बोलायचं आहे..." मी वैतागून म्हणालो, हिला पण अक्ख्या जगात मीच सापडलो प्रेम करायला. लहानपणी मैत्री होती म्हणून लगेच प्रेम बीम, सगळा घोळ करून ठेवला. मी भाराभार विचार करत होतो. .

हो हो काही हरकत नाही, जा सानू, केदारला वर टेरिस वर घेऊन जा . . .

हे बघ सानू, मला हे लग्न नाही करायचं, पण आई ऐकत नाहीये. तुम्ही स्वतः पुढाकार घेतला आहे लग्नाला म्हणून मला तुला सगळं स्पष्ट सांगायला लागत आहे. आणि तुझ्या विषयी माझ्या मनात असं कधीच नव्हतं आणि आत ते मी ठरवून पण अनु शकत नाहीये.
तू मला पहिल्यापासून ओळखतेस, माझ्या नात्यात लागतेस, आणि आई म्हणाली मी तुला पहिल्यापासून आवडतो त्यामुळे मी आईला नकार देऊ शकत नाही ती हल्ली सगळं तब्येतीवर घेते. . .
पण माझं प्रेम आहे एका मुलीवर, मी नाही विसरू शकत तिला केव्हाच. दोन वर्षाआधी ती एका अपघातात मला कायमची सोडून गेलीये पण . . . . तू नकार दे ह्या लग्नाला प्लिज. तुझी उगीच फरफट होईल. . ." मी तिला सगळं सांगून टाकलं.

" कधीतरी लग्न करशील ना?? आयुष्यात पुढे जावंच लागणार. . . मग आता का नाही??"

मला पुढचं काही माहित नाही, पण माझ्यामुळे मला कोणाचं आयुष्य बिघडवायचं नाहीये, म्हणून ऐक तू माझं, नकार दे . . .

" माझं तुझ्यावर प्रेम आहे, मी थांबायला तयार आहे, तुला हे नातं स्वीकारायला वेळ देत आहे, तरीही ??? "

मी निरुत्तर होऊन त्या संध्याकाळी आईला घरी सोडून रात्रभर विचारांत वणवण भटकत राहिलो . . .
________

आईला भेटून आलो आज तिचं पुन्हा तेच तेच . . . पण आज मनाला खुप लागलं. बरोबर तर म्हणाली ती, दुसरी कुणी असती तर केव्हाच सोडून गेली असती. हिचं खरंच माझ्यावर प्रेम आहे. करते चिडचिड, रागावते, वैतागते पण तिची तरी काय चूक त्यात. . .
आपण सुधारू लवकर ह्या आशेवर बिचारीची किती वणवण झाली. . . एकट्यात किती रडते, तिच्या मनातलं दुःख आपल्या दिसू नये म्हणून चिडायचं नाटक देखील करते. . .

तक्रार देखील करत नाही कसली कारण तिने स्वतःच हे नातं स्वीकारलं आहे म्हटल्यावर पण किती दिवस . . .. . . .

सकाळी सकाळी उठलो ते रात्री एक निर्णय घेऊनच, आज संपूर्ण घर माझ्या मानासारखं प्रसन्न वाटत होतं.
दरवळ सोनचाफ्याची, बाहेर आलो तर देव्हारा आज सोनचाफ्यांनी सजला होता . . .

हिला सगळी कडे शोधली पण कुठेच सापडली नाही, आज कधी नव्हे ते जीव कासावीस झाला, पुन्हा एकदा. . .
मला पुन्हा कोणाला हरवायचं नाहीये. मी वेड्यासारखं शोधलं पण कुठेच नाही. घर सोडून तर गेली नाही ना??
मला अचानक रडायला आलं, मी धावत बाहेर आलो, मी व्याकुळतेने सोनचाफ्याकडे पाहत राहिलो.

"छान बहरलाय नाही आज?? कितीतरी दिवसांनी असा मनासारखा बहरलाय" ओंजळीत फुलं घेऊन सोनचाफ्याचं सुगंध संपूर्ण श्वासांत भरत ती माझ्याबाजूला उभी होती. . .

मी व्याकुळतेने तिला जवळ घेतलं, ती आश्चर्याने एकाच जागी स्तब्ध होऊन राहिली. . .
ह्या सोनचाफ्याच्या साक्षीने मी एका नवीन आयुष्याला सुरुवात केली, कदाचित ह्या एका निर्णयासाठी तोही बहरायचा थांबला होता . . .

श्री म्हणाली होती, आहे तो क्षण जगून घ्यायचा, पुढे काय होईल कोणाला माहित.
मी श्रीला गमावली आहे, पण नशिबाने अजून एक प्रेम करणारी व्यक्ती दिली आहे तिला मी नाही गमावणार. . .
खूप उशीर लागला मला हे कळायला पण आहे ते स्वीकारणार आहे मी, भूतकाळातून बाहेर येऊन भविष्य सावरायचा प्रयत्न करणार आहे . . . शेवटी काय, आपण कोणावर प्रेम करतो ते मिळत नसताना त्याच्या मागे लागण्यापेक्षा जो आपल्यावर खरं प्रेम करतो त्यावर प्रेम केलं तर आपणच जास्त आनंदी राहतो . . .

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

चांगले लिहिता पण लिहिल्यावर एकदा वाचून का नाही पाहात? किती त्या चुका? मी जगाचा कोसळलो म्हणजे काय हे वाचकांनी समजून घ्यायचे का?

इतके स्वतःच्या लेखनाच्या प्रेमात पडू नका की त्यातल्या चुका तुम्हाला दिसणार नाहीत.

सुंदर लिहीतेस... प्रश्नच नाही. कथानक ही वेगळे असते.
भाग उशिरा आला तरी चालेल. फक्त वाक्ये आणि शुद्धलेखनाकडे थोड लक्ष दे.

मनापासून सॉरी, मी दोन वेळा तपासून पाहते, पण पुढच्या वेळेस जास्त काळजी घेईल शुद्ध लेखनाची.
स्वतःच्या लिखाणाच्या इतक्याही प्रेमात नाहीये मी सो सुधारणा चुका नक्कीच पाहीन.
सांगितल्या बद्दल मनापासून आभार .

छान.

मनापासून सॉरी, मी दोन वेळा तपासून पाहते, पण पुढच्या वेळेस जास्त काळजी घेईल शुद्ध लेखनाची.>>>

ठीक आहे. तुम्ही छान लिहिता त्यामुळे वाचावेसे वाटते पण चुका बोचतात, कंटाळा येतो वाचायचा. म्हणून परत परत अलिप्तपणे वाचून बघा म्हणजे चुका दिसतील.